मी सूडाचे व उधारीचे राजकारण करीत नाही. हिशोब पूर्ण करतो – खासदार डॉ. सुजय विखे

राहुरी – आमचे ठरले आहे. आमदार शिवाजी कर्डिले आणि लोकसभेत डॉ. सुजय विखे पाटील प्रतिनिधित्व करतील. विखे कर्डिले युती विकासासाठी असून ती अतूट असल्याची ग्वाही आमदार शिवाजी कर्डिले व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. काल राहुरीत आयोजित जाहीर नागरी सत्कार समारंभात ते बोलत होते. आ.कर्डिले अध्यक्षस्थानी होते. भैय्यासाहेब शेळके मित्रमंडळ, तालुका विकास मंडळ, परिवर्तन … Read more

पालकमंत्री राम शिंदे यांच्याकडून गुन्हेगार आणि दहशत माजवणाऱ्याना संरक्षण !

अहमदनगर :- भाजप तालुकाध्यक्ष व त्यांच्या साथीदारांपासून मुक्ती मिळावी, मालकीच्या जागेवर कंपाऊंड बांधून केलेले अतिक्रमण त्वरित थांबावे व भाजप तालुकाध्यक्षावर गुन्हा दाखल करावा, अन्यथा इच्छा मरणास परवानगी द्यावी आदीमागण्यांसाठी कल्याण सुरवसे यांच्या कुटुंबाने तहसील कार्यालयासमोर शुक्रवारपासून उपोषण सुरू केले आहे.  जामखेड तालुक्यातील खर्डा येथील कल्याण सुरवसे यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मी … Read more

मुलीने हिम्मत दाखविल्याने छेड काढणाऱ्यास चोप देवून पकडले

श्रीरामपूर: श्रीरामपूर शहरात वा. नं. ७, कॅनॉल पुलाजवळील श्री सिद्धीविनायक  हनुमान मंदिराजवळ  श्रीरामपुरात तरूणीची गाडी अडवून छेडछाड करून विनयभंग करणाऱ्याला तरूणीने आरडाओरडा करत जाब विचारल्याने गणेशोत्सव सुरू असल्याने नागरीकांची वर्दळ मोठया प्रमाणावर होती. हा आरडाओरडा ऐकून जागरूक नागरीकांनी तातडीने तरुणीला काय झाले विचारले. तेव्हा विनयभंग, छेडछाड केल्याची माहिती मिळताच संबंधीत अजहर नावाच्या तरुणास लोकांनी यथेच्छ … Read more

श्रीगोंद्यातील ‘त्या’ खून प्रकरणातील सर्व आरोपींना २४ तासांत अटक

श्रीगोंदे: भानगाव खूनप्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी घटनास्थळावरूनच ताब्यात घेतले. मुख्य आरोपीसही बेड्या ठोकण्यात आल्या. २४ तासांत सर्व आरोपी जेरबंद केल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधीक्षक संजय सातव यांनी शनिवारी दिली. नानासाहेब ज्ञानदेव आघाव याच्या भानगाव येथील शेतजमिनीची मोजणी ५ सप्टेंबरला भूमिअभिलेखच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलिस बंदोबस्तात झाली. मोजणी करून अधिकारी व कर्मचारी गेल्यानंतर शेत मोजणीच्या ठिकाणी दुपारच्या … Read more

लाच घेताना भूमिअभिलेख लिपिकास अटक

श्रीरामपूर: येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील छाननी लिपिक बाबुराव यादवराव राशीनकर याला दहा हजारांची लाच घेताना नाशिक व नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने शनिवारी रंगेहाथ पकडले. टाकळीभान येथील एका शेतकऱ्याची नेवासे-श्रीरामपूर रस्त्यावर भोकर शिवारात ३० आर जमीन आहे. या जागेची मोजणी करण्यासाठी संबंधित शेतकऱ्याने मोजणीची तारीख मिळण्यासाठी अर्ज केला होता.त्यासाठी राशीनकरने २० हजार रोख व … Read more

