अहमदनगर जिल्ह्यातील कर्जमाफीसाठी प्राप्त झाला इतक्या कोटींचा निधी

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- महाविकास आघडी सरकारच्यावतीने देण्यात येणार्‍या कर्जमाफीत नगर जिल्ह्यात मंगळवारीअखेर 511 कोटींचा निधी जिल्हा बँकेच्या खात्यावर वर्ग करण्यात आहे. हा निधी येत्या दोन दिवसांत बँकेच्या 85 हजार 579 शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती सहकार विभागाकडून देण्यात आली. जिल्ह्यात पात्र 1 लाख 75 हजार कर्ज खात्यांचे आधार प्रामाणिकरण करण्यात आले … Read more

उसने पैसे मागितल्याने जीवे मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- उसने पैसे मागितल्याच्या रागातून तलवार व लाकडी दांडक्याने मारहाण करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना झारेकर गल्लीत घडली. महेश अशोक चव्हाण (२९, आदर्श नगर, कल्याण रोड, नगर) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी चव्हाण यांच्या फिर्यादीवरून रविंद्र सुरेश बारस्कर, आशा रवींद्र बारस्कर, सागर सुरेश बारस्कर, निखिल कैलास बारस्कर, अविनाश सुरेश … Read more

शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये – प्रा. शशिकांत गाडे

पाथर्डी : राज्यात बळीराजाचे सरकार आले असून, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार सर्वसामान्य शेतकऱ्यांना केंद्रबिंदू म्हणून दिलासा देण्याचे काम करणार असून, कोणत्याही शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी केले. पाथर्डी तालुक्यातील शिराळ येथील जि. प. प्रा. शाळेत मिरी -करंजी गटातील प्राथमिक शाळांच्या वतीने आयोजित बालआनंद मेळाव्याचे उद्घाटन राहुरी … Read more

वाढत्या चोऱ्यांबाबत मंत्रालयातील गृह विभागात बैठक घेणार

अहमदनगर : शहरातील वाढत्या चोऱ्यांबाबत उपाययोजना करण्यासाठी मंत्रालयातील गृह विभागात लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आ. संग्राम जगताप यांनी दिली. महापालिकेत काल सोमवारी (दि.२) पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शहर विकास आराखड्यातील रस्ते तयार करण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य शासनाकडून निधी मिळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. … Read more

अहमदनगर जिल्ह्यात दहा ठिकाणी सुरु झाले शिवाभोजन !

अहमदनगर : शिवभोजन योजनेद्वारे सध्या शहरात मंजूर असलेल्या पाच केंद्रांत ९०० थाळीचे शिवभोजन सुरू होते. दरम्यान अनेक गरजूंना थाळी संख्या पूर्ण झाल्याने माघारी जावे लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणखी ५ केंद्रांना मंजुरी दिली होती. या पाचही केंद्रांना जिल्हाधिकारी यांनी कार्यारंभ आदेश दिल्यानंतर काल रविवारपासून शहरात ऐकून दहा केंद्रांत १ हजार … Read more

गुन्हा दाखल केला तर तुमची व्हिडीओ क्लिप आम्ही व्हायरल करू !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अत्याचार प्रकरणातील दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी पतीपत्नीस विवस्त्र करून मारहाण करण्यात आल्याची घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. या मारहाणीत पोलिसांचाही समावेश असल्याचा पीडित पती-पत्नीचा आरोप आहे. जर याबाबत तक्रार दिली तर व्हिडीओ व्हायरल करून पीडितेच्या पतीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी आरोपींनी दिल्याचा दावाही संबंधितांनी केला आहे. २०१६ मध्ये एका विवाहित … Read more

कर्जमाफीच्या आनंदावर एका क्षणात विरजण !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- रविवारी कर्जमाफीची दुसरी यादी प्रसिद्ध झाली. शेतकरी सुखावले असतानाच दुसरीकडे अनेक भागात झालेल्या अवकाळी पावसाने आनंदावर विरजण पडले. जिल्ह्यात रविवारी झालेल्या अवकाळी व गारपिटीच्या पावसामुळे सुमारे १ हजार ५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. नुकसानीचा प्राथमिक अहवाल महसूल विभागाने राज्य सरकारकडे सोमवारी सादर केला. अवकाळीचा सर्वाधिक फटका शेवगाव व पाथर्डी तालुक्याला बसला. … Read more

महाविकास आघाडी सरकारबाबत आमदार शिवाजी कर्डिले म्हणतात…

अहमदनगर लाईव्ह24 टीम / करंजी :– राज्यातील शेतकऱ्याला भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. सरसकट कर्जमाफी केली जात नाही. दुष्काळी परिस्थितीत पशुधन वाचवणाऱ्या छावणीचालकांकडे डोळेझाक केली जात आहे. एकूणच राज्यातील महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांबाबत असंवेदनशील आहे, अशी टीका माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केली. पाथर्डी तालुक्यातील मोहोज खुर्द येथे जिल्हा परिषदेंतर्गत मंजूर सुमारे साठ लाख रुपये … Read more

शासनाकडून फसवणूक होत असल्यानेच ‘त्या’ आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह24 टीम/ पाथर्डी :- राज्य सरकारचे कर्जमाफीचे धोरण फसवे आहे. शेतकऱ्यांची शासनाकडून फसवणूक होत असल्याने मल्हारी बटुळे यांनी आत्महत्या केली. राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून पालकमंत्री, तसेच जिल्ह्यातीलच असलेल्या महसूलमंत्र्यांनी याकडे गांभीर्याने पहाणे गरजेचे होते.  मात्र, शेतकरी आत्महत्यांपेक्षा त्यांना सरकार टिकवणे महत्त्वाचे वाटत असल्याने ते अद्याप फिरकले नाहीत. या प्रश्नावर चालू अधिवेशनात सरकारला जाब विचारू, … Read more

