file photo

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आणखी नवे दोन पोलीस ठाणे निर्माण होणार असून जामखेड तालुक्यातील खर्डा आणि कर्जत तालुक्यातील मिरजगाव पोलीस स्टेशनला गृहविभागाने मान्यता दिली आहे.

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे पोलीस ठाणे व्हावे यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. मात्र तेथील मंजुरी न आल्याने नाराजी व्यक्त होत आहे. गृह सहसचिवांचे आदे अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षकांना प्राप्त झाले असून विभाजित नवीन पोलीस ठाण्यांची हद्द ठरवून तातडीने मान्यतेसाठी पोलीस महासंचालकां कडे पाठवण्याचे सांगण्यात आले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा आणि कर्जत तालुक्यातील मिरजगाव या ठिकाणी नवीन स्वतंत्र पोलिस ठाणे निर्माण करण्यासाठी गृहविभागाने परवानगी दिली असून, आता खर्डा आणि कर्जत या ठिकाणी स्वतंत्र पोलिस ठाणे निर्माण होणार आहेत. दोन्ही पोलीस ठाण्यात ३५-३५ असे पोलीस बळ असणार आहेत.

यात एक सहायक पोलिस निरीक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक, तीन सहायक फौजदार, सहा पोलीस हवालदार, नऊ पोलीस नाईक आणि पंधरा पोलीस शिपाई असे अधिकारी-कर्मचारी बळ असणार आहेत. दरम्यान राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे नवीन पोलीस स्टेशन मंजुरी येईल अशी अपेक्षा होती.

मात्र निराशा पदरी पडली आहे . राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच देवळाली प्रवरा आपलं आजुळ असल्याचे आवर्जुन सांगतात. त्यांनी देवळाली प्रवरा पोलीस ठाण्यासाठी लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे.

नगर जिल्ह्यात यामागील सरकारने शनि शिंगणापुर व आश्वी असे दोन पोलिस ठाणे नवीन निर्माण केली होती. आता जामखेड मधील खर्डा तर कर्जत मधील मिरजगावला नवीन पोलिस ठाणे होणार असुन देवळाली प्रवराच्या नशिबी अद्याप प्रतीक्षा आहे.