दोन गटांत तुंबळ हाणामारी ; एकाला भोकसले

अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :-संगमनेर शहरातील मदिनानगर परिसरात दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. एका गटाशी किरकोळ कारणावरुन वाद घालीत दुसर्‍या गटातील तिघांनी जीवघेणा हल्ला चढवला.  या हल्ल्यात चाकूसारख्या प्राणघातक शस्त्राचा वापर झाल्याने एक तरुण अत्यवस्थ झाला असून त्याला पुढील उपचारांसाठी नाशिकला हलविण्यात आले आहे. याप्रकरणी शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत … Read more

हत्याराचा धाक दाखवत वाहनचालकास लुटले

अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :-कोपरगाव शहरात चार ते पाच अज्ञात व्यक्तींनी वाहन चालकास लुटल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, कोपरगाव शहरातील संजयनगर भागातील भाजी मार्केट परिसरात हत्याराचा धाक दाखवत एका वाहनचालकास लुटले. यामध्ये त्याच्याजवळील १० हजार रुपये किमतीचा मोबाईल व २०० रुपये रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले आहेत. ही … Read more

कोरोना ! तीन दिवसात सहा कोरोनाबाधितांची भर

अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :-जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा वेग काहीसा मंदावला आहे. त्यातच जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट देखील चांगलाच सुधारला आहे. दरम्यान नेवासा तालुक्यात तीन दिवसांत 6 संक्रमित आढळून आले. काल गुरुवारी तालुक्यात एकही संक्रमित आढळून आला नाही. तालुक्यातील एकूण करोना संक्रमितांची संख्या 2921 झाली आहे. मंगळावरी सोनई, घोडेगाव, भेंडा खुर्द येथे प्रत्येकी एक असे … Read more

नादुरुस्त रस्त्यावरून होणारी वाहतूक ठरतेय जीवघेणी

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यातील अनेक रस्ते अक्षरश वाहतुकीसाठी जीवघेणे ठरत आहे. नादुरुस्त रस्त्यांमुळे दरदिवशी वाहनांचे अपघात होण्याचे व या अपघातात मरण पावणाऱ्यांची संख्या देखील वाढते आहे. मात्र तरी देखील प्रशासन या विषयाबाबत गंभीर नसलेले दिसून येत आहे. नुकतेच नेवासा ते खडका फाटा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या रस्त्याची त्वरित … Read more

५२ ग्रामपंचायतीसाठी अकराशेहून अधिक उमेदवारांनी अर्ज केले दाखल

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- राज्य निवडणूक आयोगाने १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. १५ जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. त्यासाठी २३ डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. दरम्यान अकोले तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतच्या निवडणुकीत आज शेवटच्या दिवशी तब्बल ७५७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असुन ५२ ग्रामपंचायतीत एकुण ११५३ उमेदवारांनी अर्ज … Read more

ज्या कारणाने तु हा निर्णय घेतला असेल,त्याला शिक्षा नक्कीच मिळेल,अगदी कुणी रक्ताचं असलं तरी…

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :-  प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी गडाख काही दिवसांपूर्वी अहमदनगरमधील त्यांच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळल्या होत्या. गौरी गडाख यांचा मृतदेह राहत्या घरात आढळल्याची घटना नगर जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली. गौरी यांच्या आत्महत्येने जिल्ह्यात जिल्ह्यात सन्नाटा पसरला होता, गौरी गडाख या माजी खासदार आणि साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा, जलसंधारण मंत्री … Read more

कोरोनाबाधितांचा आकडा पोहचला सहा हजारांच्या जवळ

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- शहरी रुग्णसंख्येत झालेली मोठी घट आणि ग्रामीणभागातही होत असलेली माघार यामुळे संगमनेर तालुक्यात दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान गेल्या 24 तासात तालुक्याच्या रुग्णसंख्येत अठरा रुग्णांची भर पडून एकूण संख्या आता 5 हजार 994 वर पोहोचली आहे. सप्टेंबरनंतर नोव्हेंबरमध्ये उच्चांक गाठणार्‍या कोविडच्या रुग्णसंख्येत गेल्या पंधरवड्यापासून मोठी घट झाल्याचे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोविस तासांत वाढले फक्त इतकेच रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात आज ११५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६६ हजार ९७० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८४ ने वाढ … Read more

नायलॉन मांजा विकणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :-  नववर्षाला आता केवळ काही तसंच अवधी शिल्लक राहिला आहे. तसेच जानेवारी मध्ये संक्रांतीचा सण अत्यंत उत्साहात साजरा केला जात असतो. दरम्यान यंदाच्या वर्षी नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान श्रीरामपूर मध्ये मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर शहर परिसरात पतंग आणि मांजा विक्रीची दुकाने मोठ्या प्रमाणात सजली आहेत. … Read more

… आणि रस्त्यावरच कारने घेतला पेट,नंतर झाले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- कर्जत राशीन रस्त्यावर रात्री राशीहून कर्जतकडे येणाऱ्या स्विफ्ट कार क्रमांक एम एच 11 बी व्ही 0 293 या गाडीने अचानक पेट घेतला. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे कारचालक सुदैवाने बचावला. यावेळी गाडी चालवत असणारे प्रशांत पांडुरंग जमदाडे (रा. राशीन, ता. कर्जत) यांनी तात्काळ राशिन पोलिस स्टेशनमध्ये याबाबत पोलिस कॉन्स्टेबल गणेश … Read more

डॉ.सुजय विखे पाटील मित्र मंडळाच्‍या वतीने ऊस तोडणी कामगारांना उबदार कपड्यांचे वाटप

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्‍या पुण्‍यतिथीच्‍या निमित्‍ताने शिर्डी नगरपंचायत आणि डॉ.सुजय विखे पाटील मित्र मंडळाच्‍या वतीने ऊस तोडणी कामगारांना उबदार कपड्यांचे वाटप करण्‍यात आले. नगरपंचायतीमध्‍ये पद्मभूषण डॉ.विखे पाटील यांच्‍या प्रमिमेचे पुजन करुन अभिवादन करण्‍यात आले. याप्रसंगी नगराध्‍यक्ष शिवाजीराव गोंदकर, माजी नगराध्‍यक्ष कैलासबापू कोते, भाजपाचे तालुका अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चाळीस वर्षीय शेतकऱ्याचा खून

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- नेवासे तालुक्यातील गोधेगाव येथे शेतीच्या बांधाच्या वादातून दत्तात्रय लक्ष्मण ठोंबरे या चाळीस वर्षीय शेतकऱ्याचा खून झाला. ही घटना मंगळवारी संध्याकाळी साडेसहा वाजता घडली. पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. ठोंबरे व महेश भिंगारदे यांची घरे व जमिनी शेजारी आहेत. दोन दिवसांपूर्वी भिंगारदे यांच्या उसाला तोड आली. अनेक … Read more

वाहतूक पोलीस पथकाने वसूल केले सव्वा कोटी

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- वाहतूक नियमांचे पालन न करणाऱ्या बेशिस्त वाहनचालक यांच्यावर वाहतूक शाखेच्या पोलीस पथकाने दंडात्मक कारवाई केली आहे. यामध्ये अनेक वाहनावर कारवाई करत कोट्यवधींचा दंड वसूल करण्यात आला आहे. याबाबत करंजीघाट येथील महामार्ग पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर या ११ महिन्यांच्या कालावधीमध्ये कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गासह … Read more

भक्तांसाठी खुशखबर ! साई मंदिर 31 डिसेंबरला खुलं राहणार

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :-शिर्डी येथील साईबाबा मंदिरात २५ , २६ व २७ डिसेंबरला दर्शनार्थी भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यातच नववर्षाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ३१ डिसेंबरला साई मंदिर रात्रभर खुले ठेवण्याचा निर्णय संस्थानने घेतला आहे. दरम्यान कोरोना विषाणूचा संसर्ग अद्यापही संपलेला नसून याच पार्श्वभूमीवर आता राज्यातील मंदिरे सरकारने घालून दिलेल्या नियमावलीनुसार सुरु … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ११३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६६ हजार ८५५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १६८ ने वाढ … Read more

दिप चव्हाण यांची राजगुरू नगरपरिषद निवडणुकीच्या निरीक्षक पदी निवड म्हणजे निष्ठेचा सन्मान – मयूर पाटोळे

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :-अहमदनगर शहर काँग्रेसचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ नेते दिप चव्हाण यांची राजगुरू नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्यावतीने निरीक्षक म्हणून जबाबदारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी टाकली आहे, त्याबद्दल अहमदनगर शहर युवक कांग्रेस च्या वतीने दीप चव्हाण यांचा अहमदनगर महानगरपालिका येथे सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले, दिप … Read more

कौटुंबिक वादातून एकाच्या डोक्यात कुर्‍हाडीचा घाव घालून निर्घृण खून

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :-शेतबांधाच्या रस्त्यावरुन दोन शेतकरी कुटुंबात झालेल्या वादातून एका चाळीसवर्षीय शेतकर्‍याच्या डोक्यात कुर्‍हाडीचा घाव घालून खून केल्याची घटना घडली आहे. दरम्यान हा धक्कादायक प्रकार नेवासा तालुक्यातील गोधेगाव येथे घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, गोधेगाव शिवारात मयत दत्तात्रय लक्ष्मण ठोंबरे व महेश भिंगारदे यांची शेजारी शेजारी शेतवस्ती व जमिनी … Read more

महिलेच्या पर्समधून चोरट्याने चार तोळ्याचे दागिने लांबवीले

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :-काही केल्या जिल्ह्यातील चोऱ्या, लुटमारीच्या घटनांना रोख लावण्यात पोलिसांना यश येताना दिसत नाहीये.कारण दिवसाढवळ्या होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच संगमनेर शहरातील बसस्थानकामध्ये गर्दीचा फायदा घेऊन प्रवासी महिलेच्या पर्समधून सुमारे चार तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली आहे. दरम्यान या संबंधित महिलेने संगमनेर शहर … Read more