सर्वाधिक विषारी सर्प कोब्राला पकडण्यात सर्पमित्राला आले यश

अहमदनगर Live24 टीम, 11 जून 2021 :- राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे राहणारे दैवत ग्रामीण सह. पतसंस्थेचे अध्यक्ष केशव शिंदे यांच्या घरासमोर निघालेल्या 5 फुटी कोब्रा नागाला पकडण्यात सर्पमित्राला यश आले. दरम्यान शिंदे यांनी तात्काळ संस्थेचे उपाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्याशी संपर्क करून त्यांना सांगितले. मोरे यांनी ताबडतोब श्रीरामपूर येथील सर्पमित्र अमोल राळेगणकर व राहुरीचे सर्पमित्र कृष्णा … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना मृत्यूंचे आकडे लपविले ?

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या वाढलेल्या रुग्ण संख्येमुळे सर्वसामान्य नागरीकांच्या मनात धास्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. काेराेना उपचारादरम्यान मृत्यू झालेल्यांची संख्या अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल २२४ ने वाढली आहे. अचानक मृतांची संख्या वाढल्याने अहमदनगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. अहमदनगर जिल्हा प्रशासन आणि आराेग्य यंत्रणेने यापूर्वी मृत्यूच्या नाेंदी लपविल्या का, … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ११७१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६२ हजार ८१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८६८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

जिल्ह्यातील या परिसरात बिबट्याचा धुमाकूळ; नागरिकांमध्ये दहशत

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्या व त्याच्या हल्ल्याच्या घटना कमी झाल्या होत्या. मात्र आता पुन्हा एकदा जिल्ह्यात बिबट्याने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच बिबट्याने राहुरी राहुरी तालुक्यातील पिंपळगाव फूणगी येथील राऊतवाडी परिसरात मध्यवस्तीत बिबट्याने धुमाकूळ एका शेतकऱ्याच्या दोन शेळ्या ठार मारल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेवरून परिसरातील … Read more

नगरसेवकच झाला ठेकेदार आणि बिघडला कारभार…

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- नगरसेवकच ठेकेदार झाल्याने राहुरी नगर परिषदेचा कारभार बिघडला असून शहराचा विकास या नावाखाली सत्ताधारी मंडळीकडून स्वत:चा विकास होत असल्याचा आरोप परिवर्तन मंडळाचे नेते रावसाहेब चाचा तनपुरे यांनी केला. परिवर्तन मंडळाच्या वतीने रावसाहेब चाचा तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी राहुरी नगर परिषद प्रशासनाला विविध मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले. यावेळी … Read more

अखेर खरे कारण आले समोर ! या कारणामुळे झाली रेखा जरे यांची हत्या !

अहमदनगर Live24 टीम, 9 जून 2021 :- सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्यासह सात आरोपींच्या विरोधात पोलिसांनी पुरवणी दोषारोप पत्र न्यायालयासमोर सादर केले. बोठे याचे रेखा जरे यांच्याशी प्रेमसंबंध होते, या प्रेमसंबंधांमुळे आपली बदनामी होईल, या भीतीपोटीच बोठे याने जरे यांच्या हत्येची सुपारी दिली असे पोलिसांनी दोषारोप पत्रात म्हटले … Read more

दोन कुटुंबात शेतात जनावरे चारण्याच्या कारणावरून मारामारी

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- दोन कुटुंबात शेतात जनावरे चारण्याच्या कारणावरून मारामारी झाली. हि घटना राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द येथे घडली. याबाबत दोन्ही कुटुंबाने राहुरी पोलिसांत परस्पर विरोधात गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, पहिली घटना ही 5 जून रोजी सकाळी 10 वाजे दरम्यान फिर्यादी व आरोपी यांच्या शेतातील सामायिक … Read more

दोघेजण सरकारी कार्यालयाच्या परिसरात एकमेकांसोबत भिडले

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- दोन तरूणांमध्ये आपापसात वाद झाले आणि त्यांनी एकमेकांवर दगड व विटाने मारहाण झाली. दरम्यान हा धक्कादायक प्रकार राहुरी येथील पंचायत समिती कार्यालयाच्या गेटसमोरील रस्त्यावर घडला आहे. राहुरी पोलीस ठाण्यातील हवालदार आजिनाथ पाखरे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सागर गुंजाळ व लक्ष्मण दळे या दोघांविरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात … Read more

