कांदा चाळीच्या अनुदानासाठी शेतकऱ्याचे उपोषण

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सन २०१८-२०१९ मधील कांदा चाळीचे प्रलंबित अनुदान त्वरित मंजूर करण्यात यावे तसेच शेतकऱ्यांना पैशासाठी वेठीस धरणार्‍या अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी, या प्रमुख मागण्यांसाठी येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर नेवासे तालुक्यातील बाभूळखेडा येथील शेतकरी उपोषणास बसले आहेत. शेतकऱ्यांचा हा उपोषणाचा दुसरा दिवस आहे. कांदा चाळीचे प्रलंबित … Read more

अद्यापही विद्यार्थ्यांची शाळांकडे पाठच

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- शासनाच्या आदेशाने सोमवारपासून (ता.23) टप्याटप्याने शाळा सुरू करण्याच्या सूचना शाळांना मिळाल्या असल्या तरी शाळा सुरू हपऊनही विद्यार्थ्यांनी शाळेकडे पाठ फिरवली आहे. उपस्थित विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार अद्यापही पालक वर्गामध्ये कोरोनाची भीती असलेली साफ दिसून येत आहेत. यामुळेच शाळा सुरु होऊनही विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी दिसून येत आहे. नेवासा तालुक्यातील कौठा येथील … Read more

स्वच्छतेच्या माध्यमातून शहराचा कायापालट होणार

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :-दोन वर्षांपासून स्वच्छ सर्वेक्षणाच्या माध्यमातून नगर शहर कचरा कुंडीमुक्त झाले. नागरिकांनी केलेल्या सहकार्यामुळे नगर शहर स्वच्छतेच्या बाबतीत देशात ३० व्या स्थानावर आले. आता पुन्हा स्वच्छ सर्वेक्षण सुरू झाले आहे. सर्व नगरकरांच्या सहकार्यातून नगर शहर देशात टॉपटेन करणार आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. शहरातील सारसनगर येथे भुयारी … Read more

रस्त्याची झाली दुर्दशा… अपघाताचे प्रमाण वाढले

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात सर्वत्र रस्त्यांची अक्षरश चाळण झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे मोठे हाल होत असून यामुळे अपघाताचे सत्र देखील सुरूच होते. नागरिकांचा जीव गेला तरी प्रशासनाला मात्र रस्त्यांच्या दुरुस्तीचे काही घेणे देणे राहिलेले नाही. मात्र याच नादुरुस्त रस्त्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे. यातच पाथर्डी … Read more

कामचुकार अधिकाऱ्यांना काँग्रेस नेत्याने झापले

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- श्रीगोंदे तालुक्याचे तहसीलदार प्रदीपकुमार पवार यांनी पदभार स्वीकारल्यापासून तहसील कार्यालयाबाबत तक्रारी वाढल्या. त्याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांनी तहसील कार्यालयाला भेट दिली. अनेक त्रुटी लक्षात आल्यावर शेलार यांनी ‘पगार शासनाचा घेता, मग कामही शासनाचे करा’, असे खडेबोल सुनावले. मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असताना कामात … Read more

शहरातील कुष्ठधाम रस्त्यावरील बांधकामाला स्थगिती

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- कुष्ठधामलगत असलेल्या भूखंड १२२ मध्ये सुरू बांधकाम विनापरवाना असल्याची तक्रार वैभव जाधव यांनी आयुक्तांकडे केली होती. हे बांधकाम स्थगित करण्याचे आदेश मनपा नगररचना विभागाच्या सहायक संचालकांनी दिले आहेत. पत्रात सहायक संचालकांनी सावेडी नगररचना योजना ४ अंतिम भूखंड १२२ अ जागेतील रेखांकनास अंतिम मंजुरीबाबत संदर्भ दिला आहे. जागेच्या रेखांकनास … Read more

डॉ. विखे येथील नागरिकांचा विमा उतरविणार

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :-खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची कर्जत नगरपंचायत हद्दीमधील नागरिकांना वाढदिवसाची अनोखी भेट दिली. डॉ. विखे यांनी त्यांच्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अपघात विमा योजना कर्जत नगरपंचायत मधील सर्व नागरिकांना आपण स्वतः खर्च करून देत आहोत पुढील काही दिवसांमध्ये डॉ विखे यांचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन नागरिकांची माहिती गोळा करून … Read more

पिरमिरावली दर्गा यांचे संदल उरुस सार्वजनिक कार्यक्रम कोरोना प्रार्दुभावामुळे रद्द

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-मौजे कापूरवाडी येथील ह.सय्यद इसहाक पिरमिरावली दर्गा पहाड ट्रस्टच्या वतीने सर्व धर्मिय भाविक भक्तांना आवाहन करण्यात येते की, सालाबादप्रमाणे साजरे होणारे संदल व उरुस गुरुवार दि.26 व शुक्रवार दि.27 नोव्हेंबर 2020 रोजी होणारे कार्यक्रम कोविड-19 च्या दुसर्‍या लाटेच्या शक्यतेमुळे शासनाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी यांचे लेखी आदेशाप्रमाणे भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनच्यावतीने … Read more

देशव्यापी बंदला काँग्रेसचा पाठिंबा; महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-कामगार व शेतकरी कायद्यांना विरोध करण्यासाठी विविध कामगार संघटनांनी २६ नोव्हेंबरला देशव्यापी बंद पुकारला आहे. या बंदला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. शेतकरी विरोधी कृषि कायदे व कामगार विरोधी चार श्रम संहिता रद्द करा या व … Read more

संस्कारक्षम पिढी घडविण्यात जिल्हा वाचनालय अग्रेसर

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-महासत्तेचे स्वप्न उराशी बाळगुण असलेल्या भारत देशातील उगवत्या पिढीला वाचन संस्कृतीतून घडविण्यात अहमदनगर जिल्हा वाचनालयाचे योगदान अमुल्य असल्याचे प्रतिपादन भारत सरकारच्या राजाराम मोहनरॉय ग्रंथालय प्रतिष्ठानचे क्षेत्रीय अधिकारी अनंतराव वाघ यांनी केले. वाचनालयाच्या भेटीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष अजित रेखी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर, वाचनालयाचे संचालक दिलीप … Read more

माजी पालकमंत्री म्हणाले… मी जो शब्द देतो तो पूर्ण करतो

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-5 वर्षांपूर्वी कर्जत गावाचे शहरामध्ये रूपांतर करण्याचा शब्द दिला होता आणि तो पूर्ण केला. मी जो शब्द देतो तो पूर्ण करत आहे. असे प्रतिपादन माजी मंत्री राम शिंदे यांनी केले आहे. कर्जत नगर पंचायतच्या वतीने शहरांमध्ये समर्थ गार्डन व शहा गार्डन या दोन गार्डनचा लोकार्पण सोहळा मोठ्या दिमाखात माजी … Read more

उसनवारी उठली जीवावर; चौघांकडून एकास गजाने मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-उसने पैसे घेतल्याच्या कारणावरून चार जणांनी एकास लाकडी दांडके व गजाने बेदम मारहाण तसेच शिवीगाळ केल्याची घटना राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे घडली आहे. याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, याप्रकरणातील फिर्यादी व व साक्षीदार हे दिनांक २२ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास … Read more

अज्ञात समाजकंटकाने सोयाबीन दिले पेटून

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-ज्ञानेश्वर लिंबाजी लांडे या शेतकरीऱ्याने तीन एकरातील सोयाबीन सुमारे ४० पोते रचून ठेवले होते. या सोयाबीनला अज्ञात समाजकंटकाने आग लावल्याची घटना अकोले तालुक्यात घडली आहे. या घटनेत शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, अकोले तालुक्यातील वाघापूर येथील शेतकऱ्याच्या सोयाबीनला २३ तारखेला रात्री बाराच्या सुमारास … Read more

सोफ्यावर ठेवलेल्या पिशवीतून एक लाख रुपयांची रोकड लंपास

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :- जामखेड शहरातील मुख्य बाजारपेठेतील एका सोन्याच्या दुकानातून महिला ग्राहकाची पैशाची पिशवी चोरट्यांनी लंपास केली. या घटनेत सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शहरातील मुख्य बाजारपेठेत चिंतामणी ज्वेलर्स हे सोन्याचे दुकान आहे. शनिवारी मंगल गिरी (रा. आदरुड, ता. जि. उस्मानाबाद) या आपल्या … Read more

वाढत्या चोरीच्या घटनांना आवर घाला; नागरिकांचे पोलिसांना साकडे

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत चालली असून गुन्हेगार आपल्या क्षेत्रात अपडेट होत गुन्हेगारीसाठी आता नवनवे फंडे वापरू लागला आहे. वाढती गुन्हेगारी हि पोलिसांबरोबरच आता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. मात्र अशा भामट्यांना गजाआड करण्यासाठी पोलीस प्रशासन देखील आक्रमक झाले आहे. मात्र तरी देखील शहरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण … Read more

दोस्तीत कुस्ती..तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-जगात मैत्रीचे नाते हे सर्वात वेगळे असते. एकीकडे मैत्रीसाठी जीव देणारे उदाहरणे तुम्ही आजवर ऐकले असतील,मात्र इकडे जरा वेगळेच घडले आहे. एका मित्राने साथीदारांच्या साह्याने आपल्याच मित्राला लुटल्याची घटना जामखेड मध्ये घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, जामखेड तालुक्यातील खर्डा येथील फिर्यादी सुभाष अर्जुन गोलेकर (वय ५० वर्षे) … Read more

विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही शाळेकडे फिरवली पाठ

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :- कोरोना महामारीने अवघ्या जगात थैमान घातले आहे.हळूहळू सरकारने लॉकडाऊनमधून जनतेला दिलासा देण्यासाठी अनलॉकबाबत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. यामध्ये दिवाळी पाडव्यापासून सर्व प्रार्थनास्थळे सुरू करण्यात आले आहे तर सोमवारपासून नववी ते बारावीचे वर्ग स्थानिक पातळीवर सुरू करण्यास परवानगी दिली आहे. शासनाच्या आदेशाने सोमवारपासून (ता.23) टप्याटप्याने शाळा सुरू करण्याच्या सूचना … Read more

मोबाईल चोरणाऱ्या चोरट्यास पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-मोबाईलवर बोलत असताना अचानक दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी हातातील मोबाईल हिसकावून चोरून नेणारा चोरटा अखेर पोलिसांनी जेरबंद केला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, श्रीरामपूर येथील इंद्रप्रस्थ मंगलकार्यालयाजवळ फोनवर बोलत असताना त्याचे पाठीमागून दोन इसम स्कुटी मोटारसायकलवर येऊन हातातील मोबाईल बळजबरीने हिसकावून घेऊन … Read more