कोकणातील अनेक भागांना पावसाने झोडपले असून, मध्य महाराष्ट्राच्याही काही भागांत रविवारी जोरदार पाऊस पडला. तसेच उर्वरित भागातही पावसाने हजेरी लावली. पुढील चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या अनेक भागांत पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
समुद्रसपाटीवरील कमी दाबाचा पट्टा रविवारी दक्षिण गुजरात ते उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत कायम होता. कमी दाबाचे क्षेत्र अंतर्गत ओडिशा व लगतच्या छत्तीसगडवर स्थित आहे.
तसेच, आगामी दिवसात महाराष्ट्रावर तर बंगालच्या उपसागरावर कमी हवेचा दाब राहणार आहे. अरबी समुद्रावरून नैऋत्य दिशेने वाहणारे वारे महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरातच्या ) दिशेने वेगाने वाहणार आहेत, त्यामुळे चांगल्या पावसाला अनुकुल वातावरण तयार होण्याची शक्यता आहे.
कोकणात जोरदार, मध्य महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार, मराठवाडयात हलका ते मध्यम तर विदर्भात मध्यम पावसाची शक्यता आहे. कोकणवगळता इतर सर्व विभागांत काही दिवस पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे.