अहमदनगरमधील ११४ गावांसह ६३१ वाड्यांत पाणीटंचाई ! मुदत संपल्याने टँकर बंद, हजारो लोकांची पाण्यासाठी वणवण

pani tanchai

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यातील साधारण २३८ टँकर जून महिन्यात बंद करण्यात आले. पाऊस झालेला असला तरी अजूनही जिल्ह्यातील ११४ गावे आणि ६३१ वाड्यांमध्ये पाणीटंचाई सुरु आहे. दरम्यान ३० जूनला पाणीटंचाई उपाययोजनेचा कालावधी संपल्याने सोमवारपासून टँकर बंद झाले असल्याने या पाण्याचे दुर्भिक्ष्य असणाऱ्या गावातील जनतेवर पाण्यासाठी वणवण करण्याची … Read more

नवीन फौजदारी कायदे लागू होताच पहिला गुन्हा नगरमध्ये दाखल ! इनकॅमेरा पंचनामा, आरोपींना जामीनही नाही, पहा काय घडलं…

panchanama

Ahmednagar News : देशात काल सोमवारपासून तीन नवे फौजदारी कायदे लागू झाले आहेत. भारतीय न्याय संहिता २०२३, भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ आणि भारतीय सक्षम अधिनियम २०२३ यांनी अनुक्रमे कालबाह्य भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय पुरावा कायदा यांची जागा घेतली. दरम्यान हे कायदे कालपासून लागू झाले. दरम्यान या नवीन कायद्यानुसार अहमदनगरमधील रस्ता … Read more

दर्शनासाठी अहमदनगरमधील गोरक्षनाथ गडावर गेलेल्या वारकऱ्यांचा टेम्पो उलटला

apghat

Ahmednagar News : दर्शनासाठी गोरक्षनाथ गडावर गेलेल्या वारकऱ्यांचा एक टेम्पो परतत असताना पलटी झाल्याचे वृत्त आले आहे. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर पंढरपूर पायी दिंडी सोहळा सोमवारी डोंगरगण येथे मुक्कामी आलेला होता. यामधील एक पिकअप दर्शन करावे या हेतूने गोरक्षनाथ गडावर पोहोचला. दर्शन झाल्यानंतर ते गडावरून परतत असताना हा भाविकांचा पिकअप पलटी झाला. यामध्ये असणारे दहा ते … Read more

अहमदनगरमधील नगरपालिकेच्या कचरा डेपोत आढळलेले हाडांचे सांगाडे नेमके कुणाचे? नागरिक आक्रमक

hade

Ahmednagar News : शहरानजीक संवत्सर हद्दीत असलेल्या एका भागात येथील नगरपालिकेच्या कचरा डेपोत स्लॉटर हाऊसच्या भिंतीच्या आडोशाला मोठ्या प्रमाणात कुजलेल्या अवस्थेत जनावरांच्या हाडांचे सांगाडे, शिंगे, मासांचा साठा आढळला असून हे अवशेष गोवंश जनावरांचे असल्याचा आरोप येथील गोरक्षकांनी केला आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्यासंबंधित अधिकाऱ्यांची चालढकल सुरू असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दि.३० … Read more

कांद्याचे भाव वधारले : नगरमध्ये कांद्याला मिळाला इतका भाव

Ahmednagar News : सॊमवारी नगरच्या नेप्ती उपबाजार समितीत ३४ हजार ३६ क्विंटल कांद्याची आवक झाली. यात सरासरी ७०० ते ३२०० रुपये असा दर मिळाले. मागील लिलावाच्या तुलनेत यावेळी चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात दोन रुपये पडत आहेत. चालू वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी पुरता वैतागला आहे. मात्र तरी देखील मोठ्या हिमतीने कांद्याचे पीक घेतले. … Read more

भिंगार छावणीचा लवकरच महापालिका हद्दीत समावेश होणार; नगरच्या छावणी मंडळाला पत्र प्राप्त

Ahmednagar News : काही दिवसांपासून देशातील विविध छावणी परिषदांचे नजिकच्या नगरपालिका आणि महापालिकांकडे हस्तांतरणाचा विषय चर्चेत आहे. सैन्य तळ सोडून देशातील १४ आणि महाराष्ट्रातील ६ छावणी परिषदांच्या नागरी परिसराचे विनामूल्य हस्तांतरणास केंद्र सरकारकडून ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. त्यामुळे आता लवकरच महापालिका क्षेत्रात भिंगार छावणीचा समावेश होणार आहे. २५ जून रोजी झालेल्या बैठकीत संरक्षण सचिवांच्या … Read more

हरवलेल्या मुलाला घेण्यासाठी निघालेल्या पित्याला नगर जिल्ह्यात लुटले ; ‘या’ घाटातील घटना

Ahmednagar News : आठ दिवसांपासून हरवलेल्या मुलाला घेण्यासाठी निघालेल्या पित्याला नगर पुणे महामार्गावर कामरगाव घाटात अनोळखी ३ चोरट्यांनी कोयता व चाकूचा धाक दाखवत ३ लाख २८ हजारांचा ऐवज लुटल्याची घटना सोमवारी (दि.१) पहाटे ३.३० च्या सुमारास घडली आहे. सदरचे चौघेजण कोल्हापूरहून शिर्डीकडे कारमधून जात होते. या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात तिघा चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा … Read more

विधान परिषदेसाठी भाजपकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर ; असा आहे निवडणूक कार्यक्रम

Ahmednagar Politics : विधान परिषदेवरील ११ जागांच्या निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने पाच जणांना तिकिटं जाहीर केली आहेत. यात पाच वर्षांपासून राजकीय पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या पंकजा मुंडे यांना भाजपने संधी दिली आहे. . पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे या पाच जणांना भाजपने विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे.त्यामुळे … Read more

सॊने खरेदीच्या बहाण्याने सराफास घातला साडेतीन लाखांचा गंडा ..!

Ahmednagar News : दागिने खरेदीच्या बहाण्याने सराफाच्या दुकानात आलेल्या एका अनोळखी इसमाने सराफ व्यावसायिकाला दागिने दाखवायला सांगितले अन त्यांना बोलण्यात गुंतवून ३ लाख ४८ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेवून तेथून पोबारा करत, तब्बल साडेतीन लाखांना गंडा घातला. ही घटना बालिकाश्रम रस्त्यावरील सुडके मळा येथे असलेल्या दहीवळ ज्वेलर्स या सराफी दुकानात रविवारी (दि.३०) सकाळी ९.४५ … Read more

होर्डिंगबाबत प्रशासन योग्य यंत्रणाची अंमलबजावणी कधी करणार ; आ. सत्यजीत तांबे यांचा सवाल

Ahmednagar News : मुंबईत मे महिन्यात वादळी पावसामुळे घाटकोपरम ध्ये एका पेट्रोल पंपाजवळ भलंमोठं होर्डिंग कोसळलं होत. त्यावेळी आडोशाला उभे असणाऱ्या अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. होर्डिंगचा प्रश्न हा फक्त मुंबईचाच नाही तर संपुर्ण राज्याचा आहे.या दुर्घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासन योग्य यंत्रणाची अंमलबजावणी कधी करणार असा संतप्त प्रश्न आ. सत्यजीत तांबे यांनी … Read more

पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर आले ‘हे’ संकट ; पिके करपण्याच्या मार्गावर ..!

Ahmednagar News : मागील काही दिवसांपासून पावसाने अचानक उघडीप दिल्याने जिल्ह्यातील दक्षिण भागातील खरीप पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. पाऊस लांबल्याने भाजीपाल्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. आठवडाभरात पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. यंदा जून महिन्याच्या सुरुवातीस जिल्ह्यातील बहुतेक भागात समाधानकारक पाऊस झाला. अनेक वर्षांनंतर वेळेवर पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी सुखावला … Read more

रेशनच्या धान्यात अफरातफर करणाऱ्या ‘त्या’ दुकानदारांचे परवाने केले रद्द ; तर १४ लाखांची केली वसुली !

Ahmednagar News : रेशनकार्डचा वापर केवळ धान्य मिळवण्यासाठी केला जात नाही. नागरिकांना स्वतःची ओळख पटण्यासाठी रेशन कार्ड आवश्यक आहे. आजही धान्य खरेदी करताना शिधापत्रिका आवश्यक आहे. शिधापत्रिका दाखवावी लागते. हे कार्ड स्वस्त धान्य दुकानात खाद्यतेल खरेदीसाठी दाखवले जाते. हे कार्ड सरकारी रेशन योजनेत दाखवावे लागते. बँक खाती उघडण्यासाठी आजही शाळा आणि महाविद्यालयांमध्ये घराच्या पत्त्याचा पुरावा … Read more

भुसार, फळे भाजीपाला बाजार दोन दिवस राहणार बंद ..? शेतकऱ्यांना केले ‘हे’ आवाहन

Ahmednagar News : सालाबादप्रमाणे त्रंबकेश्वरवरुन निघालेला संत निवृत्तीनाथ महाराजांचा पंढरपुर पायी दिंडी सोहळा आगामी दोन दिवस अहमदनगरमध्ये मुक्कामी असणार आहे. त्यामुळे हे दोन दिवस बाजार समितीच्या भुसार, फळे भाजीपाला बाजार दोन दिवस बंद ठेवण्यात येणार असल्याचे कृषि उत्पन्न बाजार समितीकडून कळवण्यात आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी, कृषि उत्पन्न बाजार समितीत सालाबादप्रमाणे संत निवृत्तीनाथ महाराज … Read more

वीज कंपनीचा नागरिकांना दरवाढीचा शॉक …!

Ahmednagar News : सध्या नागरिक महागाईच्या विळख्यात चांगलेच अडकले आहेत. अगदी भाजीपाल्यापासून ते किराणा मालासह सर्वच वस्तूचे दर वाढले असल्याने सर्वसामान्य नागरिक वैतागले आहेत. या वस्तूच्या वाढलेल्या भावामुळे आधीच आर्थिक कंबरडे मोडलेल्या नागरिकांना आता वीज कंपनीने परत शॉक दिला आहे. जून महिन्यातील भरमसाट वीज बिलांमुळे खळबळ उडाली आहे. बिलात वीस ते तीस टक्के वाढ झाली … Read more

पाथर्डी तालुक्यातील ‘त्या’ गोळीबारामागील खरे कारण आले समोर ..!

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील सैदापूर (हत्राळ) गावात माणिक सुखदेव केदार यांच्यावर रिव्हालवरमधून दोन गोळ्या झाडल्याची घटना घडली होती. यातील एक गोळी लागून केदार हे जखमी झाले, प्रत्यक्षदर्शींनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. तर जखमीला पुढील उपचारासाठी नगर येथे पाठविण्यात आले होते. दरम्यान आता या गोळीबारामागील खरे कारण आले समोर असून पती पत्नीचा घटस्फोट झाल्यानंतर … Read more

लग्नाळू तरुणांनो वेळीच सावध व्हा …! अन्यथा तुमचीही होऊ शकते फसवणूक

Ahmednagar News : मुलांचे कमी शिक्षण, चांगली नोकरी नसणे, घर नसल्याने लग्नासाठी मुलगी मिळत नाही. त्यामुळे पैसे गेले तरी हरकत नाही, पण मुलगी मिळाली पाहिजे, या भावनेतून काहीजण एजंटच्या भूलथापांना बळी पडतात. अनाथाश्रम, गरीब घरच्या मुली असल्याचे सांगत सोशल मीडियावर जाहिरात करून मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे.त्यामुळे तरुणांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे. सध्या शहरासह … Read more

गावात घरकूल पाहिजे का? ‘या’ तारखेपर्यंत मुदत, जाणून घ्या निकष, नियम, अर्ज करण्याची पद्धती..

gharkul

Ahmednagar News : शासनामार्फत विविध योजना राबवल्या जातात. गरिबांच्या कल्याणासाठी तसेच त्यांच्या आर्थिक पुनर्वसनासाठी शासन प्रयतशील असते. यातीलच योजनेचा आणखी एक भाग म्हणजे मोदी आवास योजनेंतर्गत घरकूलचे वाटप. ग्रामीण भागातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील ग्रामसभेमार्फत निवड झालेल्या कुटुंबांना या अंतर्गत घरकूल दिले जाते. यासाठी १० जुलैपर्यंत अर्ज … Read more

अखेर भंडारदऱ्याच्या पाणलोटात जोरदार पाऊस ! धरणात आले ‘इतके’ पाणी

bhandaradara

Ahmednagar News : अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत असणाऱ्या भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्राला रविवारी जोरदार पावसाने झोडपले आहे. आदिवासी बांधवांची भात खाचरे तुडुंब भरलेली दिसुन येत आहेत. शनिवार व रविवारचे औचित्य साधत अनेक पर्यटकांनी भंडारदऱ्याच्या पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटला. अकोले तालुक्यातील भंडारदरा म्हणजे पावसाचे माहेरघर समजले जाते. शुक्रवारी मध्यरात्री भंडारदरा धरणाच्या पाणलोटासह सर्वत्र मान्सूनचे जोरदार … Read more