बालविवाहातून पीडितेने दिला बालकास जन्म; आरोपीस अटक

२ जानेवारी २०२५ तांदुळवाडी : बालविवाह करून पीडित अल्पवयीन मुलीस गरोदर करून नवजात बालकास जन्म दिल्याने राहुरी पोलिसांनी नुकतीच आरोपीस अटक केली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुरी पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी व त्याचे आई-वडील व सासू-सासरे यांनी सदर गुन्ह्यातील फिर्यादी पीडित अल्पवयीन मुलीचे आरोपीशी लग्न लावून दिले. … Read more

अहिल्यानगर मनपाकडून नगरकरांना लुटण्याचा घाट ! नगरकरांनी कोट्यवधीचा कर भरुन….

२ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : शहरातील नागरीक हा महागाईने त्रस्त आहे व नगरकरांनी कोट्यवधीचा कर भरुन देखील कोणतीही मूलभूत सुविधा नागरिकांना मनपा व्यवस्थित देत नाही. असे असताना नवीन योजनेची अंमलबजावणी करुन नगरकरांना लुटण्याचा घाट मनपा घालत आहे. मनपाने ही योजना त्वरीत मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने मनपा उपायुक्त यांना … Read more

अहिल्यानगर शहरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण ! ‘त्या’ व्यक्तीविरूध्द गुन्हा

२ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरातून अज्ञात व्यक्तीने मजुरी काम करणाऱ्या महिलेच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना मंगळवारी (दि. ३१) ३.४५ दुपारी च्या सुमारास घडली. या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने रात्री कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरूध्द अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी या मुळच्या बुलढाणा जिल्ह्यातील असून … Read more

Ahilyanagar Crime : गांजा ओढण्यास मज्जाव केल्यामुळे वॉचमनवर चॉपर व कोयत्याने वार !

२ जानेवारी २०२५, अहिल्यानगर : एका बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी गांजा ओढण्यास मज्जाव केल्यामुळे वॉचमनवर चॉपर व कोयत्याने वार करत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना बोल्हेगाव परिसरात सोमवारी (दि.३०) रात्री घडली. करण संतोष कदम (वय १९, रा. टाकळी खातगाव, ता. नगर) असे जखमी वॉचमनचे नाव आहे. उपचार घेत असताना तोफखाना पोलिसांना दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी … Read more

MLA Amol Khatal : निराधार योजनेअंतर्गत ६ कोटी रुपये वर्ग,शासनाच्या योजनेचा लाभ घ्या – आ. खताळ

२ जानेवारी २०२५ संगमनेर : केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर, या तीन महिन्यातील संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्धापकाळ योजना, सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, अशा विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून नोव्हेंबर २०२४ अखेरपर्यंत १८ हजार २७४ लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर ५ कोटी ९६ लाख ६५ हजार ९०० रुपये काल बुधवारी (दि. … Read more

स्थानिकांच्या जाचामुळे आईसह चार बहिणींची हत्या ! युवकाचे कृत्य, व्हिडिओतून मांडली व्यथा

२ जानेवारी २०२५ : उत्तर प्रदेशातील लखनौ शहर नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी एका भयंकर हत्याकांडाने हादरले. स्थानिकांच्या त्रासाला कंटाळून युवकाने आपली आई व चार बहिणींची एका हॉटेलच्या खोलीत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. स्थानिकांनी आपले घर आणि भूखंड हिसकावून घेतल्याने कुटुंबाला संपविण्याशिवाय आपल्याकडे कुठलाही पर्याय नव्हता, असा दावा या २४ वर्षीय आरोपीने व्हिडिओतून केला. त्याने … Read more

Ahilyanagar News : शनिवारपासून अहिल्यानगर महानगरपालिकेचे स्वच्छता अभियान सुरू

Ahilyanagar News : अहिल्यानगर महानगरपालिकेचे शहर स्वच्छता अभियान येत्या शनिवारपासून सुरू होत आहे. दर शनिवारी शहराच्या एकेका भागात अधिकारी, कर्मचारी सहभागी होणार आहेत. शहरातील नागरिक, सामाजिक संघटनांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे. नव्या वर्षात शहर स्वच्छतेसाठी महानगरपालिकेने संकल्प केला आहे. अहिल्यानगर शहर स्वच्छ शहर म्हणून ओळखले … Read more