अहमदनगर महापालिकेत हिरक महोत्सवी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ

अहमदनगर : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या हिरक महोत्सवानिमित्त राज्यभरात दोन महिने स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. नगर शहरात या नागरी स्वच्छता अभियानासह सिंगल युज प्लॅस्टिक मुक्त शहर अभियानाचा शुभारंभ रविवारी (दि.1) महापौर बाबासाहेब वाकळे व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते करण्यात आला.  सावेडी येथील जॉगिंग ट्रॅक परिसरातून या अभियानास सुरूवात करण्यात आली. यावेळी उपायुक्त सुनील पवार, … Read more

अहमदनगर जिल्ह्यात ‘अवकाळी’चा दणका !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- थंडीचा महिना उलटून उबदार उन्हाळ्याची चाहूल लागली असतानाच अवकाळी पावसाने रविवारी नगर शहरासह जिल्ह्यातील काही भागात हजेरी लावली. काही भागात गारांचा मारा झाल्याने दाणादाण उडाली.  शेवगाव आणि पाथर्डी शहर तसेच तालुक्यातील विविध भागांत काल अवकाळी पावसाने तडाखा दिला. काही ठिकाणी गारपिटही झाली. या आस्मानी संकटात गहू, हरभरा, ज्वारीसह आंबा आणि संत्रा … Read more

२६ वर्षे जनतेला हसवले पण आज मला रडावं लागतंय ….

जीवन जगवण्यासाठी हसणे महत्त्वाचे आहे. त्या साठीच आजपर्यंत २६ वर्षे कीर्तन सेवेच्या माध्यमातून जनतेला हसवत आलो. पण आज मला रडावं लागतंय, अशी खंत निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी व्यक्त केले. आठवड येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाबासाहेब गुंजाळ यांच्या मातोश्री सोनाबाई माणिकराव गुंजाळ यांच्या स्मृतीिदनानिमित्त आयोजित कीर्तनात ते बोलत होते. या वेळी माजी आमदार … Read more

आजपासून पाच दिवसांचा आठवडा !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-शासकीय कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण हलका करण्यासाठी महाविकास आघाडीच्या सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेतला होता. त्याची शनिवार २८ फेब्रुवारीपासून अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासह विविध शासकीय कार्यालये बंद राहणार आहेत. दरम्यान, या निर्णयाचे सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांनी स्वागत करून सुटीच्या मोबदल्यात अधिक काम करण्यासाठी वचनबद्ध राहण्याची शपथ … Read more

दगडाला पाझर फुटणारी घटना; आत्महत्या करू नका, असे आवाहन करणाऱ्या विद्यार्थ्याच्या वडिलांनीच केली आत्महत्या

Farmer Suicide In Maharashtra

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका, असे कवितेतून आवाहन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वडिलांनीच केली रात्री आत्महत्या पाथर्डी तालुक्यातील धक्कादायक घटना दगडाला पाझर फुटणारी घटना. पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव परिसरातील भारजवाडी येथील हनुमान नगर जिल्हा परिषद शाळेतील विदयार्थी प्रशांत बटुळे याने काल बुधवारी दुपारी शाळेत कार्यक्रमात शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, म्हणून एक कविता स्वतःहून सादर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बायकोच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  श्रीगोंद्यात बायकोच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची धककादायक घटना समोर आली आहे.मयताने आत्महत्येपूर्वी बायको व सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत लिहले आहे. अमोल शिंदे असे मयताचे नाव असून याप्रकरणी अमोलचे आई -वडील मीना चंद्रकांत शिंदे यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पत्नी काजल शिंदे, सासरा दत्तू मेटे, सासू … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिवद्रोही श्रीपाद छिंदम याचे नगरसेवक पद रद्द !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याप्रकरणी भाजपचे माजी उपमहापौर आणि अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदमला सरकारने मोठा दणका दिला आहे. सरकारकडून श्रीपाद छिंदम याचे नगरसेवक पद रद्द करण्यात आले आहे. महापुरुषांबद्दल अवमानकारक शब्द वापरल्या प्रकरणी त्याच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. तत्कालीन महापालिकेतील सभागृहाने त्याचे पद रद्द झाले पाहिजे, यासाठी ठराव केला होता. छिंदम निवडणुकीला … Read more

भगवान गडावरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

अहमदनगर लाईव्ह24 टीम / पाथर्डी :- तालुक्यातील भगवानगडावरील वास्तुसंग्रहालयातून भगवानबाबा यांनी वापरलेली २ बोअरची एक रायफल व तलवार चोरीला गेल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. गडावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन संशयित आरोपी दिसत असून त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे भगवान गडावरील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही रायफल संत भगवानबाबा स्वतः वापरत होते. वस्तू वस्तुसंग्रहालयात … Read more

आश्वासन देणारे मंत्री प्रत्यक्षात कृती मात्र अन्यायाची करत आहेत…

अहमदनगर लाईव्ह24 टीम / राहुरी :- सत्तेत आलेल्या मंत्र्यांनी देसवंडीच्या बंधाऱ्याच्या माध्यमातून एकाच्या तोंडातला घास हिसकावून दुसऱ्याचे पोट भरण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांचे आहे की मंत्र्यांचे असा सवाल देसवंडीच्या अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. अन्यायग्रस्त भागातील शेतकऱ्यांचा देसवंडी बंधाऱ्याला विरोध नसून त्याची जागा बदलल्यास अन्यायग्रस्त भागातील शेतकऱ्यांनाही या बंधाऱ्याचा फायदा होईल, … Read more