दक्षता जनजागृती सप्ताहास जिल्ह्यात प्रारंभ

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :-  राज्यात दरवर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दिनांक ३१ ऑक्टोबर या जन्मदिवसानिमित्त एक आठवडा दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या पार्श्वभूमीवर जिल्हयात दिनांक २७ ऑक्टोबरपासून या सप्ताहास सुरुवात झाली. हा सप्ताह ०२ नोव्हेंबरपर्यंत सुरु राहणार असून सतर्क भारत, समर्थ भारत ही या सप्ताहाची संकल्पना आहे. यानिमित्त काल (मंगळवारी) विविध … Read more

एरियल फोटोग्राफर बाळ जहागिरदार कालवश

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- जगप्रसिद्ध एरियल फोटोग्राफर नगरचे सुपुत्र योगेंद्र उर्फ बाळ जहागिरदार यांचे आज (दि.28) अल्पशा आजाराने निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. देशात व परदेशात रिमोट कंट्रोल विमानातून तसेच ग्लायडरमधून चित्तवेधक छायाचित्र घेण्यात त्यांचा हातखंडा होता. अतिशय चिकित्सक, साहसी व कलाप्रेमी बाळ जहागिरदार यांनी हैद्राबाद,पुणे,नगर तसेच कश्मिर-कन्याकुमारी-ढाका असा रिमोट कंट्रोलवर जगातील सर्वात … Read more

स्नेहालयसंस्थेच्या माजी विद्यार्थ्यांद्वारे मोफतनेत्रसेवा

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :-अनाथाश्रमात शिकताना मिळालेल्या समाजाच्या मदतीची अंशतः परतफेड करण्यासाठी शुभम शोर आणि मिरेन गायकवाड या नवउद्योजकांनी आजन्म मोफत डोळे तपासण्याचा संकल्प केला आहे. स्नेहालय नेत्रसेवा, या चष्म्याच्या दुकानामुळे आता नगरमध्ये कोणालाही मोफत डोळ्याचा नंबर तपासण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. या केंद्रामुळे कुठल्याही अनाथाश्रमातील अनाथ-निराधार अशा विद्यमान आणि माजी विद्यार्थ्यांना तसेच समस्याग्रस्त … Read more

स्नेहालयातील गरजूंना जीवनोपयोगी वस्तुंचे वाटपस्नेहालयातील गरजूंना जीवनोपयोगी वस्तुंचे वाटप

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :-  सण, उत्सव, वाढदिवस, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करत असताना प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले पाहिजे. आजच्या युवकांनी समाजाबद्दल आदर, आपलुकीच्या भावनेतून काम केले पाहिजे. सकारात्मक दृष्टिकोनातून समाजातील गरजूंसाठी काम केले पाहिजे. या भावनेतून कल्पतरु प्रतिष्ठान व विनायकराव देशमुख मित्र मंडळाच्यावतीने स्नेहालयातील गरजूंना जीवनोपयोगी भेटवस्तुंचे वाटप करण्यात आले. … Read more

काँग्रेस कार्यकर्ते उतरले रस्त्यावर; मोदी सरकारच्या कायद्यांच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- केंद्र सरकारच्या कामगारविरोधी कायद्यांसाठी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने एमआयडीसीमध्ये कामगारांची स्वाक्षरी मोहीम राबवली जात आहे. शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम सुरू असून स्वाक्षरी मोहिमेला कामगारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या प्रसंगी कामगारांना संबोधित करताना काळे म्हणाले की, कामगारांना कुठलीही पूर्वकल्पना न देता अचानकपणे थेट कामावरून … Read more

शेतकऱ्यांना सरसकट भरपाई द्या – डॉ.अजित नवले

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :-  परतीच्या पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले त्यावर राज्य सरकारने या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सहाय्य करण्यासाठी पॅकेजची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना हे अर्थसहाय्य मिळावे यासाठी नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत. मात्र या अंतर्गत केवळ उभ्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे होत असल्याने नुकसान भरपाई अत्यंत थोड्या शेतकऱ्यांना मिळेल व बहुसंख्य शेतकरी भरपाई पासून … Read more

