कर्जमाफीच्या आनंदावर एका क्षणात विरजण !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- रविवारी कर्जमाफीची दुसरी यादी प्रसिद्ध झाली. शेतकरी सुखावले असतानाच दुसरीकडे अनेक भागात झालेल्या अवकाळी पावसाने आनंदावर विरजण पडले. जिल्ह्यात रविवारी झालेल्या अवकाळी व गारपिटीच्या पावसामुळे सुमारे १ हजार ५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. नुकसानीचा प्राथमिक अहवाल महसूल विभागाने राज्य सरकारकडे सोमवारी सादर केला. अवकाळीचा सर्वाधिक फटका शेवगाव व पाथर्डी तालुक्याला बसला. … Read more

महाविकास आघाडी सरकारबाबत आमदार शिवाजी कर्डिले म्हणतात…

अहमदनगर लाईव्ह24 टीम / करंजी :– राज्यातील शेतकऱ्याला भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. सरसकट कर्जमाफी केली जात नाही. दुष्काळी परिस्थितीत पशुधन वाचवणाऱ्या छावणीचालकांकडे डोळेझाक केली जात आहे. एकूणच राज्यातील महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांबाबत असंवेदनशील आहे, अशी टीका माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी केली. पाथर्डी तालुक्यातील मोहोज खुर्द येथे जिल्हा परिषदेंतर्गत मंजूर सुमारे साठ लाख रुपये … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नदीत युवतीचा आत्महत्येचा प्रयत्न 

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे आठवाडीतील २३ वर्षांच्या युवतीने रविवारी दुपारी बारा वाजता बेलापूरच्या पुलावरून प्रवरा नदीत उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. बेलापूरचा बाजार असल्याने नागरिकांची बाजारात वर्दळ होती. युवतीने उडी मारल्याचे लक्षात येताच लोकांनी तातडीने पुलाकडे धाव घेतली. माहिती मिळताच बेलापूर पोलिस ठाण्याचे अतुल लोटके, पोलिस नाईक गणेश भिंगारदे,बाळासाहेब गुंजाळ, निखील … Read more

सांगितलेले काम खासदार सुजय विखे जर करणार नसतील तर काय उपयोग ?

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर शहरातील तृतीय पंथीय मतदारांनी खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्यावर शरसंधान साधले आहे आम्ही सांगितलेले काम खासदार सुजय विखे जर करणार नसतील तर काय उपयोग’, असा सवाल केला.  ‘आता त्यांनी आमचे फोन घेणे सुद्धा बंद केले’, असा आरोप तृतीय पंथीय कल्याणकारी संस्थेच्या काजल गुरु यांनी केला आहे.  ते म्हणाले की, जर … Read more

तिघाडीचे शासन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याची धोरणे राबवतय !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोपरगाव :राज्यात सत्तेवर आलेले तिघाडीचे शासन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याची धोरणे राबवत असून शेतकरी खरोखरच जगावायचं असेल, तर त्याची येथून मागची सर्व वीज बिले माफ करावी. दिलेल्या आश्वासनानुसार सातबारा उतारा कोरा करा, शासनाने पाटबंधारे विभागाची पाणीपट्टी वाढवून त्यांच्या तोंडाला पाने पुसली असून त्याची आकारणी पूर्वीप्रमाणेच करावी, अशी मागणी संजीवनी समूहाचे अध्यक्ष बिपीन … Read more

शासनाकडून फसवणूक होत असल्यानेच ‘त्या’ आत्महत्या

अहमदनगर लाईव्ह24 टीम/ पाथर्डी :- राज्य सरकारचे कर्जमाफीचे धोरण फसवे आहे. शेतकऱ्यांची शासनाकडून फसवणूक होत असल्याने मल्हारी बटुळे यांनी आत्महत्या केली. राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून पालकमंत्री, तसेच जिल्ह्यातीलच असलेल्या महसूलमंत्र्यांनी याकडे गांभीर्याने पहाणे गरजेचे होते.  मात्र, शेतकरी आत्महत्यांपेक्षा त्यांना सरकार टिकवणे महत्त्वाचे वाटत असल्याने ते अद्याप फिरकले नाहीत. या प्रश्नावर चालू अधिवेशनात सरकारला जाब विचारू, … Read more

