विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी शिकविला धडा

शिर्डी : पहिल्यांचा दांडक्याचा प्रसाद, त्यानंतर दंडात्मक कारवाई, भररस्त्यात उठबशा, हातजोडुन विनंती, अन्य गांधीगिरी मार्गाचा अवलंब करूनही शिर्डीत विनाकारण फिरणाऱ्या चाकरमान्यांना लगाम बसत नसल्याने अखेर शिर्डी पोलीस व वाहतूक शाखेने संयुक्तरित्या विशेष मोहीम हाती घेत विनाकारण दुचाकी किंवा पायी फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करतानाच त्यांना पकडून थेट रुग्णवाहिकेत टाकून आरोग्य तपासणीसाठी साईसंस्थानच्या रुग्णालयात पाठविले. या अनोख्या … Read more

अज्ञात व्यक्तींकडून घरांवर दगडफेक, ग्रामस्थ भयभीत !

कोपरगाव : कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथे गेल्या एक महिन्यापासून अज्ञात व्यक्तींकडून घरांवर दगडफेक होत असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले असून हा मूर्खपणा कोण करतो आहे,याचा शोध घेण्यासाठी त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली असुन आवश्यक ती पावलेही उचलली आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, सध्या लॉकडाऊन असल्याने लोक घरातच थांबलेले आहेत. अशातच सोनेवाडीमध्ये गेल्या एक महिन्यापासून विचित्र … Read more

यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज

अहमदनगर Live24 :- यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज ग्रामीण भागातील जुन्या-जाणत्या वयोवृद्धांनी व्यक्त केला आहे. झाडावरील कावळ्याने बनविलेल्या घरट्याच्या उंचीवरून त्यांनी हा अंदाज बांधला असून त्यांचा हा पारंपरिक ठोकताळा अगदी अचूक ठरल्याचा अनुभवही त्यांच्या गाठीशी असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. प्रत्येक चांगल्या-वाईट गोष्टींचे संकेत निसर्ग माणसाला देत असतो. परंतु ते बघण्याची नजर माणसांकडे असायला हवी. … Read more

रणरागिणींनी उद्ध्वस्तकेला अवैध गावठी दारूचा अड्डा !

नेवासे :- तालुक्यातील मुकिंदपूर येथे अनेक दिवसांपासून खुलेआमपणे सुरू असलेला गावठी दारूचा अड्डा स्थानिक महिला बचत गटाच्या रणरागिनींनी एकत्र येत नेवासे पोलिसांच्या मदतीने उद्ध्वस्त केला. मुकिंदपूर येथील गट नंबर ७६ मधील सुरेखा चव्हाण यांच्या येथे चालू असलेला गावठी दारूचा अड्डा सुरू असल्याने या परिसरात तळीरामांचा उपद्रव वाढला होता. तळीरामांच्या आरडाओरड तसेच अश्लील भाषेतील शिव्यांनी महिलांची … Read more

कोरोना रोखण्याच्या नियमांचे उल्लंघन करत वास्तव्य करणाऱ्यांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 :- कोरोना रोखण्याच्या नियमांचे उल्लंघन करत संगमनेर येथील तीनजण सावळीविहीर येथे नातेवाईकांकडे वास्तव्य करत असल्याचे कळताच पोलिसांनी हे कुटुंब, तसेच आश्रय देणाऱ्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला. प्रशासनाने रेड झोन तयार करुन विनापरवाना कोणी गावाबाहेर जाऊ नये, असे सक्त आदेश दिले असताना संगमनेर शहरातून पोलिसांना चकवा देत तीन जणांनी सावळीविहीर येथील आपल्या नातेवाईकांकडे आश्रय … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ शेतकऱ्यांचा कांदा दुबईला

राहुरी: किसान विकास महिला शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड वांबोरीने परीसरातील शेतकऱ्यांचा कांदा दुबईच्या बाजारपेठेत रवाना करण्यात आला. वातानुकूलित कंटेनरमध्ये भरून हा माल शुक्रवारी पाठवण्यात आला. लॉकडाऊनमुळे देशातील बाजार समित्या बंद आहेत. शेतकऱ्यांचा हजारो टन कांदा विक्रीच्या प्रतिक्षेत शेतातच पडून आहे. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन किसान विकास शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला. … Read more

