लॉजवर देहव्यापार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच…

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :-श्रीरामपूर शहरातील पंचशील लाॅजवर पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्यासह विशेष पोलिस पथकाने छापा टाकून देहव्यापारातील तीन मुलींची सुटका केली. लॉज व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. गुरुवारी सायंकाळी उशिरा पोलिसांनी एका हॉटेलवरही छापा टाकून दारूचा अवैध साठा जप्त केला. पंचशील लॉजवर देहव्यापार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कंटेनर आणि बसचा अपघात

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- दारूच्या नशेत कंटेनर चालकाने दोन बसला धडक दिली. यानंतर हा कंटेनर भिंतीवर जाऊन आदळला. या अपघातात बस चालक अन्सार सत्तार शेख (पंचपीर चावडी, नगर) हे जखमी झाले असून बसचे मोठे नुकसान झाले आहे. हा अपघात शहरातील चांदणी चौकात झाला. याप्रकरणी कंटेनर चालक अनिल किसन परते (रा. धुमा जि. … Read more

सरकार चालवण्याची हिंमत ठाकरे यांच्यात नाही काय?

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- मराठा आरक्षण प्रश्नी राज्य सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार हेच खुद्द आरोप-प्रत्यारोप करत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना मंत्रिमंडळातून काढून का टाकत नाहीत. सरकार चालवण्याची हिंमत ठाकरे यांच्यात नाही काय? राज्याचे प्रश्न सोडवत नसाल तर खुर्चीवर बसता कशाला, अशा शब्दांत शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर हल्लाबोल … Read more

लोकप्रतिनिधी कांदा उत्पादकांपेक्षा ग्राहकांचे प्रतिनिधी होऊन शेतकऱ्यांना देशोधडीला लावत आहेत

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- जीवनाश्यक वस्तूंच्या यादीत असताना कांद्याला कधीही हमीभाव मिळाला नाही. बाजारात एक रुपया किलो भावाने विकण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यांना कांदे फेकून द्यावे लागले. त्यावेळी कोणत्याही सरकारला शेतकऱ्यांची काळजी वाटली नाही. लोकप्रतिनिधी कांदा उत्पादकांपेक्षा ग्राहकांचे प्रतिनिधी होऊन शेतकऱ्यांना देशोधडीला लावत अाहेत, अशी टीका शेतकरी संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी जवरे यांनी … Read more

देशातील ह्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झापाट्याने वाढतेय… परिस्थिती आणखी बनली बिकट

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- दिल्ली राष्ट्रीय राजधानी असली तरी बुधवारी कोरोना संसर्गाची विक्रमी संख्या आढळून आली. त्यावरून दिल्लीतील संसर्गाचा वेग प्रचंड वाढल्याचे स्पष्ट झाले. दुसरीकडे दिल्ली उच्च न्यायालयाने वाढत्या संसर्गावरून दिल्ली सरकारला फटकारले आहे. दिल्ली आता कोरोना कॅपिटल होत चालल्याचे कोर्टाने म्हटले आहे. हेल्थ बुलेटिननुसार बुधवारी एका दिवसात दिल्लीत सुमारे ७ हजारांवर … Read more

… त्याच पावलावर पाऊल ठेवून अविनाश आदिक यांची वाटचाल सुरू

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- स्व. गोविंदराव आदिकांनी नेहमीच गोरगरीब जनतेचे कल्याण पाहिले, त्याच पावलावर पाऊल ठेवून अविनाश आदिक यांची वाटचाल सुरू आहे. अविनाश आदिक हे पक्षाच्या माध्यमातून सरकार दरबारी पाठपुरावा करून अनेक कामे मार्गी लावत आहेत, असे प्रतिपादन नगराध्यक्ष अनुराधा आदिक यांनी केले. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश आदिक यांच्या वाढदिवसानिमित्त … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ लॉजवर छापा ! वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणार्‍याविरुध्द गुन्हा दाखल…

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- श्रीरामपूर शहर पोलिसांनी शहरातील शिवाजी चौकाजवळच असलेल्या एका लॉजवर छापा टाकला, या लॉजमध्ये चितळी येथील एकजण महिलांशी अनैतिक सबंध ठेवण्यास भाग पाडत असताना पोलिसांनी त्यांच्याकडून 3 हजार रुपये रोख, निरोधची पाकिटे तसेच 37 हजार रुपयांचे मोबाईल जप्त केले. तसेच अनैतिकपणे वेश्या व्यवसाय करणार्‍या पीडित महिलांना सोडून देण्यात आले. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील क्रीडा, जलतरण व योग केंद्र सुरू

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :-राज्य सरकारने ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत कंटेन्मेंट झोनबाहेरील जलतरण तलाव, राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्पर्धा, तसेच खेळाडूंना सराव करण्यास परवानगी दिली आहे. योगा केंद्रांनाही परवानगी देण्यात आली आहे. चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले यांनी गुरुवारी … Read more

साईकृपा कारखान्यातुन कोट्यावधी रुपयांच्या मुद्देमालाची चोरी

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील श्री साईकृपा शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेड या कारखान्यातील मिल सेक्शन, पॉवर हाऊस स्टेशन व स्विच यार्ड विभागातील पाच ट्रान्सफारर्मर मधील 48 हजार 880 किलो कॉपर व 25 हजार 680 लिटर ऑईल असा एकूण 1 कोटी 41 लाख 88 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल चोरीला … Read more

भाजपचे हे नेते म्हणाले नगर जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढाळसली

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- राज्यातील आघाडी सरकार हे केंद्राच्या योजनांचे श्रेय घेण्याचेच काम करत आहे, अशी टीका भाजपचे संघटनमंत्री रवी अनस्पुरे यांनी गुरुवारी केली. भाजपची जिल्हास्तरीय बैठक अनासपुरे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी ते बोलत होते. पत्रकार अर्णव गोस्वामींच्या अटकेचा यावेळी निषेध करण्यात आला. प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे, आमदार बबनराव पाचपुते, नगर … Read more

नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहनपर मदत लवकरात लवकर मिळावी

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- कांद्याची निर्यात बंद करून आयात सुरू करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध, तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष व राज्य किसान सभेतर्फे तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. अतिवृष्टी झाल्याची सरकार दरबारी नोंद असलेल्या केवळ १५ गावांमध्येच नुकसानीचे पंचनामे करण्यात आल्याच्या मुद्यावरून तहसीलदार ज्योती देवरे व आझाद ठुबे यांच्यात … Read more

देशपांडे रुग्णालयालामनुष्यबळ वाढवून द्या : महापौर वाकळे

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- महापालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाने चांगली वैद्यकीय सेवा देऊन नावलौकिक मिळवला आहे. या रुग्णालयासाठी आवश्यक मनुष्यबळ वाढवून द्यावे, असे आदेश महापाैर बाबासाहेब वाकळे यांनी गुरुवारी दिले. रुग्णालयातील कामकाजाचा व अडचणींचा आढावा महापाैर वाकळे यांनी घेतला. रुग्णालयाच्या बळकटीकरणासह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित बैठकीला आयुक्त श्रीकांत मायकलवार उपस्थित होते. … Read more

शहराच्या विकासाला चालना देणे आवश्यक आहे – माजी आमदार शिवाजी कर्डिले

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- पद मिळाल्यानंतर कोणीही हवेत न जाता पदाला साजेसे काम करून जनतेचा विश्वास संपादन करावा. नगर शहराच्या विकासाला चालना देऊन आगामी कालावधीत मनपात स्वबळावर सत्ता आणण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन भाजप नेते माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केले. नगरसेवक मनोज दुलम यांची सभागृह नेतेपदी निवड झाली. त्यांचा सत्कार कर्डिले … Read more

नागरिकांनी बिबट्यासंदर्भात अजूनही सावधानता बाळगावी : मंत्री तनपुरे

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :-पाथर्डी तालुक्यातील शिरापूर, मढी, केळवंडी याठिकाणी नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात तीन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर गुरुवारी पहाटे सावरगावघाट परिसरात एका बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. असे असले, तरी आणखी काही दिवस या भागातील सर्व नागरिकांनी सावधानता बाळगत स्वत:बरोबरच मुलाबाळांची देखील काळजी घ्यावी, तसेच आणखी एखादा बिबट्या या परिसरात … Read more

एका दिवसात आढळले २०१ नवे रुग्ण,कोरोनामुळे इतक्या रुग्णांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- कोरोनामुळे सहा जणांचा मृत्यू झाला, तर २०१ नवे रुग्ण आढळले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०६ टक्के झाले. नगर शहरात सर्वात कमी १८ रुग्ण आढळले. मागील चार महिन्यांतील सर्वात कमी नोंद गुरुवारी झाली. रुग्णवाढीचा वेग मंदावला अाहे. यापूर्वी दररोज पाचशेहून अधिक रुग्ण आढळून येत होते. शहरातदेखील ३०० हून अधिक … Read more

जिल्ह्यातील बिबट्याचा वाढलेला त्रास हा राजकारण्यांनी विरोध केल्यामुळे झालाय – आमदार बबनराव पाचपुते

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बिबट्याचा वाढलेला त्रास हा त्यावेळी मला जिल्ह्यातील राजकारण्यांनी राजकीय हेतूने विरोध केल्याने होत आहे, असा आरोप माजी वनमंत्री व श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते यांनी गुरुवारी येथे केला. ८ वर्षांपूर्वी २०१२ मध्ये मी वनमंत्री असताना श्रीगोंदे तालुक्यातील बेलवंडी येथे बिबट्या रेस्क्यु सेंटर सुरू करण्याचे प्रयत्न केले … Read more

शिर्डी संस्थान ट्रस्टवर नवीन विश्वस्त मंडळ नेमण्यासाठी याचिका

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :-  शिर्डी येथील साईबाबा संस्थान ट्रस्टवर नवीन विश्वस्त मंडळ नेमण्यासाठी दाखल जनहित याचिकेवर सुनावणीदरम्यान आज शासनाला मुख्य कार्यकारी अधिकारीपदी सरळ नेमणुकीद्वारे आयएएस अधिकारी नेमण्यासंदर्भात शपथपत्र सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. संस्थानमधील पात्र कर्मचार्‍यांना दीपावलीनिमित्त तात्पुरते सानुग्रह अनुदान शासनाच्या मान्यतेला राखून देण्याचे आदेश दिले. संस्थांचे … Read more

अनावश्यक बाबींकडे लक्ष देण्यापेक्षा शेतकर्‍यांना तातडीने मदत द्या

state employee news

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :- अतिवृष्टी-बोंडअळीमुळे कापूस-सोयाबीनचे प्रचंड नुकसान झालेले असताना सुद्धा विदर्भातील शेतकर्‍यांना कुठलीही मदत नाही. शेतमाल खरेदी सुद्धा अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे अन्य अनावश्यक बाबींकडे लक्ष देण्यापेक्षा राज्य सरकारने शेतकर्‍यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी करणारे पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले … Read more