राज्यमंत्र्यांच्या शहरातच पथदिवे बंद, नागरिक संतापले !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :  राहुरीला ऊर्जा व नगरविकास राज्यमंत्रिपद मिळाले असताना राहुरीच्या जनतेवर अंधारात चाचपडत मार्ग काढण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. तालुक्याचे ठिकाण म्हणून ओळख असलेल्या राहुरी शहरातील आमदार चारीजवळील पथदिवे व रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. नगर-मनमाड राज्यमार्गालगत मल्हारवाडी दिशेला असलेल्या आमदार चारीजवळील रस्त्यावर पहाटे व सायंकाळी फिरावयास येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. आमदार चारीजवळ … Read more

अहमदनगर महापालिकेत हिरक महोत्सवी स्वच्छता अभियानाचा शुभारंभ

अहमदनगर : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या हिरक महोत्सवानिमित्त राज्यभरात दोन महिने स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. नगर शहरात या नागरी स्वच्छता अभियानासह सिंगल युज प्लॅस्टिक मुक्त शहर अभियानाचा शुभारंभ रविवारी (दि.1) महापौर बाबासाहेब वाकळे व जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते करण्यात आला.  सावेडी येथील जॉगिंग ट्रॅक परिसरातून या अभियानास सुरूवात करण्यात आली. यावेळी उपायुक्त सुनील पवार, … Read more

सरकार कोण चालवत आहे याचा शिवसेनेने विचार करायला हवा !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- भाजप व शिवसेनेत रक्ताचे नाते असून राष्ट्रवादी कॉंग्रेसला फक्त मात्र भाजपाची खुन्नस काढायची आहे. शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून राष्ट्रवादी खुन्नस काढत आहे. असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केला. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी रविवार दि. 1 मार्च दुपारी शिर्डीत साईदर्शन घेतले. साईदर्शनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. गेल्या पाच वर्षात युती सरकारने … Read more

अहमदनगर जिल्ह्यात ‘अवकाळी’चा दणका !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- थंडीचा महिना उलटून उबदार उन्हाळ्याची चाहूल लागली असतानाच अवकाळी पावसाने रविवारी नगर शहरासह जिल्ह्यातील काही भागात हजेरी लावली. काही भागात गारांचा मारा झाल्याने दाणादाण उडाली.  शेवगाव आणि पाथर्डी शहर तसेच तालुक्यातील विविध भागांत काल अवकाळी पावसाने तडाखा दिला. काही ठिकाणी गारपिटही झाली. या आस्मानी संकटात गहू, हरभरा, ज्वारीसह आंबा आणि संत्रा … Read more

आदिवासी समाजाची स्मशान भूमीचे ट्रॅक्टरच्या साह्याने उत्खनन केल्याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण.

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  राहुरी येथील धामोरी खुर्द येथील आदिवासी समाजाची स्मशान भूमीचे ट्रॅक्टरच्या साह्याने पूर्वजांचे कबरीचे उत्खनन करुन शेती प्लॉट तयार केला हरिजन समाजावर मोठा अन्याय केला याच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करताना जालिंदर रघुनाथ पवार, भाऊसाहेब पवार, रमेश पवार, बाजीराव बर्डे, तानाजी पिंपळे, मल्हारी बर्डे, राजू बर्डे, अंकुश स्वपुत, राजू निकम आदींसह … Read more

२६ वर्षे जनतेला हसवले पण आज मला रडावं लागतंय ….

