‘तो’भरदिवसा घरफोडी करून पसार झाला… मात्र पोलिसांनी अटक केलीच…

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील कोसेगव्हाण येथे भरदिवसा घराचे कुलूप तोडून रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी पारनेर तालुक्यातील घाणेगाव शिवारात कोबिंग ऑपरेशन राबवुन रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार राजु आजगन उर्फ अर्जुन काळे (वय ३५) याला जेरबंद केले. तसेच त्याने साथीदारासोबत घरफोडीचा गुन्हा केल्याचे … Read more

उडीदाची काढणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचे भरदिवसा घर फोडले

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- सध्या खरीप हंगामातील पिके काढण्याची शेतकऱ्यांची लगबग चालू आहे. शेतात उडीद पिकाची काढणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या घरावर अज्ञात चोरांनी भरदिवसा डल्ला मारून ऐवज लंपास केला. जामखेड तालुक्यातील वंजारवाडी येथे रात्री व दरडवाडी येथे भरदिवसा चोरी होऊन दीड लाखाचा ऐवज चोरीस गेला . दरडवाडी येथील बाळू अशोक खाडे यांच्या घराचे … Read more

टाकळी ढोकेश्वर येथे चोरटयांनी एटीएम चोरीचा केला प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- पारनेर तालुक्यातील नगर कल्याण हायवे वरील टाकळी ढोकेश्वर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शेजारी असणाऱ्या एटीएमची चोरी करण्याचा प्रयत्न झाला. या चोरांनी एटीएम पळविण्यासाठी चार चाकी वाहनाचाही वापर केला. परंतु एटीएम अर्ध्यावर तुटल्याने व मोठा आवाज झाल्याने चोरट्यांनी पळ काढला. दरम्यान, एटीएम मधील 28 लाख रुपयांची रक्कम सुरक्षित … Read more

बळीराजा हवालदिल ; जिल्ह्यात टोमॅटोचे भाव गडगडले

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- टोमॅटोचे भाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. लाखो रुपये खर्च करुनही टोमॅटो विक्रीला नेल्यानंतर वाहनखर्चही निघेनासा झाल्यामुळे शेतकऱ्याला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. टोमॅटोचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात हाती येऊ लागले असून, बाजारात आवकही वाढली आहे. मात्र, दर गडगडल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. सध्या टोमॅटोला … Read more

कोरोनाच्या भीतीने कृषी विद्यापीठात होणाऱ्या लष्कर भरतीला स्थगिती

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- अहमदनगरमधील राहुरी तालुक्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथे भारतीय लष्कराच्या वतीनं सैन्य भरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. 7 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर दरम्यान सैन्य भरती घेण्यात येणार होती. मात्र जिल्यात कायम असलेला कोरोना तसेच करोनाच्या तिसर्‍या लाटेची भीती आणि करोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता भरती प्रक्रिया स्थगित करण्यात … Read more

महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात कोरोनाची शतकीय खेळी सुरूच

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- जिल्हयाच्या रुग्ण संख्येत 702 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 4 हजार 586 इतकी झाली आहे. दुसरीकडे संगमनेर तालुक्यातील करोना संसर्ग हटण्याचे नाव घेण्यास तयार नाही. संगमनेर वगळता इतर तालुक्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे. संगमनेरमध्ये ९४३ इतके सर्वाधिक सक्रिय रुग्ण आहेत, असे जिल्हा आरोग्य … Read more

तहसीलदार देवरेंच्या वाहनचालकासह दोन महिला डॉक्टरांनी चौकशीला सामोरे जाण्यास टाळले

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- लोकप्रतिनिधींबाबत व्हायरल झालेली ऑडिओ क्लिपप्रकरणी सध्या पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. या प्रकरणाची चौकशीसाठी समिती गठीत करण्यात आली आहे. महिला आयोगाच्या आदेशानूसार गठीत केलेल्या उपजिल्हाधिकारी यांच्या स्तरावरील चौकशी गुरूवारी पूर्ण झाली आहे. या प्रकरणातील 18 जणांना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. मात्र याप्रकरणातील तिघे पारनेर … Read more

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या ! ‘या’ ठिकाणी घडली ही घटना

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- आधीच डोक्यावर असलेले कर्ज व कोरोनामुळे आलेल्या आर्थिक अडचणी. या सर्वाला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. ही दुर्दैवी घटना शेवगाव तालुक्यातील अमरापुर येथे घडली. गोरक्ष रामकिसन पोटफोडे ( वय ५६) असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्यांने गुरुवार दि.२६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ च्या सुमारास आपल्या राहत्या … Read more

नगर जिल्ह्यातील ‘ या’ दोन तालुक्यात नवीन पोलीस ठाण्यास मंजुरी

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आणखी नवे दोन पोलीस ठाणे निर्माण होणार असून जामखेड तालुक्यातील खर्डा आणि कर्जत तालुक्यातील मिरजगाव पोलीस स्टेशनला गृहविभागाने मान्यता दिली आहे. राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे पोलीस ठाणे व्हावे यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. मात्र तेथील मंजुरी न आल्याने नाराजी व्यक्त होत आहे. गृह सहसचिवांचे आदे अहमदनगर जिल्हा … Read more

चोर काय करतील ते सांगता येणार नाही, एटीएम मशीनची काच फुटली अन त्यांचा प्लॅन फसला..

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- अलीकडे चोरटे चोरी करण्यासाठी काय करतील ते सांगता येणार नाही. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम मशीन गाडीला बांधून ओढत घेवून जाण्याचा बेत होता. तसा त्यांनी प्रयत्न देखील केला मात्र काच फुटली अन सर्व प्लॅन फसला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, काल मध्यरात्री २ वाजण्याच्या … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : गेल्या चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- जिल्ह्यात आज ८२३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ०८ हजार २६४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७०२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

आमदार निलेश लंके यांचा लोककर्मा म्हणून होणार सन्मान

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी कोरोनाच्या काळात जनतेची मोठी सेवा करुन हजारो कोरोनो रुग्णांचे प्राण वाचविले. या कार्याचा सन्मान म्हणून पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने आमदार लंके यांना लोककर्मा म्हणून जाहीर सन्मान केला जाणार असल्याची माहिती संघटनेचे निमंत्रक अ‍ॅड. कारभारी … Read more

रिपब्लीकन पार्टीच्या नूतन पदाधिकार्‍यांची नियुक्ती

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :-रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया (ए) आंबेडकर गटाच्या विविध पदाधिकार्‍यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये पाथर्डी तालुकाध्यक्षपदी सचिन मिरपगार, चर्मकार आघाडीच्या राहाता तालुकाध्यक्षपदी गणेश सोनवणे, राहुरी तालुकाध्यक्षपदी गंगाराम मोहोरे यांची निवड करण्यात आली. या नूतन पदाधिकार्‍यांना जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब … Read more

डुकरासाठी लावलेल्या सापळ्यात गेला अन जीवाला मुकला…!

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :-  उसाचे नुकसान करू नये म्हणून उसाच्या शेतात डुकरासाठी लावलेल्या वीज प्रवाह असलेल्या तारेला चिकटुन एकाचा मृत्यू झाला. ही घटना पाथर्डी तालुक्यातील साकेगाव येथे घडली. खड्या रामु चव्हाण असे त्या मृत इसमाचे नाव आहे. रात्रीच्या वेळी ही घटना घडल्याने तब्बल दोन दिवसानंतर घटना उघडकीस आली. याप्रकरणी गोपाळ रायभान भोसले … Read more

शेवगाव तालुक्यातील मावा विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :-  शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे मावा विक्री करणाऱ्या चार जणांविरुध्द नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत १६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पो.ना. संतोष शंकर लोढे यांच्या फिर्यादीवरुन चार जणाविरुध्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेस शेवगाव … Read more

खून करून सासुरवाडीत लपला मात्र…!

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- कर्नाटक राज्यात दरोडा टाकून मुलीचा खून करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नगर तालुक्यातील वाकोडी फाटा येथे जेरबंद केला. संतोष नंदू भोसले असे त्या आरोपीचे नाव असून तो सासुरवाडीला लपून बसला होता. कर्नाटक राज्यातील कलादगी पोलीस ठाणे हद्दीत अज्ञात आरोपींनी दरोडा टाकून मुलीची हत्या केली होती. तर … Read more

‘या’ गावात गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांचा छापा..!

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :-  विनापरवाना बेकायदा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गावठी हातभट्टी दारुचे उत्पादन करणाऱ्या वाळकी शिवारातील अड्ड्यावर नगर तालुका पोलिसांच्या पथकाने छापा टाकून ३१ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करूनहा अड्डा उदध्वस्त केला आहे. याबाबतची माहिती अशी की नगर तालुक्यातील वाळकी येथील धोंडेवाडी तलावाच्या भिंतीच्या आडोशाला गावठी हातभट्टी दारूचा अड्डा सुरू असून मोठ्या … Read more

लसीकरण केंद्रावरील वाढता हस्तक्षेप थांबवा…

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लसीकरण हा सध्या एकच उपाय दिसून येत आहे. यामुळे नागरिकांची लसीकरणासाठी मोठी गर्दी लसीकरण केंद्राबाहेर वाढू लागली आहे. यातच अनेक ठिकाणी वशिलेबाजी व राजकीय हस्तक्षेप वाढला आहे. यामुळे वादजन्य परिस्थिती निर्माण होऊ लागली आहे. असाच काहीसा प्रकार श्रीगोंदा तालुक्यात झालेला आढळून येऊ लागला आहे. श्रीगोंदा … Read more