Ahmednagar News : अहमदनगरचे नामांतर करा, पडळकरांनी सूचविले हे नाव

Ahmednagar News :- भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगरच्या नामांतरासंबंधी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, नुकत्याच पार पडलेल्या चौंडी, अहमदनगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीमध्ये पवार आजोबा- नातवाच्या मुघलशाहीने पोलीस बळाचा गैरवापर करत अहिल्यादेवी भक्तांना चौंडी येथे दर्शनापासून जाण्यास रोखलं. शेकडो हिंदूंनी जीव गमावलेल्या मुंबई बॉम स्फोटातील सुत्रधार दाऊद इब्राहीमच्या बहिणीसोबत … Read more

आता अनिल गोंटेच्या वक्तव्याला आक्षेप, आज जामखेडमध्ये निदर्शने

Ahmednagar News : चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी (३१ मे) रोजी माजी आमदार अनिल गोंटे यांच्या भाषणावर आक्षेप घेण्यात आला आहे. गोंटे यांनी आपल्या भाषणात राजमाता आणि महाराणींचा अवमान केल्याचा आरोप करण्यात येत आहे. याचा निषेध करण्यासाठी आज गुरूवारी दुपारी जामखेड येथील खर्डा चौकात अहिल्याप्रेमी आणि शिवप्रेमींच्या वतीने निदर्शने करण्यात येणार आहेत. याआधी … Read more

रेडिओलॉजिस्टमध्ये ‘सुरभि’चे डॉ. संकेत सारडा देशात अव्वल

आयुर्विज्ञान राष्ट्रीय परीक्षा बोर्डने घेतलेल्या रेडिओलॉजी विभागातील सुरभि हॉस्पिटलचे रेडिओलॉजिस्ट डॉ. संकेत सारडा यांनी सुवर्णपदक मिळवून देशात अव्वल स्थान पटकावले. सन 2019 मध्ये झालेल्या वैद्यकीय क्षेत्रातील डीएनबी परीक्षेत सुवर्णपदक मिळवणारे ते एकमेव डॉक्टर आहेत. आज प्रसिद्ध झालेल्या गुणवत्ता यादीत त्यांचे अव्वलस्थान नमूद करण्यात आले आहे.डॉ. सारडा हे मूळचे हिंगोली येथील रहिवासी आहेत. त्यांनी पुण्यातील ससून … Read more

अहमदनगर-पुणे मार्गावर धावली राज्यातील पह‍िली ‘ई-बस’

Ahmednagar – Pune Electric Bus : राज्य पर‍िवहन महामंडळाची पह‍िली बस १ जून १९४८ रोजी पुणे-अहमदनगर मार्गावर धावली होती. त्या इत‍िहासाची १ जून २०२२ रोजी अहमदनगर-पुणे दरम्यान पुनरावृत्ती झाली. अहमदनगर-पुणे दरम्यान ‘श‍िवाई’ या राज्यातील पह‍िल्या व‍िद्युत घटावरील (ई-बस) सेवेची सुरूवात महाराष्ट्र राज्य पर‍िवहन महामंडळाचे पहिले वाहक अहमदनगर येथील लक्ष्मणराव शंकरराव केवटे यांच्या हस्ते हिरवा झेंडा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वृद्ध दाम्पत्याचा घराच्या छतावर खून करून दरोडा, तीन दिवसांनी…

AhmednagarLive24 : कोपरगाव तालुक्यातील तळेगाव मळे गावातील एका वस्तीवर दरोडा टाकण्यात आला आहे. दरोडेखोरांच्या मारहाणीत वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाला असून दोन-तीन दिवसांनंतर ही घटना उघडकीस आली. घराच्या छतावर झोपलेले असताना दरोडेखोरांनी दोघांचाही खून केला. गेल्या दोन दिवसांपासून त्यांचे नातेवाईक संपर्क करीत होते, मात्र प्रतिसाद मिळत नव्हता. आजूबाजूला वस्ती नसल्याने इतरांच्याही लक्षात आले नाही. शेवटी नातेवाईकांनी … Read more

