उधार दिलेले पैसे मागितल्याच्या रागातून एकास मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :-उसने दिलेले पैसे परत मागीतल्याचा राग येऊन आरोपी विजय पांडुरंग वाघ, निलेश विजय वाघ, गणेश विजय वाघ, ससतीश पांडुरंग वाघ यांनी फिर्यादी रवींद्र माधव वाघ (वय-४०) यांना शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी रवींद्र वाघ यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. … Read more

ग्रामपंचायत निवडणूक : १३ हजार १९४ उमेदवार रिंगणात ९ हजार १० जणांची माघार तर ४६ ग्रामपंचायती बिनविरोध

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :- जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या दिशानिर्देशात सुरु आहे. अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीत ९ हजार १० इच्छूकांनी आपले अर्ज माघारी घेतले. प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात आता १३ हजार १९४ उमेदवार मतदारांचा कौल आजमावणार आहेत. दरम्यान ७६७ पैकी जिल्ह्यातील ४६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. राज्य … Read more

14 जागा बिनविरोध तर एक जागा रिक्त

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- नेवासा तालुक्यातील खरवंडी ग्रामस्थांच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे खरवंडी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. 15 पैकी 14 जागांवर उमेदवार शिल्लक राहिल्याने या सर्व 14 जागा बिनविरोध निवडून आल्या तर एक जागा रिक्त राहिली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, खरवंडी येथील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी अर्ज सादर करण्यापूर्वी … Read more

महसूलमंत्र्यांच्या तालुक्यातील चार ग्रामपंचायती बिनविरोध

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :-संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणूकीत एकूण २ हजार ६०६ उमेदवारांपैकी तब्बल ९३२ जणांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे ९४ ग्रामपंचायतींच्या १९२ जागा बिनविरोध झाल्या आहेत. अपेक्षेप्रमाणे त्यातील चार ग्रामपंचायतींनी बिनविरोधचा झेंडा रोवला असून आता उर्वरीत 287 प्रभागातील ६९६ जागांसाठी १ हजार ४८२ उमेदवारांनी निवडणुकीच्या मैदानात उभे आहे. ग्रामपातळीवरील विधानसभा … Read more

परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती द्या; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :-देशातून अद्याप कोरोनाचा धोका टळलेला नाही आहे, यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. दरम्यान जिल्ह्यातील कोरोनाला हद्दपार करण्यासाठी प्रशासनाने जिल्हापातळीवर अनेक पाऊले उचलली आहे. यातच कोरोनाच्या पार्शवभूमीवर जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे. युरोप अथवा इतर देशातून प्रवास करुन जिल्ह्यात आलेल्या नागरिकांची माहिती असेल तर ती जिल्हा प्रशासन अथवा … Read more

आंतरजातीय विवाह केल्याने छळ; तरुणीची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- संगमनेर शहरात लालतारा हौसिंग सोसायटी येथे सासरी नांदत असलेली विवाहीत तरूणी वैष्णवी राहुल घोडेकर, (वय- २१) हिला सासरच्या लोकांनी तू तुझ्या आईवडीलांकडून ३० हजार रूपये घेवुन ये अशी वेळोवेळी पैशांची मागणी करून ते पैसे न आणल्याने नवरा तसेच सासू- सासरे यांनी शारिरीक व मानसिक छळ करून पैशांची मागणी … Read more

नामांतराचा वाद… मनसे महसूलमंत्री थोरातांना १०,००० पत्र पाठवणार

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- हिंदू धर्माचे दैवत छत्रपती संभाजी महाराज हे बाळासाहेब थोरातांच्या स्मरणात रहावे यासाठी व औरंगाबाद जिल्ह्यचे नाव बदलून संभाजी महाराज नगर करावे ह्या मागणीला केलेला विरोध बाळासाहेब थोरात यांनी मागे घ्यावा त्यासाठी मनसेच्या वतीने संभाजीनगर चे आमचे जिल्हा अध्यक्ष सुहास दशरते यानी जो 26 जानेवारी पर्यंत नामांतराचा अल्तिमेटम दिला. … Read more

9 जागांसाठी 9 च उमेदवारी अर्ज; निवडणूक बिनविरोध

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा धुराळा उडाला आहे. अनेक ठिकाणी निवडणूक बिनविरोधही झाल्या आहेत. त्यातच अनेक ठिकाणी निवडणूक या होणारच आहे. त्यातच श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली आहे. अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी दोन उमेदवारांनी माघार घेतल्याने सर्वपक्षीय लोकसेवा महाविकास आघाडीचे 9 जागांसाठी 9 च उमेदवारी अर्ज राहिल्याने अखेर … Read more

अहमदनगरकरांसाठी दिलासादायक बातमी : 24 तासांत वाढले फक्त ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १५१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६७ हजार ५९४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६२ ने वाढ … Read more