जीवन जगवण्यासाठी हसणे महत्त्वाचे आहे. त्या साठीच आजपर्यंत २६ वर्षे कीर्तन सेवेच्या माध्यमातून जनतेला हसवत आलो. पण आज मला रडावं लागतंय, अशी खंत निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी व्यक्त केले. आठवड येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाबासाहेब गुंजाळ यांच्या मातोश्री सोनाबाई माणिकराव गुंजाळ यांच्या स्मृतीिदनानिमित्त आयोजित कीर्तनात ते बोलत होते. या वेळी माजी आमदार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : माहेरी आलेल्या विवाहितेस लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- सुरेगाव येथे माहेरी आलेल्या विवाहितेस लग्नाचे आमिष दाखवून मनोज पवार याने विवाहितेवर अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी कोपरगाव ग्रामीण पोलिसात मनोज पवार याचे विरुद्ध गुन्हा दाखल झाला. या संदर्भात पीडित महिलेने फिर्यादीत म्हटले, सासरी मनमाड (ता. नांदगाव, जि. नाशिक) येथे नांदत असताना समोरच राहणाऱ्या मनोज गणेश पवार याच्याशी ओळख वाढली. त्याने … Read more

रेणुकामाता’चे चेअरमन प्रशांत भालेराव यांना आर्थिक क्षेत्रातील योगदानाबद्दल राष्ट्रीय पुरस्कार

अहमदनगर: श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटीचे संस्थापक चेअरमन प्रशांत चंद्रकांत भालेराव यांना इंडियन सिग्नेचर ब्रँडच्यावतीने आर्थिक क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा राष्ट्रीय स्तरावरील ‘आर्थिक क्षेत्रातील तज्ञ’ म्हणून गौरविण्यात आला आहे. प्रसिद्ध सिनेअभिनेते सुनील शेट्टी यांच्या हस्ते पणजी येथील शुक्रवारी रात्री झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास अभिनेते शेट्टी यांच्यासह गोव्याचे उप-मुख्यमंत्री … Read more

आजपासून पाच दिवसांचा आठवडा !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-शासकीय कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण हलका करण्यासाठी महाविकास आघाडीच्या सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय घेतला होता. त्याची शनिवार २८ फेब्रुवारीपासून अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासह विविध शासकीय कार्यालये बंद राहणार आहेत. दरम्यान, या निर्णयाचे सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांनी स्वागत करून सुटीच्या मोबदल्यात अधिक काम करण्यासाठी वचनबद्ध राहण्याची शपथ … Read more

दगडाला पाझर फुटणारी घटना; आत्महत्या करू नका, असे आवाहन करणाऱ्या विद्यार्थ्याच्या वडिलांनीच केली आत्महत्या

Farmer Suicide In Maharashtra

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका, असे कवितेतून आवाहन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वडिलांनीच केली रात्री आत्महत्या पाथर्डी तालुक्यातील धक्कादायक घटना दगडाला पाझर फुटणारी घटना. पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव परिसरातील भारजवाडी येथील हनुमान नगर जिल्हा परिषद शाळेतील विदयार्थी प्रशांत बटुळे याने काल बुधवारी दुपारी शाळेत कार्यक्रमात शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, म्हणून एक कविता स्वतःहून सादर … Read more

मेव्हणीच्या नावाने त्याने बनविले फेसबुक अकाउंट त्यानंतर झाले असे काही कि त्याला भोगावे लागले परिणाम !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  मेव्हणीच्या नावे फेसबुकवर फेक अकाउंट तयार करून तिची बदनामी करणा-या तरुणाला येथील सायबर पोलिसांनी शुक्रवारी (दि. २८) अटक केली आहे. रमेश अशोक कावरे (रा़ कुकाणा ता़ नेवासा) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. रमेश कावरे हा त्याच्या नात्यातील एका अल्पवयीन मुलीला गेल्या काही महिन्यांपासून व्हिडिओ कॉल करून तसेच व्हिडिओ पाठवून त्रास … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बायकोच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  श्रीगोंद्यात बायकोच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची धककादायक घटना समोर आली आहे.मयताने आत्महत्येपूर्वी बायको व सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत लिहले आहे. अमोल शिंदे असे मयताचे नाव असून याप्रकरणी अमोलचे आई -वडील मीना चंद्रकांत शिंदे यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पत्नी काजल शिंदे, सासरा दत्तू मेटे, सासू … Read more