अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ४१५ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- आज ४१५ रुग्णांना डिस्चार्ज मनपा ४९ अकोले २२ जामखेड ६६ कर्जत ३७ कोपरगाव १४ नगर ग्रा. १३ नेवासा ०७ पारनेर १० पाथर्डी ४७ राहाता ०४ राहुरी ०६ संगमनेर २२ शेवगाव ३३ श्रीगोंदा ५६ श्रीरामपूर २९ एकूण बरे झालेले रुग्ण:४५७९७ अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी … Read more

मर्जीतील भाविकांना ‘ते’ विश्वस्त घडवतात शनिदर्शन… सर्वसामान्य भाविक व ग्रामस्थांनी व्यक्त केली नाराजी

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :-कोरोनामुळे देवस्थाने बंद आहेत. भाविकांसाठी पाच महिन्यांपूर्वी देवस्थान प्रशासनाने मुख्य दरवाजाजवळ स्क्रीन लावून दर्शन चालू केले. या निर्णयाचे अनेक भाविकांनी कौतुक केले. राज्यातील, तसेच बाहेरील अनेक भाविक दर्शन घेत आहेत. दोन ते तीन अतिउत्साही विश्वस्त आपल्या मर्जीतील भाविकांना घेऊन दर्शनासाठी आत जात आहेत. मागील महिन्यात एका विश्वस्ताने नगर शहरातील युवा … Read more

उपाशी मरण्यापेक्षा परिवारासाठी कोरोना होऊन मेलेले बरे असे वाटत आहे…

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- कोपरगाव शहर सोमवारी होणारा जनावरांचा आठवडे बाजार कोरोनामुळे सहा महिन्यांपासून बंद असून आता त्याचा फटका व्यापारी वर्गाबरोबर शेतकरी, गाय पालन, म्हैस खरेदी-विक्री व्यावसायिक, दुग्ध व्यावसायिक, कुक्कुटपालन, शेळीपालन करणाऱ्यांबरोबर बाजारात छोटे-मोठे धंदे करणाऱ्यांना बसला आहे. शासनानाने याची गांभीर्याने दाखल घेत बाजार सुरू न केल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना व युवा बेलदार … Read more

अहमदनगर जिल्ह्यात ‘ह्या’ ठिकाणी कांद्याला मिळतोय ३३०० ते ४००० ‌भाव

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीशी संलग्न असलेल्या वांबोरी उपबाजार समितीच्या मोंढ्यावर शनिवारी झालेल्या लिलावात १ नंबर कांद्याला ३३०० ते ४००० रूपये क्विंटल बाजारभाव मिळाला. शुक्रवारी राहुरीतील मोंढ्यावर मिळालेल्या बाजारभावाच्या तुलनेत शनिवारी वांबोरीत क्विंटलमागे ४०० ते ५०० रूपयांची वाढ झाली. ३ हजार १९६ गोण्यांची आवक झाली. एक नंबर कांद्याला ३३०० … Read more

‘त्या’ शेतकऱ्याच्या शेतात गांजाची झाडे सापडली…

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- श्रीगोंदे तालुक्यातील टाकळी कडेवळीत गावात धोंडीबा गणपत सोनावणे याच्या गट नंबर ७ ब मधील गांजाची ३० झाडे पोलिसांनी शनिवारी जप्त केली. साडेसात किलो वजनाचा हा गांजा ३७ हजार ५०० रुपयांचा आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या पथकाने सोनावणेच्या शेतात छापा … Read more

कांदा व्यापाऱ्यांना बेकायदेशीररित्या प्लॉट

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- पणन संचालकांची परवानगी न घेता श्रीरामपूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकऱ्यांनी काही कांदा व्यापाऱ्यांना बेकायदेशीररित्या प्लॉट दिल्याची तक्रार संचालक सचिन गुजर यांनी सहायक निबंधकांकडे तक्रार केली आहे. बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपली आहे. न्यायालयाने सध्या त्यांना काही दिवसांसाठी दिलासा दिला आहे. मात्र, या कालावधीत त्यांनी आपल्या मर्जीतील … Read more

शेतीच्या जुन्या वादातून मारहाण, डोक्यावर केला कुऱ्हाडीने वार

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- शेतीच्या जुन्या वादातून कुऱ्हाडीने मारहाण करण्यात आली. ही घटना महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी वीरगाव येथे घडली. मात्र, साक्षीदारांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पोलिसांकडे उशिरा तक्रार दाखल करण्यात आली. भागवत गबाजी कुमकर (वय ५७) यांच्या डोक्यावर कुऱ्हाडीने वार झाल्याने ते जखमी झाले. याप्रकरणी सोपान संपत कुमकर, … Read more

शेतकरी व कामगारविरोधी केलेले काळे कायदे केंद्राने तातडीने रद्द करावेत

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :- केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर केलेले नवे कृषी विधेयक आधारभूत किंमत विनाआधार करणारे अाहे. संघर्षातून कामगारांनी मिळवलेले अधिकार नव्या कामगार कायद्याने संपुष्टात येणार आहेत. फक्त भांडवलदारांच्या सोयीसाठी शेतकरी व कामगारविरोधी केलेले काळे कायदे केंद्राने तातडीने रद्द करावेत, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. मालुंजे येथे … Read more

५३ लाखांच्या गुटखाप्रकरणी आरोपींच्या कोठडीत वाढ

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :-  श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे येथे मंगळवारी पोलिसांनी सुमारे ५३ लाख ५४ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. अटक केलेल्या चार आरोपींच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने १२ ऑक्टोबरपर्यंत वाढ केली. एकलहरे शिवारातील आठवाडी परिसरात कलिम सय्यद यांचे शेतातील पत्र्याच्या गोडावूनमध्ये आयशर कंपनीचा टेम्पो (जीए ०७ एफ ३१००) व अशोक लेलंड कंपनीच्या छोटा टेम्पोतून … Read more

कोरोना नसता, तर बरेचसे प्रश्न एव्हाना मार्गीही लावले असते

अहमदनगर Live24 टीम,11 ऑक्टोबर 2020 :-  माझ्या मतदारसंघातील याच नाही, तर बहुतांश रस्त्यांची ही अवस्था आहे. कारण या मतदारसंघात गेली पंचवीस वर्षे भाजपचे आमदार होते. याचा जाब खरंतर तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे होता. मी विकासाचा हा दीर्घ बॅकलॉग भरुन काढण्यासाठी काम करतोय. कोरोना नसता, तर बरेचसे प्रश्न एव्हाना मार्गीही लावले असते, असे प्रत्युत्तर आमदार रोहित … Read more

रोहित पवारांनी देशाच्या नेतृत्वाला सल्ले देण्यापेक्षा…

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- आमदार रोहित पवारांनी देशाच्या नेतृत्वाला सल्ले देण्यापेक्षा आपल्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील दयनीय अवस्था झालेल्या मिरजगाव येथील नगर-सोलापूर रस्त्याची दुरुस्ती करावी, असा सल्ला भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी शनिवारी व्हिडिओ क्लिपवर दिला. आमदार पडळकर सकाळी साडेसात वाजता नगर-सोलापूर रस्त्याने औरंगाबादकडे चालले असताना मिरजगाव येथे काही वेळ थांबले होते. या वेळी त्यांनी ग्रामस्थांशी … Read more

हृदयद्रावक घटना …व्यसनाधीन बाप प्रयत्न करूनही सुधारत नसल्याने 20 वर्षीय मुलाने केले असे काही…

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :-  राहाता तालुक्यातील लोणी खुर्द येथे एक अत्यंत हृदयद्रावक घटना शुक्रवारी  घडली. व्यसनाधीन बाप अनेक प्रयत्न करूनही सुधारत नसल्याने 20 वर्षीय मुलाने गळफास घेवून आत्महत्या केली.   लोणी पोलीस ठाण्याजवळच असलेल्या लोमेश्वरनगर वसाहतीमध्ये राहणार्‍या शुभम अनिल चव्हाण (वय 20) हा तरुण त्याच्या राहत्या घरात साडीच्या साह्याने गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला पन्नास हजारांचा आकडा

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ७७९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४५ हजार ३८२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.७८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५४५ ने वाढ … Read more

कार लोन घ्यायचंय ? : जाणून घ्या ‘ह्या’ १५ बँकांचे व्याजदर व हप्ता

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :-  सध्याचा काळ हा फेस्टिव सीजन म्हणून ओळखला जातो. या हंगामात वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जातात. कंपन्या उत्कृष्ट सूट आणि ऑफर देखील देतात, ज्यायोगे लोक आवश्यक नसतानाही खरेदी करतात. अशीच डिस्काउंट कार कंपन्यादेखील ऑफर करतात. आपणास ही ऑफर आवडत असेल तर मग प्रथम कर्जाचे नियोजन करावे लागेल. कर्ज किती … Read more

आपण आपला मोबाईल नंबर हव्या त्या कंपनीत ऑनलाईन पोर्ट करू शकता; ‘अशी’ करा प्रोसेस

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :-  वेगवान इंटरनेटसह अधिक डेटाची मागणी वाढली आहे. अशा परिस्थितीत बर्‍याच टेलिकॉम कंपन्या कमी किंमतीत अधिक डेटा आणि व्हॉईस कॉल सारख्या मूलभूत सुविधादेखील उपलब्ध करुन देत आहेत. बाजारात अशा अनेक योजना आहेत ज्या उच्च-गती प्रदान करतात. अशाप्रकारे, सर्व टेलिकॉम कंपन्या त्यांच्या ग्राहकांना सर्वोत्तम योजना देण्यासाठी स्पर्धा करीत आहेत. त्यानंतरही, जर … Read more

कोरोना विषाणू ‘इतक्या’ तास त्वचेवर जिवंत राहतो ; ‘हा’ आला नवीन अहवाल

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- कोरोना विषाणूने गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून जगभरासह भारतातही थैमान घातलं आहे. कोरोना विषाणूला रोखण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ संशोधन करत आहेत. आतापर्यंत या विषाणूंच्या प्रसाराबाबत नवनवीन गोष्टी संशोधनातून समोर आल्या आहेत. दरम्यान जपानच्या क्योटो प्रीफेक्चुरल युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिनने एक धक्कादायक खुलासा केला आहे. सार्स सीओव्ही – 2 अर्थात कोरोना विषाणू … Read more

आनंदाची बातमी : आरटीजीएस सुविधा आता 24X7 मिळणार ; वाचा सविस्तर डिटेल्स

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- डिसेंबर 2020 पासून, आरटीजीएसद्वारे आठवड्यातून 24 तास आणि सात दिवस पैसे हस्तांतरित करता येतील. रिअल टाईम ग्रॉस सेटलमेंट म्हणजेच आरटीजीसी ही एका खात्यातून दुसर्‍या खात्यात पैसे हस्तांतरित करण्याची सुविधा आहे. सध्याच्या नियमांनुसार, दुसर्‍या व चौथ्या शनिवारी, रविवारी वगळता सकाळी सात ते संध्याकाळी सहा या दरम्यान पैसे हस्तांतरित करता येतील. … Read more

मोदींच्या ‘आत्मनिर्भर’ घोषणेने झालंय ‘असे’ काही ; चीनला बसलाय ‘असा’ झटका

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- लडाखमध्ये चीनने जो भ्याड हल्ला केला त्यावरून देशभरात संतापाची लाट उसळली . त्यानंतर चिनी मालावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला. गोपनीयतेचे कारण देत सरकारने अनेक ऍपवर बंदी घातली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियान सुरु केलं. मोदी यांनी यासाठी विविध पॅकेजेसच्या घोषणा केल्या. आत्मनिर्भर घोषणेचे आता परिणाम दिसून … Read more