पंचनामे करण्यात वेळ न घालता निकषाप्रमाणे सरसकट नुकसान भरपाई द्यावी – आमदार मोनिका राजळे

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- यंदा महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली आहे. या सर्व पूर परिस्थीतीमुळे व अती पावसामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल, फळबाग, घरे, संसार उपयोगी साहित्य, दुभती जनावरे, पाण्याखाली जावून मोठी हानी झालेली आहे. अनेक जिल्ह्यातील गावे जलमय होऊन गावांचे शिवार पाण्याखाली जावून, यात खरिपाची पिके, ऊस, फळबागा भुईसपाट होऊन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. … Read more

ऐन सणासुदीच्या काळातच पाच दिवसांपासून पाणी नाही !

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- गेल्या चार-पाच दिवसांपासून ऐन सणासुदीच्या काळातच छावणी परिषद प्रशासनाकडून भिंगार गावात पाणीपुरवठा होऊ शकला नाही. परिणामी नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. भिंगारला पाणीपुरवठा करणारे मुळाधरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.जास्तीचे पाणी नदी पात्रात सोडले असले तरी पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. पाणीप्रश्नी आजी, माजी खासदार,आमदार यांनी वरिष्ठ पातळीवर चर्चा … Read more

एकरी ५० हजारांची भरपाई द्या : डॉ. अजित नवले

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :-परतीच्या पावसाने कापणी करून ठेवलेल्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. विदर्भ, मराठवाड्यात कापूस, पश्चिम महाराष्ट्रात ऊस व द्राक्षपिकाचे, तर कोकणात भाताचे नुकसान झाले. खरीप हंगामातील ३० टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. तातडीने पंचनामे करून एकरी किमान ५० हजार रुपये भरपाई देऊन शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा. केंद्र सरकारने तातडीने पथक पाठवून … Read more

उपवासाची भगर खाल्ल्याने १०० जणांना विषबाधा

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- उपवासाची भगर खाल्ल्याने सुमारे शंभर गावकऱ्यांना विषबाधा झाली. राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथे शनिवारी रात्री हा प्रकार घडला. त्रास जाणवू लागल्यानंतर उपचार घेण्यासाठी चांगलीच धावपळ उडाली. नवरात्रामुळे उपवासाच्या पदार्थांची खरेदी वाढली आहे. म्हैसगाव पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी स्थानिक दुकानदाराकडून भगर खरेदी केली होती. शनिवारी रात्री भगर खाल्ल्यानंतर अनेकांना उलट्या व जुलाबाचा त्रास … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले कोरोनावर लस प्राप्त होईपर्यंत…

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- कोरोना विरुद्धचा लढा आता निर्णायक वळणावर आला आहे. यावर लस प्राप्त होईपर्यंत मास्कच उत्तम लस ठरणार आहे, याची जाण ठेवा आणि इतरांना जाणीव करुन द्या. कोरोनाची दुसरी लाट येऊ द्यायची नाही यासाठी मास्क, अंतर आणि हातांची स्वच्छता अशी ‘मां कसम’ सर्वांनी घ्यावी असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरी … Read more

के. के. रेंज बाबत आमदार निलेश लंके यांचा गौप्यस्फोट

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- के. के. रेंजसाठी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, नगर व राहुरी तालुक्यातील 23 गावांमधील शेतकर्‍यांच्या जमिनींचे हस्तांतर करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मान्यता दिली होती. 18 मे 2017 मध्ये मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली होती, असा गौप्यस्फौट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी केला आहे. फडणवीस व … Read more

शहरातील या भागात गोमांस साठा जप्त

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- शहरातील झेंडीगेट परिसरात प्रभारी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉक्टर दत्ताराम राठोड यांच्या विशेष पथकाकडून गोमास विक्री ठिकाणावर छापा टाकला आहे. या छाप्यात दोघांना अटक केली असून साधनांचा 41 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नावेद सादिक कुरेशी, मोसिन सादिक कुरेशी अशी ताब्यात घेतलेले यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली … Read more

मोहटादेवी गडावर नवरात्रौत्सवाला प्रारंभ

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- राज्यात कालपासून नवरात्रीच्या उत्सवाला प्रारंभ झाला आहे. पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मोहटा येथे शारदीय नवरात्र उत्सवास पारंपारिक पद्धतीने प्रारंभ होऊन घटस्थापना करण्यात आली. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सध्या देवस्थाने बंद असल्याने येथेही देवस्थानाच्या मंदिराचा मुख्य दरवाजा बंद असून मंदिराच्या आत प्रवेशास बंदी करण्यात आली आहे. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी मोहटा देवीच्या … Read more

देशी दारूचा साठा जप्त… या तालुक्यात पोलिसांची कारवाई

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात अवैध व्यवसायांचा सुळसुळाट झाला आहे. यास रोख बसावा यासाठी पोलिसांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. पारनेर तालुक्यातील पळशी येथील पोपट उर्फ पप्पू भाउसाहेब गायकवाड (वय २२ रा. भिल्ल वस्ती, पळशी) हा त्याच्या घराच्या आडोशाला विना परवाना बेकायदा देशी दारू विक्री करताना आढळून आला. त्याला पारनेर पोलिसांच्या पथकाने रंगेहात … Read more