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी ‘या’ शहरातील प्रत्येक कुटुंबाचा सर्व्हे

अहमदनगर Live24 :- जामखेड कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी जामखेड शहरातील प्रत्येक कुटुंबाचा सर्व्हे करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी सोमवारी दिली. शहरातील कोरोनाबाधितांची संख्या १७ झाली आहे. सर्व शहर एका कंट्रोल अंतर्गत आणले असून कोणीही बाहेरचा व्यक्ती येणार नाही व शहरातील व्यक्ती बाहेर जाणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. आतापर्यंत १८५ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पाचपुते पिता-पुत्राकडून व्यवस्थापकाला मारहाण

अहमदनगर Live24 :- काष्टी सेवा संस्थेतील गैरव्यवहार व व्यापारी कमिशन साखळी उघड केल्याच्या रागातून ज्येष्ठ संचालक भगवानराव पाचपुते, त्यांचा मुलगा प्रताप यांच्यासह सहा ते सात जणांनी शिवीगाळ व मारहाण केल्याची तक्रार व्यवस्थापक जालिंदर पाचपुते यांनी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात सोमवारी केली. तक्रारीत म्हटले आहे, गेल्या काही महिन्यांत संस्थेच्या कारभारात भगवानराव यांचे चिरंजीव प्रताप यांचा काहीही संबंध … Read more

राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या झाली 8590 ! जाणून घ्या तुमच्या शहरासह जिल्ह्यातील माहिती

मुंबई :- राज्यात आज कोरोनाबाधित ५२२ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ८५९० झाली आहे. आज ९४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात १२८२ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ६९३९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १ लाख २१ हजार ५६२ नमुन्यांपैकी … Read more

संचारबंदीत ‘असा’झाला भाजपच्या तालुकाध्यक्षांचा विवाह सोहळा !

अहमदनगर Live24 :- लग्नपत्रिका छापून झाल्या होत्या, १९ एप्रिल लग्नाची तारीख होती, मात्र २१ मार्चपासून कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर देशात संचारबंदी लागू झाली, त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे नगर तालुक्याचे तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांना त्यांचा शुभविवाह घरातच साजरा करावा लागला. संचारबंदीचे नियम पाळून गर्दी न करता, अवघ्या काही लोकांच्या उपस्थितीत मास्क लावून आणि सुरक्षित अंतर ठेवून हा विवाह … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील आजचे कोरोना न्यूज अपडेट्स

अहमदनगर Live24 :- जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल ३१ व्यक्तींच्या घशातील स्त्राव चाचणीचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यापैकी १४ व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले. ते सर्व अहवाल निगेटिव्ह आले असून उर्वरित १७ अहवालाची प्रतीक्षा आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधीत व्यक्तींची संख्या आता ४३ झाली आहे. त्यापैकी २४ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर ०२ व्यक्तींचा … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा इन्स्टिट्यूटमध्ये अवघ्या पाच सेकंदात कळणार कोरोना रुग्णाचा रिपोर्ट !

लोणी : – कोरोनाचे टेस्टसाठी लागणारा वेळ आणि त्यासाठी लागणारा मोठा खर्च लक्षात घेऊन केवळ एक्स रे आणि रक्त चाचणीच्या साह्याने ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स‘चे तंत्रज्ञानाचा वापर करुन काही सेकंदात रग्णांची वर्गवारी कोरोनाबाधित, कोरोना संशयीत व इतर हे शोधण्याची ही प्रणाली प्रवरा इन्स्टिट्यूट ॲाफ मेडिकल सायन्सेस आणि ग्रेट ब्रिटन स्थित एआय फाॅर वर्ल्ड या संस्थेशी परस्पर सहकार्य … Read more

दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले

अहमदनगर Live24 :- राहुरी तालुक्यातील तहाराबाद येथील वाळू वाहतूक करतांना पकडलेला ट्रॅकटर सोडण्यासाठी पन्नास हजार रुपयांची मागणी करणारा तलाठी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. अशोक रामचंद्र थोरात असे आरोपीचे नाव असून दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. तक्रारदार यांचे मालकीचे ट्रॅक्टर वाळू वाहतूक करताना आरोपी लोकसेवक यांनी रविवारी पकडले होते. सदर ट्रॅक्टरवर कोणतीही … Read more

आमदार लंके यांनी का केली कुकडी डाव्या कालव्याची पाहणी ?

पारनेर :- आमदार नीलेश लंके यांनी आज कुकडी डावा कालव्याच्या पाणी प्रश्नासंदर्भात कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर, कुकडी प्रकल्प नारायणगाव विभागाचे उपविभागीय अधिकारी सुहास साळवे यांच्या सोबत बैठक घेऊन पाणी प्रश्नाबाबत सविस्तर चर्चा केली. आमदार लंके यांच्या सुचनेनुसार दि. 27 रोजी अधिकाऱ्यांनी पारनेर तालुक्यातील जनतेकरीता पाण्याचे आवर्तन सोडले असून हे पाणी व्यवस्थीत शेतकऱ्यांना मिळते की नाही … Read more

खा.सुजय विखे यांनी मुख्यमंत्र्यांना केली ‘ही’ मागणी

अहमदनगर :-  कोरोना पार्श्वभूमीवर महसूल, पोलिस, आरोग्य कर्मचारी व सफाई कामगार आपला जीव धोक्यात घालून महाराष्ट्राला कोरोना पासून लांब ठेवत आहेत. त्यांच्या या कामगिरीमुळे आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक झालेला नाही. कोरोनाच्या लढाई मध्ये ह्या योध्यांची महत्त्वाची भूमिका आहे. हरियाणा सारख्या राज्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता दिला आहे. मात्र महाराष्ट्र शासन आपल्या कर्मचारी वर्गाची पगार कपात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : स्वस्त धान्य दुकानावर कारवाई;चार दुकाने केली सील

अहमदनगर Live24 :- सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु असून या काळात शेवगाव मधील काही स्वस्त धान्य दुकान चालक काळा बाजार करत असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हा पुरवठा अधिकारी यांकडे आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत जिल्हा पुरवठा अधिकारी माळी यांनी शेवगावला भेट देऊन कारवाई केली. चार दुकाने सील केले. अनेक स्वस्त धान्य दुकानदार आणि त्यांना पाठीशी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार ; मुंबईवरून आलेल्या मुलास वडिलांनी ठेवले घराबाहेर !

अहमदनगर :- मुंबई येथील 57 वर्षीय एक दुचाकीवर थेट राहुरीत आला. मात्र, वडिलांनी त्यास घरात प्रवेश नाकारला. त्यांनी दोन रात्री घराबाहेर काढल्या. येथे “होम क्वारंटाईन’चा शिक्का हातावर बसला. मात्र, येथील निवारा केंद्रात थांबण्याऐवजी त्यांनी मुंबईची परतीची वाट धरली. राहुरी कारखाना येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांची दुचाकी अडविली. प्रशासनाला कळविले. अखेर त्यांची रवानगी नगरच्या जिल्हा रुग्णालयात झाली. … Read more

कोरोनाचा जामखेडमध्ये धुमाकूळ, कर्जत तालुक्यास धोका

अहमदनगर Live24 :- कर्जत आणि जामखेड यांचा पूर्ण संपर्क तोडण्यात यावा, नगर-कर्जत संपर्काचे प्रमाण वाढत असल्याने कर्जत तालुक्यास करोनाचा धोका संभवतो आहे. याची दखल प्रशासनाने तातडीने घ्यावी, असी मागणी जोर धरू लागली आहे. कर्जत तालुक्याच्या सर्वात जवळचा तालुका जामखेड आहे. या दोन्ही तालुक्यांचा मिळून एक विधानसभा मतदारसंघ आहे. करोना आजाराने जामखेडमध्ये धुमाकूळ घातला आहे. जिल्ह्यातील … Read more