डोंगरचा रानमेवा करवंद नामशेष होण्याच्या मार्गावर

Agricultural News

Agricultural News : डोंगर उतारावर लागवड न करता निसर्गनिर्मित तयार होणारे झुडूप म्हणजे करवंद (डोंगरची काळी मैना). अलिकडील बदलत्या हवामानामुळे व पावसाच्या लहरी पणामुळे दिसेनासी होत आहे. पारनेर तालुक्यातील डोंगरांवर एप्रिल-मे महिन्यात करवंदाची झुडपे आढळतात. काळ्या जांभळ्या बोराएवढ्या आंबट गोड चवीच्या करवंदांच्या फळांनी हे झाड गच्च भरून जाते. पिकलेल्या करवंदांचा खाण्यासाठी व सरबतासाठी वापर होतो. … Read more

Ahmednagar News : कर्जदारांच्या कर्जाची रक्कम परस्पर खासगी सावकाराच्या खात्यावर ! राजे शिवाजी पतसंस्थेमधील प्रकार, आझाद ठुबेंसह चौघांवर गुन्हा

 Ahmednagar News : जमीनीच्या इसार पावतीसाठी घेतलेले मुद्रांक कर्जाच्या वसुली प्रतिज्ञालेखासाठी वापरले. त्यावरून तब्बल १२ कर्जदारांनी घेतलेल्या कर्जाची रक्कम परस्पर खासगी सावकाराच्या खात्यावर जमा केली. हा प्रकार राजे शिवाजी पतसंस्थेत घडला असून तत्कालीन चेअरमन आझाद ठुबे यांच्यासह चौघांवर पारनेर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. रणजित गणेश पाचर्णे, पोपट बोल्हाजी ढवळे, आझाद प्रभाकर ठुबे … Read more

Ahmednagar News : अहमदनगरकरांनो आता तुमच्या मालमत्तांचे जीआयएस प्रणालीद्वारे होणार पुनर्मूल्यांकन! कर न भरणारे, पाणी चोरी करणारे सगळंच समोर येणार

GIS SYSTME

Ahmednagar News : नगरकरांसाठी एक महत्वपूर्ण बातमी आली आहे. महापालिकेने मालमत्तांबाबत एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महापालिका शहरातील सर्व मालमत्तांचे जीआयएस मॅपिंग प्रणालीद्वारे पुनर्मूल्यांकन करणार आहे. या कामासाठी दिल्ली येथील मे. सीई फंन्फो सिस्टम लि. या कंपनीची निवड करण्यात आली असून तिला हे काम दिले आहे. या माध्यमातून कर आकारणी न होणाऱ्या मालमत्ता, अनधिकृत नळ … Read more

Ahmednagar News : सोशल मीडिया पोस्टवर पोलिसांची करडी नजर

Ahmednagar News

Ahmednagar News : विचार मांडण्यासाठी सोशल मीडिया हे चांगले माध्यम आहे; परंतु याचा काही तरुण दुरुपयोग करीत आहेत. इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप, फेसबुक आदींवर आक्षेपार्ह मजकूर, तलवार घेऊन फोटो टाकतात, तसेच जातीय तेढ निर्माण करतात. अशांवर स्थानिक पोलिसांसह सायबर पोलिसांची विशेष नजर आहे. त्यामुळे शांतता भंग होईल, असे वर्तन करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. लोकसभा … Read more

‘त्यांनी’ निष्ठेच्या गप्पा मारू नयेत : लंके

Ahmednagar News

Ahmednagar News : अजित पवारांना फसवलं ते जनतेला का फसवणार नाही, अशी टीका करणाऱ्या मंत्री राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेस, शिवसेनेला फसविले. त्यांनी निष्ठेच्या गप्पा मारू नयेत, असे प्रत्युत्तर आ. नीलेश लंके यांनी करंजी येथे झालेल्या सभेत शुक्रवारी दिले. लंके यांची नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी जनसंवाद यात्रा सुरू असून, पाचव्या दिवशी करंजी येथे झालेल्या सभेत … Read more

