पोलिसांच्या मदतीसाठी ‘तिसरा डोळा’; गुन्हेगारांवर ठेवणार वॉच

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-काही केल्या जिल्ह्यातील चोऱ्या, दरोडे. लुटमारीच्या घटना कमी होताना दिसत नाहीये.जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी मुळे नागरिकांसह बाहेर प्रवास करणाऱ्यांमध्ये देखील दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच श्रीरामपूर येथील पोलीस प्रशासनाला शहर परिसरातील गुन्हेगारी आटोक्यात ठेवण्यात काहीअंशी यश मिळाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विविध गुन्हेगारींचे प्रमाण कमी झाले आहे. शहरात … Read more

१७ जानेवारीला पल्स पोलिओ रविवार जिल्ह्यातील ४ लाखाहून अधिक बालकांना मिळणार पोलिओ लस

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-जिल्हयातील ० ते ५ वयोगटातील सर्व बालकांना १७ जानेवारी २०२१ रोजी पोलिओ लसीकरण करण्यात येणार आहे. त्या संदर्भातील पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी आज घेतला. एकही बालक लसिकरणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी मोबाईल टीमच्या माध्यमातून लसीकरण नियोजन करावे, … Read more

उपसरपंच असल्याचे भासवणाऱ्या त्या भामट्यावर कारवाई करा

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. एकीकडे निवडणुकीचा धुराळा उडाला असताना मात्र नेवासा तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नेवासे तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे ग्रामपंचायतच्या विद्यमान उपसरपंच चंद्रकला भगवान गंगावणे यांच्या दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यात तसेच इतरत्र कुणीतरी अज्ञातव्यक्ती उपसरपंच असल्याचे सांगत फसवणूकी करत असल्याबाबत निदर्शनास आले आहे. याबाबत … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १४२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६७ हजार ४४३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९९ ने वाढ … Read more

बिबट्याशी झुंज देत आईने वाचवला बाळाचा जीव ! वाचा अहमदनगर जिल्ह्यातील थरारक प्रसंग !

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :- आपला व आपल्या बाळाचा जीव घेण्यासाठी समोर बिबट्या उभा असतानाही धाडसाने त्यास पिटाळून लावण्याचा थरार अकोले तालुक्यातील शेंडी (भंडारदरा) येथील रहिवासी महिला रंजना सुनील भांगरे यांनी केला. आपल्या जीवितास पर्वा न करताच बाळाच्या सुरक्षिता राखण्यात बिबट्यावरच चाल करून जाणाऱ्या एका आईच्या मातृत्वाची येथे प्रचिती आली. सायंकाळी सहाच्या सुमारास … Read more

बाळासाहेब थोरात म्हणाले सन्मान दिल्यास महाविकास आघाडीचा विचार होईल, अन्यथा …

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :- आगामी निवडणुका पक्ष संपूर्ण ताकदीने लढवेल. स्थानिक पातळीवर लोकप्रतिनिधींनी काँग्रेसला योग्य तो सन्मान दिल्यास महाविकास आघाडीचा विचार होईल, अन्यथा स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर थोरात यांनी आमदार सुधीर तांबे, आमदार लहू कानडे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, … Read more

मुस्लिम कब्रस्तानच्या खोलीत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :- राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील अशपाक गुलजार पठाण (वय २१) याने शुक्रवारी दुपारी गळफास घेऊन मामाच्या घरात आत्महत्या केली. सदर मृत युवक टाकळीमिया येथील कारवाडी परिसरात आपल्या आईसमवेत राहत होता. दररोजच्या प्रमाणे मुलगा घरी आला नाही म्हणून त्याचा गावात शोध घेत असता मुस्लिम कब्रस्तानच्या खोलीत अश्फाक याने गळ्याला गळफास … Read more

सरकारी बाबूचे घर फोडून चोरटयांनी लाखाचा ऐवज केला लंपास

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात चोरीच्या घटना सुरूच आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये कमालीची दहशत पसरली आहे. नुकतेच अकोले तालूक्यात एका सरकारी कर्मचाऱ्याच्या घरी चोरीची घटना घडली आहे. अकोले तालुक्यातील राजूर येथील कृषी सहायक विकास प्रकाश कापसे यांचे बंद घर फोडून करून चोरट्यांनी लाखाचा ऐवज लंपास केला. ५२ हजारांची रोख रक्कम व … Read more

भरदिवसा शेतकऱ्याच्या घरावर चोरट्याचा डल्ला

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-शेतीच्या कामासाठी घर बंद करून शेतात गेलेल्या शेतकऱ्याच्या घरावर चोरटयांनी डल्ला मारला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, गळनिंब येथील अनिल बबन शेळके (वय 38) यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, मी, पत्नी, आई व वडील 1 जानेवारी रोजी सकाळी सात वाजता घरापासून दीड किमी … Read more

साईंच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला

अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :- कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शिर्डी येथील साई मंदिर बंद ठेवण्यात आले होते. मात्र काही दिवसांपूर्वी हे मंदिर पुन्हा एकदा भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. दरम्यान साईंच्या दर्शनासाठी वेगवेगळ्या ठिकाणावरून भाविक शिर्डी मध्ये दाखल होत आहे. असेच साईंच्या दर्शनासाठी येणाऱ्या काही भाविकांवर काळाचा घाला घातला असल्याची धक्कादायक घटना … Read more

बांधकाम सुरु असलेल्या इमारतीवरून पडून मजुराचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :-बांधकाम सुरु असलेल्या इमारतीवरून पडून एका मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शिर्डी मध्ये घडली आहे. यामुळे मोठी हळहळ व्यक्त केली जाऊ लागली आहे. दरम्यान याबाबत सविस्तर माहिती अशी कि, शिर्डी शहरात महाराष्ट्र शासनाच्या पोलीस वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून जवळपास 26 कोटी रुपये खर्च करून ऑफिस व पोलीस निवासस्थान अशा जवळपास … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोविस तासांत वाढले फक्त इतकेच रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ७५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६७ हजार ३०१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८८ ने वाढ … Read more

या तालुक्यात आढळली बिबट्याची पिल्ले

अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने चांगलीच दहशत माजवली आहे. यामुळे सर्वसामन्यांमध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे. त्यातच पुन्हा एकदा बिबट्याने हजेरी लावली आहे. अकोले तालुक्यातील जामगाव शिवारात दोन बिबटे आपल्या पिलांसह वास्तव्यास आहेत. या दोन पिलांसह आठ दिवसांपूर्वी पुन्हा यातील एका मादीने दोन बछड्यांना जन्म दिला आहे. हे … Read more

अल्पवयीन मुलावर अत्याचार करणाऱ्या आरोपीस पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :- संगमनेर शहरातील एका उपनगरातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलावर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी पिडीत मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून अल्ताफ उर्फ लाला असिफ शेख याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान अल्पवयीन मुलाला मारहाण, शिवीगाळ करुन त्याच्यावर अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दाखल … Read more

रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या विरोधात ‘रस्ता रोको’ आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :- कोल्हार-घोटी रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या विरोधात सुगाव बुद्रुक फाट्यावर कोल्हार-घोटी राज्यमार्गावर सुगाव, मनोहरपूर, कळस ग्रामस्थांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. जोपर्यत अकोले संगमनेर महामार्गाचे कळस पर्यंतचे काम पूर्ण होत नाही तो पर्यंत पुढील काम होऊ देणार नसल्याचा इशारा राज्य सचिव विजयराव वाकचौरे, संजय वाकचौरे यांनी दिला आहे. दरम्यान … Read more

मुंबईहून मुळा धरणापर्यंत सी-प्लेन सेवा सुरू होणार !

अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :- महाराष्ट्रात मुंबई ते शिर्डीसह लोणावळा आणि गणपतीपुळे यांसारख्या प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर सीप्लेनही सेवा सुरु केली जाणार आहे. त्यासाठी जलपरिवहन मंत्रालयाने जलवाहतूक सेवेसाठी कंपन्यांचे प्रस्ताव मागवले आहेत. ही सेवा झाल्यास भक्तांना साईदर्शनासह या हवाई प्रवासाचा वेगळा आनंद मिळणार आहे. नुकतेच अहमदाबाद ते केवडिया सीप्लेनमधून प्रवास सुरू असून आता महाराष्ट्रासह देशभरात … Read more

मागील चार महिन्यात राज्याच्या महसुलात तब्बल 367 कोटीची वाढ

अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :- कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रावर मंदीचे सावट असल्याने राज्याची अर्थव्यवस्थाही कोलडमली होती. बाजारातील मंदी व अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ लक्षात घेऊन महसूल विभागाने बांधकाम क्षेत्राला व अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी मुद्रांक शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा चांगला फायदा झाला असून, बांधकाम क्षेत्रात तेजी येऊन घर खरेदी करणाऱ्यांनाही मोठा … Read more

महसूलमंत्र्यांच्या तालुक्यातील या तलावाने उन्हाळ्यापूर्वी गाठला तळ

अहमदनगर Live24 टीम, 3 जानेवारी 2021 :- संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील खंदरमाळवाडी गावांतर्गत असलेल्या माहुली येथील यावर्षी तुडूंब भरलेल्या पाझर तलावाने तळ गाठला आहे. यामुळे परिसरातील शेतकर्‍यांमध्ये उन्हाळ्यापूर्वीच चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.माहुली येथील पाझर तलाव हा यंदाच्या पावसाळ्यात तुडूंब भरून वाहत होता. त्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. मात्र, आता तुडूंब भरलेल्या पाझर तलावाने तळ … Read more