अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ९० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६९ हजार ४७५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ११७ ने वाढ … Read more

जीपची टेम्पोला धडक; सहा जण जखमी

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- जीपवरील चालकाचा ताबा सुटल्याने जीपची टेम्पोला जोराची धडक बसल्याने जीपमधील असलेले सहा जण जखमी झाले आहेत. दरम्यान हा अपघात शनिवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा फाटा येथे नाशिक पुणे महामार्गावर घडला. याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक पुणे महामार्गावर जीपने (एम.एच. १६ ए.जी. ६८९२) प्रवास … Read more

मध्यस्ती करणे पडली महागात; कुटुंबियांना बेदम मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :-शेतबांधावरून मध्यस्ती केल्याच्या कारणावरून एकाच कुटुंबातील चौघांना फायटर व बाबूने बेदम मारहाण केली. हि घटना मंगळवारी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील निमज येथे घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, पोपट कासार हे मुलीला घरी घेऊन जात असताना १४ जणांच्या जमावाने त्यांना अडवून शेतबांधाच्या भांडणात मध्यस्थी केल्याच्या कारणावरून वाद … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ठिकाणी बिबटया मृतावस्थेत आढळला

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील मातापूर चौकी शिवारात शुक्रवारी सकाळी नर जातीचा बिबटया मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृतावस्थेत आढळलेल्या नर जातीच्या बिबटयाचा मृत्यू कशामुळे झाला? याचे कारण समजू शकले नाही.सकाळी हा प्रकार स्थानिक नागरिकाच्या लक्षात येताच घडलेल्या घटनेची माहिती वनधिकाऱ्यास देण्यात आली. वनसंरक्षक गाढे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल विकास … Read more

एक वर्षाचा कालावधीही लोटला नाही, तोच ‘हा’ रस्ता झाला खराब !

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील नरसाळी ते देवळाली प्रवरा या रस्त्याचे काम होवून एक वर्षही झाले नाही, तोच हा रस्ता पूर्णपणे उखडला असून या रस्त्याचे काम तातडीने करण्यात आले नाही तर संबधित अधिकाऱ्यांना घेराव घालण्यात येईल, असा इशारा टॅक्सी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुनिल मुथा यांनी दिला आहे. प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात मुथा यांनी … Read more

कावळ्याचा मृत्यू झाल्याने खळबळ, रिपोर्ट येताच..

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- संगमनेर पठारातील घारगावमध्ये मंगळवारी कावळ्याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. तपासणीसाठी नमुने भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठवले होते. शुक्रवारी घारगावचा १० किलोमीटर परिसर अलर्ट झोन घोषित करण्यात आला असतानाच अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे अधिकारी व ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला. बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर कावळा मृतावस्थेत आढळल्याने पंचायत समितीच्या पशुधन विभागाने उपाययोजना … Read more

थकीत वेतन मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :-नेवासा नगरपंचायतचे पाणीपुरवठा कर्मचारी, सफाई कर्मचारी व कार्यालयीन कर्मचारी यांचे चार महिन्याचे वेतन थकीत असून ते मिळावे या मागणीचे निवेदन अखिल महाराष्ट्र सफाई कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. वेतन दि. २४ जानेवारी पर्यंत न दिल्यास दि. २५ जानेवारी रोजी नगरपंचायत कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर बहिरु … Read more

पालकमंत्री हसन मुश्रीफ तीन दिवसांच्या जिल्हा दौर्‍यावर !

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :-राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे जिल्हा दौर्‍यावर येत असून त्यांच्या कार्यक्रमांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. रविवार, दिनांक २४ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता खासदार शरदचंद्रजी पवार यांच्यासमवेत मुंबईहून हेलिकॉप्टरने भंडारदराकडे प्रयाण. सकाळी ९-४५ वाजता यश रिसोर्ट, शेंडी, भंडारदरा येथे आगमन व राखीव. सकाळी १०-३० ते दुपारी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या तालुक्यात कांदा @2600 !

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत २२ जानेवारी रोजी ४ हजार २२६ कांदा गोण्यांची आवक झाली असून एक नंबर कांद्याला २४००ते२६००, दोन नंबर कांदा १३५०ते२३५०तर तीन नंबर कांदा ७००ते१३००असा भाव मिळाला आहे. गोल्टी कांदा १५००ते२१००तर जोड कांदा २००ते६००असा भाव निघाला आहे,अशी माहिती सचिव उध्दव देवकर यांनी दिली. अहमदनगर Live24 च्या … Read more

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरातच हवे

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :-प्रदेशाध्यक्षपद घ्यायला कोणी तयार नव्हते. त्या वेळी बाळासाहेब थोरात यांनी जबाबदारी स्वीकारली व काँग्रेसचे ४४ आमदार निवडून आणले. परिणामी, आज आपण सत्तेत आहोत. म्हणून थोरातच प्रदेशाध्यक्षपदी राहिले पाहिजेत. पुढच्या वेळी आपले सरकार बनवल्याशिवाय ते राहणार नाहीत, अशी जाहीर भूमिका महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी मांडली. महाराष्ट्र प्रदेश महिला … Read more

दुर्दैवी ! घराची भिंत कोसळून एकजण ठार

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :-श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगाव येथील प्रगतिशील शेतकरी व ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब नारायण ताके यांच्या अंगावर घराची भिंत कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान हि दुर्दैवी घटना शुक्रवारी दुपारी 3 वाजता घडली असल्याचे समजते आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, घराच्या दुरूस्तीचे काम सुरू असताना भिंत त्यांच्या अंगावर पडल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू … Read more

जिल्हा बँक निवडणुकीसाठी एवढे उमेदवारी अर्ज दाखल

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :-शुक्रवारी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी 21 उमेदवारांचे 68 अर्ज दाखल झाले असून बँकेच्या संचालक मंडळासाठी आतापर्यंत 106 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. तर 644 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज विकत नेलेले आहेत. दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवार शेवट दिवस असल्याने उमेदवारांची मोठी गर्दी होणार आहे. दरम्यान शुक्रवारी दाखल अर्जामध्ये पाथर्डीच्या आ. … Read more

नौकरीच्या आमिषाने नायब तहसिलदारास लाखोंना गंडा

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ म्हणजेचज महावितरण कार्यालयात मुलाला नोकरी लावून देतो असे अमिष दाखवून कोपरगावच्या महिला नायब तहसीलदारास राहुरी तालुक्यातील मुसळवाडीच्या तरूणाने दीड लाखांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी कोपरगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मनिषा प्रभाकर कुलकर्णी (रा. नोकरी रा . गुलमोहोर कॉलनी, … Read more

या ठिकाणी बिबट्या आढळला मृतावस्थेत

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात बिबट्याची दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. दरम्यान अनेकदा बिबट्या शिकारीच्या शोधात असताना मृत झालेला आहे. असाच काहीसा प्रकार श्रीरामपूर तालुक्यात घडला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव परिसरातील मातापूर रेल्वे चौकी येथे दीड वर्षे वयाच्या मादी बिबट्याचा अनैसर्गीक मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी … Read more

संगमनेर परिसरात वाळू ट्रॅक्टर पकडला

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-संगमनेर परिसरात वाळू तस्करी सुरूच असुन काल संगमनेर शहर पोलिसांनी पहाटे ४.३० च्या सुमारास संगमनेर-नाशिक रस्त्यावर शेतकरी पेट्रोल पंपासमोर छापा टाकून महिंद्रा कंपनीचा लाल ट्रॅक्टर व त्याला जोडलेली लाल रंगाची ट्रॉली त्यात चोरीची शासकीय वाळू पकडली. पोकॉ ज्ञानेश्‍वर सोनवणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी मोहन भिमाजी जेडगुले, रा. सायखिंडी फाटा, संगमनेर, … Read more

बांधावरील गावात पेटविल्याने महिलेच्या डोक्यात कुऱ्हाडीचा वार

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-नेवासा तालुक्यातील चांदा शिवारात सामाईक शेतीच्या बांधावरील गवत काट्या पेटविल्याच्या कारणावरून छाया बाबासाहेब रासकर, वय ४० रा. चांदा या शेतकरी महिलेस ५ जणांनी शिवीगाळ करुन काठीने पायावर, मांडीवर मारून जखमी केले. तर डोक्यात कुऱ्हाड मारुन डोके फोडले. शिवीगाळ करून छाया रासकर या महिलेस जिवे ठार मारण्याची धमकी दिली. जखमी … Read more

तरुणीचा विनयभंग करून सासूला मारहाण !

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-संगमनेर शहरातील अकोले नाका परिसरात राहणारी एक १९ वर्षाची विवाहित तरुणी दुपारी ४ च्या सुमारास घरात एकटी असताना तेथे नात्यातील आरोपी दातीर बाबामिया शेख, समीर दातीर शेख, अशोक शौकत शेख, मलेखा रमजान पठाण, सर्व रा. मदिनानगर, संगमनेर हे आले व त्यांनी तरुणीला तुझी सासू व पती हे आम्हाला तुम्ही … Read more

श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकपदी यांची नियुक्ती

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2021 :-श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनला ४ वर्षात ४ पोलीस निरीक्षक बदलून गेले. श्रीरामपुरात आता नव्याने एसपी मनोज पाटील यांच्या आदेशाने शहर पोलीस स्टेशनला पोलिस निरीक्षक म्हणुन संजय दत्तात्रय सानप यांची नेमणुक करण्यात आली आहे. रात्रीच तसा आदेश एसपी कार्यालयातून जारी करण्यात आला असून पोनि संजय सानप यांनी रात्रीच शहर पोलीस … Read more