पक्ष बदलणाऱ्यांचा पराभव होणार

संगमनेर : लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यातील वारे बदलल्याचा काही लोकांचा समज झाला. त्यामुळे धावपळ करत काहींनी पक्ष बदलले. मात्र, त्यांचा हा निर्णय शंभर टक्के चुकेल. मतदार त्यांना मानणार नाहीत. त्यांचे उड्या मारणे लोकांना आवडले नसल्याने ज्यांनी-ज्यांनी वेगळ्या पक्षाचा आधार घेतला त्यांना पराभव पत्करावा लागेल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. शनिवारी संगमनेरमध्ये पत्रकारांशी बोलताना … Read more

भाऊसाहेब कांबळेंच्या हाती शिवसेनेचा भगवा

श्रीरामपूर: काँग्रेसला जय महाराष्ट्र करून राजीनामा दिलेले आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शनिवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याने सर्व उलटसुलट चर्चांना पूर्णविराम मिळाला. विधानसभेसाठी खासदार सदाशिव लोखंडे यांचे चिरंजीव डॉ. चेतन लोखंडे, मागील निवडणुकीत सेनेकडून निवडणूक लढलेले लहू कानडे, काही महिन्यांपूर्वी सेनेत प्रवेश केलेले माजी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांचीही व्यूहरचना सुरू होती. … Read more

सासूरवाडीत जावयाचा पाय केला पॅक्चर

लोणी  – राहाता तालुक्यातील निर्मळपिंपरी येथे पत्नीला आणण्यासाठी सासरी गेलेले राजेंद्र चंद्रभान बाराहाते, वय – ४७, रा. कोकमठाम, ता. कोपरगाव यांना ते निर्मळ यांच्या घरी असताना आरोपींनी लाकडी दांडा व लोखंडी पाईपने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली, शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देत डावा पाय फ्रेंक्चर करून दुखापत केली. काल या प्रकरणी जखमी राजेंद्र … Read more

सासरकडून पैशांची मागणी माहलेचा गळफास

शिर्डी – कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका येथे सासरी नांदत असलेली विवाहीत तरूणी वैशाली संदिप अनर्थे, वय – ३२ हिला नवरा, सासू, सासरा यांनी तू घर बांधण्यासाठी माहेरून पैसे घेवून ये, असे म्हणत वेळोवेळी पैशांची मागणी करून शिवीगाळ करत मारहाण केली. उपाशी पोटी ठेवून शारिरीक व मानसिक छळ केला. या त्रासातून वैशाली या महिलेने गळफास घेवून … Read more

पोलीसात तक्रार दिल्याने छळ, छळाला कंटाळून आत्महत्या

शिर्डी – पोलीसात फिर्याद दिल्याने आरोपींकडून होणाऱ्या त्रासातून शिर्डीत श्रीरामनगर कनकरी रोड परिसरात संजय बाळासाहेब चव्हाण, वय – ५० वर्षे या इसमाने पाण्याच्या टाकीजवळील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मयत संजय चव्हाण यांचे भाऊ केशव बाळासाहेब चव्हाण, धंदा – नोकरी, रा. नागवाडी फाटा, लोणी खुर्द, ता. वैजापूर यांनी काल शिर्डी पोलीसात फिर्याद दिल्यावरून आरोपी … Read more

फुलांना उत्सवामुळे तेजी

अहमदनगर : गौरी,गणपती व त्यापाठोपाठ नवरोत्रोत्सव,दिवाळी या सणांच्या पार्श्वभुमीवर बाजारात सध्या फुलांना चांगली मागणी वाढली आहे. मात्र पावसाच्या अत्यल्प प्रमाणामुळे अनेक भागातील फूलशेती बहरलीच नाही. त्यामुळे त्यातुलनेत यंदा फुलांचे उत्पादन घटले असून,फुलांना चांगला भाव मिळत आहे. . नगर तालुक्यातील अकोळनेर,सारोळा कासार,घोसपुरी,चास,कामरगाव,पिंपळगाव माळवी,डोंगरगण,बारादरी,दरेवाडी आदी भागात फूलशेती केली जाते. मात्र यावर्षी पडलेल्या दुष्काळाने फूलशेतीत घट झाली आहे. … Read more

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार

संगमनेर : तालुक्यातील एका चोवीस वर्षीय तरुणीला दिनेश बाळू बर्डे (पत्ता माहीत नाही) याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना सोमवार दि. २७ मे २०१९ रोजी घडली. याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही चोवीस वर्षीय तरुणी दिनेश बाळू बर्डे याच्या नातेवाईकाच्या लग्नासाठी आली होती. त्यावेळी दिनेश बर्डे याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर … Read more

भुलथापांचे राजकारण व चुकीच्या निर्णयाने देशात आर्थिक मंदी

अहमदनगर ;- भुलथापांचे राजकारण व चुकीच्या निर्णयाने देशात आर्थिक मंदीचे सावट आहे. देशातील युवकांना नोकर्‍या तर मिळाल्या नसून, आहे त्या नोकर्‍या देखील धोक्यात आल्या आहेत. शाश्‍वत विकासाचा पर्याय राष्ट्रवादीच्या माध्यमातून युवकांना दिसत आहे. अल्पसंख्यांक समाजातील युवकांना राष्ट्रवादीत नेहमीच न्याय व सन्मान देण्याचे काम करण्यात आल्याची भावना राष्ट्रवादीचे मा.शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादी … Read more

मळणी यंत्रात अडकून महिलेचा मृत्यू

जामखेड : तालुक्यातील पाटोदा गरडाचे येथे मळणी यंत्राव्दारे उडिदाची मळणी करत असताना,मळणी यंत्रात गेल्याने मंगल अशोक भाकरे (वय ४५) या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर असे की, जामखेड तालुक्यातील पाटोदा गरडाचे येथील हभप भाकरे महाराज यांच्या पत्नी मंगल अशोक भाकरे यांचा उडदाची मळणी करत असताना मळणी यंत्रात डोके गेल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू … Read more

दारू पिण्यास पैसे न दिल्याने राडा

अहमदनगर : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून दोघांनी मित्रालाच कमरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण केली. तसेच त्याच्या हातातील अंगठी व गळ्यातील सोन्याची चेन काढून घेतली. ही घटना बोल्हेगाव येथील जॉगिंग ट्रॅक येथे घडली. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गणेश शंकर वाकळे, आकाश गोरख कोलते (दोघेही रा. बोल्हेगाव, नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या … Read more

बघायचं नाही, बोलायचं हा नवा मंत्र : अभिषेक कळमकर

अहमदनगर : शहराला आधुनिकतेकडे नेण्यासाठी सर्वसामान्य नगरकरांचा आवाज उठणे गरजेचे आहे. अहमदनगर स्पीक्सच्या माध्यमातून नगरच्या सर्वांगीण विकासाचा आवाज बुलंद होणार आहे,असे स्पष्ट करीत अहमदनगर स्पीक्स या चळवळीची घोषणा माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी पत्रकार परिषदेत केली. हि चळवळ राजकारणविरहित असून फेसबुकच्या माध्यमातून ही चळवळ चालणार आहे.यासाठी कळमकर यांनी पुढाकार घेतला आहे.बघायचं नाही,बोलायचं असा मंत्र या … Read more

कडकनाथ कोंबडी पालनात शेतकऱ्यांची फसवणूक

राहाता : तुम्ही फक्त कोंबडी वाढवा आणि परत द्या. बाजारातील इतर कोंबड्यांपेक्षा आम्ही तिला २०० ते २५० रुपये जास्त भाव देऊ, असे आमिष दाखवून कडकनाथ कोंबडी मार्केटिंगची साखळी चालविणाऱ्या एका कंपनीने राहाता व कोपरगाव तालुक्यातील सुमारे १५ शेतकऱ्यांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. कडकनाथ कोंबडी चांगली असल्याचा मोठा गाजावाजा करीत एका कोंबडी मार्केटिंग कंपनीने शेतकऱ्यांना … Read more

नारायण राणे हद्दपार, त्यांना दुर्बिण घेऊन शोधावे लागेल

शिर्डी : राज्याच्या राजकारणातून नारायण राणे हद्दपार झाले असून, त्यांना राजकारणात दुर्बिण घेऊन शोधावे लागेल, असे स्पष्ट करत त्यांनी हवं तिथं जावं शिवसेना त्यांना भूईसपाट करण्यास सक्षम असल्याचे शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक यांनी सांगितले. कुचिक हे किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष आहेत. नुकतेच त्यांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. साईभक्त व कर्मचाऱ्यांसंदर्भात ते नेहमी … Read more