अहमदनगरमधील कचरा संकलन करणार्‍याविरूध्द गुन्हा; दीड कोटींची फसवणूक

Ahmednagar News : शहरातील कचरा संकलन करणार्‍या स्वयंभु ट्रान्सपोर्टचे संचालक/चालक नामदेव भापकर (रा. खडकी, पुणे) यांच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात भांदवि कलम 420, 467, 468 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.P शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गिरीश तुकाराम जाधव (रा. बागरोजा हाडको, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. महानगरपालिकेची सुमारे एक कोटी 42 लाख 63 हजार 138 रूपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत … Read more

अहमदनगर ब्रेकींग: ‘अर्बन’ बँक सस्पेन्स खाते घोटाळा; गांधी बंधूसह तिघांना अजामीनपात्र वॉरंट

AhmednagarLive24 : नगर अर्बन बँकेत झालेल्या सस्पेन्स खाते घोटाळ्याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक सुरेंद्र दिलीप गांधी आणि त्यांचे बंधू देवेंद्र दिलीप गांधी तसेच संगीता अनिल गांधी या तिघांना न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. येत्या 21 जूनरोजी होणार्‍या सुनावणीस उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणाच्या नुकत्याच झालेल्या न्यायालयीन सुनावणीस गैरहजर राहिल्याने या तिघांनाही अजामीन पात्र वॉरंट … Read more

अहमदनगर ब्रेकींग: लाल किल्ल्यावर हिरवा झेंडा, आक्षेपार्ह व्हिडिओ; युवक पोलिसांच्या ताब्यात

AhmednagarLive24 : लाल किल्ल्यावर हिरव्या रंगाचा झेंडा फडकवितांनाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर व्हायरल करणार्‍या युवकाविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अदनान आयाज सय्यद (वय 21 रा. कोतवाली पोलीस ठाण्याच्यासमोर, अहमदनगर) असे या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी कुणाल सुनील भंडारी (वय 28 रा. आनंदनगर, रेल्वेस्टेशन, अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. … Read more

”कंगणी कंगणी, होय होय कंगणी…, देवमाणूस-2 मध्ये नगरी कलाकार खातोय भाव

Ahmednagar News : झी मराठी वाहिनीवरील देव माणूस- २ या मालिकेत पोलिस इन्पेक्टर मार्तंड जामकर हे पात्र सध्या चांगलच गाजत आहे. पहिल्या भागात किरण गायकवाड याची देव माणूसची भूमिका गाजल्यानंतर आता नगर जिल्ह्याचे भूषण, प्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदे यांनी इन्पेक्टर मार्तंड जामकरच्या भूमिकेतून ही मालिका गाजविण्यास सुरवात केली आहे. शिंदे यांच्या आजवरच्या अनेक भूमिकामध्ये उजवी … Read more

विखे-पवार कुटुंबात संघर्ष नव्हे, मतभिन्नता: विखे पाटलांचे अजितदादांना निमंत्रण

Ahmednagar Politics : राजकारणात विखे पाटील आणि पवार कुटुंबातील संघर्षाची नेहमीच चर्चा होती. दर निवडणुकाच्यावेळी याचा प्रत्यय येतो. मात्र आमच्यात असा कुठलाही वैयक्तिक संघर्ष नाही. केवळ राजकीय भूमिका वेगळ्या असल्याने मतभिन्नता आहे. असे माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले. लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्ट व प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाने … Read more

कोरोनानंतरच्या सात महिन्यांत साईंच्या झोळीत इतक्या कोटींचे दान

Ahmednagar News : कोरोनाच्या काळात अडचणीत आलेल्या शिर्डीच्या साईबाबा संस्थानची परिस्थिती पुन्हा पूर्वपदावर येत आहे. भाविकांचा ओढा आणि देगण्यांचे प्रमाणही वाढले आहे. गेल्या सात महिन्यांत ६४ लाख भाविकांनी शिर्डीत येऊन दर्शन घेतले असून त्यांच्या माध्यमातून १८८ कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली. कोरोना काळात मंदीर बंद होते. … Read more

वाळूतस्करांची मुजोरी : थेट तहसीलदारांच्या वाहनावर घातला वाळूचा डंपर ….?

Ahmednagar News : यापूर्वी थेट प्रांताधिकारी यांना वाळूतस्कर पोलिसानेच धक्काबुक्की केल्याची घटना घडली होती. मात्र आता तर चक्क तहसीलदार आणि त्यांच्या भरारी पथकावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर चालकाने वाहन पळवून नेण्याच्या उद्देशाने अंगावर वाहन घालीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रसंगावधान राखीत वाहन बाजूला केल्याने पथकातील कर्मचारी बचावले अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. अवैध … Read more

साईंच्या झोळीत अवघ्या सात महिन्यांत तब्बल ‘इतक्या’ कोटींचे दान…!

Ahmednagar News : अनेक भाविक आपले श्रध्दास्थान असलेल्या विविध देवस्थानच्या दानपेटीत ज्याच्यात्याच्या कुवतीनुसार दान करत असतो. जिल्ह्यातील शिर्डीच्या साईबाबांच्या दानपेटीत देखील अनेक भावीक दान करत असतात. त्याच अनुषंगाने मागील अवघ्या सात महिन्यांच्या कालावधीत शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या दानपेटीत सुमारे १८८ कोटी ५५ लाख रुपयांचे विक्रमी दान जमा झाले असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत … Read more

Ahmednagar Politics : शिवसेनेसंबंधी खासदार विखे पाटलांचा हा निर्धार

Ahmednagar News : सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये मोठा राजकीय संर्घष पेटलेला असताना नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी मात्र शिवसेनेवर टीका न करण्याचा व शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्धार केला आहे. पारनेर तालुक्यात एका युवा नेत्याच्या वाढदिवस कार्यक्रमात डॉ. विखे पाटील बोलत होते.आपल्या विजयात नगर जिल्ह्याच्या शिवसेनेचा पन्नास टक्के वाटा आहे, त्यामुळे आपण शिवसेनेसोबत … Read more

Ahmednagar Rain : पावसाची जोरदार बॅटींग, नदीला पूर :चार तास वाहतूक ठप्प

Ahmednagar Rain : नगर तालुक्यातील जेऊर परिसरात शनिवारी सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पहिल्याच पावसात सीना नदीला पुर आला होता. दरम्यान या पावसाचे पाणी महामार्गावर मोठ्या प्रमाणात आल्याने नगर औरंगाबाद महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती.परिसरात जोरदार पाऊस झाल्याने सर्व बंधारे तुडुंब भरले आहेत. पहिल्याच पावसात बंधारे तुडुंब भरून सीना नदीला महापूर येण्याची ही … Read more

काय सांगता : चक्क ऊसतोड टोळी मुकादमाने टोळी मालकालच पळवला..!

Ahmednagar News : उचल घेतली मात्र मुकादम टोळी घेऊन उसतोडीला आलाच नाही, उचल न फेडताच पळ काढला, घेतलेली उचल परत केली नाही अशा घटना घडत असतात. मात्र परजिल्ह्यातील मुकादमाने येथील टोळी मालकाला त्याच्या गावाकडे येऊन पळवून नेल्याची घटना कर्जत तालुक्यात घडली आहे.कर्जत तालुक्यातील गणेशवाडी गावातील टोळी मालक सुभाष बापु ठोंबरे हे आणि डोळे मुकदम आणि … Read more

आता जर ‘ती’जलवाहिनी फुटली तर ठेकेदारालाच झोडपून काढू…?

Ahmednagar News : महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामामुळे बुऱ्हाणनगर पाणी योजनेची जलवाहिनी फुटल्यामुळे या भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सहा महिन्यात ५५ वेळा जलवाहिनी फुटली. त्यामुळे दहा वेळेस या भागात पाणी सुटले. जलवाहिनीचे काम तातडीने पुर्ण केले नाही तर शिवसेना स्टाईल संबंधीत ठेकेदाराला झोडपण्याचा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांनी दिला. नगर सोलापूर महामार्गावर रस्ता … Read more

शिवसेनेच्या गोटातील कोणते अपक्ष फुटले? नगर जिल्ह्याकडेही बोट दाखविले जाऊ लागले…

Ahmednagar News: राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला तो अपक्षांची मते फुटल्यामुळे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही हेच सांगितले आहे. पक्षाची मते कायम आहेत, मात्र शिवसेनेला पाठिंबा दिलेल्या काही अपक्षांची मते मिळाली नाहीत, असे सांगितले जात आहे. त्यामुळे यामध्ये कोणाचा समावेश आहे? याची चर्चा सुरू झाली असून त्या दृष्टीने नगर जिल्ह्याकडेही बोट दाखविले जाऊ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भीषण अपघातात दोघांचा मृत्यू !

AhmednagarLive24 : नगर औरंगाबाद महामार्गावरील कांगोणी फाटा शिवारात दोन कराची समोरा समोर टक्कर झाल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात २ जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, काल गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास पुण्याहून औरंगाबादच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या क्रेटा … Read more

अहमदनगर ब्रेकींग: म्हणून ‘या’ तीन अधिकार्‍यांना एसीबीकडून अटक

AhmednagarLive24 : अहमदनगरच्या लाचलुचपत (एसीबी) विभागाने अहमदनगर वनविभागाच्या तीन अधिकार्‍यांना आज अटक केली आहे. सन 2015-16 या आर्थिक वर्षात कर्जत तालुक्यात झालेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या भ्रष्टाचार प्रकरणी ही अटक करण्यात आल्याचे पोलीस उपअधीक्षक हरीष खेडेकर यांनी सांगितले. वनपरिक्षेत्र अधिकारी शंकर वृषीकेत पाटील, वनरक्षक बलभीम राजाराम गांगर्डे व वनरक्षक शेखर रमेश पाटोळे यांना अटक करण्यात आली … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सिद्धू मुसेवाला खून प्रकरणातील गुन्हेगारास नगर जिल्ह्यातून अटक !

AhmednagarLive24 : गायक व काँग्रेस पक्षाचे नेते सिद्धू मुसेवाला खून प्रकरणात संशयित असलेल्या पुणे जिल्ह्यातील दोघांपैकी एका सराईत गुन्हेगाराला पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने पुणे नगर सीमेवरील बोटा शिवारात बेड्या ठोकल्या. हत्याप्रकरणातील संशयित संतोष जाधव याचा साथीदार सिद्धेश कांबळे उर्फ सौरभ महाकाळ (वय-19) असे त्या आरोपीचे नाव आहे. ही कारवाई बुधवारी (7 जून) रोजी करण्यात आली. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नगरसेवकाकडून पत्नीचा छळ; पत्नीची पोलिसांत धाव, गुन्हा दाखल

AhmednagarLive24 : सासरी नांदत असलेल्या विवाहितेला मारहाण करत पैशाची मागणी केल्याप्रकरणी नगरसेवकासह तिघांविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित विवाहित महिलेने फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये नगरसेवक पती अक्षय सदानंद उणवणे, सासरे सदानंद उणवणे आणि सासू उषा सदानंद उणवणे (सर्व रा. लालटाकी, अहमदनगर) यांचा समावेश आहे. दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे … Read more

अहमदनगर ब्रेकींग: वादळी वार्‍यामुळे चौघांचा मृत्यू

AhmednagarLive24 : तालुक्यातील अकलापूर येथील मुंजेवाडी शिवारात वादळी वार्‍यामुळे घर पडून तीन जण जागीच ठार झाले. तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. विठ्ठल भिमा दूधवडे (वय 75), हौसाबाई भिमा दूधवडे (वय 80), साहिल पिनू दूधवडे (वय 10) असे मृत झालेल्यांची नावे आहेत. तर वनिता सुभाष दुधवडे, मंदाबाई विठ्ठल दुधवडे या महिला गंभीर जखमी झाल्या … Read more