गांधीगिरी आंदोलन! खड्डेमय शहरात आपले स्वागत आहे

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- शहरासह जिल्ह्यातील खड्डे चांगलेच गाजले आहे. खड्डे बुजविण्याच्या मागणीसाठी सातत्याने आंदोलने झाली. मात्र निष्क्रिय प्रशासनामुळे या खड्यांचा त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागतो आहे. यातच कोपरगाव शहरात गांधीगिरी आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला चांगलीच चपराक लागवली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने कोपरगाव शहरातील अनेक रस्ते खड्डेमय झाले डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक … Read more

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकरी एक लाखांची मदत करा; माजी आमदारांनी केली मागणी

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हा परतीच्या पावसाने हिरावला आहे. यामुळे शेतकऱ्यांना एकरी एक लाखांची मदत द्यावी अशी मागणी माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी केली आहे. कुंडलिकराव जगताप कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ नुकताच कर्डिले यांच्या हस्ते झाला. यावेळी माजी … Read more

भाजप सरकारच्या पापाचे खापर आमच्या सरकारच्या माथ्यावर फोडण्याचा प्रयत्न सुरू

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यातील के. के.रेंजच्या जमीन हस्तांतराचा मुद्दा थेट दिल्लीवारी करून आला आहे. जमीन हस्तांतराच्या मुद्यावरून उत्तरेकडील भूधारक शेतकरी चिंतेत होते. मात्र याबाबत तोडगा निघाला असून यानंतर शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. यातच आता राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी एक धक्कादायक माहिती समोर आणली आहे. के. के. रेंंजसाठी लष्कराला जमिनी देण्यावरुन … Read more

महापालिकेच्या घंटा गाड्या समस्यांनी ग्रासल्या…

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- गाडीवाला आया घरसे कचरा निकाल … हे गाणं ऐकताच घंटा गाडी कचरा संकलनासाठी आली याची आपल्याला समजते. कचरा साफ करत शहराला रोगराईमुक्त ठेवणाऱ्या मनपाच्या घंटा गाड्या सध्या समस्यांनी ग्रासल्या आहेत. महापालिकेच्या घनकचरा विभागाने सात महिन्यांपूर्वी 64 नवीन घंटागाड्यांची खरेदी केली. यातील 22 वाहनांत डंपिंग ऍडजेस्टमेंटची समस्या निर्माण झाली आहे. … Read more

साडेपाच कोटी रुपये खर्चाच्या भव्य दिपस्तंभाचे काम पुर्ण

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- स्वयंभू शनिमुर्ती वाहुन आलेल्या पानसनाला ओढ्याला गटारीचे स्वरुप आलेले होते. पानसनाला ओढ्याच्या दुरावस्थेबाबत जेष्ठ नेते यशवंतराव गडाख व मंत्री शंकरराव गडाख यांच्या सुचनेनंतर विश्वस्त मंडळाने खर्चाचे सुशोभीकरण हाती घेतले होते. शनैश्वर देवस्थान ट्रस्टने हाती घेतलेल्या पानसनाला सुशोभीकरण कामातील ७५ फुट उंचीच्या व साडेपाच कोटी रुपये खर्चाच्या भव्य दिपस्तंभाचे काम … Read more

त्यामुळे नैतिक जबाबदारी स्विकारून राज्यपालांनी राजीनामा द्यावा…

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- ज्यांनी शेतकऱ्यांना साले म्हणून संबोधलं त्या भाजप नेत्यांचं शेतकरी प्रेम बेगडी असून शेतकऱ्यांबद्दल त्यांचं प्रेम कधीपासून जागे झाले अशी टीका अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर केली आहे. काल रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरात बसून काम करतात अशी टीका केली होती. दानवे यांच्या टीकेचा माजी राज्यमंत्री … Read more

शेतकऱ्यांच्या भरीव मदतीसाठी खासदारांना घेवून पंतप्रधान मोदींची भेट घेणार – शरद पवार

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-राज्यात अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. हे संकट अस्मानी आहे त्यामुळे त्याचे परिणाम दीर्घकाळ असतील. शेतकऱ्यांना भरीव मदतीसाठी महाविकास आघाडीच्या सर्व खासदारांना घेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार आजपासून दोन दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. … Read more

उपवासाच्या अन्नातून महिलांना झाली विषबाधा; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-सण उत्सवाचा काळ सुरु झाला आहे. कालपासून सुरु झालेल्या नवरात्री निमित्त अनेक जण उपवासाचे व्रत करत असतात. खासकरून महिलांकडन उपवास केला जात असतो. दरम्यान उपवासाचा पदार्थ खाल्याने राहुरी तालुक्यामधील आठ महिलांना विषबाधा झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. नवरात्र उत्सव सुरू असल्याने महिला भगिनी उपवास करताना शाबुदाना, भगर आहारात घेतात. मात्र … Read more

होणार धमाका ! रिलायन्स जिओ देणार अडीच हजारात 5G मोबाईल

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :- देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडून एक चांगली धमाकेदार बातमी समोर आली आहे. रिलायन्स जिओ 5 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत 5 जी स्मार्टफोन बाजारात आणण्याची योजना आखत आहे. जेव्हा या स्मार्टफोनचे संचालन वाढेल, हळूहळू त्याची किंमत प्रति युनिट 2,500-3,000 रुपये होईल. सध्या भारतात 5 जी स्मार्टफोनची प्रारंभिक किंमत … Read more