उद्योजकाचा बंगला फोडून चोरी, चोरटे सीसीटीव्हीत कैद

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- राहुरी येथील उद्योजक विजयकुमार सेठी यांच्या बंगल्याच्या दाराचे कुलुप तोडून अज्ञात चोरट्यांनी २० हजार रूपये किंमतीचा एलसीडी टिव्ही चोरून नेल्याची घटना सोमवार दिनांक ७ जून रोजी घडली. हा सर्व प्रकार सीसीटिव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. राहुरी शहर हद्दीतील नगर मनमाड राज्य महामार्गावर भूजाडी पेट्रोल पंप समोर विजयकुमार सेठी … Read more

पंचायत समितीच्या गेटसमोर दोघांत हाणामाऱ्या

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- राहुरी येथील पंचायत समिती कार्यालयच्या गेट समोर रस्त्यावर दोन तरूणांमध्ये आपापसात दिनांक ७ जून रोजी दगड व विटाने एक मेकांना मारहाण झाली. सार्वजनिक ठिकाणी मारामारी करून शांततेचा भंग केल्या प्रकरणी सागर गुंजाळ व लक्ष्मण दळे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. राहुरी पोलिस ठाण्यातील हवालदार आजिनाथ पाखरे यांनी … Read more

राहुरीत विरोधकांडून सत्ताधाऱ्यांची भांडफोड

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- राहुरी शहरातील कोविड लसीकरणाबाबत केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या कोणत्याही नियमांचे आणि अटींचे पालन होत नसल्याने कोरोना चा प्रादूर्भाव वाढण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. शहरातील भागीरथी कन्या विद्यालय या एकाच ठिकाणी लसीकरण असल्याने वयोवृद्ध नागरिकांना या लसीकरण घेण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होतात तसेच गर्दीचे प्रमाण देखील वाढते त्यामुळे आरोग्य … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ११३४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ६० हजार ९२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.६७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५३४ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

कमी धान्य देणाऱ्या रेशन दुकानदारांवर कारवाई करन्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :-राहुरी तालुक्यात स्वस्त धान्य दुकानदारांकडून नागरिकांना कमी प्रमाणात धान्य मिळत असून मनमानी कारभार करणाऱ्या धान्य दुकानदारांवर कारवाई करावी, अशी मागणी येथील सत्तार शेख यांनी तहसीलदार राहुरी यांच्याकडे केली आहे. तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात शेख यांनी म्हटले आहे की, राहुरी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेमार्फत नागरिकांना पंतप्रधान गरीब कल्याण योजनाअंतर्गत … Read more

राज्यात बंदी मात्र तरीही गुटखा विक्री सर्रास सुरूच

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे गुटखा व मावा विक्री खुलेआम सुरू होती. नुकतेच राहुरी पोलिसांनी राहुरी फॅक्टरी परिसरात छापा टाकून सुमारे 9 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, राहुरी फॅक्टरी परिसरातील अमिर शेख याच्या खोलीमध्ये आरोपी पोपटलाल भंडारी (रा. राहुरी फॅक्टरी ता. राहुरी) … Read more

गुटखा विकणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :-  महाराष्ट्र राज्यात तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी आहे. मात्र राज्य सरकारचा आदेश न पाळता राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे गुटखा व मावा विक्री सुरू होती. ५ जून रोजी फॅक्टरी परिसरात दोन ठिकाणी राहुरी पोलिसांनी छापा टाकून सुमारे ९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. राहुरी फॅक्टरी परिसरातील अमिर शेख … Read more

उसाच्या शेतात बिबट्या आढळला मृतावस्थेत

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- गेल्या अनेक दिवसांपासून उत्तरेकडील भागामध्ये बिबट्याचा वावर वाढल्याचे दिसून आले आहे. यातच अनेकदा भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्याचा मृत्यू झाला असल्याची घटना जिल्ह्यात घडली आहे. यातच राहुरी तालुक्यातील कोंढवड शिवारात उसात नर जातीचा बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, कोंढवड शिवारात दत्तात्रय बाळकृष्ण म्हसे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले फक्त ‘इतके’ रुग्ण जाणून घ्या अधिकृत आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ८८३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ५८ हजार ९५८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५३० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

बिबट्याने मध्यवस्तीत घुसून पाडला शेळीचा फडशा

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- राहुरी तालुक्यातील अंमळनेर येथे मध्यवस्तीत धुमाकूळ घालत ज्ञानदेव गंगाधर जगताप या शेतकऱ्यांची शेळी ठार केल्याची दुर्दैवी घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. जगताप यांनी घराशेजारी गोठ्यात बांधलेली शेळी बिबट्याने संरक्षक जाळी उचकटून शेजारील ऊसाचा शेतात ओढून नेली. यामुळे जगताप यांचे सुमारे पंधरा हजाराचे नुकसान झाले आहे. प्रवरा परिसरात … Read more