अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व रुग्णसंख्या वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज २५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५५ हजार ५४५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.०६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २५८ ने वाढ … Read more

माहेरच्या साडी साठी सहयोगाचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-  भाऊबीजेनिमित्त ज्यांना परीवार किंवा भाऊ नाही, अश्या वंचित महिलांना स्नेहभावाचे प्रतीक म्हणून माहेरची साडी देण्याचा उपक्रम सामाजिक कार्यकर्ते धर्मराज शंकर औटी गुरुजी यांनी दीड दशकांपूर्वी चालु केला. वयोमानामुळे औटी गुरुजींना आलेल्या मर्यादा विचारात घेऊन यंदाच्या वर्षी स्नेहालय परिवाराने या उपक्रमाची जबाबदारी स्वीकारली आहे. जाणीवसंपन्न नागरिकांच्या सहयोगातून यंदाही भाऊबीजेला … Read more

व्यापाऱ्याचे धूमस्टाईल पावणेतीन लाख लांबवले कोहिनूर गार्डन येथील घटना

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- सध्या दिवाळी सणाची खरेदी सुरू झाली असून त्यानिमित्त शहरातील प्रमुख बाजारपेठेसह इतर दुकानेही गजबजली आहेत. मात्र या गर्दीचा फायदा भुरटे चोर घेत आहेत. शहरातील माळीवाडा परिसरातील कोहीनूर गार्डन समोर एका व्यापाऱ्याचे पावणेतिन लाख रूपये हिसकावून पळवल्याची घटना घडली आहे. प्रसन्नकुमार नेनसुखलाल नहार (वय ६५, रा.कोहिनूर गार्डन) असे त्या व्यापाऱ्याचे … Read more

मदतीसाठी बोलविलेल्या व्यक्तीकडूनच महिलेवर अत्याचार

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-  महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये आजकाल जास्तच वाढ झालेली पाहायला मिळत आहे. यातच बहुतांश वेळा महिलांवरील होणारे अत्याचाराच्या घटना त्यांच्या परिचित व्यक्तींकडूनच झालेल्या आढळून आल्या आहेत. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात घडला आहे. भावाला पैसे देण्यासाठी सोबत नेलेल्या इसमानेच परतीच्या प्रवासात आडवाटेला नेवून अत्याचार केल्याची खळबळजनक घटना … Read more

किरण काळे बहुआयामी व्यक्तिमत्त्व – आमदार लहू कानडे ; सत्यजित तांबे यांनी काळे यांची थोपटली पाठ

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-  अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी अल्पावधीतच नगर शहरातील काँग्रेसला संजीवनी मिळवून दिली आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहत्यिक, काँग्रेसचे आ. लहू कानडे यांनी काढले आहेत. आ. कानडे यांनी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये काळे यांचे वाढदिसानिमित्त अभिष्टचिंतन केले. त्यावेळी ते … Read more

कोरोनामुक्तीसाठी सर्व धर्मिय धर्मगुरुंची महाप्रार्थना

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- कोरोना महामारीने संपुर्ण देशात थैमान घातले असताना यामध्ये अनेकांचा जीव गेला आहे. कोरोनाचे संकट टळण्यासाठी भिंगार, सदर बाजार येथील बौध्द विहारात सर्व धर्मिय धर्मगुरुंच्या उपस्थितीमध्ये सामुदायिक महाप्रार्थना करण्यात आली. फिजीकल डिस्टन्स व नियमांचे पालन करुन घेण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे, कॅन्टोमेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष … Read more

मराठी चित्रपट आणि चित्रपटगृहे पुनर्जीवित करण्याला प्राधान्य – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-  काही वर्षांपूर्वी मराठीत नवीन काही येत नाही असं म्हटलं जात होते पण आज मराठी चित्रपट पाहायलाच पाहिजे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे हे मराठी चित्रपटांचे यश आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मराठी चित्रपट आणि महाराष्ट्रातील चित्रपटगृहे पुनर्जीवित करण्याला राज्य शासन प्राधान्य देईल, असे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले. महाराष्ट्र चित्रपट … Read more

निकृष्ट कामाच्या निषेधार्थ रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-  नगर-जामखेड रोड येथे राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत जामखेड नाका ते आठवड या 19 किलोमीटर रस्त्याचे पॅचींगचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप करीत काम बंद पाडून जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन करण्यात आले. जन आधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात गणेश … Read more

घरापासून दुरावलेल्या बेवारस मनोरुग्णांची दिवाळी गोड

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-दिवाळी सण आनंद लुटण्याचा नव्हे आनंद वाटण्याचा सण आहे. कोरोनाच्या टाळेबंदीमुळे आर्थिक दुर्बल घटकांची परिस्थिती बिकट बनली असताना बाबासाहेब बोडखे या उपक्रमशील शिक्षकाने राबविलेले सामाजिक उपक्रम प्रेरणादायी आहे. शिक्षकांच्या अनेक समस्या त्यांनी वेळेवेळी आंदोलने, निदर्शने व निवेदने देवून शासनदरबारी मांडून सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी … Read more

आशिष निनगुरकर यांच्या ‘कुलूपबंद’ लघुपटाला बेस्ट शॉर्टफिल्म व सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार…

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-  अखिल भारतीय महाक्रांती चित्रपट आघाडी सेना यांच्या विद्यमाने आयोजित ‘मोबाईल शॉर्टफिल्म फेस्टीवल स्पर्धेत’ येथील आशिष निनगुरकर लिखित-दिग्दर्शित ‘कुलूपबंद’ या लघुपटाला ‘बेस्ट शॉर्टफिल्म- प्रथम पुरस्कार’ व ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. कोरोनाच्या संकट काळात लॉकडाऊन मध्ये घरी राहून कोरोनाविषयी जनजागृती करणाऱ्या फिल्ममेकर्ससाठी ‘ऑनलाइन मोबाईल शॉर्टफिल्म फेस्टिवल’ … Read more

राज्यातील साखर व जोड धंद्यातील कामगार 30 नोव्हेंबर पासून संपावर

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-  महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ व महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ या दोन राज्यव्यापी संघटनांची शुक्रवारी (दि.6 नोव्हेंबर) सांगली येथे बैठक पार पडली. या बैठकित 30 नोव्हेंबर पासून राज्यातील साखर व जोड धंद्यातील कामगारांचा संप पुकारण्यात आला आहे. साखर कामगारांच्या वेतन वाढीच्या करारांची मुदत 31 मार्च 2019 … Read more

टीका होऊ द्या, आपण आपला संयम सोडू नये आमदार अरुण जगताप यांचा सल्ला

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-कोरोना संकटाने सर्वांना वेठीस धरले आहे. त्यामुळे या संकटात काळात काम करणाऱ्यांना मोठा ताण सहन करावा लागत आहे. काही लोकांकडून टीकाही होत आहे. परंतु आपण आपला संयम सोडू नये, असा सल्ला आमदार अरुण जगताप यांनी दिला. कोरोना काळात सामाजिक कार्य करणाऱ्या स्नेहबंध सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांचा कोरोना … Read more

नाशिक – पुणे महामार्गावर एका टेम्पोसह तीन कारचा भीषण अपघात !

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी शिवारात एका टेम्पोसह तीन कारचा भीषण अपघात झाला असून विशेष म्हणजे ही सर्वच वाहने पुण्याकडून नाशिकच्या दिशेने निघाली होती. शनिवारी ( ७ ऑक्टोंबर) दुपारी दीड वाजेच्या सुमारास हा अपघात झाला आहे. दरम्यान ह्या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर संगमनेर वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी व शहर पोलीस ठाण्यातील … Read more

न्यूड फोटोशूट केल्याप्रकरणी अभिनेता मिलिंद सोमणविरोधात तक्रार दाखल

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-  गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर न्यूड फोटोशूट केल्याप्रकरणी अभिनेता मिलिंद सोमणविरोधात गोव्यातील वास्को पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार गोवा सुरक्षा मंचाकडून दाखल करण्यात आली आहे. मिलिंद सोमणने आपल्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर एक धावत असतानाचा निर्वस्त्र फोटो शेअर केला होता. याविरोधात आयटी कायद्याच्या आयपीसीच्या कलम २९४ आणि सेक्शन … Read more

भीक मागण्यासाठी तो पुढे आला व वाहनाच्या धडकेत ठार झाला

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- नाशिक-पुणे बाह्यवळण महामार्गावर संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी शिवारात एका टेम्पोसह तीन कारचा भीषण अपघात झाला आहे. ही सर्व वाहने पुण्याकडून नाशिकच्या दिशेने निघाली होती. दरम्यान या विचित्र घडलेल्या अपघातात एका तृतीयपंथीयाला आपला जीव गमवावा लागला, तर या गडबडीत घडलेल्या चार वाहनांच्या विचित्र अपघातात अन्य दोघे जखमी झाले आहेत. या … Read more

चोरटयांनी त्याला भुयारी पुलाखाली गाठले व त्याला लुटले

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढत असताना त्याचबरोबरीने शहरातील वाढती गुन्हेगारीला आवर घालण्याचे मोठे आव्हान पोलीस प्रशासनासमोर उभे राहिले आहे. जिल्ह्यात लुटमारी, चोरी, दरोडा, घातपात अशा गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यातच श्रीरामपूर येथील एका बॅक ग्राहक सेवा केंद्र चालकास तीन चोरट्यांनी लुटल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी संजय साखरे (वय … Read more

त्या वादग्रस्त पोलीस निरीक्षकाची बदली मुख्यालयात

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-  जिल्ह्यातील पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक यांचे जिल्हांतर्गत बदली आदेश पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी शुक्रवारी रात्री उशिरा काढले आहेत. दरम्यान विविध कारणांवरुन सतत चर्चेत असलेले आणि कार्यकाळाच्या अगदी शेवटच्या क्षणातही वादग्रस्त ठरलेले तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील पाटील यांची अखेर अपेक्षेप्रमाणे मुख्यालयात रवानगी झाली आहे. त्यांच्याजागी संगमनेर शहर पोलीस … Read more

विजेच्या शॉर्टसर्किटमुळे 25 लाखांचा ऊस जळून खाक

अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात यंदाच्या वर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोनामुळे आधीच हतबल झालेल्या शेतकऱ्यांना परतीच्या पावसाने आर्थिक संकटात पाडले आहे. यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. यातच राहाता तालुक्यातील राजुरी येथे शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किट होऊन पंधरा ते सोळा एकर उसाच्या पिकामध्ये आग … Read more