म्हणून एसटीची पहिलीच ई-बस झाली लेट

Ahmednagar Pune Electric Bus : एसटीच्या अमृत महोत्सवी वर्षात एसटीची ई-बस सेवा सुरू झाली. ज्या नगर-पुणे मार्गावर एसटीची पहिली बस धावली, त्याच मार्गावर पहिली ई-बसही धावली. मात्र, पुण्यातील उद्घाटनाचा कार्यक्रम लांबल्याने दोन्ही बाजूंनी सोडण्यात येणाऱ्या बस नियोजित वेळेपेक्षा उशिरा सुटल्या.पुण्यातून ऐतिहासिक वडाच्या झाडाखालून तर नगरच्या तारकपूर बसस्थानकात समारंभपूर्वक या सेवेला प्रारंभ झाला. पुण्यातील उद्घाटन कार्यक्रम … Read more

Ahmednagar News | पुणतांब्यात पुन्हा घुमला शेतकऱ्यांचा आवाज

Ahmednagar News : आजपासून पुणतांबा येथे शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. ते पाच जूनपर्यंत सुरू राहणार आहे. आज सकाळी गावातून शेतकऱ्यांची रॅली काढण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांच्या मागण्यांच्या घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर गावातील शेतकरी पुतळ्यासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. सकाळी शेतकऱ्यांनी गावातून दिंडी काढली. यावेळी २०१७ मध्ये याच गावातून झालेल्या पहिल्या शेतकरी संपाच्या … Read more

अहमदनगर ब्रेकींग: प्रवरा नदीपात्रात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू

AhmednagarLive24 : प्रवरा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. संकेत वाडेकर ( रा. मांडवे ता. संगमनेर) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. ही घटना शहरातील गंगामाई घाटाच्या परिसरात घडली. नदीपात्रात अडकलेल्या अन्य तीन विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. वाडेकर हा आपल्या सहकारी मित्रांसह काल सायंकाळी प्रवरा नदीपात्रात पोहण्यासाठी गेला होता. गंगामाई घाटाच्या … Read more

ऐतिहासिक क्षण : नगरमधून आज धावणार पहिली ‘शिवाई’…!

Ahmednagar To Pune Electric Bus :- ज्या अहमदनगर शहरातून राज्याची प्रवासी सेवालाल परीने सुरू केली, त्याच शहरातील तारकपूर बसस्थानकात ७५ वर्षात पदार्पण करीत असताना आता शिवाई बसचे प्रस्थान होत आहे. एसटीच्या इतिहासातील स्थापनेचा साक्षीदार असणारे शहर ही अहमदनगर शहराची ओळख आहे. आता शिवाईच्या प्रस्थानाच्या रूपाने राज्य परिवहन महामंडळाच्या नव्या संकल्प व परिवर्तनाच्या वाटचालीचे साक्षीदार देखील … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील संतापजनक घटना ! विवाहितेचा खून, अंगणात अंत्यसंस्कार

Ahmednagar News : संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथिल आरती राजेंद्र मुन्तोडे (वय – 35) या महिलेचा मृतदेह सोमवारी सकाळी आश्वी खुर्द येथिल प्रवरा उजव्या कालव्यात आढळून आल्यामुळे खळबळ उडाली असून याप्रकरणी महिलेच्या पतीसह सासरच्या मंडळीवर 302 व 498 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही महिला दोन दिवसापासून बेपत्ता होती व तिचाच मृतदेह सापडल्यामुळे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जवखेडे खालसा तिहेरी हत्याकांड: आरोपींची निर्दोष मुक्तता

AhmednagarLive24 : जवखेडे खालसा तिहेरी हत्याकांड प्रकरणी प्रशांत उर्फ काळू दिलीप जाधव, अशोक दिलीप जाधव, दिलीप जगन्नाथ जाधव यांची जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. सरकारी पक्षाने आरोपींवर ठेवलेले आरोप ते सिध्द शकले नाही, असे निरीक्षक न्यायालयाने नोंदविले. प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर यलागड्डा यांच्या न्यायालयात आज हा निकाल दिला. 20 ऑक्टोबर 2014 ला जवखेडे … Read more

