तरुणास कुऱ्हाडीने मारहाण

श्रीगोंदा : तालुक्यातील आढळगाव शिवारात एकास कुऱ्हाडीने मारहाण करण्यात आली. ही घटना ३० ऑगस्ट रोजी घडली. श्रीरंग आश्रु मेटे (वय ६०) यांनी फिर्यरद दाखल केली. बाळू कुंडलिक जगदाळे यांच्याविरुध्द श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रोज रोज तु आमच्या सुनेच्या घरी का येतो? अशी विचारणा श्रीरंग मेटे यांनी केली असता त्याचा राग धरुन बाळु … Read more

धनादेश न वटल्याने महिलेला दोन महिने शिक्षा

अहमदनगर : हातउसने घेतलेला एक लाखाचा धनादेश न वटल्याप्रकरणी अति. मुख्य न्यायदंडाधिकारी भाविशा गाटे यांनी कांचन गोरख चंदन (रा.साई नगर, बोल्हेगाव) या महिलेस दोन महिने साधी कैद व आरोपीने फिर्यादीला दीड लाखाची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. या खटल्याची माहिती अशी की,फिर्यादी आशा सुनील जाधव (रा. नेप्तीनाका, नालेगाव) यांच्याकडून कांचन चंदन (रा.साईनगर, बोल्हेगाव) हिने दि.१७ … Read more

‘त्या’ प्रकरणात गडाखांना न्यायालयाकडून जामीन

नेवासा : तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथे दोन वर्षांपूर्वी केलेल्या पाटपाणी, हमीभाव, संपूर्ण कर्जमाफी आदी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रास्तारोको आंदोलन केल्याप्रकरणी नेवासा न्यायालयाने माजी आमदार शंकरराव गडाख यांना जामीन मंजूर केला आहे. यासाठी ३१ ऑगस्ट रोजी उपस्थित राहाण्यासाठी न्यायालयाने निर्वाणीचा इशारा दिलेला होता. गडाख यांच्यासाठी ही शेवटची संधी असल्याने याप्रकरणी न्यायालय त्यांच्याबाबतीत कोणती भूमिका घेते, किंवा त्यांना … Read more

एसटी वाहकाला मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा

पाथर्डी : एसटीच्या तिकीटासाठी सुटे पैसे द्या, असे सांगितल्याचा राग आल्याने तिघांनी एसटीला मोटारसायकल आडवी घालून व एसटीत चढून एसटीच्या वाहकाला शिवीगाळ, मारहाण करत दमदाटी केली. पटेलवाडा परिसरात शुक्रवारी ही घटना घडली. वाहक संजय सुडके यांच्या फिर्यादीवरून सुरेश परसराम पवार,राहुल परसराम पवार व एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंदविला आहे. पाथर्डी आगाराचे वाहक संजय सुडके … Read more

महिलांना घरात घुसून मारहाण, दोन गटांत तुफान हाणामारी

कर्जत : तालुक्यातील नेटकेवाडी येथे दोन गटांत तुफान हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही बाजूचे काही लोक जखमी झाले आहेत. दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्या असून, पोलिसांनी आठ लोकांना अटक केली आहे. तालुक्यातील नेटकेवाडी येथे आज सकाळी ९:०० च्या सुमारास गावात दोन गटांत जोरदार हाणामारी झाली. याबाबत अजय बापू धांडे व गहिनीनाथ भिवा धांडे यांनी परस्परविरोधांत … Read more

राधाकृष्ण विखे पाटील यांना मोठ्या मताधिक्‍याने निवडूण द्या

लोणी : ज्‍या माणसाने ५ वर्षे आपल्‍यासाठी रात्रंदिवस काम केले, विखे पाटील कुटुबियांनीही सामाजिक विकास कामांसाठी प्रयत्‍न केले अशा माणसासाठी डोळे झाकुन येणा-या विधानसभा निवडणूकीत पुन्‍हा एकदा नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना मोठ्या मताधिक्‍याने निवडूण द्या असे आवाहन खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले. प्रवरानगर येथील डॉ.धनंजयराव गाडगीळ सभागृहात अन्‍नसुरक्षा योजनेत नव्‍याने समावेश करण्‍यात आलेल्‍या … Read more