भाजपाला खिंडार पडणार नाही – माजी मंत्री, गिरीश महाजन

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- भाजप हा विचारधारेवर चालणारा पक्ष असून कुणी पक्षातून गेल्याचा काहीही परिणाम होणार नाही. एकनाथराव खडसे यांच्या जाण्याने काही खिंडार वगैरे पडणार नसून त्यांच्या सोबत कुणीही जाणार नसल्याचा दावा आज माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी केला. पक्षाच्या जिल्हा कार्यालयात झालेल्या कोअर समितीच्या बैठकीनंतर ते बोलत होते. लवकरच जळगाव जिल्हा … Read more

अजित पवार कोरोनामुक्त व्हावेत यासाठी कार्यकर्त्यांनकडून अभिषेक

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नुकतीच कोरोनाची लागण झाली. ते सध्या मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी, यासाठी बारामती तालुक्यातील सुपे येथील ग्रामपंचायत पदाधिकारी व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अष्टविनायकातील प्रथम स्थान असलेल्या श्रीमयुरेश्वराला साकडे घातल अभिषेक केला आणि, अजितदादांना दीर्घायुष्य लाभावे अशी सामूहिक प्रार्थनाही यावेळी … Read more

विधानपरिषदेच्या जागांवरुन कोणतेही मतभेद नाहीत – जयंत पाटील

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :-राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांच्या नेमणुकीमध्ये उशीर झाला नाही असे त्यांनी सांगितले. राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत उद्या चर्चा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विधानपरिषदेच्या जागावरुन कोणतेही मतभेद नाहीत. असेही ते म्हणाले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख म्हणुन … Read more

हास्यास्पद … आरोग्य सेतू App बनवले कुणी? सरकारलाही माहिती नाही !

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशातील कोट्यवधी मोबाइलमध्ये डाऊनलोड झालेले आरोग्य सेतू हे App नेमके कुणी बनवले, ही माहितीच सरकारकडे उपलब्ध नाही. केंद्रीय माहिती आयोगाने मंगळवारी हा प्रश्न उपस्थित केला आहे. या काँटॅक्ट ट्रेसिंग App बद्दल माहिती अधिकारात विचारल्या गेलेल्या उत्तराला समाधानकारक उत्तर दिले गेलेले नसल्याने माहिती आयोगाने नॅशनल इन्फरमेटिक सेंटरला (एनआयसी) … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या शेतक-याने मुख्यमंत्र्यांना पाठवला १० हजारांचा चेक; म्हणाला गांजा पिकविण्याची परवानगी दिली …

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :-  राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी दहा हजार रुपयांची मदत देऊन थट्टा केली आहे, असा आरोप करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावानेच दहा हजार रुपयांचा धनादेश श्रीरामपूर येथील निलेश शेडगे या शेतकऱ्याने प्रशासनाला दिला आहे. हा धनादेश मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात यावा, अशी विनंतीही या शेतकऱ्याने केली आहे. दरम्यान, या … Read more

‘त्या’ बँकेतील आठ कर्मचारी एकाच दिवशी कोरोना बाधित !

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- स्टेट बँकेच्या येथील शाखेतील आठ अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोना झाल्याने सलग दुसऱ्या दिवशी बॅँकेचे कामकाज बंद ठेवण्यात आले. बँकेतील एकूण बारा अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आल्या. त्यापैकी आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. निगेटिव्ह अहवाल आलेल्या अधिकाऱ्यांच्या घशातील स्त्राव घेण्यात आले असून या अहवालाची प्रतीक्षा आहे. गुरूवारी (२९ ऑक्टोबर) इतर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ह्या नदीपात्रात अनोळखी मृतदेह आढळला

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :- शेवगाव तालुक्यातील मुंगी येथील गोदावरी नदीपात्रात ४५ वर्षे वयाच्या पुरुषाचा मृतदेह शनिवारी आढळला. मृतदेह सडलेला असल्याने ओळख पटली नाही. सरपंच दादासाहेब भुसारी यांनी पोलिसांना कळवताच बोधेगाव दूरक्षेत्राचे पोलिस नाईक संतोष धोत्रे, कॉन्स्टेबल अभय लबडे यांनी पंचनामा करून मृतदेह शेवगाव रुग्णालयात पाठवला. मृताबाबत माहिती असल्यास शेवगाव पोलिस ठाणे (०२४२९/२२१२३३) किंवा … Read more

फक्त घोषणाबाजी करुन मराठ्यांना मराठा नेत्यांनी फसविण्याचे काम केले !

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :-मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर नसुन समितीचे अध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा देऊन छावा संघटनेकडे दहा दिवस सूत्रे सोपवावीत. दहा दिवसांत आम्ही मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढतो. आणि जर आरक्षणासाठी मंत्री, आमदार, खासदार यांनी सहकार्य केले नाही, तर संघटनेचा छावा त्यांना पाडल्याशिवाय राहणार नाही, असा गर्भित इशारा, छावा … Read more

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचे कार्य सर्वांच्या स्मरणात राहील

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :-  जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची नियुक्ती झाल्यापासून त्यांनी आपल्या कामाने नगरकरांची मने जिंकली. सर्वांना आरोग्य सेवा मिळवून देण्याचे मोठे काम केले. त्यांची कारर्किद सर्वांच्या स्मरणात कायम राहील, असे प्रतिपादन संत सावता माळी युवक संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक तुपे यांनी केले. राहुल द्विवेदी यांची मुंबई येथे समग्र शिक्षा अभियानाच्या राज्य प्रकल्प संचालकपदी … Read more

गर्दी वाढली, मास्क वापरत नसल्याने प्रादुर्भाव वाढणार ?

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :-  कोरोनामुळे आणखी पाच जणांचा मृत्यू झाला. दिवसभरात २८५ रुग्ण आढळून आले. बळींची एकूण संख्या ८५३, तर बाधितांची संख्या ५५ हजार ६३५ झाली आहे. जिल्ह्यात बुधवारी ३४६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. बऱ्या झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५३ हजार २४१ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.७९ टक्के आहे. बुधवारी रुग्णसंख्येत … Read more

कुजलेले धान्य आंदोलकांनी पाठवले मुख्यमंत्री ठाकरेंकडे !

अहमदनगर Live24 टीम,29 ऑक्टोबर 2020 :-  पंचनामे न करता शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय दोन दिवसांत न घेतल्यास शासकीय अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडण्यात येईल, असा इशारा भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य माजी आमदार वैभव पिचड यांनी बुधवारी दिला. कुजलेले धान्य मुख्यमंत्र्यांना पाठवत कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. रेशनकार्डवर धान्य मिळत नाही, नुुकसानीचे पंचनामे होत नाहीत, दोषी रेशन … Read more

मैत्रिणीला सोडविण्यावरून चाकूने वार

अहमदनगर Live24 टीम,28 ऑक्टोबर 2020 :- श्रीरामपुर तालुक्यातील हरेगाव येथे २० ऑक्टोबर रोजो रात्री ८.३० वा.एका तरूणावर धारदार चाकूने वार करण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी शाहरुख मोहम्मद पठाण, वय २७, धंदा ड्रायव्हर, रा. शिरसगाव, ता. श्रीरामपूर याने काल श्रीरामपूर तालुका पोलिसात फिर्याद दिल्यावरुन आरोपी आदित्य गवारे, पूर्ण नाव माहीत नाही, रा. शिरसगाव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात … Read more