या तालुक्यात कोरोनाने घेतला पंचवीस जणांचा बळी

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून कमी होताना दिसत आहे. मात्र अद्यापही जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचे चित्र आहे. दरम्यान अकोले तालुक्यात आज (बुधवार ता.7) कोरोना विषाणूंनी सत्तरवर्षीय वृद्धाचा बळी घेतल्याने बळींचा आकडा पंचवीस झाला आहे. तर बाधितांचा आकडा सतराशे पार गेला आहे. आज सकाळीच अकोले तालुकावासियांना … Read more

श्रीगोंदा तालुका भाजपाचे वतीने शेतकरी विरोधी महाविकास आघाडी सरकार विरोधात निषेध आंदोलन…

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने राष्ट्रहित व जनहिताचे केवळ अनेक ऐतिहासिक निर्णयच घेतले नाहीत तर यशस्वी अंमलबजावणी करण्याचे कामही केले. यामुळेच देशात अभिमानाने म्हटले जाते की, “मोदी है तो मुमकीन है”. आता मोदी सरकारने संसदेच्या दोन्ही सभागृहात ऐतिहासिक कृषी विषयक विधेयक मंजूर करून शेतकऱ्यांच्या जीवनात अमुलाग्र … Read more

आता या राजकीय पक्षाचे 5 रुपयात जेवण

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- शिवसेने पाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने कल्याणरोडवरील शिवाजीनगर येथे गरजूंना ५ रुपयात भोजन देण्याचा उपक्रम सुरु केला आहे. शिवाजीनगर परिसरामध्ये मोठ्याप्रमाणात हातावर पोट भरणाऱ्यांची संख्या आहे. कोरोनाकाळात अनेकांचा व्यवसाय गेल्यामुळे अनेक कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे. त्यांना मदतीचा हात म्हणून सुमारे ८0 गरजूंना दररोज ५ रुपयात भोजन देण्याची सुविधा रविंद्र … Read more

नारी शक्ती आक्रमक! स्वरक्षणासाठी आमच्या हाती शस्त्रे द्या

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- देशात महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. जगातील महान संस्कृती असलेल्या भारत देशात महिलांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. यामुळे आता हि नारी आक्रमक झाली आहे. महिलांचे रक्षण करण्यास सरकार, पोलीस प्रशासन अकार्यक्षम असल्यास महिलांना स्वतःच्या रक्षणासाठी शस्त्रे बाळगण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी महिलांनी केली आहे. उत्तर … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील त्या सरपंचांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :-  खारी-टोस्ट विकणाऱ्या तरुणास जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी नान्नज दुमलाचे सरपंच व भाजपचे पदाधिकारी भिमराज नामदेव चत्तर यांच्यावर तालुका पोलिसात अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी दुपारी ४.३० वाजता नान्नज दुमाला बाजारतळावर घडली. घुलेवाडीचा संतोष धोंडिबा सोनवणे हा तरुण मारुती ओमिनीमधून खारी-टोस्टची विक्री करतो. बाजारतळावर खारी विक्रीसाठी त्याने … Read more

कोरोना महामारीमुळे ‘या’ देवीच्या मंदिरातील नवरात्र उत्सव रद्द

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :-  कोरोनामुळे यंदाच्या वर्षी सर्वच सणउत्सव सध्या पद्धतीने साजरे करण्याचे आवाहन सरकारने केले आहे. नुकताच होऊन गेलेला गणेश उत्सव देखील अत्यंत सध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर आता जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र उक्कडगाव येथील श्री रेणुका देवी मंदिरात नवरात्र उत्सव रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांनी मंदिर कार्यस्थळावर … Read more

पोलिसांची गांधीगिरी! विनामास्क फिरणाऱ्या बेजबाबदारांना दिले गुलाबपुष्प

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात आद्यपही कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. नागरिकांच्या सुरक्षितेसाठी शासनाकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे. परंतु काही बेजबाबदार नागरिकांकडून शासनाच्या या नियमांची पायमल्ली केली जात आहे. या नागरिकांना त्याची चूक लक्षात आणून देण्यासाठी पोलिसांनी खाक्या न दाखवता चक्क गांधीगिरीचे अवलंबन केले आहे. कोरोना महामारीच्या संकटमय काळात विनामास्क रस्त्यांवर फिरणाऱ्यांच्या संख्येत … Read more

दिलासादायक! गेल्या 48 तासात एकाही मृत्यूची नोंद नाही

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असला तरी एक दिलासादायक माहिती समोर येत आहे. गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात कोरोनामुळे कोणाचाही बळी गेलेला नाही. तसेच जिल्ह्यात हळहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. कोरोनाबाधितांची संख्या घटना दिसून येत आहे. दरम्यान रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 91.94 टक्के इतके झाले … Read more

शेतकऱ्यांना मिळणार 2 हजारांचा सहावा हप्ता; खात्यात जमा झालेत कि नाही ‘असे’ करा चेक

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :-  पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 3 हप्त्यांमध्ये 6000 रुपये दिले जात आहेत. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 2000 रुपयांचे 5 हप्तेही देण्यात आले आहेत. 9 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहाव्या हप्त्याचे पैसे जाहीर केले. यानंतर 3 कोटी 77 लाख शेतकर्‍यांच्या खात्यात सहावा हप्ता जोडला गेला आहे. अशा … Read more

युवकांसाठी रोजगार निर्मिती केंद्रीभूत ठेवून शहर काँग्रेसने काम करावे – आ. डॉ. सुधीर तांबे

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :-  नगर शहरातील युवकांसमोर रोजगार हा सगळ्यात मोठा समस्येचा विषय आहे. युवकांच्या हाताला काम मिळावे यासाठी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसने पुढाकार घेत शहरामध्ये काम करावे, असे आवाहन काँग्रेसचे विधानपरिषदेचे आ.डॉ.सुधीर तांबे यांनी केले आहे. शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने केंद्र शासनाच्या शेतकरी, कामगार विरोधी निर्णयांच्या कायद्याला विरोध करण्यासाठीच्या सह्यांच्या मोहीमेच्या शुभारंभ … Read more

वंचित बहुजन आघाडीचे स्मशानभूमीत सरन रचत आंदोलन, हाथरस प्रकरणाचा केला निषेध

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :-  वंचित बहुजन आघाडी ने आज स्टेशन रोडवरील स्मशानभूमीत आंदोलन करत हाथरस प्रकरणाचा निषेध केला. यावेळी योगी सरकारच्या विरोधात संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच स्मशानभूमीत सरन रचत तेथे बसण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला. त्यावेळी त्यांना पोलिसांनी अडवले. हाथरस प्रकरणाचे तीव्र पडसाद देशभर उमटले आहे. नगरमध्येही आज वंचित बहुजन आघाडीने स्मशानभूमीत … Read more

देशात लोकशाही आणण्यासाठी राजकीय, सामाजिक परिवर्तनाची गरज

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :-  सत्ताधारी हुकुमशाही पध्दतीने कारभार करीत आहे. शेतकरी व कामगार विरोधी धोरण राबवून लोकशाही पायदळी तुडवत आहे. राज्यकारभार घटनेला अनुसरुन चालताना दिसत नाही.याचा सर्वसामान्यांनी गाभीर्याने विचार करण्याची गरज आहे. दलित व अल्पसंख्यांक समाजावर अत्याचार होताना दिसत असून, देशात लोकशाही आणण्यासाठी व आपले हक्क अबाधित ठेवण्यासाठी एकजुटीने राजकीय, सामाजिक परिवर्तनाची मशाल … Read more

महिला बचत गट, फायनान्स, मायक्रो फायनान्स कंपन्या व बँकेचे कर्ज माफ करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- टाळेबंदीमुळे महिला आर्थिक संकटात सापडल्या असून, त्यांनी महिला बचत गट, फायनान्स, मायक्रो फायनान्स कंपन्या व बँकेकडून घेतलेले कर्ज माफ करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे सुनील शिंदे, सागर भिंगारदिवे, संदीप गायकवाड, विजय गायकवाड, सुनील गट्टाणी, जीवन कांबळे, विनोद … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना अपडेट्स वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ६१७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४३ हजार ४९७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९१.९४ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या ३०७१ इतकी आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ११९, … Read more

लवकरच लिंकरोड पुलाचे काम पूर्ण होणार : सभापती मनोज कोतकर

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- केडगाव उपनगराच्या विकासासाठी व विस्तारीकरणासाठी आ. संग्राम जगताप यांनी लिंकरोडच्या कामासाठी दीड कोटी रुपये व त्यावरील खोकर नदीवरील पुलासाठी १ कोटी रुपयांचा निधी असा सुमारे अडीच कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडून मंजूर करुन आणला व कामाला सुरुवातही झाली. रस्त्याचे व पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आणि कोरोनामुळे संपूर्ण देशात … Read more

मोठी बातमी! शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- शहर पाणीपुरवठा योजनेवरील दुरुस्तीसाठी उद्या गुरूवारी (ता. ८) महापालिकेकडून शट-डाऊन घेण्यात येणार आहे. गुरूवारी सकाळी दहा वाजल्यापासून ते दुसर्‍या दिवशी पहाटे तीन वाजेपर्यंत ही दुरुस्ती सुरू राहणार आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यात महापालिकेने बदल केला आहे. बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगर परिसर, लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर, स्टेशन रोड परिसर, सारसनगर, स्टेशन रोड, … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज ६१७ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- आज ६१७ रुग्णांना डिस्चार्ज मनपा ११९ अकोले २१ जामखेड ३७ कोपरगाव २७ नगर ग्रा.६७ नेवासा ४६ पारनेर २२ पाथर्डी २२ राहाता ५९ राहुरी ४८ संगमनेर ५६ शेवगाव २६ श्रीगोंदा २८ श्रीरामपूर ३४ कॅन्टोन्मेंट ०३ मिलिटरी हॉस्पिटल ०१ इतर जिल्हा ०१ एकूण बरे झालेले रुग्ण:४३४९७ अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी … Read more

शेतकऱ्यांना दिलासा; आढळाचे पाणी आणले रोहित ओढ्यात

अहमदनगर Live24 टीम,7 ऑक्टोबर 2020 :- महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा कामाचा धडाका आणि त्यांची कर्तव्यतत्परता सर्वांनाचं माहित आहे. त्यांच्या कामाच्या धडाक्याने त्यांनी आजपर्यंत अनेक काम मार्गी लावले आहेत. आता महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या मदतीने आढळा नदीचे ओव्हरफ्लोचे पाणी सतराशे फूट लांब … Read more