भंडारदरा धरणात फक्त ४५ टक्के पाणी साठा

Ahmednagar News

Ahmednagar News : महाराष्ट्रातील सर्व धरणांमध्ये पाणीसाठा कमी झाला असून भंडारदरा धरणही याला अपवाद राहिलेले नाही. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ४५ टक्क्यांवर पोहोचला आहे. यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रात वरुण राजाची कृपादृष्टी कमी झाल्याने पावसाचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे जायकवाडी धरणासह अनेक धरणे भरली नाहीत. त्यामुळे यंदाच्या भर उन्हाळ्यात संपूर्ण महाराष्ट्रच तहानलेला आहे. महाराष्ट्रामध्ये नाशिक तसेच … Read more

उंबरे येथे एकाला गजाने मारहाण…

Ahmednagar News

Ahmednagar News : शेती व सामायिक घराच्या वादातून प्रवीण गायकवाड यांना कोयता, गज व दगडाने मारहाण करण्यात आली. ही घटना राहुरी तालुक्यातील उंबरे येथे दिनांक १ एप्रिल २०२४ रोजी घडली. या घटनेबाबत राहुरी पोलिस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की प्रविण शहाराम गायकवाड (वय २७ वर्षे) हे राहुरी तालुक्यातील … Read more

अहमदनगर: वाळकी खून प्रकरणी त्या दोघांना पकडले

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर तालुक्यातील वाळकी गावच्या शिवारात शेतातून जाणाऱ्या रस्त्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत मोहन खिराजी दांगडे (वय ६५, रा. हंदार मळा, वाळकी, ता. नगर) यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना नगर तालुका पोलिसांनी नेवासा तालुक्यातील चांदा येथे पकडले आहे. या प्रकरणी मयताचा मुलगा संतोष मोहन दांगडे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बाजार समितीत दोन कोटींचा घोटाळा बोगस कांदा अनुदानप्रकरणी गुन्हा…

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बोगस काटा पट्टी पावत्या तयार करत ३०२ शेतकऱ्यांच्या नावे बोगस कांदा अनुदान प्रस्ताव सादर करून १ कोटी ८८ लाख ४७ हजार ५२४ रुपयांचा गैरव्यवहार करत शासनाची फसवणूक केल्याचा ठपका ठेवत बोगस काटा पट्टी पावत्या तयार करणारे व्यापारी, संस्थेचे सचिव दिलीप डेवरे तसेच डेबरे यांच्या सुचनेनुसार यात सहभागी … Read more

Ahmednagar Loksabha : ज्यांनी अजित पवारांना फसवलं ते उद्या जनतेचीही साथ सोडतील ! जिल्ह्यासाठी केलेलं एक काम दाखवा…

Ahmednagar Loksabha

Ahmednagar Loksabha : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले पाहायला मिळत आहे. नगर दक्षिण मध्य तर रोजच काही ना काही नवीन घडामोडी घडतं आहेत. येथून महाविकास आघाडीचे निलेश लंके आणि महायुतीचे डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यात लढत होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने तथा महायुतीने जोरदार प्रचाराला देखील सुरुवात केली … Read more

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार, एमआयएम आपला उमेदवार उतरवणार, कोणाला मिळणार संधी ?

Ahmednagar Politics News

Ahmednagar Politics News : अहमदनगर मधून आताची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात आता तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपाने उमेदवार दिलेला आहे. भारतीय जनता पक्षाने या जागेवर विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतलेला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून या जागेवर … Read more

Ahmednagar News : दिवंगत खा.दिलीप गांधींचा राईट हँड दिनेश कटारीया सूरतमधूनही फरार ! अर्बन बँक घोटाळा व अस्तित्वात नसणारे बोगस गुजराथी सभासद आणल्याचा आरोप..

Nagar Urban Bank News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यासह राज्यभर गाजलेला घोटाळा म्हणजे नगर अर्बन बँकेचा महा घोटाळा. जवळपास २९१ कोटी रूपयांपेक्षा जास्त रकमेचा घोटाळा या बँकेत झालाय. अनेक बड्या लोकांची नावे यात येत आहेत. दरम्यान हा घोटाळा सुकर कसा झाला? तर ही बँक मल्टीस्टेट करून टाकल्यामुळे राज्य सहकार विभागातून नियंत्रणमुक्त झाली व कोट्यवधींचा घोटाळा झाला. ही बँक मल्टीस्टेट … Read more

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात चार दिवस ड्राय डे !

अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी कोरडा दिवसाचा आदेश जारी केला आहे. मतदान संपण्याच्या ४८ तास आधीपासून म्हणजे ११ मे ते १३ मे या कालावधीत व मतमोजणी ४ जूनचा संपूर्ण दिवस कोरडा दिवसाचा (ड्राय डे) आदेश लागू राहणार आहे. अहमदनगर जिल्हा व जिल्ह्याच्या … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘त्या’ मल्टीस्टेट पतसंस्थेच्या अध्यक्षांनी विषारी पदार्थ सेवन करून संपविले जीवन

ahmednagar

श्रीनाथ मल्टीस्टेट पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष पोपटराव एकनाथ शेवाळे (वय ६२ रा. वडगाव गुप्ता ता. नगर) यांनी ३१ मार्च रोजी राहत्या घरी विषारी पदार्थ घेतला होता. त्यांचा उपचारादरम्यान बुधवारी (दि. ३) रात्री खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान आत्महत्येचे कारण अद्याप पुढे आलेले नसले तरी ठेवीदारांच्या … Read more

रामदास आठवले यांना शिर्डीच तिकीट मिळालं नाही म्हणून रिपाईचा मोठा निर्णय, महायुतीच्या उमेदवारांचे काम करणार नाहीत, तर……

Shirdi Loksabha

Shirdi Loksabha : शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडी कडून शिवसेना ठाकरे गटाने उमेदवार दिला आहे. ठाकरे गटाने या जागेवर माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना संधी दिली आहे. दुसरीकडे महायुतीकडून शिर्डीच्या जागेवर शिवसेना शिंदे गटाने उमेदवार दिलेला आहे. शिंदे गटाने या जागेवरून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांना पुन्हा एकदा तिकीट देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मात्र, शिर्डीच्या … Read more

Ahmednagar Breaking : अहमदनगरमधील ‘या’ गावात आगीचे तांडव ! ५० कोंबड्या, दागिने, बैलही जळून खाक…

aag

Ahmednagar Breaking : अहमदनगरमध्ये आगीच्या घटना या अनेकदा घडताना दिसतात. भर नगर शहरात आग लागल्याच्या घटना नुकत्याच घडल्या आहेत. उष्णता वाढल्यानंतर तर अनेकदा या घटना घडताना दिसतात. आता एक अहमदनगर जिल्ह्यातून आगीसंदर्भात एक महत्वाचे वृत्त आले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथे कारेगावमध्ये आगीने तांडव केले. राहत्या घराला गुरुवारी दुपारी अचानक आग लागल्याने चांगलाच भडका उडाला. … Read more

Ahmednagar News : ‘मुळा’तून आजपासून आवर्तन ! जायकवाडीला पाणी दिल्याने ४५ ऐवजी ३० दिवसांचेच आवर्तन, लाभक्षेत्रात कलम १४४ लागू

mula dam avartan

Ahmednagar News : मुळा धरणातून आजपासून (५ एप्रिल) शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. आवर्तन हे साधारण ४५ दिवसांचे असते. परंतु धरणातून नोव्हेंबर २०२३ मध्ये १.९६ टिएमसी पाणी जायकवाडीला सोडण्यात आले असल्याने ४५ ऐवजी ३० दिवसांचेच आवर्तन असणार आहे. कालावधी कमी झाल्याने शेतकऱ्यांना १५ दिवस कमी कालावधीत आवर्तन मिळणार आहे. पुढील खबरदारी व गैरप्रकार टाळण्यासाठी महावितरणला … Read more

वीर जवान सुभाष लगड अनंतात विलीन..! कोळगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Ahmednagar News

Ahmednagar News : भारत माता की जय. वंदे मातरम्‌… सुभाष लगड अमर रहे… वीर जवान अमर रहे…च्या घोषणा देत श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील शहीद जवान सुभेदार सुभाष श्रीरंग लगड यांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुभेदार सुभाष श्रीरंग लगड हे १९९७ साली भारतीय सेनेत भारती झाले … Read more