‘ह्या’ महिन्यात व्हाट्सअपवर आले ‘हे’ नवीन चार फिचर

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :-व्हॉट्सअ‍ॅप यूजर्सच्या गरजेनुसार यात फीचर्स अपडेट करते. या महिन्यात आतापर्यंत या अ‍ॅपमध्ये बरीच फीचर्स आली आहेत. या प्रकरणात, आपण अद्याप आपले व्हॉट्सअॅप अपडेट केले नसल्यास ते त्वरीत अपडेट करा. तथापि, बीटा वापरकर्त्यांसाठी बरीच फीचर्स आणली गेली आहेत. कोणते फीचर्स आले? :- 1. ऑलवेज म्यूट फीचर :- या फीचरच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप … Read more

आ. राधाकृष्ण विखे यांचा खळबळजनक आरोप ; बदल्यांसाठी सरकारने केलय ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- सध्या महाराष्ट्रात अतिवृष्टीने अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. कोरोनाने पिचलेला शेतकरी आता आणखीनच हवालदिल झाला आहे. त्यामुळे अस्तगाव व रुई येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची विखे पाटील यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर तोफ डागली. ते म्हणाले, राज्यातील मंत्र्यांना शेतकऱ्याचे काही देणे घेणे नाही. मंत्रालयात शेतकऱ्यांच्या … Read more

खुशखबर : आता ‘ह्या’ तारखेपर्यंत भरता येणार आयटी रिटर्न्स

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर प्राप्तिकर विभागाने पुन्हा एकदा रिटर्न भरण्याची अंतिम तारीख पुढे ढकलली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून (सीबीडीटी) प्राप्त माहितीनुसार, ज्यांना आपल्या रिटर्न सह लेखापरीक्षण अहवाल द्यावा लागत नाही, ते 31 डिसेंबरपर्यंत 2019-20 साठी आपला परतावा सादर करू शकतात. याआधी हि अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2020 अशी निश्चित … Read more

‘त्या’ रस्त्यावरून तनपुरे-कर्डिले समर्थकांमध्ये कलगीतुरा

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात रस्त्यांची दुरवस्था हा नित्याचाच भाग झाला आहे. अनेक आंदोलने या रस्त्यांसाठी होत असतात. परंतु हि परिस्थिती मात्र बदलताना दिसत नाही. राहुरी मतदारसंघामधील मानोरी येथील रस्त्याचीही अशीच दुरवस्था झाली आहे. परंतु या रस्त्याच्या अशा अवस्थेवरून मंत्री तनपुरे व माजी आ. शिवाजी कर्डिले यांच्या समर्थकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. या … Read more

भोळेपणाचा आव आणणाऱ्या जिल्ह्यातील त्या पुढाऱ्यांना खासदार विखेंनी दिला इशारा

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- भोळेपणाचा आव आणत जिल्ह्यातील काही पुढारी मंडळी केवळ स्वतःच्या प्रसिद्धीसाठी कामाचा दिखावा करत आहे. स्वतःचे सोडून दुसऱ्यांच्या मतदार संघात ढवळाढवळ करत आहे. याच अनुषंगाने खासदार विखे पाटील यांनी जिल्ह्यातील मंत्र्यांची खिल्ली उडवत त्यांचा पोलखोल करण्याचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील काही नेतेमंडळी दुसऱ्याच्या मतदारसंघात येऊन ढवळाढवळ करीत कामाचे श्रेय घेण्याचा … Read more

खडसेंच्या जाण्याने भाजपाला फटका बसणार; भाजपचे शिवाजी कर्डीले म्हणतात…

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. नुकतेच भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने भाजपाला धक्का बसला आहे. त्यांच्या जाण्याने काही फरक पडत नसल्याचे बोलले जात असले तरी पक्षाला नक्कीच याचा तोटा होईल असे पक्षांतर्गत गुप्तपणे चर्चाही ऐकायला मिळत आहे. अशातच आता नाथाभाऊंचे कट्टर समर्थक … Read more

आतापर्यंत ५२ हजार ३६६ रुग्ण बरे होऊन परतले घरी

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात आज १६८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५२ हजार ३६६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.६९ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १५१७ इतकी आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ४२, जामखेड … Read more

मंत्री गडाखांचे नेवाशाला ‘दसरा गिफ्ट’ ; तीन कोटी मंजूर

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- नेवासा नगरपंचायतीसाठी 7 कोटी 89 लाख 42 हजार रुपयांची मागणी आपण या योजने अंर्तगत निधी मिळावा अशी मागणी नगरविकास विभागा कडे केली होती. त्यापैकी 3 कोटी रुपये मंजूर झाले असून उर्वरित निधी देखील लवकरच मंजूर होणार आहे. नेवासा शहरातील नागरिकांना या निधीतून पायाभूत सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. येणाऱ्या … Read more

‘केंद्राचा निधी आहे म्हणून गावांना वैभव प्राप्त होतंय’ ; खा.डॉ. विखे म्हणतात…

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- सध्या जिल्ह्यातील काही ठिकाणी रस्ते कामास वेग आला आहे. काहींचे भूमिपूजन सुरु आहे. काष्टी येथे न्हावरा ते आढळगाव पर्यंतच्या 216 कोटी 51 लाख खर्च अपेक्षित कामाचे भूमिपूजन नुकतेच पार पडले.  हे भूमिपूजन खा. डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते पार पडले. त्यांनी आपल्या याच खास शैलीत येथे आपल्या भाषणात फटकेबाजी … Read more

