पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळाले मास्क, विदूषकाची टोपी फुगे अन खाऊ…

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- नव्याने प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांना मास्क, मुखवटा, विदूषकाची टोपी, फुगे, खाऊ आणि छान छान गोष्टीचे पुस्तक देऊन त्यांचे गोपाळवाडी (ता. राहुरी) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतर्फे स्वागत करण्यात आले. पहिल्याच दिवशी मिळालेल्या या भेटी मुळे मुलांना आनंद झाला. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ ची सुरवात मंगळवारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित तरी मोठ्या उत्साहात … Read more

या तालुक्यात सुरु असलेल्या अवैध दारू विक्री अड्यावर पोलिसांचा छापा

अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. यातच याला रोख बसावा यासाठी पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. यातच राहुरी तालुक्यात पोलिसांनी अवैध धंदे चालकांवर कारवायांचे सत्र सुरु केले आहे. राहुरी तालुक्यातील वांबोरी शिवारात दोन वेगवेगळ्या ठिकाणी अवैध दारू विक्री अड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी २५०० रूपयांचा … Read more

वारंवार होणाऱ्या पाणी गळतीमुळे राहुरीकर त्रस्त; पाण्यासाठी होतेय भटकंती

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- जिल्ह्यात मागील वर्षी चांगले पर्जन्यमान झाल्याने जिल्ह्यातील धरणे, तलाव, नद्या हे तुडुंब भरून वाहिल्या. एवढे असतानाही आजही जिल्ह्यात अनेक ठिकाणी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. अशीच काहीशी घटना राहुरी तालुक्यात घडलेली दिसून येत आहे. राहुरी तालुक्यातील मुळा धरणातून चौदा गावची पाणी योजना गेल्या चार दिवसापासून बंद … Read more

दैनंदिन व्यवहार सुरु करण्यास परवानगी असली तरी नियमांचे पालन बंधनकारक: जिल्हाधिकारी डॉ. भोसले

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- जिल्ह्यात निर्बंध शिथिल झाल्यानंतर काही भागात लग्न समारंभ अथवा इतर सोहळ्यांसाठी नागरिक गर्दी करताना दिसत आहेत तसेच प्रतिबंधात्मक नियम आणि कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन त्यांच्याकडून होताना दिसत नाही. त्यामुळे तालुकास्तरीय यंत्रणांनी याबाबत अधिक दक्ष राहून कोरोना प्रादुर्भाव वाढणार नाही, यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी … Read more

लग्न सोहळ्यात आढळले २२ कोरोना बाधित !

अहमदनगर Live24 टीम, 14 जून 2021 :- राहुरी तालुक्यातील कणगर येथे झालेल्या लग्न समारंभात २२ कोरोना बाधित आढळून आल्याने खळबळ उडाली. बाधित रुग्णांमध्ये नवरदेव, नवरीसह कलवऱ्यांचा समावेश असून या रुग्णांना राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. लग्न समारंभानंतर नवरदेवाला त्रास जाणवू लागल्याने डाॅक्टरांकडे तपासणी करण्यात आली. यावेळी कोविड चाचणीत नवरदेव कोरोना … Read more

मिळालेल्या पदाच्या माध्यमातून पक्ष संघटना बांधणीचे काम आवश्यक

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- शहरी व ग्रामीण भागातील सर्वांगीण विकास हे धोरण राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या धोरणाचा अंमलबजावणी करण्याचे आवाहन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले. राहुरी तालुक्यातील वळण येथील राजू मकासरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका सरचिटणीपदी नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते शनिवारी देण्यात आले. तनपुरे म्हणाले, … Read more

मतिमंद इसमास बेदम मारहाण करणाऱ्या उत्पादन शुल्कच्या कर्मचाऱ्यांना जमावाने चोपले!

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- राज्य उत्पादन शुल्कच्या कर्मचाऱ्यांनी दारुच्या नशेत असताना मतीमंद असलेल्या निरपराध व्यक्तीला अमानुष पणे मारहाण केल्याने चवताळून तरुणांनी त्या कर्मचाऱ्यांना बेदम चोप दिला. जमावाचा रुद्र अवतार पाहून या कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणाहून काढता पाय घेतला. हे कर्मचारी निघून जात असताना तरुणांनी त्यांच्या खाजगी गाडीच्या काचा फोडल्या.राज्य उत्पादन शुल्काच्या एका हि … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ठिकाणाहून मुलीला पळवले

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :-    राहुरी तालुक्यातील डिग्रस येथील एका मुलीला अज्ञात तरूणाने पळवून नेल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली. ९ जून रोजी साडेआठ वाजे दरम्यान ही घटना घडली. या मुलीला तिच्या घरासमोरून अज्ञात व्यक्तीने पळवून नेले. मुलगी गायब झाल्यानंतर घरातील नातेवाईकांनी तिचा शोध घेतला माञ मुलीचा शोध लागला नाही. अखेर मुलीच्या वडिलांनी … Read more

नवरदेव – नवरीसह 23 वर्‍हाडी आढळले कोरोनाबाधित

अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून थाणू मांडलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता बघता जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले होते. यामुळे सोहळे, संभारंभ यांच्यावर देखील निर्बंध लावले होते. मात्र आता अनलॉक होतो तोच काही बेजबाबदारपणाने लागल्याने कोरोनात वाढ झाल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. नुकत्याच एका लग्नसमारंभादरम्यान बाधित झालेल्या नवरी, नवरदेवासह … Read more

आज ६९३ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ६७२ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- जिल्ह्यात आज ६९३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६३ हजार ३२९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६७२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

लग्न पडले महागात… नवरदेवासह २५ वऱ्हाडींना कोरोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :-  राहुरी तालुक्यातील कणगर येथील एका लग्न सभारंभात नवरदेवासह २५ व्यक्ती बाधित निघाल्याने एकच खबळळ उडाली असून नागरीकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन सरपंच सर्जेराव घाडगे यांनी केले आहे. राहुरी तालुक्यातील पश्चिम भागातील कणगर गावातील एका वस्तीवर दोन दिवसांपूर्वी लगाम सभारंभ पार लदल. नवरदेव व नवरीचे घर अवघे … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसची ध्येयधोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवा : राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहाेचवण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून करावे, असे आवाहन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले. राहुरी शहरातील दीपक आनंदा साळवे यांची राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र राज्यमंत्री तनपुरे यांच्या हस्ते साळवे यांना देण्यात आले. पदाच्या माध्यमातून समाजाचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पोलिसांनी पकडले ६१ लाख रुपयांचे चंदन !

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- नगर-मनमाड मार्गावरून मध्यप्रदेशकडे ६१ लाख रुपये किंमतीचे ६५० किलो चंदन घेऊन जाणारा टेम्पो राहूरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने अडवून धडाकेबाज कारवाई करून केरळ राज्यातील दोघांना ताब्यात घेतले आहे. आज शनिवारी दुपारी नगर-मनमाड मार्गावरून 16 बीसी-7999 या क्रमांकाच्या सम्राट कंपनीच्या टेम्पोमधून … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण ! वाचा अधिकृत आकडेवारी…

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या मागील चोवीस तासांत 672 ने वाढली आहे.  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत शहर व तालुकानिहाय पुढीलप्रमाणे रुग्ण वाढले आहेत –  अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

सर्जा-राजाला फाटा देत बळीराजाची आधुनिक शेतीकडे वाटचाल सुरु

अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- राहुरी तालुक्याच्या पूर्वभागातील अनेक गावांमध्ये पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. त्यामुळे या भागात शेतकरीराजाने ट्रॅक्टरच्या साह्याने सोयाबीनची पेरणी सुरु केली आहे. यामध्ये सोयाबीन, मका, कपाशी, या खरीप हंगामातील पिकांची पेरणी सुरू झाली आहे. यापूर्वी शेतकरी राजा सर्जा-राजा, हाऊशा नवश्या असे मोठमोठ्याने ओरडून बैलाच्या पाठीमागे पेरणी करीत होते. मात्र, … Read more

विरोधकांनी साडेचार वर्ष काय केले याचं आत्मपरीक्षण करावं

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- साडेचार वर्ष गप्प बसलेल्या विरोधकांनी राहुरीच्या जनतेसाठी काय केले, याचे प्रथम आत्म परिक्षण करावे. नंतर सत्ताधारी गटावर आरोप करावे. असे प्रतिपादन नगराध्यक्ष अनिल कासार यांनी नगरपरिषद कार्यालयातील सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. दोन दिवसांपूर्वी विरोधकांनी सत्ताधारी गटावर घणाघाती आरोप केले होते. त्यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी सत्ताधारी गटाकडून … Read more

बिबट्याने मध्यवस्तीत घुसून केली शेळी ठार !

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- राहुरी तालुक्यातील अंमळनेर येथे मध्यवस्तीत धुमाकूळ घालत ज्ञानदेव गंगाधर जगताप या शेतकऱ्याची शेळी ठार केल्याची दुर्दैवी घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. जगताप यांनी घराशेजारी गोठ्यात बांधलेली शेळी बिबट्याने संरक्षक जाळी उचकटून शेजारील उसाचा शेतात ओढून नेली. यामुळे जगताप यांचे सुमारे १५ हजाराचे नुकसान झाले आहे.प्रवरा परिसरात बिबट्यांच्या उपद्रव … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कडक निर्बंध हटविल्यानंतर आता रुग्ण संख्या वाढू लागली आहे.  अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 769 रुग्ण वाढले आहेत.  जिल्ह्यातील सर्व तालुकानिहाय वाढलेली रुग्ण संख्या पुढील प्रमाणे आहे –  ahmdnagar corona update अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम