कोणाचं कोणावाचून अडत नाही, अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सज्जड दम !

ajit pawar

काही पदाधिकारी, कार्यकर्ते साथ सोडून गेले आहेत. अनेक जण कारण नसताना अफवा पसरवत आहेत. अजूनही सर्व प्रमुख पदाधिकारी माझ्या सोबतच आहेत. तर काही जण दिवसा इकडे आणि रात्री तिकडे असे आहेत. असे करणाऱ्यांनी इकडेच राहावे किंवा तिकडे जावे. देश कोणाच्या हातात आहे, राज्य कोणाच्या हातात आहे आणि निधी आणण्याची ताकद कोणामध्ये आहे, हे सर्वांनी लक्षात … Read more

पुण्यातील सभेत शाहांचा घणाघात, शरद पवार भ्रष्टाचाराचे सरदार तर उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते !

amit shaha

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सरदार, तर उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले आहेत. ते सध्या औरंगजेब फॅन क्लबचे नेते झाल्याने त्यांचे कधीही भले होणार नाही, अशी घणाघाती टीका करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रात महायुती सरकार प्रचंड बहुमताने सत्तेत येणार … Read more

जिल्ह्यातील ‘या’ कारखान्याची अवस्था बिकट; वीजबिल थकल्याने कारखान्याचा वीज पुरवठा खंडित…!

Ahmednagar News : श्रीगोंदा तालुक्यातील कर्मयोगी कुंडलिकराव जगताप सहकारी साखर कारखान्याने (कुकडी) शेतकऱ्यांचेही पैसे थकवले आहेत. ‘आरआरसी’चा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठवला होता. आयुक्तांकडे सुनावणी झाल्यानंतर कारखान्याने शेतकऱ्यांची काही रक्कम अदा केली. तरीही १५ कोटी थकित होते. शेतक-यांचे पूर्ण पैसे न दिल्याने कारखान्याची मालमत्ता ताब्यात घेऊन साखर, मोलॅसिस व इतर उत्पादनांची विक्री करून ही रक्कम वसूल करण्याचे … Read more

माझ्या घरासमोर मुरूम का टाकला; सरपंचावर केला कोयत्याने हल्ला, नगर तालुक्यातील ‘या’ गावात घडला धक्कादायक प्रकार

Ahmed nagar News : माझ्या घरासमोर मुरूम का टाकला असे म्हणत एकाने सरपंचावर कोयत्याने हल्ला करत त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नगर तालुक्यातील घोसपुरी गावात शनिवारी घडली. या बाबत घोसपुरीचे सरपंच किरण साळवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अय्याज शौकत शेख याच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न, आर्म अक्ट सह अट्रॉसीटीचा गुन्हा नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात … Read more

विधानसभेपूर्वीच गावचे कारभारी ठरणार :’त्या’ ग्रामपंचायतींची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध; आता प्रतीक्षा निवडणुक अधिसूचनेची

Ahmednagar News : जिल्ह्यातील ८४ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. तर वेगवेगळ्या कारणांमुळे अनेक ग्रामपंचायत सदस्यांची पदे रिक्त आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आता या कार्यकाळ पूर्ण केलेल्या ग्रामपंचायतींसह रिक्त ग्रामपंचायत सदस्यांची विधानसभा निवडणुकीपूर्वी होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शुक्रवारी (दि. १९) प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे रिक्त पदे … Read more

कोणत्या मुद्द्यांच्या आधारे कोपरे धरण रद्द झाले हे आधी तपासा त्यानंतर टीका करा : काकडे यांच्यावर बर्डे यांचा पलटवार

Ahmednagar News : कोपरे धरण रद्द होण्याची कारणे जाणून घेवून जनशक्तीच्या नेत्या माजी जिल्हा परिषद सदस्या हर्षदाताई काकडे यांनी राजकीय आरोप करावेत. हनुमान टाकळीच्या हनुमंताची मुर्ती समर्थ रामदासांनी स्वहस्ते स्थापन केलेली आहे. ती मुर्ती इतरत्र हलविता येत नाही. म्हणुन व कोपरे धरण होण्यास त्यावेळी अनेक गावातील गावकऱ्यांनी विरोध केला होता. राजळे कुंटुबावर आरोप करताना काकडे … Read more

सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर; महिलांना मिळणार अजित दादांशी बोलण्याची संधी..?

Ahmednagar News : नुकताच ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी नगर जिल्हा दौरा केला. यात प्रामुख्याने अकोले तालुक्यात स्वर्गीय अशोकराव भांगरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून शरद पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यात त्यांनी महायुती सरकारवर सडकून टीका केली. तसेच आगामी विधानसभेच्या उमेदवाराची घोषणा केली. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवार हे पहिल्यांदाच … Read more

पाणलोटात धुवाँधार पाऊस; २४ तासांत भंडारदरा धरणाच्या पाणी साठ्यात झाली ‘इतकी’ वाढ.. ? पर्यटकांची गर्दी वाढली; वन्यजीव विभागाने केल्या ‘या’ सूचना

Ahmednagar News : अकोले तालुक्‍यात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. भंडारदरा पाणलोटक्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू असून, ओढे-नाले खळखळून वाहू लागल्याने परिसरातील धबधबे कोसळत आहेत.सर्व परिसर निसर्गरम्य असून, डोंगरदऱ्यांनी हिरवा शालू परिधान केला आहे. या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची रेलचेल वाढली आहे. दरम्यान भंडारदरा धरणात गेल्या २४ तासांत २४१ दशलक्ष घनफूट नवीन पाणी आले … Read more

आता मी केलेल्या विकासकामाच्या श्रेयासाठी काहीजण आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत : आ. संग्राम जगताप यांची टीका

Ahmednagar News : शहराची विकासकामे करीत असताना या पाच वर्षांमध्ये कोरोनाचे संकट आपल्यावर ओढावले, आणि पाठोपाठ सरकार बदलाबदलीमध्ये फार वेळ गेला आणि विकास कामे करीत असताना अडचणी आल्या. मंजूर केलेल्या विकास कामांना स्थगिती दिली होती. कारण कोविड काळामध्ये निधी उपलब्ध होत नव्हता. हा सर्व निधी आरोग्यासाठी वळविला होता त्यामुळे अनेक कामे ठप्प होती. परंतु मी … Read more

अहमदनगर येथे तरुणाकडून महाविद्यालयीन विद्यार्थीनीची छेडछाड !

chedchad

अहमदनगर येथील महाविद्यालय सुटल्यावर घरी जाण्यासाठी निघालेल्या एका १७ वर्षीय विद्यार्थिनीला महाविद्यालयाच्या गेटवर अडवून तिची छेडछाड केल्याचा प्रकार लालटाकी परिसरातील एका महाविद्यालयासमोर घडला. याबाबत तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, कृष्णा किरण कांबळे (रा. प्रबुद्ध नगर, भिंगार) असे या गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद पिडीत तरुणीने शुक्रवारी (दि.१९) सायंकाळी तोफखाना पोलिस ठाण्यात … Read more

कोविडमध्ये निधी उपलब्ध होत नव्हता तरी देखील विकासाची कामे सुरूच होती : आ. जगताप

sangram jagtap

अहमदनगर शहराची विकास कामे करीत असताना या पाच वर्षांमध्ये कोरोनाचे संकट आपल्यावर ओढावले, तसेच सरकार बदलाबदलीमध्ये फार वेळ गेला त्यामुळे विकास कामे करीत असताना अडचणी आल्या, मंजूर केलेल्या विकास कामांना स्थगिती दिली गेली, मी सरकारमधला प्रतिनिधी असल्याने शहराच्या विकासाला भरभरून निधी मंजूर करून आणला व ती कामे आता टप्प्याटप्प्याने सुरू आहेत, विकासाची कामे सुरू असल्यामुळे … Read more

आजोबांनी पण तेच केले, आता हे पण तेच करत आहेत; विखे कुटुंबाची खासियतच अशी आहे की, त्यांना … ?: खासदार निलेश लंके यांची टीका

विखे पाटील फाउंडेशनची तीन कोटी रुपयांची पाणीपट्टी माफ केल्याचा ठराव शासनाकडे विखंडित करण्यासाठी पाठवा  Ahmednagar News : पाच वर्षांसाठी मी मतदारसंघाचा खासदार म्हणून निवडून आलो आहे. या मतदारसंघात विविध योजना आणून विकास करण्याचे काम माझ्याकडे आहे. तर आता त्यांच्याकडे काहीच काम नाही. त्यामुळे कोर्टकचेऱ्या हे डिपार्टमेंट त्यांच्याकडे दिले आहे. देशात इतके खासदार निवडून आले, मात्र … Read more

मोबाईल रिचार्ज दर वाढवल्याने, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री !

mobile recharge

आज प्रत्येक घरात किमान चार मोबाईल फोन आहेत, त्यामध्ये महिन्याला दोनशे रुपये प्रमाणे ८०० रुपयांचे रिचार्ज करावे लागते. मात्र, जुलै महिन्यापासून मोबाईल रिचार्जचे दर वाढल्याने मोबाईल वापरकर्त्यांना आर्थिक फटका बसला आहे. ज्याचे पोट हातावर आहे, जे मोलमजुरी करतात त्यांना लोकेशन मिळवण्यासाठी, व्हॉट्सअॅप डेटा हा अत्यंत गरजेचा झालेला आहे. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीपासून सर्वांचे आर्थिक गणित बिघडले … Read more

अविश्वास ठराव नामंजूर होण्यासाठी ग्रामपंचायत सदस्याचे अपहरण करणाऱ्या सरपंचाला न्यायालयाचा दणका ; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने अटकेची टांगती तलवार ..!

Ahmednagar News : ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्र येऊन सरपंचाविरुद्ध दाखल केलेला अविश्वास ठराव नामंजूर व्हावा. यासाठी ग्रामपंचायत सदस्याचे अपहरण केल्याप्रकरणी श्रीगोंदा तालुक्यातील आढळगावचे सरपंच शिवप्रसाद उबाळे यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे . याबाबत सरपंच उबाळे यांच्यासह अन्य सात अज्ञात आरोपी विरोधात मिरजगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने … Read more

डिंबे माणिक डोह कालवा झाला नाही तर तालुक्यातील शेतीचे वाळवंट होईल – घनश्याम शेलार !

ghanshyam shelar

राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ज्या मागण्या केल्या आहेत. त्या मागण्या कुकडी डाव्या कालव्याच्या पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, करमाळा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या आहे. डिंबे माणिकडोह कालवा झाला नाही तर पुढील येणाऱ्या पिढ्या बरबाद होतील अशी भिती काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार यांनी श्रीगोंदा येथे आयोजित पत्रकार परिषदेत … Read more

… तर आगामी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काँग्रेसचा होऊ शकतो : माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे सूतोवाच

Ahmednagar News : सध्या महाराष्ट्रात महायुती सरकारचा भ्रष्टाचार मंत्रालयापासून खालपर्यंत बिनधास्त सुरु आहे. महागाई, बरोजगारीचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे हाल होत आहेत, युवकांचे प्रश्न आहेत, हे सर्व जनतेपर्यंत घेऊन जायचे आहे. विधानसभा निवडणुक एकजूटीने लढलो तर महाविकास आघाडी १८० जागा जिंकू शकते आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकतो. अशा विश्वास माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. … Read more

सरकारने ‘या’ लाडक्या बहिणींचे संसार उद्ध्वस्त होणार नाहीत यासाठी प्रयत्न करावेत: आमदार तनपुरे यांची टीका

Ahmednagar News : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ ही योजना वैयक्तिक कोणा एका पक्षाची नाही राज्य सरकार जे काही उपक्रम राबवते, ते लोकांकडून मिळणाऱ्या टॅक्स रुपी पैशातूनच राबवले जातात. या योजनेचा प्रत्येक महिला भगिनीला लाभ मिळावा, या योजनेपासून कोणतीही महिला वंचित राहू नये म्हणून आपण हे अभियान मतदारसंघात राबवले आहे. तिसगाव येथील गट नंबर २९६ मधील गोरगरीब … Read more

सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या ‘त्या’ मागण्या मान्य झाल्या तर तब्बल ‘या’ चार तालुक्यातील शेतीचे वाळवंट होऊन शेतकरी उद्धवस्त होईल..!: काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार आक्रमक

Ahmednagar News : राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ज्या मागण्या केल्या आहेत. वळसे पाटील यांच्या मागण्या पूर्ण झाल्यास भविष्यात कुकडी कालवा बुजवला जाऊ शकतो. शेतकऱ्यांच्या या महत्वाच्या प्रश्नाबाबत श्रीगोंदे तालुक्याचे लोकप्रतिनिधी व दोन्ही कारखान्याचे अध्यक्ष जे कालवा सल्लागार समितीचे पदसिद्ध सदस्य असतात ते मूग गिळून गप्प … Read more