प्रा. राम शिंदे अभि बच्चा है ; एकनाथ खडसे यांचा पलटवार…

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :-सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. नुकतेच भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने भाजपाला धक्का बसला आहे. परंतु त्यांच्या पक्षांतरानंतर एकनाथ खडसे सिंचन घोटाळ्यातील प्रमुख साक्षीदार असल्याने त्यांना राष्ट्रवादीने फोडले, असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांनी केला होता. याच पार्श्वभूमीवर एकनाथ … Read more

खा. सुजय विखे म्हणतात.. संरक्षणमंत्री व्हावं लागेल

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी खासदार झाल्यानंतर अनेक मोठ्या कामांना हात घातला. त्यांचा अभ्यास आणि त्यांची टोलेबाजी करण्याची शैली सर्वश्रुत आहेच. त्यांनी आपल्या याच खास शैलीत टाकळीकाझी (ता. नगर) येथे फटकेबाजी केली. अहमदनगर-जामखेड या राष्ट्रीय महामार्गाचे डांबरीकरण-नुतनीकरण भूमिपूजन कार्यक्रम टाकळीकाझी (ता. नगर) येथे पार पडला. या कार्यक्रमाला व्यासपीठावर … Read more

थरारक ! पहाटे बिबट्याचा हल्ला ; चिमुरड्याला पळविले

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- पाथर्डीमधील बिबट्याच्या हल्ल्यात चिमुरड्याचा झालेला मृत्यूची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा याचीच पुनरावृत्ती झाली. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास शहराजवळील माणिकदौंडी रोडलगत असलेल्या केळवंडी परिसरात बिबट्याने हल्ला केला यात आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. सक्षम गणेश आठरे (वय ८) असे या बिबट्याच्या हल्ल्यात … Read more

अबब ! पाऊस पुन्हा येणार ; ‘ह्या’ भागात पावसाचा इशारा

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :-सध्या पावसाने सर्वांच्याच तोंडचे पाणी पळवले आहे. जूनच्या पूर्वार्धात सुरु झालेला पाऊस अद्यापही सुरूच आहे. मध्यंतरी थंडावलेला पाऊस सुखावणारा असला तरी पुन्हा एकदा हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे. पुढील काही तासांत पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख के … Read more

साईबाबांच्या १०२ व्या पुण्यतिथी उत्सवास सुरुवात

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- साईबाबा संस्थानच्या वतीने आयोजित केलेल्या १०२ वा श्रींच्या पुण्यतिथी उत्सवास शुक्रवारी सुरुवात झाली. उत्सवानिमित्त श्री साईबाबा समाधी मंदिर व परिसरात विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात आली. उत्सवाच्या प्रथम दिवशी पहाटे साडेचारला श्रींची काकड आरती झाली. पहाटे ५ वाजता साई प्रतिमा व श्री साईसच्चरित ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली. या … Read more

नैऋत्य मान्सून यंदा ‘या’ दिवशी घेणार निरोप

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- यंदा देशात दीर्घकाळ रेंगाळलेला नैऋत्य मान्सून अखेर २८ ऑक्टोबरला निरोप घेण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) शनिवारी वर्तवली. ईशान्य मान्सून दक्षिणेत दाखल होण्यास अनुकूल वातावरण असल्याचे आयएमडीने म्हटले आहे. राज्यातून साधारणपणे सप्टेंबरअखेरीस परतीला सुरुवात करणाऱ्या मान्सूनचा राज्यातील मुक्काम यंदा तब्बल महिनाभर लांबला आहे. आयएमडीने यंदापासून मान्सूनच्या आगमन आणि प्रस्थानाचे … Read more

कांद्याच्या दरात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- शेतमालाचे मोठे नुकसान झाले असून वाचलेला मोजकाच शेतमाल बाजार समितीत दाखल होत आहे. एक नंबर कांदा साडेसात हजारापर्यंत पोहोचला होता, परंतु शनिवारी वांबोरी उपबाजारात झालेल्या लिलावानुसार एक नंबर कांद्याला अवघा ५ हजार १०० ते ६ हजार ५०० प्रति क्विंटल दराने विकला गेला. आवक कमी असतानाही दर घसरल्याने शेतकऱयांमध्ये नाराजी … Read more

यंदा फुलांच्या दरात चार पटीने वाढ ‘हे’ आहे कारण !

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- शनिवारी नगरच्या बाजारात झेंडू दीडशे ते अडीचशे रुपये किलो दराने विकला गेला तर शेवंतीच्या फुलांची देखील दीडशे ते दोनशे रुपये किलो दराने विक्री झाली. विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फुलांच्या दरात चार पटीने वाढ झाली आहे. दसऱ्याचा सणाच्या पूर्वसंध्येला नगर शहरातील बाजार समितीत सकाळी झेंडू, शेवंती, अस्टरच्या फुलांची … Read more

कोरोनामुळे आणखी दोन जणांचा मृत्यू,तर ‘इतके’ नवे रुग्ण ..

अहमदनगर Live24 टीम,25 ऑक्टोबर 2020 :- नगर शहर व जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी दोन जणांचा मृत्यू झाला. २५४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात ५२ हजार १९८ रुग्ण झाले बरे होऊन घरी परतले. जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी सहा वाजेपासून शनिवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २५४ ने वाढ झाली. दिवसभरात आणखी दोन जणांचा मृत्यू झाला. बळींची … Read more