काँग्रेस शिष्टमंडळाच्या मागणीवरून प्रलंबित योजनांचे पाच कोटी 96 लाख 65 हजार रुपये बँकेत वर्ग ! 18274 पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळणार

Sangamner News : काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून विविध गावांमधील वाडीवस्त्यावरील योग्य व पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून दिला जात आहे .मात्र अनेक दिवसांपासून हे अनुदान रखडवले गेले होते. याबाबत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी 23 डिसेंबर रोजी प्रशासनाकडे तातडीने प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याची विनंती केल्यानंतर आज शासनाने 18 हजार … Read more

सहकारमहर्षी T20 क्रिकेट स्पर्धेचा थरार सुरू रौप्य महोत्सवी वर्षात राष्ट्रीय दर्जाचे आयोजन

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर मध्ये तरुणांना करिअरसाठी सर्व संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. 25 वर्षापासून जयहिंदच्या वतीने सहकारमहर्षी क्रिकेट चषकाचे आयोजन होत असून संपूर्ण मैदानावर हिरवळ टर्फ विकेट यासह राज्यभरातील नामांकित खेळाडूंचा सहभाग यामुळे ही स्पर्धा राज्यपातळीवर लौकिकास्पद ठरली असून पुढील पंधरा दिवसांमध्ये क्रीडा रसिकांसाठी मोठी मेजवानी ठरणार असल्याचे प्रतिपादन आयोजक तथा … Read more

शिस्त मोडाल,तर राहुरी पोलिसांशी आहे गाठ ; वर्षभरात ६५४ विना नंबर वाहनांवर कारवाई,लाखोंचा दंड वसूल

१ जानेवारी २०२५ राहुरी शहर : पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी पोलीस स्टेशनने वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.नंबर प्लेट नसणाऱ्या वाहनांविरोधात राबविलेल्या विशेष मोहिमेद्वारे केवळ वाहनचोरीचे प्रकार कमी करण्यात यश मिळाले नाही,तर वाहतूक शिस्तीचाही बडगा उगारण्यात आला आहे.त्याचा अपेक्षित परिणाम दिसून आला असून वाहन चोरट्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे … Read more

तीन लाख भाविकांसहित बड्या बड्या हस्ती साईबाबांच्या चरणी नतमस्तक ; सरत्या वर्षाला निरोप देऊन केले नवीन वर्षाचे स्वागत

१ जानेवारी २०२५ शिर्डी : सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीत दरवर्षी नाताळपासूनचं अनेक मंत्री, अभिनेते, सेलिब्रेटी, खेळाडू, उद्योगपती, आमदार, खासदार आदी बड्या मंडळीं हजेरी लावतात. मंगळवारी देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी साई समाधीचे दर्शन घेतले, तर केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दरवर्षीप्रमाणे साईबाबांच्या दर्शनाला हजेरी लावली. सरत्या वर्षाला निरोप … Read more

अतिक्रमणावर हातोडा ; सर्वसामान्यांची शिकार करत उपजीविका सोडली वाऱ्यावर परंतु बड्या माश्यांना अभय !

१ जानेवारी २०२५ अकोले : कोल्हार-घोटी राज्य मार्गालगतच्या अतिक्रमणांविरोधात अकोले नगरपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने पोलिस बंदोबस्तात संयुक्त कारवाई सुरू केली आहे.तात्पुरत्या स्वरूपातील अतिक्रमणे हटविण्यात आली, मात्र पक्क्या बांधकामांना अभय दिल्याचे बोलले जात आहे.या मोहिमेमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अतिक्रमणांविरुद्ध सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी अकोल्याचे तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांना निवेदन दिल्यानंतर ही प्रक्रिया … Read more

नव्या वर्षात प्रलंबित सर्व योजना, प्रकल्पांना गती देऊन ते कार्यरत करणार

अहिल्यानगर – नव्या वर्षात महानगरपालिकेकडून अधिक चांगल्या सेवा, सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. येत्या वर्षात सध्या सुरू असलेल्या प्रकल्प, योजनांना गती देऊन नाट्यगृह, क्रीडा संकुले, अद्ययावत रुग्णालय, ई बस सेवा, सीना नदी सुशोभीकरण आदी प्रमुख योजना व प्रगतीपथावर असलेली रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचा निर्धार महानगरपालिकेने केला असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी … Read more

अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने व आंजनेय प्रतिष्ठान आयोजित बाळासाहेब पवार स्मृती करंडक क्रिकेट स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न

अहिल्यानगर : वाकोडी येथील साईदीप मैदानावर जिल्हास्तरीय बाळासाहेब पवार स्मृती करंडक क्रिकेट स्पर्धा 23 दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाली. प्रत्येक सामना अटीतटीचा व शेवटच्या षटकापर्यंत चालला असून खेळाडूंनी क्रिकेट प्रेमींचे मने जिंकली. या स्पर्धेमध्ये १२ वर्षाखालील वयोगटातील अंतिम सामना डिफेन्स क्रिकेट ॲकॅडमी विरुद्ध हुंडेकरी क्रिकेट ॲकॅडमी यांच्या मध्ये चुरशीचा झाला असून यामध्ये डिफेन्स क्रिकेट अकॅडमी … Read more

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत मोठा बदल, अनेक रस्त्यावरील वाहतूक बंद राहणार

Pune News : भीमा कोरेगाव येथे होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन सोहळा निमित्त पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अवजड वाहनांना शहरात येण्यास बंदी करण्यात आली आहे.दरवर्षी भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभ अभिवादन सोहळा आयोजित होतो. सालाबादाप्रमाणे एक जानेवारी 2025 ला भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभ अभिवादन सोहळा आयोजित होणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील … Read more

अहिल्यानगर आणि पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! ‘या’ तीन रेल्वे मार्ग प्रकल्पांना मिळाली मंजुरी, कसे असतील मार्ग ?

Ahilyanagar Railway News : अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. केंद्राकडून अहिल्यानगर जिल्ह्यातील तीन महत्त्वाच्या रेल्वे मार्ग प्रकल्पांच्या सर्वेक्षणास मंजुरी देण्यात आली आहे. नाशिक-साईनगर शिर्डी, पुणे-अहिल्यानगर नवीन दुहेरी ट्रॅक आणि साईनगर शिर्डी-पुणतांबा दरम्यान नवीन दुहेरी ट्रॅक अशा तीन रेल्वे प्रकल्पांसाठी केंद्राकडून सर्वेक्षणास मान्यता देण्यात आली आहे. खरंतर या तिन्ही … Read more

महानगरपालिका राबवणार ‘फ्लेक्समुक्त अहिल्यानगर’ अभियान; फलक लावणारे व फोटो असणाऱ्यांवरही गुन्हे दाखल करणार : आयुक्त यशवंत डांगे

Ahilyanagar News : शहराचे विद्रुपीकरण टाळण्यासाठी महानगरपालिकेने फ्लेक्समुक्त अहिल्यानगर अभियान हाती घेतले आहे. या अभियानात नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे. शहरात फ्लेक्स लावण्यास अटकाव करण्यासाठी प्रभागस्तरावर समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. फलक लावणाऱ्या व्यक्ती, संस्थांसह फलकांवर ज्याचे फोटो असतील, त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा आयुक्त … Read more

बंगाल चौक परिसरात सार्वजनिक ठिकाणी जनावरे बांधणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल

अहिल्यानगर – बंगाल चौकी परिसरात बस स्टॉपच्या शेडमध्ये, रस्त्यावर सार्वजानिक ठिकाणी सातत्याने जनावरे बांधणाऱ्या, महानगरपालिकेच्या दंडात्मक कारवाईला न जुमानता वारंवार रस्त्यावर सार्वजानिक ठिकाणी जनावरे बांधणाऱ्या जनावराच्या मालकावर महानगरपालिकेने अखेर गुन्हा दाखल केला आहे. बंटी श्रीनिवास वायकर (राहणार – बंगाल चौक) असे त्याचे नाव आहे. रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणे जनावरे बांधणाऱ्या जनावराच्या मालकावर यापुढे अशाच प्रकारे गुन्हे … Read more