Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘त्या’ मल्टीस्टेट पतसंस्थेच्या अध्यक्षांनी विषारी पदार्थ सेवन करून संपविले जीवन

Ahmednagarlive24 office
Published:
ahmednagar

श्रीनाथ मल्टीस्टेट पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष पोपटराव एकनाथ शेवाळे (वय ६२ रा. वडगाव गुप्ता ता. नगर) यांनी ३१ मार्च रोजी राहत्या घरी विषारी पदार्थ घेतला होता. त्यांचा उपचारादरम्यान बुधवारी (दि. ३) रात्री खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान आत्महत्येचे कारण अद्याप पुढे आलेले नसले तरी ठेवीदारांच्या तगाद्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे. श्रीनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची पोपटराव शेवाळे यांनी स्थापना केली होती. या पतसंस्थेला मल्टीस्टेटचाही दर्जा मिळाला होता.

कोट्यवधींच्या ठेवी पतसंस्थेत जमा झालेल्या होत्या. दरम्यान, मल्टीस्टेट दर्जा मिळाल्यानंतर पुढील तीन चार वर्षांतच पतसंस्थेत सुमारे ६० ते ७० कोटींचा घोटाळा झाल्याचे पुढे आले. याप्रकरणी संस्थापक अध्यक्ष शेवाळे यांच्यासह ११ संचालकांना अटक झाली.

त्या सर्वांची सहा महिन्यांपूर्वी जामिनावर सुटका झाली. दरम्यान शेवाळे यांनी ३१ मार्च रोजी सकाळी राहत्या घरी विष प्राशन केले. उपचारासाठी त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु बुधवारी रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. अधिक तपास एमआयडीसी पोलीस करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe