‘त्यांनी’ निष्ठेच्या गप्पा मारू नयेत : लंके

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar News

Ahmednagar News : अजित पवारांना फसवलं ते जनतेला का फसवणार नाही, अशी टीका करणाऱ्या मंत्री राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेस, शिवसेनेला फसविले. त्यांनी निष्ठेच्या गप्पा मारू नयेत,

असे प्रत्युत्तर आ. नीलेश लंके यांनी करंजी येथे झालेल्या सभेत शुक्रवारी दिले. लंके यांची नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी जनसंवाद यात्रा सुरू असून,

पाचव्या दिवशी करंजी येथे झालेल्या सभेत लंके यांनी विखे पिता-पुत्रांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला. यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे, माजी जि प सदस्य उषाताई कराळे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रफिक शेख,

सरपंच नसीम शेख, उपसरपंच सुनील अकोलकर, युवानेते अमोल वाघ, सरपंच राजेंद्र पाठक, भीमराज सोनवणे, अॅड सतीश पालवे, विष्णू पालवे, तिसगावचे सरपंच इलियास शेख, माजी चेअरमन बाळासाहेब लवांडे, सरपंच नितीन लोमटे,

ग्रामपंचायत सदस्य गणेश अकोलकर, अंबादास नजन, अभयकुमार गुगळे सुनील अकोलकर, बाळासाहेब अकोलकर, भाऊसाहेब अकोलकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तिसगाव, शिरापूर, घाटशिरस, देवराइ, करंजी, भोसे, वैजूबाभळगाव, चिचोंडी कोल्हार, मिरी या परिसरात लंके यांची जनसंवाद यात्रा पोहचली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe