डोंगरचा रानमेवा करवंद नामशेष होण्याच्या मार्गावर

Ahmednagarlive24 office
Published:
Agricultural News

Agricultural News : डोंगर उतारावर लागवड न करता निसर्गनिर्मित तयार होणारे झुडूप म्हणजे करवंद (डोंगरची काळी मैना). अलिकडील बदलत्या हवामानामुळे व पावसाच्या लहरी पणामुळे दिसेनासी होत आहे.

पारनेर तालुक्यातील डोंगरांवर एप्रिल-मे महिन्यात करवंदाची झुडपे आढळतात. काळ्या जांभळ्या बोराएवढ्या आंबट गोड चवीच्या करवंदांच्या फळांनी हे झाड गच्च भरून जाते. पिकलेल्या करवंदांचा खाण्यासाठी व सरबतासाठी वापर होतो.

अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक वातावरणात हे झुडूप वाढते; परंतु जंगलची काळी मैना उद्यान ओळखल्या जाणाऱ्या करवंदाची काटेरी झुडपे वणव्यांमुळे नष्ट होत असल्याने करवंद हे फळ आता काही वर्षात नामशेष होण्याची भीती निसर्गप्रेमी व पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होत आहे.

गावरान आंबे, जांभळे, करवंदे आता बाजारात कमी प्रमाणात येताना दिसत असल्याने या वृक्षप्रकाराचे संवर्धन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

करवंदे ही डोंगरची काळी मैना असून, आदिवासी लोक करवंदे विकण्याचा व्यवसाय करतात. या काटेरी झुडुप वृक्ष प्रकाराला साधारणतः फेब्रुवारीत पांढरी फुले येतात, त्यानंतर मार्चमध्ये या जाळ्यांना छोटी हिरवी फळे येतात. कच्ची असताना त्याच्या आंबट चवीमुळे करवंद पाहिजे की,तोंडाला पाणी सुटते. एप्रिलच्या अखेरीस ही फळे पिकून काळी होतात. पिकल्यानंतर ती गोड लागतात. त्यामुळे हा रानमेवा विकत घेणारांची संख्या वाढते. परिसरातील बहुतेक जमिनी या विविध प्रकल्प व खासगी उद्योजकांना शेतकऱ्यांनी विकल्यामुळे त्यावरील जंगले नष्ट झाली आहेत. तेथील झुडपांना समूळ नष्ट करण्यात आले आहे, अनेक जंगलांना आगी लागल्याने झुडपांसह अनेक औषधी वनस्पती नष्ट झाल्या आहेत. काही ठिकाणी सरपणासाठी या झुडपांची तोड केली जात आहे. त्यामुळे हा वक्षपकार अखेरचा घटका मोजत आहे

करवंद या फळामुळे जीवनसत्व व रोग प्रतिकारक क्षमता वाढते. शासनाने या फळाच्या ज्यूस उत्पादनास चालना दिल्यास अशा प्रकारच्या उद्योगांना चालना मिळेल व करवंद वृक्षांचे चांगले संवर्धन होईल व स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराचा नवा मार्ग मिळेल. मात्र, वनवा व वृक्षतोडीमुळे करवंदाची काटेरी झुडपे नष्ट होत चालली आहेत.

बाजारात करवंद कमी प्रमाणात पहावयास मिळत आहेत. त्यामुळे येत्या काही वर्षात ही जंगलची काळी मैना म्हणून लौकिक प्राप्त केलेले करवंद हे फळ नामशेष होण्याची भीती व्यक्त होत आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe