Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यासह राज्यभर गाजलेला घोटाळा म्हणजे नगर अर्बन बँकेचा महा घोटाळा. जवळपास २९१ कोटी रूपयांपेक्षा जास्त रकमेचा घोटाळा या बँकेत झालाय. अनेक बड्या लोकांची नावे यात येत आहेत.
दरम्यान हा घोटाळा सुकर कसा झाला? तर ही बँक मल्टीस्टेट करून टाकल्यामुळे राज्य सहकार विभागातून नियंत्रणमुक्त झाली व कोट्यवधींचा घोटाळा झाला. ही बँक मल्टीस्टेट करण्यासाठी गुजरातमधील अनेक बोगस सभासद करण्यात आले होते.
हे सभासद कधीच कुठे आले नव्हते. ज्या गुजरातींची नावे सभासद म्हणून नोंदविली गेली होती. ते लोकंच उपलब्ध झाले नाहीत. बोगस गुजराती लोकांची नावे सभासद म्हणून नोंदवून नगर अर्बन बँक मल्टीस्टेट केली गेली.
दरम्यान हे कृत्य करण्यासाठी गुजराती व्यापारी व सूरत व्यापारी संघटनेचा पदाधिकारी दिनेश कटारीया याचा मुख्य सहभाग असल्याचे बोलले जाते. तो दिलीप गांधी यांचा राईटहँड असल्याचे ठेवीदार बोलतात. आता तोच दिनेश कटारीया गेल्या दिड महिन्यापासून सुरतमधून फरार असल्याची माहिती समजली आहे.
सुरत येथील एका वर्तमानपत्राने संबंधित बातमी प्रसिद्ध केल्याचे समजले आहे. दिनेश कटारीयाचा या घोटाळ्यात नक्की काय सहभाग आहे हे पोलिस तपासातून निष्पन्न तर होईलच.
परंतु बोगस गुजराती सभासद दाखवून बँक मल्टीस्टेट करून अर्बन बँकेच्या वाटोळ्याचा पायाचा राईटहँड गुजराती व्यापारी दिनेश कटारीयाने घातल्याने ठेवीदारांमधे संताप निर्माण झालाय.
या कटारियाने अहमदनगर शहरपरीसरात इतर कैच लोकांच्या नावे अनेक प्रॉपर्ट्या घेऊन ठेवल्याचा आरोप सध्या काही लोक खासगीत करत आहेत.
दरम्यान अर्बन घोटाळ्याप्रकरणी अनेक लोक अटकेत आहेत. पोलीस आणखी पुढे तपास करत असल्याने ठेवीदारांना लवकरच न्याय मिळेल असे बोलले जात आहे.