ब्रेकिंग : नगर – कल्याण महामार्गावर भिषण अपघातात दोघांचा मृत्यू

जुन्नर :- नगर-कल्याण महामार्गावर आज पहाटे ५ च्या सुमारास जुन्नर तालुक्यामधील पेमदरा येथे कारच्या भिषण अपघातामधे २ जण जागीच ठार झाले असुन,६ जण जखमी झाले आहेत. या अपघाता मधे कर्जुले हर्या ता.पारनेर मधील सौ.शुभांगी आशिष आंधळे वय वर्ष २७ व कु.यश सचिन आंधळे वय वर्ष ११ हे जागीच ठार झाले असुन,दोन जण जखमी आहेत. मुंबईवरुन … Read more

सात वर्षांच्या लढयानंतर गोगलगाव मंगळापूर शिवरस्ता खुला

नेवासा ;- तालुक्यातील गोगलगाव-जुना मंगळापूर शिवरस्त्यावर अतिक्रमण झाल्याने हा रस्ता वहिवाटीस बंद होता. त्यामुळे या परिसरातील काही शेतकर्यांना रस्ता नसल्याने शेती कसता येत नव्हती. या संदर्भात येथील महिला शेतकर्याने महसूल प्रशासनाकडे सलग सात वर्षे पाठपुरावा केला. या त्यांच्या लढयाला यश आले असून हा रस्ता खुला झाला आहे. हा दीड किलोमीटरचा रस्ता खुला झाल्याने या परिसरातील … Read more

माजी आमदार अनिल राठोड अस्वस्थ, अहमदनगर शहर शिवसेनेत उभी फूट !

अहमदनगर :- शिवसनेचे उपनेते अनिल राठोड हे नगर शहर विधानसभा मतदारसंघातून आमदारकीच्या उमेदवारीचे दावेदार आहेत. मात्र असे असताना शिवसेनेच्या माजी महापौर शीला शिंदे त्याचप्रमाणे माजी महापौर सुरेखा कदम यांचे पती शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजीराजे कदम हेदेखील विधानसभेची तयारी करत आहेत. उपनेते राठोड यांच्या बरोबरीने शिंदे व कदम यांनी वरिष्ठांकडे शहर विधानसभेवर शिवसेनेच्या उमेदवारीचा हक्क सांगितला. … Read more

काँग्रेसला धक्का, आमदार भाऊसाहेब कांबळे शिवसेनेत !

श्रीरामपूर :- विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे विद्यमान आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शनिवारी रात्री आमदारकीचा राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे दिला. सेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची त्यांनी भेट घेतली. बैठकीनंतर त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.या बातमीने राजकीय वर्तुळासह काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. कांबळे यांनी काँग्रेस पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. … Read more

जळालेल्या खरीपाची नुकसानभरपाई द्यावी – माजी आ. शंकरराव गडाख

नेवासा –  चांगल्या पावसाच्या भरवशावर नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांनी केलेल्या खरीप पेरण्या पाटपाणी वेळेवर उपलब्ध न झाल्याने वाया गेल्या.त्याचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे प्रमुख माजी आमदार शंकरराव गडाख यांनी केली आहे. प्रशासनाला दिलेल्या निवेदनात गडाख यांनी म्हटले आहे, की चांगल्या पावसाच्या भरवशावर तालुक्यातील शेतकऱ्यांनी बाजरी, सोयाबीन, कपाशी आदी खरीप … Read more

विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही : आ. कर्डिले

करंजी : पाथर्डी-नगर तालुक्यातील विविध गावच्या विकास कामासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंढे यांच्या माध्यमातुन सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन आ. शिवाजीराव कर्डिले यांनी केले. करंजी येथील भावलेवस्ती रस्ता, तिसगाव येथील गारूडकर वस्ती रस्ता, शिराळ मारूती मंदिर सभामंडप, करडवाडी … Read more

अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला

कर्जत : तालुक्यातील जलालपूर शिवारात एका अज्ञात तरूणाचे प्रेत शेतात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून दोन दिवसांपूर्वी या व्यक्तीचा खून करून त्याचे प्रेत या ठिकाणी आणून टाकले असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे याचा पोलिस तपास करत आहेत.जलालपुर गावच्या शिवारात नवनाथ आत्माराम बाबर यांच्या शेतातील बाजरीच्या पिकात … Read more

पाणी मागितले तर गोळ्या घातल्या हा इतिहास जनता कधीही विसरणार नाही!

कर्जत – राष्ट्रवादी हा काय पक्ष आहे असा प्रश्­न करीत ही तर केवळ गुंडांची टोळी असून मी तर त्या पक्षाचे नाव अलीबाबा चालीस चोर असे ठेवले असल्याचे प्रतिपादन पणन व कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. कर्जत तालुक्यातील राशीन येथे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमाअंतर्गत राशीन गावासाठी १३ कोटी ३१ लाख रूपयांच्या पाणी योजनेचा शुभारंभ मंत्री श्री. खोत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तरुणाची हत्या करून मृतदेह फेकला पाण्यात !

श्रीरामपूर – श्रीरामपूर शहरातील सूतगिरणी रोड परिसरात राहणारे रामदास भिमराव कडनोर, वय ३४ यांचा टणक हत्याराने डोक्यात मारहाण करुन खून करण्यात आला. हा खुन करुन रामदास कडनोर यांचा मृतदेह प्रवरा कॅनॉलमध्ये वाहत्या पाण्यात टाकून देण्यात आला. हा प्रकार १५ ऑगस्ट रोजी वार्ड नं. २ येथील पाटाच्या पाण्यात हा मृतदेह आढळला व खुनाचा प्रकार उघड झाला. … Read more

भाजपमुळे देशाची अर्थव्यवस्था चिंताजनक : आ. डॉ. तांबे

अहमदनगर : आज जे स्वार्थी लोक पक्षांतर करत आहेत ते कुठेच टिकणार नाहीत. काँग्रेस पक्षातून असे लोक बाहेर पडत असले तरी पक्ष पुन्हा मोठ्या ताकदीने उभा राहणार आहे. काँग्रेस पक्षाची उभारणी सामाजिक चळवळीतून झालेली असून याच चळवळीच्या माध्यमातून पक्षाने देशात काम केले आहे. आज देशावर मोठे संकट आलेले असून जेव्हा लोकांना हे संकट समजेल तेव्हा … Read more

झेडपी पदाधिकाऱ्यांच्या निवडी पुढे ढकलल्या

अहमदनगर : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समित्यांचे सभापती तसेच पंचायत समितीच्या सभापतींच्या नव्याने होणाऱ्या निवडी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यात विधानसभा निवडणूक कार्यक्रम संपन्न होणार आहे. या विधानसभा निवडणूक कार्यक्रमात जिल्हा प्रशासन व पोलिस व्यस्त असल्याकारणाने नव्याने होणाऱ्या पधाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया तात्पुरत्या स्वरूपात पुढे ढकलली आहे. पदाचा कालावधी समाप्त झाल्यापासून १२० दिवसाच्या आत या … Read more

विरोधकांकडून पाण्याचे राजकारण : आ. राजळे

करंजी : पाथर्डी -शेवगाव मतदारसंघात केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून भरीव विकास निधी आणला. दुष्काळी परिस्थितीत पिकांना पाण्याची गरज असल्याने मुळा धरणातून डावा व उजवा कालव्याला पाणी सोडले, पाटाला पाणी सोडताना टेलकडून हेडकडे पाणी देण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला दिलेल्या असतान विरोधकांकडे कोणताच मुद्दा नसल्याने त्यांनी पाणीप्रश्नाचे राजकारण पुढे करून शेतकऱ्यांची सहानुभूती मिळवण्याचा केविलवाना प्रयत्न सुरू … Read more