उसन्या पैशावरुन नातवाकडून आजीला मारहाण

Ahmednagar News

Ahmednagar News : उसने दिलेल्या पैशाच्या कारणावरुन नातवाने आजीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून चुलत्याला तलवार दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली. राहुरी तालुक्यातील धामोरी खुर्द येथे नुकतीच ही घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शकुंतला रामभाऊ जाधव (वय ७५) या राहुरी तालुक्यातील धामोरी खुर्द, ता. राहुरी येथे त्यांचा मुलगा व मोठा नातू युवराज यांच्यासह राहतात. त्यांच्या शेजारीच … Read more

इस्रोच्या ‘युविका’ कार्यक्रमांमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील मुलीची निवड

Ahmednagar News

Ahmednagar News : विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी, त्यांना अवकाश विज्ञानाच्या क्षेत्रातील देशाची प्रगती समजावी, शाळेत शिकवल्या जाणाऱ्या विज्ञानाचा प्रत्यक्ष अवकाश संशोधन आणि तंत्रज्ञानाशी असलेल्या संबधांचा परिचय व्हावा, यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) वतीने दरवर्षी आयोजित होणाऱ्या युवा विज्ञान कार्यक्रमासाठी (युविका) येथील ध्रुव ग्लोबल स्कूलमधील साची रमाकांत राठी या विद्यार्थिची निवड झाली आहे. या कार्यक्रमासाठी … Read more

समन्यायी बाबत उच्च न्यायालयात दाद मागा

Ahmednagar News

Ahmednagar News : पश्चिम वाहिनी नद्यांचे अरबी समुद्राला अतिरिक्‍त वाहुन जाणारे ८० टीएमसी पाणी तात्काळ गोदावरी खोऱ्यात वळवावे, या संदर्भात उच्च न्यायालयाने आदेश करूनही राज्य शासनाने त्याची पुर्तता केलेली नाही, म्हणून कोल्हे सहकारी साखर कारखान्याने सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे स्वतंत्र याचिका दाखल केली होती. त्याची सुनावणी नुकतीच होवून सर्व याचिका निकाली काढताना सर्वोच्च न्यायालयाने … Read more

कळसूबाई, हरिश्चंद्रगड अभयारण्यात पाणवठ्यांची व्यवस्था

Ahmednagar News

Ahmednagar News : उन्हाळ्यात वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचे हाल होऊ नये, म्हणून वन्यजीव विभाग सरसावले आहे. भंडारदऱ्याच्या कळसुबाई, हरिश्चंद्रगड अभयारण्यात वन्यजीव विभागाकडून पाणवठ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. काही ठिकाणी कृत्रीम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. तर नैसर्गिक असणाऱ्या पाणवठ्यांचीही स्वच्छता करण्यात आली आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा हा सह्याद्रीच्या कुशीत लपलेला असून भंडारदऱ्याच्या शेजारीच कळसुबाई, हरिश्चंद्रगड अभयारण्य … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांनो जरा जपून… प्रचार केला तर पडेल महागात !

Ahmednagar News

Ahmednagar News : निवडणूक म्हटली, की अनेकांच्या अंगात उत्साह संचारतो, मात्र हा उत्साह एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यांत संचारला; तर मात्र मोठा घोळ होऊ शकतो. सरकारी कर्मचाऱ्याला कोणत्याही उमेदवाराचा प्रचार करण्यास परवानगी नाही. उलट असे करताना कुणी कर्मचारी आढळला, तर त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांनी प्रचारापासून थोडे नाही तर कोसो मैल दूर राहाणे त्यांच्या … Read more

Ahmednagar News : रस्त्याच्या वादातून मारहाण, एकाचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : शेतातून जाणाऱ्या रस्त्याच्या वादातून झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना नगर तालुक्यातील वाळकी गावच्या शिवारात गुरुवारी (दि.४) सकाळी घडली. मोहन खिराजी दांगडे (वय ६५, रा. हंदार मळा, वाळकी, ता. नगर) असे मयताचे नाव आहे. वाळकी गावच्या शिवारात हंदार मळा तलाव असून या तलावालगत दांगडे वस्ती तसेच तेथून काही अंतरावर तिरमली समाजाची वस्ती … Read more

Ahmednagar News : पोपटराव शेवाळे यांची आत्महत्या

Ahmednagar News

Ahmednagar News : आर्थिक दिवाळखोरीमुळे बंद पडलेल्या श्रीनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन पोपटराव एकनाथ शेवाळे (वय ६३, रा. वडगाव गुप्ता, ता.नगर) यांची राहत्या घरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. शेवाळे यांनी ३१ मार्च रोजी सायंकाळी राहत्या घरात विषारी औषध प्राशन केले. त्यांना त्यांच्या कुटुंबीयांनी तातडीने नगरमधील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. … Read more

उपचाराचा खर्च न उचलल्यास टाळे ठोकणार

Ahmednagar News

Ahmednagar News : महावितरण कंपनीच्या सहयोगातून जखमी तरुणांवर उपचार करावेत, तसे न झाल्यास महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा माकपचे तालुका सचिव एकनाथ मेंगाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, तालुक्यातील धुमाळवाडी येथे रस्त्याच्या बाजूनेच गेलेल्या विद्युतवाहक तारांचा शॉक लागून होरपळलेल्या जखमी तरुणांना महावितरण कंपनीकडून तुटपुंजी आर्थिक मदत देऊन त्यांच्या … Read more

चिंचोली गुरव येथील बेपत्ता इसमाचा मृतदेह सापडला

Ahmednagar News

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथून बेपत्ता असलेल्या एकाचा कहांडळवाडी (ता. सिन्नर) शिवारात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप भाऊसाहेब सोनवणे (वय ३६), असे मयताचे नाव आहे. बुधवारी (दि.३) एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मयत इसमाचा घातपात करून मृतदेह वाळलेल्या फांद्या … Read more

शिर्डीच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीमध्ये बंड, आता मविआचा ‘हा’ बडा नेता म्हणतोय, उमेदवार बदला नाहीतर….

Shirdi Lok Sabha Election

Shirdi Lok Sabha Election : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघांमध्ये दररोज काही ना काही नवीन घडामोड पाहायला मिळत आहे. दुसरीकडे आता शिर्डी लोकसभा मतदारसंघात देखील तशीच परिस्थिती तयार होत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने अहमदनगर आता राज्याच्या राजकारणाचे केंद्रबिंदू बनत आहे. साऱ्या राज्याचे लक्ष आता नगरकडे वळले आहे. खरेतर शिर्डी लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेनेने (एकनाथ शिंदे गट) … Read more

नगर दक्षिण लोकसभा : निलेश लंकेंचा विजयाचा मार्ग खडतर, राम शिंदेंसोबतच्या फ्रेंडशिपमुळे शरद पवार यांचे नातू नाराज !

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : नगर दक्षिण लोकसभेच्या आखाड्यात यंदा गेल्या वर्षी प्रमाणेच दोन युवा नेते परस्परांच्या विरोधात उभे आहेत. महाविकास आघाडीने नगर दक्षिण मधून महायुतीमधून आयात केलेला उमेदवार अर्थातच निलेश लंके यांना उभे केले आहे दुसरीकडे महायुतीने आपला गेल्या वर्षीचा विजयी गडी अर्थातच विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान या दोन्ही युवा … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगरमधील ‘या’ गावात शिवरस्त्याच्या वादातून निर्घृण खून

murder

Ahmednagar Breaking : अहमदनगर जिल्हा एकीकडे सुसंस्कृत, ऐतिहासिक वारसा असलेला जिल्हा आहे. परंतु अलीकडील काळात काही गुन्हेगारी घटनांमुळे अहमदनगरमधील वातावरण ढवळून निघत आहे. मारहाण, खून आदी घटना सातत्याने घडत असल्याचे चित्र आहे. आता शेतातून जाणाऱ्या रस्त्याच्या वादातून झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवारी (दि.४) सकाळी नगर तालुक्यातील वाळकी गावच्या … Read more

‘विखे पिता-पुत्रांनी तुम्हाला त्रास दिला याचा पुरावा दाखवा…’ खुद्द अजित पवार गटानेच लंकेंच्या दाव्याची हवा काढली

Nilesh Lanke Vs Sujay Vikhe Patil

Nilesh Lanke Vs Sujay Vikhe Patil : सध्या नगर दक्षिणमध्ये राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपाचे विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीने शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निलेश लंके यांना पहिल्यांदा खासदारकीसाठी संधी दिली आहे. सध्या या … Read more

Ahmednagar News : अर्बनची पुनरावृत्ती? अहमदनगरमधील ‘या’ पतसंस्थेत कर्जदारांचे मंजूर कोट्यवधी रुपये परस्पर ‘त्या’ सावकाराच्या खात्यात वर्ग

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याला एक सहकाराची आदर्श परंपरा लाभलेली आहे. परंतु काही लोक याला काळिमा फसवण्याचे काम करत असतात. अहमदनगर जिल्ह्यातील काही बँक व पतसंस्था यांमधील गैरप्रकार सर्वांसमोर आलेले असतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी पतसंस्थेत कर्ज प्रकरणे दाखल केलेल्या १२ कर्जदारांची मंजूर झालेली सुमारे २ कोटी रुपयांची … Read more

Ahmednagar News : अहमदनगरकरांनो सावधान ! वाढत्या उन्हामुळे वाढतोय उष्माघाताचा धोका, जिल्हाभरात उष्माघात कक्ष सुरू, अशी’ घ्या स्वतःची काळजी

heat

Ahmednagar News : तापमानात आता वाढ होत आहे. उन्हाची काहिली वाढली आहे. अहमदनगरचे तापमान ३८ ते ४० अंशावर गेले आहे. त्यामुळे उष्णतेचे प्रमाण वाढले, तीव्रता वाढली आहे. उष्णतेच्या झळा जर वाढल्या तर शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रियेवर त्याचा दुष्परिणाम होत असतो. शरीराचे तापमान नियंत्रणात राहिले नाही तर आरोग्यावर फार वाईट परिणाम होत असतात. उन्हाचा कडाका वाढत असल्याने … Read more

Ahmednagar News : घराच्या पत्र्यावर उसाचे वाढे टाकायला गेला सरपंचाचा पुतण्या, नंतर त्यासोबत जे झालं ते पाहून अहमदनगरमधील ‘हे’ गाव ‘शॉक’ झालं

Ahmednagar News

Ahmednagar News : सध्या वातावरणात चांगलीच उष्णता वाढली आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्याची तीव्रता आता जाणवू लागली आहे. पत्र्याच्या खोल्यांमध्ये राहणाऱ्यांना याची धग जास्त जाणवते. हीच धग कमी करण्याच्या प्रयत्नात एका अल्पवयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. ऊन वाढलं म्हणून छतावर उसाचे वाढे टाकायला तो गेला होता. तेथेच त्याला विद्युत तारेचा जबर शॉक बसला. त्यात तो गतप्राण … Read more

Ahmednagar News : खा. विखे आणि आ. राम शिंदे यांचे मनोमिलन

Ahmednagar News

Ahmednagar News : आमदार प्रा.राम शिंदे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील तसेच जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जामखेड येथे नुकतीच लोकसभा निवडणुकीच्या आनुशंगाने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परीषदेच्या आगोदर जामखेड येथे भारतीय जनता पार्टी व महायुतीचे लोकसभा निवडणुक प्रचार व नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. तीन तासांच्या बैठकी नंतर … Read more

Ahmednagar News : तुटेल का रे हात दोस्तीचा..! मित्र बुडालाय..दुसरा मूकबधिर मित्र लोकांना हातवारे करतोय..पण समजले कुणालाच नाही.. अहमदनगरमधील काळीज हेलवणारी घटना

shetatale

Ahmednagar News : दुपारी शाळा सुटल्यानंतर दोघे मित्र शेततळ्यात पोहण्यासाठी गेले. त्यातील एक मूकबधिर होता. दुसरा मित्र पोहण्यासाठी पाण्यात उतरला. मात्र, तो पुन्हा वर आलाच नाही. आपला मित्र बुडालाय ही बाब मूकबधिर मुलाच्या लक्षात आली. त्याने लगेच हातवारे करून आजूबाजूला असलेल्यांना मित्र पाण्यात बुडाल्याचे सांगितले. मात्र, कोणालाच काही समजेना. अखेर त्या मूकबधिर मुलाच्या आई-वडिलांना तो … Read more