अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :- सध्या खरीप हंगामातील पिके काढण्याची शेतकऱ्यांची लगबग चालू आहे. शेतात उडीद पिकाची काढणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या घरावर अज्ञात चोरांनी भरदिवसा डल्ला मारून ऐवज लंपास केला.

जामखेड तालुक्यातील वंजारवाडी येथे रात्री व दरडवाडी येथे भरदिवसा चोरी होऊन दीड लाखाचा ऐवज चोरीस गेला . दरडवाडी येथील बाळू अशोक खाडे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करून बेडरूमच्या कपाटात उचका पाचक करून त्यातील एक लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा ऐवज लंपास केला. भर दिवसा दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान ही चोरीची घटना घडली.

सध्या खरीप हंगामातील पिके काढण्याची शेतकऱ्यांची लगबग चालू आहे. बाळू खाडे हे शेतात उडीद पिकाचे काढणी करण्यासाठी गेले असता चोरट्यांनी त्यांच्या घरावर भरदिवसा डल्ला मारून ऐवज लंपास केला. तसेच मारुती भगवान गंभीरे, वंजारवाडी यांचे खर्डा सोनेगाव रस्त्यावर शेती अवजारे संदर्भात असलेल्या दुकानात ४३३६० रुपये किमतीचे इलेक्ट्रिक मोटर, मोटारीची केबल, सबमर्सिबल केबल,तांब्याची वायडींग तार व इलेक्ट्रिक वजन काटा असा ऐवज चोरट्यांनी रात्री दुकानाचे शटर तोडून लंपास केला.

ही चोरीची घटना समजतात अहमदनगर येथून श्वान पथकाला पाचारण करण्यात आले,परंतु श्वान पथकातील श्वान दुकाना परिसरात फिरले. चोरटे वाहनांमध्ये येऊन लंपास झाले असावेत म्हणून कुठलाही सुगावा अद्याप लागला नाही. वंजारवाडी व दरडवाडी या दोन्ही चोरीचे गुन्ह्याची फिर्याद जामखेड पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली.