26 – 11 दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवान यांना श्रद्धांजली

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-  मुंबईत झालेल्या 26-11 दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवान व पोलिसांना पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने हुतात्मा स्मारक येथे पुष्पचक्र वाहून व मेणबत्त्या प्रज्वलित करून श्रद्धांजली वाहण्यात आली भारत माता की जय वंदे मातरम च्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांच्या आदेशावरून दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या … Read more

विद्यमान आमदार रोहित पवार यांचे नाव का टाळले ?

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- कर्जत येथील नगरपंचायतने शहरात तयार केलेल्या दोन उद्यानांच्या लोकार्पण समारंभात कर्जत-जामखेड मतदारसंघाचे विद्यमान आमदार रोहित पवार यांचे नाव का टाळले, याचा जाब राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक उपाध्यक्ष सुनील शेलार यांनी विचारला असून उपनगराध्यक्ष नामदेव राऊत आणि मुख्याधिकाऱ्यांनी याचा खुलासा करावा, अशी मागणी त्यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन केली. नगरपंचायतचा … Read more

आजी-माजी आमदार, खासदार झोपले का ? आर्थिक संकटाची कुऱ्हाड कोसळणार …

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-  शिर्डी-नगर रस्त्यासाठी ४३० कोटी रूपये मंजूर झाले, पण शिर्डी-कोपरगाव रस्त्यासाठी ढबू पैसादेखील मिळाला नाही. आजी-माजी आमदार खासदार झोपले आहेत का, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते सुखदीप सिंग ऊर्फ कुक्कूशेठ साहनी यांनी केला. पावसाळ्यात कोपरगाव-शिर्डी रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. १४ किलोमीटर अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना दीड ते दोन तास … Read more

स्वातंत्र्य समता व बंधुत्व हेच बाबासाहेबांच्या संविधानाचा पाया – आ. संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- संविधान दिनानिमित्त शिव फुले-शाहू-आंबेडकर-साठे चळवळीतील संघटनांच्यावतीने मार्केट यार्ड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून संविधानाचे वाचन करण्यात आले . तर भीम स्मरणाचे पठण करण्यात आले व आमदार संग्राम जगताप यांचा शिव फुले-शाहू-आंबेडकर-साठे चळवळीतील संघटनांच्यावतीने सविधान देऊन सत्कार करण्यात आला यावेळी सुरेश बनसोडे, अजय साळवे, उबेद शेख, … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील दुर्दैवी घटना : भाऊबीजेसाठी माहेरी आलेल्या आईसह मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-  भाऊबीजेसाठी माहेरी आलेली आई व आठ वर्षांच्या मुलाचा विहिरीत पाय घसरून पडले. दोघांचाही बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी ११ च्या सुमारास पाथर्डी तालुक्यातील मढी येथे घडली. ओम नवनाथ गादे (वय ८) व वनिता नवनाथ गादे (वय २८, देवीनिमगाव, ता. शेवगाव) असे मृत्यू झालेल्या आई व मुलाचे … Read more

ड्रेनेजचे तुंबलेले पाणी रस्त्यावर ; नागरिकांचे होतायत हाल

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- कल्याण-नगर-विशाखापट्टणम हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 222 आहे. हा रस्ता नगर शहरातून जात आहे.या महामार्गाची महापालिकेच्या हद्दीत प्रचंड दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. त्यातच महामार्गालगत ड्रेनेजलाईन तुंबल्याने दुर्गंधीयुक्त घाण पाणी या महामार्गावरूनच वाहत आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तसेच या रस्त्यावर सीना नदीवर अनेक … Read more

भिंगार शहराचा पाणीपुरवठा पुन्हा झाला विस्कळीत

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- मागील काही महिन्यापासून मुळाधरण ते एमआयडीसी या दरम्यान जलवाहिनी फुटत आहे. ही जलवाहिनी जुनी झाल्याने वारंवार ही घटना घडत आहे. त्यामुळे भिंगार शहराचा पाणी पुरवठा पुन्हा विस्कळीत झाला आहे. बुधवारी (दि.25) पुन्हा एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याने छावणी परिषदेला पाणी मिळू शकले नाही. ती दुरुस्ती झाल्यावर पाणी मिळणार आहे, असे … Read more

झेडपीच्या कायदेशीर सल्लागारपदी अ‍ॅड. भगत यांची नियुक्ती

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्हा व सत्र न्यायालयातील जिल्हास्तरीय सर्व कामकाज पाहण्यासाठी नगरचे विधिज्ञ अभिषेक भगत यांची जिल्हा परिषदेच्या कायदेशीर सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी त्यांना या नियुक्तीचे पत्र दिले आहे. जि.प.अध्यक्षा राजश्री घुले, माजी आ.चंद्रशेखर घुले आदिंनी अभिषेक भगत अभिनंदन केले … Read more

प्रलंबित मागण्यांसाठी लिपिकवर्गीय कर्मचारी संपात सहभागी होणार

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी संघटना, कामगार संघटनांनी गुरुवारी (२६ नोव्हेंबर)पुकारलेल्या लाक्षणिक संपाला महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेने पाठिंबा दिला आहे. लिपिकवर्गीय कर्मचारी प्रत्यक्ष संपात सहभागी होणार नसले, तरी या संवर्गाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सरकारने ठोस पावले उचलावी या मागणीसाठी संपाला पाठिंबा असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले आहे. संघटनेने … Read more

सारडा महाविद्यालयातील नऊ विद्यार्थी देशसेवेत दाखल

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- शहरातील नामंकित असे सारडा कॉलेजमध्ये एनसीसी विभागाकडून छात्रांना योग्य प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळेच सारडा महाविद्यालयाच्या नऊ छात्रांची भारतीय सैन्यदलामध्ये निवड होऊन त्यांना भारतमातेची सेवा करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. एकाच वेळी नऊ छात्रांची निवड होणे ही बाब महाविद्यालयासाठी अभिमानास्पद आहे, असे प्रतिपादन हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष अजित बोरा … Read more

कपड्याचे दुकान फोडून चोरटयांनी लाखोंचा माल केला लंपास

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात लुटमारी, चोरी, दरोडा, घातपात अशा गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. संपूर्ण जिल्ह्यात चोरटयांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे मात्र नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. नुकतेच चोरटयांनी नगर तालुक्यातील रुईछत्तीसी येथील शिवशांती कापड दुकान फोडून चोरट्यांनी सव्वादोन लाख रुपयांच्या कपड्यांची चोरी केली. याप्रकरणी बिभिषण शंकर … Read more

‘प्रसाद शुगर’ला ३ डिसेंबरची डेडलाईन

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- प्रसाद शुगर कारखान्याने २०१८-१९ हंगामात गाळप केलेल्या उसापैकी कार्यक्षेत्राबाहेरील उसाला २२१ रुपये कमी दर दिला. या प्रकरणी श्रीरामपूर परिसरातील शेतकऱ्यांनी उर्जा राज्यमंत्री ना. प्राजक्त तनपुरे यांचा निषेध करत कारखान्याच्या प्रवेशद्वारावर काही दिवसांपूर्वी आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान प्रसाद शुगरकडे २०१८-१९ हंगामापासून अडकून पडलेली फरकाची प्रतिटन २२१ रुपयांप्रमाणे सुमारे … Read more

नगरपरिषदेच्या खात्यात 11 कोटींचा निधी वर्ग

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरकुल प्रकल्पातील ९३३ लाभार्थ्यांचे प्रलंबित ११ कोटींचे अनुदान राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्याने जामखेड नगरपरिषदेच्या खात्यात वर्ग झाले. या प्रकल्पाचे अनुदान राज्य व केंद्र शासनाकडे प्रलंबित होते. रखडलेल्या अनुदानासंदर्भात आमदार पवारांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी चर्चा केली. १९ नोव्हेंबरला गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिवांशी … Read more

हॉस्पिटलची तोडफोड करणाऱ्या 25 जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयातच धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर उपचारांचे बिल भरण्याच्या वादातून जमावाने गुंजाळवाडीतील संजीवन हॉस्पिटलची तोडफोड करत वैद्यकीय अधिकाऱ्यांना मारहाण केली. दरम्यान हा धक्कादायक प्रकार दोन दिवसांपूर्वीच म्हणजे मंगळवारी रात्री ९ वाजता घडला होता. या संदर्भात शहर पोलिसात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून … Read more

खाकीचा धाक; अवैध धंदे करणारे झाले अंडरग्राउंड

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- नेवासा तालुक्यातील कुकाणे मध्ये खुलेआम सुरू असलेले अवैध धंदे बंद होऊ लागले आहेत. मटकाकिंग, जुगार चालवणारे, वाळूतस्कर भूमिगत झाले आहेत. आयपीएस अधिकारी प्रभारी म्हणून येताच ही किमया घडली. कुकाणे, प्रवरासंगम ही मोठी पोलिस दूरक्षेत्रे आहेत. तालुक्यात अवैध धंदे फोफावले होते. अभिनव त्यागी यांनी कार्यभार हाती घेताच हे चित्र … Read more

नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडल्याने कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता…

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :- कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. थोडासा निष्काळजीपणा लाटेला पूरक ठरू शकतो. त्यामुळे आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी शासनाच्या नियमांचे पालन करा, असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले. तहसील कार्यालयात मंगळवारी आमदार काळे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभाग व अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संभाव्य कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसंदर्भात करावयाच्या उपाय योजनांबाबत बैठक … Read more

जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई; एकास ताब्यात घेतले

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-नेवासा येथील शिक्षक बँकेच्या पाठीमागे वडारगल्लीत कल्याण मटका जुगार चालवणाऱ्यावर प्रभारी सहायक पोलिस अधीक्षक अभिनय त्यागी यांनी मंगळवारी संध्याकाळी कारवाई केली. गुप्त बातमीदाराकडून या अड्ड्याबद्दल माहिती समजताच त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. पोलिस नाईक सुहास गायकवाड, कॉन्स्टेबल महेश कचे, जी. एल. इथापे यांनी घटनास्थळी धाव घेताच मटका खेळणारे पळून … Read more

विजेचे शॉर्टसर्किट होऊन एक एकर ऊस जळाला !

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2020 :-विजेचे शॉर्टसर्किट होऊन एक एकर ऊस जळाला. ही घटना मंगळवारी खुंटेफळ रोड येथे घडली. शेवगाव-खुंटेफळ रस्त्यालगत संतोष जगन्नाथ शित्रे यांचे शेत आहे. त्यांच्या शेतामधून महावितरणच्या अतिउच्च दाबाच्या वीज वाहिन्या गेल्या आहेत. मंगळवारी या विद्युत वाहिन्यांमध्ये शॉर्टसर्किट झाले. ठिणग्या उसाच्या पाचटावर पडून आग लागली. ही आग वाऱ्याच्या झोताने पसरल्याने शित्रे … Read more