जनावरे चोरणाऱ्या चोरट्यांकडून गोळीबार; या ठिकाणी घडला धक्कादायक प्रकार

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी व कुचकामी प्रशासन यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. लुटमारी, चोरी, मारहाण आदी घटनांमध्ये वाढ झाली आहे. नुकतीच जिल्ह्यातील एका ठिकाणी जनावरांची चोरी करणाऱ्या चोरटयांनी गोळीबार करत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. शेळ्या चोरुन चार चाकी वाहनातून पळ काढणाऱ्या चोरट्यांच्या वाहनाला अपघात घडला. या … Read more

विवाहितेला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-  गेल्या काही दिवसात जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आधीच देशात महिला अत्याचाराच्या घटनांवरून वातावरण तापलेले आहे, यामध्ये अशा घटनांमुळे संतापाची लाट उसळण्याची शक्यता आहे. दरम्यान महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे घडला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या … Read more

अल्पवयीन मुलीचा विवाह केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-  मुलामुलींचे लग्नासाठी वयोमर्यदा ठरविण्यात आलेलं आहे. या नियमनाचे उल्लंघन केल्यावर दंडात्मक कारवाई केली जाते, याचे ज्ञान असूनही एका अल्पवयीन मुलीचे लग्न लावल्याचा धक्कादायक प्रकार जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात घडला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, श्रीगोंदा तालुक्यातील चिखली येथील सोळा वर्षीय एक मुलगी आपल्या बहिणीकडे लोणीव्यंकनाथ येथे राहत होती. काही … Read more

मुसळधार पावसामुळे या तालुक्यातील नदीला आला पूर

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- यंदाची वर्षी पावसाने जिल्ह्यात चांगली हजेरी लावली आहे. काही काळ विश्रांती घेतल्यानंतर आता परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र याच परतीच्या पावसाने जिल्ह्यातील अनेक नद्यांना, नाल्यांना पूर आला आहे. नुकतीच श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर जलाशयाच्या लाभक्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून पावस कोसळला आहे. पाण्याचा साठा वाढल्याने जलाशयाच्या सांडव्यातून हंगा नदीत पाण्याचा … Read more

या ठिकाणचा पाणी पुरवठा झाला विस्कळीत

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात यंदाच्या वर्षी पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील धरणे, नद्या, ओढे, बंधारे हे ओव्हरफ्लो झाले आहे. पाण्याची मुबलकता असल्याने शहरातील काही ठिकाणी पाणी विस्कळीत झाल्याच्या घटना घडत आहे. नुकतीच भिंगार शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागतोय. आठवड्यातून ४-५ दिवसानंतर पाणी सोडले जाते. भिंगार शहराला … Read more

शेतकऱ्यांच्या या महत्वाच्या मागणीसाठी धावली भाजपा; आंदोलनाचा घेतला पवित्रा

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात पार्टीच्या पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपले आहे. यामुळे अनेक ठिकाणी शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोनाच्या काळात मोठा आर्थिक फटका बसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यातच आता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते धावले आहे. नगर तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात यावा … Read more

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर पहिल्यांदाच अजित पवारांनी दिली प्रतिक्रिया

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- जलयुक्त शिवार या योजनेची चौकशी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. देवेंद्र फडणवीस यांना हा मोठा धक्का मानला जातो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून सूडबुद्दीने किंवा मुद्दामून कोण कऱणार आहे ? अशी विचारणा केली आहे असे अजित पवार यांनी सांगितले. जाणुनबुजून कोणी चौकशी करत नाही. कॅगच्या अहवाल … Read more

आ.रोहित पवार यांच्या संपर्क कार्यालयासमोर ‘गारुड्याचा खेळ’

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- जामखेड तालुक्यातील खर्डा येथील मदारी समाजातील २० कुटुंबास यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने अंतर्गत मंजूर झालेल्या मदारी वसाहतीचे बांधकाम तात्काळ सुरू न झाल्यास सोमवार दि. १९ ऑक्टोबर रोजी जामखेड तहसील कार्यालयासमोर पाल ठोकून धरणे आंदोलन तर आ.रोहित पवार यांच्या संपर्क कार्यालयासमोर गारुड्याचा खेळ मांडण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन … Read more

त्या शाळेविरोधात राज्य मानव अधिकार आयोगाकडे केस दाखल

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- बेकायदेशीर सहल काढणार्‍या व तीन व्यक्तींच्या मृत्यूस जबाबदार असणार्‍या डॉनबॉस्को विद्यालयाच्या विरोधात राज्य मानव अधिकार आयोगाकडे केस दाखल झाली असल्याची माहिती प्रा.पंकज लोखंडे व सोन्याबापु भाकरे यांनी दिली. तर या प्रकरणात न्याय मिळण्याची अपेक्षा तक्रारदार पालकांनी व्यक्त केली आहे. सावेडी येथील डॉनबॉस्को विद्यालयाने 17 जानेवारी 2019 रोजी शिक्षण विभागाच्या … Read more

भिंगारचा पाणीपुरवठा विस्कळीत पाणीप्रश्न चर्चा करुन मार्गी लावू : महापौर बाबासाहेब वाकळे

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- भिंगार शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागतोय. आठवड्यातून ४-५ दिवसानंतर पाणी सोडले जाते. भिंगार शहराला गेली ५0 वर्षांपासून आर्मीची संस्था एम.ई.एस. या संस्थेमार्फत पाणी पुरवठा होत आहे. शहरामध्ये दिवसेंदिवस नळ कनेक्शनची मागणी वाढत आहे. भिंगार शहरातील नागरिक व्यावसायिक दराने म्हणजे वर्षाला दोन हजार रुपयांची पाणीपट्टी … Read more

कौटुंबिक न्यायालयाने जाणली वेदना, घेतली त्या महिलेची दखल

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- कुंकवाच्या धन्याने नाकारली ती काही काळात माहेरच्या सावलीलाही परकी होऊ लागली. दाद मागण्यासाठी कौटुंबिक न्यायालयासमोर सुनावनी सुरु आहे. आता तिच्यापुढे माहेर व सासर अशी दोन्ही दारे बंद झाल्याने जायचे कुठे. या विवंचनेत एक महिला पक्षकार दि. 0३/१0/२०२० रोजी तारीख संपलेनंतर ती न्यायालयातून बाहेर गेली व पुन्हा परत येऊन सांयकाळपासून … Read more

मयत १७ सभासदांचे १६ लाख १0 हजार ५00 माफ करण्याचा निर्णय

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर मनपा कर्मचारी सहकारी पतसंस्था ही सभासदांची कामधेनू आहे. अडीअडचणीच्या काळामध्ये महापालिका कर्मचाऱ्यांना मदतीचा हात देण्याचे काम पतसंस्था करीत आहे. तसेच मुलामुलींच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी व वैद्यकीय उपचारासाठी मदत करीत असते. पतसंस्थेच्या ३0-९-२0२0 रोजी संचालक मंडळाच्या झालेल्या सभेत मयत सभासदाच्या कर्जापैकी १ लाख रुपयापर्यंतचे कर्जे निर्लेखित (माफ) करण्याचा निर्णय घेतला. … Read more

निंबळकचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडवावा

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-नगर तालुक्यातील निंबळक गावाला मंजूर असलेला 550 घनमीटरचा पाणीपुरवठा नियमित देऊन गावातील पाणी प्रश्‍न सोडविण्याच्या मागणीचे निवेदन एमआयडिसी पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता पीएनजी राठोड यांना निंबळक ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आले. यावेळी माजी सरपंच विलास लामखडे, ग्रा.पं. सदस्य अविनाश आळंदीकर, बाबा पगारे, बाळासाहेब गायकवाड, अशोक शिंदे, सुभाष कोरडे, जयराम जाधव, विलास होळकर, … Read more

छगनरावजी भुजबळ यांचा वाढदिवस फळे वाटप करून साजरा

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री बहुजनहृदयसम्राट वंदनीय लोकनेते छगनरावजी भुजबळ साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह (कोविड सेंटर) येथे रुग्णांना फळवाटप केले याप्रसंगी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे तालुका अध्यक्ष संजयजी डाके नगरसेवक राजू दादा गोरे , नगरसेवक शहाजी खेतमाळीस, ओबीसींचे युवा … Read more

मोदी सरकारने शेतकऱ्यांना उद्ध्वस्त केले ; काँग्रेस नेत्यांची टीका

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-मोदी सरकारने देशातील शेतकऱ्यांना उध्वस्त केले. काळे कायदे करून देश उद्योगपतींच्या घशात घालण्याचे षडयंत्र देशात सुरू आहे. बाजार समित्यांना धोक्यात आणत शेतकऱ्यांची विक्री व्यवस्था मोडून काढण्याचे काम केले जात आहे, अशी टीका काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यव्यापी वर्च्युअल शेतकरी बचाव रॅलीमध्ये केली. अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते काँग्रेसच्या लालटकी कार्यालयामधून या … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज ५४९ रुग्णाना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-आज ५४९ रुग्णांना डिस्चार्ज मनपा १२९ अकोलेv३२ जामखेड ३० कर्जत १७ कोपरगाव ११ नगर ग्रा.२० नेवासा २३ पारनेर २२ पाथर्डी ६२ राहाता ३७ राहुरी २७ संगमनेर ८२ शेवगाव १४ श्रीगोंदा १८ श्रीरामपूर १८ मिलिटरी हॉस्पिटल ०७ एकूण बरे झालेले रुग्ण:४९२३७ अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी … Read more

शेतकरी कर्जमाफीचे लेखा परीक्षण करण्यात यावे; मुख्यमंत्र्यांना निवेदन

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- सरकारने लागू केलेल्या विविध कर्जमाफी योजनेचे स्वतंत्र लेखा परीक्षण करण्याची मागणी तालुक्यातील मातापूर येथील शेतकरी रामदास उंडे यांनी केली. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध मागण्याचे निवेदन पाठवले असून सरकारने २००७, २०१७ व २०१९ साली लागू केलेल्या कर्जमाफी योजनेचे स्वतंत्र लेखा परीक्षण करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. गावातील विविध … Read more

जिल्ह्यात राजकीय ‘गोंधळ’ : सेनेचे नेते भाजपच्या माजी आमदारांच्या पुत्राचे आदेश कसे काय पाळतात?

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांचे पुत्र कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांच्या आदेशावरून गुरुवारी कोपरगावचे शिवसेनेचे उपनगराध्यक्ष योगेश बागूल यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा उपमुख्याधिकरी सुनील गोर्डे यांच्याकडे दिला. शिवसेनेच्या गटनेत्यानेच पक्ष श्रेष्ठींना डावलल्याने बागूल यांनी शिवसेनेला घरचा आहेर दिल्याचे तालुक्यात चर्चा रंगल्या. आता या प्रकरणात शिवसेनेचे वरिष्ठ … Read more