Ahmednagar Breaking : अहमदनगरमधील ‘या’ गावात आगीचे तांडव ! ५० कोंबड्या, दागिने, बैलही जळून खाक…

Ahmednagarlive24 office
Published:
aag

Ahmednagar Breaking : अहमदनगरमध्ये आगीच्या घटना या अनेकदा घडताना दिसतात. भर नगर शहरात आग लागल्याच्या घटना नुकत्याच घडल्या आहेत. उष्णता वाढल्यानंतर तर अनेकदा या घटना घडताना दिसतात.

आता एक अहमदनगर जिल्ह्यातून आगीसंदर्भात एक महत्वाचे वृत्त आले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथे कारेगावमध्ये आगीने तांडव केले. राहत्या घराला गुरुवारी दुपारी अचानक आग लागल्याने चांगलाच भडका उडाला. यामध्ये घरातील सर्व गृहोपयोगी वस्तु, ५० कोंबड्या, दागिने जळून खाक झाली, बैल देखील मृत्युमुखी पडला.

अधिक माहिती अशी : कारेगावातील शेतकरी देवराम जेडगुले यांच्या राहत्या घराला गुरुवारी दुपारी आग लागली. यावेळी देवराम जेडगुले व घरातील सदस्य कामानिमित्त शेतात गेले होते. याचदरम्यान राहत्या घराला व गोठ्याला अचानक आग लागली.

आग लागली तेव्हा गोठ्यात दोन बैल, चार गाई होत्या त्यांनी मोठा हांबरडा फोडला. यावेळी शेतामध्ये गेलेले घरातील सदस्य व गावातील ग्रामस्थांनी धाव घेतली. आग विझवण्याचा सर्वानीच प्रयत्न केला. आगीमुळे त्यात कोणालाच जाता न आल्याने एक बैल गंभीर जखमी होवून मृत्यमुखी पडला असून एक गंभीर जखमी झाला आहे.

आगीचे प्रमाण मोठ्या स्वरूपात आसल्याने आग विझवण्याचे प्रयत्न असफल झाले. घरातील सर्व गृहोपयोगी वस्तू, ५० कोंबड्या, दागिने खाक झाली. त्यामुळे या शेतकरी कुटुंबाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

दरम्यान घटनेची माहिती कळताच दीपक लंके, माजी सभापती काशिनाथ दाते, नंदकुमार औटी, माजी नगराध्यक्ष विजय औटी आदींनी घटनास्थळी धाव घेतली. महसूल विभागाने झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला आहे. या शेतकरी कुटुंबास आर्थिक मदत मिळावी अशी मागणी नागरिकांनी केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe