जनावरांना टॅगिंग नाही ? बाजार समितीत ‘नो एंट्री’

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  सध्या जनावरांत विविध आजारांचा संसर्ग होत आहे. लाळ्या खुरकूत व सांसर्गिक गर्भपात यांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. यासाठी राहाता पंचायत समितीच्यावतीने व आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या रोगाच्या नियंत्रणासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत प्रत्येक गावात लसीकरण मोेहीम सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या एनएडीसीपी अंतर्गत हे राबविले जात आहे. … Read more

‘अवैध मुरूम उचलणाऱ्यांना आला घाला, अन्यथा…’

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- सध्या वाळू तस्करी, अवैध मुरूम उत्खनन आदी अवैध प्रकार जिल्ह्यात सर्वत्र सुरु असल्याचे वास्तव आहे. पोलीस, महसूल प्रशासन यावर कडक कारवाई करताना दिसून येतात. परंतु या लोकनावर मात्र जरब बसताना दिसत नाही. देवळाली प्रवरा व राहुरी कारखाना परिसरातून अवैधरित्या रोज हजारो ब्रास मुरूम उचलला जात आहे. या मुरूम माफीयांवर आठ … Read more

उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा; युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांची मागणी

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- उत्तर प्रदेशातील हाथसर येथील आदिवासी मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ भेटीसाठी जात उत्तर प्रदेशात झालेल्या पीडितेच्या अत्याचार प्रकरणात देशभरात संताप व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जात असताना त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. या दोन्ही घटना म्हणजे लोकशाहीवर घाला असल्याची टीका विरोधक करत आहेत. तर खासदार राहुल गांधी … Read more

बंदुकीचा धाक दाखवून अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- 5 एप्रिल 2015 रोजी शफीक शब्बीर शेख (रा. नारायणगव्हाण ता. पारनेर) या आरोपीने बंदुकीचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस तीन वर्षे सक्तमजुरी व 50 हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. सदर खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने सहा साक्षिदार तपासण्यात … Read more

‘कृषी अवजारांसाठी ऑनलाइन अर्ज करा’

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-राज्य शासनाने चालू वर्षीही कृषी यांत्रिकीकरण उप अभियान राबवण्याचे ठरवले असून या अभियानाचे अंमलबजावणी साठी राज्य शासनाने प्रशासकीय मान्यता दिलेली असून या अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी अवजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. शासनाच्या महाडीबीटी महा आयटीआय या संकेतस्थळावर तालुक्यातील गरजू शेतकऱ्यांनी अर्ज सादर … Read more

काँग्रेसचे आज जिल्हाभर धरणे आणि निदर्शने

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- नगर | मोदी सरकारने शेतकरी, कामगार विरोधी केलेल्या कायद्यांना विरोध करण्यासाठी, हे कायदे मागे घेण्यात यावे या मागणीसाठी शुक्रवारी (२ ऑक्टोबर) गांधी जयंती दिनी काँग्रेसतर्फे जिल्हाभर धरणे व निदर्शने करण्यात येणार आहेत. जिल्हा काँग्रेस आणि शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने जिल्ह्याच्या मुख्यालयी नगर मार्केट कमिटीच्या आवारामध्ये गांधी जयंतीच्या दिवशी सकाळी ११.३० … Read more

भाजप पदाधिकारी निवडीवर आक्षेप लवकरच पुढील दिशा ठरवणार

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  जनाधार नसलेली मंडळी नेत्यांच्या पुढे पुढे करुन पदे पटकावतात. साखर कारखाना संचालक, जिल्हा नियोजनचे सदस्य, तसेच पूर्वी तालुकाध्यक्ष असलेल्या व्यक्तीलाच पुन्हा संधी मिळाली. चळवळीत काम करणाऱ्या व संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलले गेले, असे सांगत पुढील दिशा ठरवण्यासाठी लवकरच सर्व बूथप्रमुखांची व शक्तीकेंद्र प्रमुखांची बैठक घेऊन निर्णय घेऊ, अशी माहिती … Read more

…तर मला मते कशामुळे पडतात हे कळत नाही -खासदार सुजय विखे

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी सर्वांना समान न्याय दिला पाहिजे. खासदार, आमदार, नेतृत्व चुकत असेेल, तर बोलले पाहिजे. उद्देश पक्षवाढीचा असला पाहिजे, कोणा एका व्यक्तीच्या वाढीचा नाही, असे सांगत खासदार डॉ. सुजय विखे यांनी आपल्या मनातील खदखद पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभात व्यक्त केली. भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे अध्यक्षस्थानी होते. महिला जिल्हाध्यक्ष अश्विनी थोरात, तालुकाध्यक्ष … Read more

जिल्हा शल्य चिकित्सकांसह जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकार्यांच्या बदल्या

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-नगरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रदीप मुरंबीकर यांची औरंगाबादमध्ये आरोग्य सहाय्यक संचालक पदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी नगरमध्येच कार्यरत असलेले अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनिल पोकर्णा यांची जिल्हा शल्य चिकित्सक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. राहुरी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.वर्षा डोईफोडे यांची औंध (पुणे) येथे अतिरिक्त जिल्हा … Read more

सात-आठ वर्षांत ८० कोटींपेक्षा जास्त रकमेचा भ्रष्टाचार !

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- नगरयेथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्ताधारी पक्षाने मागील सात-आठ वर्षांत ८० कोटींपेक्षा जास्त रकमेचा भ्रष्टाचार केला आहे. २०१८ मध्ये सहायक उपनिबंधक एस. डी. सूर्यवंशी यांच्या चौकशी समितीच्या अहवालात या बाबी स्पष्ट नमूद आहेत. त्यानंतरही सत्ताधारी मंडळाचा भ्रष्टाचार सुरूच आहे. याबाबतच्या तक्रारीवरील अहवाल उपनिबंधक गणेश पुरी समितीने तातडीने … Read more

नुकसानीपोटी ‘त्या’ शेतकऱ्यांना ३ कोटींची भरपाई

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- मागील वर्षी जुलै ते ऑक्टोबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे व गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे उभ्या पिकांचे व काढणी केलेल्या पिकांचे अतोनात नुकसान होईन शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला होता. भरपाई मिळावी, यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले. तालुक्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात ३ कोटी १ लाखाची नुकसान भरपाई … Read more

पोपटराव पवार म्हणाले कोरोनाबाबतचा वाढता निष्काळजीपणा जीवघेणा

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- शासनाने ठरवून दिलेले नियम काटेकोरपणे पाळले, तरच आपण कोरोनावर यशस्वी मात करू शकतो. मात्र, सध्या अनेकांकडून निष्काळजीपणा वाढत आहे. त्याचे परिणाम वाढत्या रुग्णसंख्येवरून दिसून येत आहेत. निष्काळजीपणा जीवघेणा ठरत आहे, अशी खंत सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांनी व्यक्त केली. नगर व पारनेर तालुका पत्रकार संघ आणि हिवरेबाजार ग्रामस्थांच्या वतीने गावात … Read more

रेस्टॉरंट, बार सोमवारपासून सुरू होणार आहेत पण …

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- तब्बल सहा महिन्यांनंतर नगर शहर व जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट व बार ५ ऑक्टोबरपासून ५० टक्के क्षमतेने सुरू होतील. शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था मात्र ३१ पर्यंत बंदच असतील. सिनेमा हॉल, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, व्यापारी संकुलही बंदच राहतील. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी राहुल दिवेदी यांनी गुरुवारी जारी केले. ३१ पर्यंत … Read more

रेकॉर्डवरील गुन्हेगार ऑन टार्गेट

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेले जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आज अखेर आपला पदभार स्वीकारला आहे. दरम्यान जिल्ह्यातील गुन्हेगारीचा वाढता आलेख, अवैध धंदे, यांना नक्कीच आळा बसेल अशी अपेक्षा नगरकरांनी बाळगली आहे. दरम्यान पोलीस अधीक्षकांनी पदभार स्वीकारल्यानंतर म्हणाले की, वाळू तस्करी च्या माध्यमातून संघटित गुन्हेगारी वाढत आहे. नगर जिल्ह्यात … Read more

शिवसेनेतील फुटीरवादी कोण? याचे आत्मपरीक्षण करा

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  एकेकाळी शहरात दिवंगत नेते अनिल भैय्यांच्या शिवसेनेचा असलेला बोलबाला आता पक्षातील अंतर्गत राजकारणामुळे डळमळू लागला आहे. गेल्या एकही दिवसांपासून शिवसेनेतील गटबाजीचे किस्से आता चांगलेच रंगू लागले आहे. पक्षातील विषय चव्हाटयावर बाहेर येऊ लागल्याने नगरकरांमध्ये चर्चेला उधाण आले आहे. शिवसेनेत जातीयवादाला थारा दिला जात नाही. पक्षाकडून स्व. अनिल भैय्या राठोड … Read more

चोविस तासांत सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यु

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात २४ तासांमध्ये कोरोना रुग्णसंख्येत ४०५ ने वाढ झाली. सध्या ४ हजार १४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ३९ हजार ५६२ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. दरम्यान आज सहा जणांचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत ७२४ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज ०५, खाजगी … Read more

पैसे उकळणाऱ्या त्या कोविड सेंटरवर कारवाई करा

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. कोरोनाला आळा बसावा यासाठी शासनाने गावपातळीवर कोविड सेंटर उभारले आहे. याच्या माध्यमातून रुग्णांची तातडीने तपासणी केली जावी असा उद्देश होतो. मात्र आता नेवासा तालुक्यातील एक कोविड सेंटर वर कारवाई करा अशी मागणी जोर धरू लागली आहे. भेंडा (ता. नेवासा) येथील एका खाजगी हॉस्पिटल … Read more

काँग्रेसचा नगरमध्ये रस्ता रोको

अहमदनगर Live24 टीम,1 ऑक्टोबर 2020 :-  उत्तरप्रदेशमधील बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यास जाणाऱ्या राहुल गांधींना पोलिसांनी रस्त्यामध्येच अडवले. तसेच पोलिसांकडून राहुल गांधींना धक्काबुक्की करण्यात आली. याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहे. ‘ याच पार्श्ववभूमीवर नगर मध्ये देखील योगी सरकारचा निषेध करण्यात आला. याबाबत माहिती अशी कि, शहर जिल्हा काँग्रेसतर्फे उत्तरप्रदेश सरकारने राहुल गांधी आणि प्रियंका … Read more