Ahmednagar News : कोण आहे रुपाली चाकणकर यांना मारण्याची धमकी देणारा व्यक्ती ? समोर आले धक्कादायक कारण…

Ahmednagar News :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर धमकी देणारी व्यक्ती ही नगरची असल्याचे कळत आहे. तर त्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे. तो नगर तालुक्यातील चिंचोडी पाटील येथील असून त्याचे नाव भाऊसाहेब शिंदे आहे. शिंदे याने धमकीचा फोन … Read more

अहमदनगर ब्रेकींग: रूपाली चाकणकर यांना धमकी देणारी व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking News : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला नगर तालुका पोलिसांनी आज सकाळी चिंचोडी पाटील (ता. नगर) येथून ताब्यात घेतले आहे. भाऊसाहेब रामदास शिंदे (रा. भेंडा ता. नेवासा) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. त्याला अटक करून दुपारी न्यायालयासमोर हजर केले जाणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप … Read more

एसटी ची शिवाई इ बस नगरला दाखल, उद्या दोन्ही दिशेने बस सुटणार

Ahmednagar News : एसटी महामंडळाने आणलेल्या ई-बस सेवेचा प्रारंभ १ जून रोजी होणार आहे. ज्या नगर-पुणे मार्गावर पहिली बस धावली, त्याच मार्गावरून पहिली ई-बसही धावणार आहे. यासाठी नगरमध्ये इ बस दाखल झाली आहे. उद्या सकाळी ९.३० वाजता एकाच वेळी पुणे आणि नगर येथून बस सोडण्यात येणार आहेत. पुण्यातून ज्या ऐतिहासिक वडाच्या झाडाखालून बस सुटली, त्याच … Read more

Ahmednagar News | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साधणार अहमदनगरच्या नागरिकांसोबत संवाद !

Ahmednagar News: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ३१ मे २०२२ रोजी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ‘प्रधानमंत्री’ नावाने सुरू असलेल्या १३ केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. पंतप्रधान हे शिमला येथून या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. याच कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अहमदनगर जिल्ह्यातील ३ लाभार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत.अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दिली. स्वातंत्र्याच्या … Read more

महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांना अहमदनगरहून धमकीचा फोन

Ahmednagar News : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना जीवे मारण्याची धमकी एका व्यक्तीने दूरध्वनीद्वारे दिली आहे. हा फोन अहमदनगरमधून केला गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मुख्य म्हणजे हा फोन राज्य महिला आयोगाच्या मुंबईतील कार्यालयात नव्हे तर राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवी दिल्लीच्या कार्यालयात करण्यात आलेला आहे. आज दुपारी … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नितीन गडकरी व शरद पवार यांचे मार्गदर्शन !

Ahmednagar News : नुसते साखरेचे उत्पादन घेत साखर कारखाना फायद्यात येणार नाही. यासाठी इथेनॉल व इतर पर्यायी उत्पादन घेणे आवश्यक आहे. असे मत ही राज्याचे ग्रामविकास, कामगार मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज येथे व्यक्त केले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही साखर कारखानदारांनी इथेनॉल निर्मिती कडे वळावे. अशा शब्दांत यावेळी मार्गदर्शन केले ‌. शेवगाव … Read more

रोहित पवारांनी मतदारसंघात सरकारी जमिनी लाटल्या, भाजपच्या नेत्याचा गंभीर आरोप

Ahmednagar News : राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेड मतदारसंघातील आमदार रोहित पवार यांनी चौंडीसह अनेक ठिकाणी सरकारी जमिनी लाटल्या असून त्यांच्या बगलबच्चांना दिल्या आहेत, असा आरोप भाजपचे नेते, माजी मंत्री राम शिंदे यांनी केला आहे. शिंदे यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी हा आरोप केला. उद्या ३१ मे रोजी चौंडी येथे होणारा कार्यक्रम म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी … Read more