दुचाकी व चारचाकीच्या अपघातात एक जण ठार

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे, यामुळे दरदिवशी अनेकांना आपल्या प्राणाला मुकावे लागत आहे. यातच पुन्हा एकदा अशाच एका अपघातात एक जण ठार झाला आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, पुणे महामार्गावर पारनेर तालुक्यातील सुपा टोलनाक्याजवळ मोटारसायकल व चारचाकी वाहनाची धडक होऊन मोटारसायकल चालक ठार झाला आहे. तर धडक … Read more

महसुल मंत्री बाळासाहेब थोरातांनी थेट शरद पवारांना दिले प्रत्युत्तर

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये पहिल्या शाब्दीक युद्धाला सुरुवात झाली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी राहुल गांधींबाबत शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले कि,राहुल गांधी आमचे नेते आहेत आणि त्यांचं नेतृत्व पक्षानं स्विकारलं आहे. राहुल यांच्या नेतृत्वाखाली देशपातळीवर काँग्रेस … Read more

आढळून आलेल्या ‘त्या’ पाऊलखुणा बिबट्याचे नाही तर..

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे नागरिक प्रचंड दहशतीखाली आहे. यातच श्रीगोंदा तालुक्यात बिबट्याचा वावर असल्याचे वृत्त पसरले होते. मागील दोन दिवसांपासून श्रीगोंदा मांडवगण परिसरात बिबट्या दिसल्याची चर्चा सामाजिक माध्यमातून सर्वत्र चालू होती. मात्र, या पाऊलखुणा बिबट्याच्या नसून, तरसाच्या असल्याचे वन विभागाच्या अधिकारी … Read more

जिल्ह्यातील एवढे गुरुजी आढळून आले कोरोनाबाधित

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. पूर्वीप्रमाणे बाधितांची संख्या वाढत नसली तरी देखील कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून येतच आहे. कोरोनामुळे गेली अनेक महिने बंद असलेल्या जिल्ह्यातील शाळा यातच काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील माध्यमिकच्या जवळपास 1200 शाळा असून, … Read more

महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी बाबा ढाकणे

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब ढाकणे यांची नियुक्ती संघाचे अध्यक्ष डाॅ.राहुल जैन-बागमार व प्रमुख मार्गदर्शक अशोकराव सोनवणे यांनी केली आहे. बाबा ढाकणे यांची महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ज्येष्ठ पञकारांसह अनेक मान्यवर पञकारांनी आणि सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी … Read more

शेतकऱ्यांसाठी अण्णाही करणार एक दिवसाचे आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-  केन्द्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्या विरोधात दिल्लीसह देशभरात शेतकरी संघटनांचे आंदोलन सुरू असुन उद्या 8 डिसेबंर रोजी भारतबंदचे आवाहन केले आहे याबाबत जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या आंदोलनाच्या समर्थनार्थ उद्या 8 डिसेंबर रोजी एक दिवसाचे लाक्षणिक आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे . शेतकरी आंदोलत आणि भारत बंदला … Read more

जुगार खेळणाऱ्या सहा जुगाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात गुन्हेगारी सुसाट सुटली आहे, कायद्याचे धाक न राहिल्याने अवैध धंदे देखील वाढू लागले आहे. पोलीस प्रशासनाकडून यावर कारवाईचा धडाका सुरु आहे. अशीच एक कारवाई संगमनेर तालुक्यात करण्यात आली आहे. संगमनेर शहरातील एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून चार हजार दोनशे रुपयांच्या रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. या … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : रुग्णसंख्येने पार केला 65000 चा आकडा, वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १७४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६२ हजार ५६५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १७८ ने वाढ … Read more

रेखा जरे खून प्रकरण! त्या म्हणाल्या माझ्या जीवास धोका आहे

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-जातेगाव घाटात सोमवारी (३० नोव्हेंबर) रात्री आठच्या सुमारास रेखा जरे यांची गळा चिरून हत्या झाली. अवघ्या दोन दिवसांत या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला. पाच आरोपी अटकेत असून, मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे पसार आहे. रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील बालविकास प्रकल्प अधिकारी विजयामाला माने प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याने त्यांना आरोपींपासून जीविताला … Read more

सासरच्या जाचास कंटाळून विवाहितेची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये आजकाल जास्तच वाढ झालेली पाहायला मिळत आहे. अत्याचार, छेडछाड, विनयभंग अशा घटना घडू लागल्याने महिलांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. असाच एक धक्कादायक प्रकार आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात घडला आहे. जामखेड तालुक्यातील आरोळे वस्ती येथील विवाहितेने सासरच्या जाचास कंटाळून आपल्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या … Read more

शेतकरी विरोधी कायदे रद्द होण्यासाठी मंगळवारी करणार जेलभरो आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-गेल्या एक आठवड्यापासून दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनास राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय येथे शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करणार्‍या केंद्रातील भाजप सरकारचा निषेध नोंदवून शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तर शेतकर्‍यांनी 8 डिसेंबर रोजी पुकारलेल्या भारत बंदला प्रतिसाद देत शहरात … Read more

रेखा जरे हत्याकांड : आरोपींना ‘ह्या’ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश !

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :- रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या फिरोज राजू शेख व आदित्य सुधाकर चोळके यांना न्यायालयीन कोठडी तर ज्ञानेश्‍वर शिवाजी शिंदे, सागर उत्तम भिंगारदिवे व ॠषीकेश उर्फ टम्या वसंत पवार यांना ९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायाधिश उमा बोऱ्हाडे यांनी दिले आहेत. पाचही आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत सोमवारी … Read more

राज्यातील सर्व विनाअनुदानित शाळांना अनुदान देणे ही शासनाची जबाबदारीच – आ.डॉ.तांबे

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :- मागील अनेक वर्ष विनाअनुदानित शाळांवर अनेक शिक्षक व कर्मचारी विनावेतन काम करत आहे.शासनाचे सर्व निकष व गुणवत्तापूर्ण करूनही या शाळांना अनुदान मिळालेले नाही. महाराष्ट्रात नवनियुक्त लोकउपयोगी असणार्‍या महाविकास आघाडीच्या सरकारने महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तपासणी समितीने केलेल्या शिफारशी स्विकारत तातडीने सर्व विनाअनुदानित शाळांना अनुदान द्यावे अशी … Read more

बाळ बोठेच्या अवैध धंद्याची व संपत्तीची सखोल चौकशी व्हावी -अजीम राजे

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-रेखा जरे हत्याकांड मधील प्रमुख सूत्रधार म्हणून उघडकीस आलेला पत्रकार बाळ बोठे याला तात्काळ अटक करावी, त्यांच्या अवैध धंद्याची व संपत्तीची सखोल चौकशी व्हावी व सदर खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची मागणी समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अजीम राजे यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन पोलीस अधिक्षक कार्यालयात देण्यात आले. सामाजिक क्षेत्रात … Read more

उड्डान पुलाला बाबासाहेबांचे नांव देण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी योग्य जागा निश्‍चित करावी, शहरात होत असलेल्या उड्डान पुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव द्यावे व टिळक रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे नूतनीकरण करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत यांना देण्यात आले. … Read more

बहुजन समाज पार्टीच्या वतीने महापरिनिर्वाण दिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बहुजन समाज पार्टीच्या वतीने मार्केटयार्ड चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रभारी संजय डहाणे, माजी जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, जिल्हाध्यक्ष राजू शिंदे, उपाध्यक्ष जितेंद्र साठे, बाळासाहेब मधे, बौध्दाचार्य दिपक पाटोळे, संतोष जाधव, प्रतिक जाधव, अजिनाथ आलचेट्टी, अतुल काते, … Read more

बाबासाहेबांचा पुर्णाकृती पुतळ्यासह अद्यावत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लहुजी शक्ती सेनेच्या वतीने मार्केटयार्ड चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल सकट, भारतीय लहुजी सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख साहेबराव काते, लक्ष्मण गायकवाड, अरुण चांदणे आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शहरात तातडीने डॉ. बाबासाहेबांचा पुर्णाकृती पुतळा … Read more

आरपीआयच्या वतीने महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना अभिवादन

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या वतीने मार्केटयार्ड चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी आरपीआयचे युवक शहराध्यक्ष अमित काळे, जिल्हाध्यक्ष अशोक केदारे, नगरसेवक राहुल कांबळे, नाना पाटोळे, अ‍ॅड. संतोष गायकवाड, विनोद भिंगारदिवे, दिपक गायकवाड, मंगेश … Read more