धक्कादायक ! दुचाकीवर चाललेल्या जोडप्यावर बिबट्याचा हल्ला

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- अकोले तालुक्यातील ढोकरी शिवारात दुचाकीवर चाललेल्या एका दाम्पत्यावर बिबट्यांच्या जोडीने हल्ला चढविला. दरम्यान सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हि धक्कादायक घटना घडली. बिबट्यांच्या या हल्ल्यात दुचाकीवर मागे बसलेली महिला जखमी झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, कैलास माधव पुंडे व मनीषा कैलास पुंडे हे दांपत्य ढोकरीहून अकोलेकडे … Read more

‘या’ तालुक्यातील सहा ग्रामपंचायती बिनविरोध

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :-राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा धुराळा उडाला आहे. अनेक ठिकाणी निवडणूक बिनविरोधही झाल्या आहेत. तर काही ठिकाणी गावकऱ्यांमध्ये एकी होत नसल्याने निवडणूक होणारच आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात काही ग्रामपंचायती बिनविरोध झाला आहेत. नेवासा तालुक्यातील 59 ग्रामपंचायतीच्या 591 जागांसाठीच्या अर्ज माघारीच्या कालच्या शेवटच्या दिवशी सहा ग्रामपंचायती … Read more

पोलिसांच्या वादग्रस्त ऑडिओ क्लीपची सुनावणी ‘या’ दिवशी होणार

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- नेवासा पोलीस ठाण्याचे कर्मचारी संभाजी गर्जे आणि तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. राठोड यांच्या वाद्ग्रस्त संभाषणाची ऑडिओ क्लीप सोशल मिडियावर व्हायरल झाली होती. या वाद्ग्रस्त संभाषणाची सत्यता पडताळणीसाठी तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांना स्वत: च्या आवाजाचा नमुना देण्याचा आदेश जिल्हा न्यायालयाने दिले होते. या आदेशाला … Read more

बिनविरोधचा डंका…५२ पैकी ११ ग्रामपंचायती बिनविरोध

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :-राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा धुराळा उडाला आहे. अनेक ठिकाणी निवडणूक बिनविरोधही झाल्या आहेत. तर काही ठिकाणी गावकऱ्यांमध्ये एकी होत नसल्याने निवडणूक होणारच आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच जिल्ह्यातील अकोले मधून एक महत्वाची माहिती समोर येत आहे. अकोले तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींपैकी मोग्रस, शेरणखेल, उंचखडक खुर्द, म्हाळादेवी, मनोहरपूर, वाघापूर, निंब्रळ, … Read more

मोबाईल चोरी करणारी दोघे मुद्देमालासह जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :-दुकानातून मोबाईल चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना मुद्देमालासह अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. मोबाईल चोरी प्रकरणी मोईन मोहम्मद पठाण (वय 21 रा. डावखररोड बसस्थानक मागे, ता. श्रीरामपूर), बंटी अमर सिंग (वय 24 मूळ रा. धानुकापूर जि. भिंड, राज्य मध्यप्रदेश, ह. रा खैरेचाळ … Read more

गडाखांचा दबदबा; पंधरा वर्षांनंतर हि ग्रामपंचायत झाली बिनविरोध

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- शनिशिंगणापूर येथे असलेल्या दोन राजकीय गटामुळे देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतीमध्ये नेहमीच राजकीय आखाडा रंगायचा. याचा विकास कामांवर परिणाम होत होता. मात्र यंदाच्या वर्षी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख व माजी विश्वस्त बापूसाहेब शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिशिंगणापूर ग्रामपंचायत पंधरा वर्षांनंतर बिनविरोध झाली आहे. मंत्री गडाख यांनी शनैश्वर देवस्थानसाठी गावातील मूळ रहिवासीच … Read more

बिनविरोधला पुढाऱ्यांनी केला विरोध.. निवडणूक तर होणारच

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-राज्य निवडणूक आयोगाने १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. १५ जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. त्यासाठी २३ डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. आज अर्ज माघारी घेण्याचा दिवस होता. दरम्यान यंदाच्या निवडणुकीत बिनविरोध निवडणुकीचा डंका वाजला मात्र बिनविरोधची घोषणा केवळ पोकळ ठरली. नगर तालुक्यात ‘बिनविरोधच्या आवाहन … Read more

लोणी बुद्रूक ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध सलग २५ वर्षांची प्रथा कायम

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांनी घालून दिलेली परंपरा कायम राखत लोणी बुद्रुक ग्रामस्थांनी माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सलग २५ वर्षे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याची प्रथा कायम राखून आदर्श निर्माण केला आहे. लोणी बुद्रुक ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल … Read more

धक्कादायक ! केस मागे घे म्हणत महिलेस बलात्काराची धमकी

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा परिसरात २.३० च्या सुमारास एक ३३ वर्षाची तरुण महिला तिच्या घरासमोर धुणे घुत असताना तेथे आरोपी सुनील जनार्दन खैरे, दीपक विनय पाटील हे आले व ते महिलेस म्हणाले की, तू मागे आमच्यावर दाखल केलेला गुन्हा मागे घे, असे म्हणत महिलेस धरुन तिच्या अंगावरील गाऊन फाडून … Read more