अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले इतके रुग्ण,जाणुन घ्या चोविस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १८१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६६ हजार ५६२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १३४ ने वाढ … Read more

२१ ग्रामपंचायतसाठी तब्बल १२८ उमेदवार रिंगणात उतरले

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :- राज्य निवडणूक आयोगाने १४ हजार २३४ ग्रामपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. १५ जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. त्यासाठी २३ डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतीची रणधुमाळी सुरू झाली असून आज अखेर ५९ ग्रामपंचायती मधून २१ ग्रामपंचायतसाठी तब्बल १२८ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. दरम्यान … Read more

वीजवाहक तारांमुळे शेतकऱ्यांची पिके धोक्यात ; महावितरणकडून दुर्लक्ष

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :- शेतातून वीजवाहक तारा तसेच विजेची टॉवर गेलेली असतात. अनेकदा या वीजवाहक तारांमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागल्याच्या घटना घडलेल्या आहेत. नुकतेच पाथर्डी तालुक्यात अशाच वीजवाहक तारामुळे तब्बल 25 एकर ऊस जाळून खाल झाला आहे. दरम्यान अशीच काहीशी घटना पुन्हा एकदा कर्जत तालुक्यात घडला आहे. कर्जत – कुळधरण -श्रीगोंदा रस्त्यालगतच्या … Read more

धक्कादायक! शिर्डीतील साईंची आरती करण्यासाठी 25 हजारांची मागणी…

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :- कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शिर्डी येथील साई मंदिर बंद ठेवण्यात आले होते. मात्र काही दिवसांपूर्वी हे मंदिर पुन्हा एकदा भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. दरम्यान नवीन वर्ष जवळ येत असल्याने साईंच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ वाढला आहे. परंतु, यातच काही भाविकांना विचित्र अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिल्लीतील … Read more

सरकारी नौकरी लावून देण्याच्या बहाण्याने भामट्याने कोट्यवधींना गंडा घातला

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :- कोरोनामुळे अनेक जण बेकार झाले आहे, तसेच नौकर भरती होत नसल्याने या परिस्थितीचा फायदा घेत अनेक ठिकाणी नौकरी लावून देण्याच्या नावाखाली भामट्यांकडून अनेकांची फसवणूक झाल्याची घटना घडत असतात. अशीच एक घटना घडली आहे. सरकारी नौकरी लावून देण्याच्या आमिषाने पुणे, नगर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेकांना कोटीचा गंडा घालणार्‍या भामट्याला … Read more

सुट्ट्यांमुळे शिर्डीतील साईंचा दरबार भाविकांनी फुलाला

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :- कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शिर्डी येथील साई मंदिर बंद ठेवण्यात आले होते. मात्र काही दिवसांपूर्वी हे मंदिर पुन्हा एकदा भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. दरम्यान नवीन वर्ष जवळ येत असल्याने साईंच्या दर्शनासाठी भाविकांना ओघ वाढला आहे. यातच सलग सुट्ट्या आले असल्याने भाविकांची संख्या सातत्याने वाढत असून गर्दीमुळे … Read more

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 17 जण ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :- गेल्या काही दिवसात जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. यातच जुगार अड्डे वाढले असून दरदिवशी जिल्ह्यात कोठेना कोठे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा पडतच असतो. यातच कोल्हार येथे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला आहे. नाशिक विभाग पोलिसमहासंचालकांच्या पथकाने ही धडक कारवाई केली. यामध्ये17 जणांना पोलिसांनी … Read more

रस्त्याची झाली चाळण; वाहनाबरोबरच नागरिकांची हाडे झाली खिळखिळी

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :- शिर्डी व शिंगणापूर या दोन महत्वाच्या देवस्थानांना जोडण्यासाठी जवळचा रस्ता म्हणून श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव- बेलापूर या रस्त्याचे काम करण्यात आले होते. मात्र या रस्त्याची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळण झाली असून वाहनचालकांना वाहन चालविताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिर्डी व शिंगणापूर या दोन महत्वाच्या देवस्थानांना जोडण्यासाठी जवळचा रस्ता … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ९९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६६ हजार ३८१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १११ ने वाढ … Read more

धक्कादायक ! चक्क दुधाच्या गाडीतून गोवंश मांंसाची तस्करी

अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- राज्यात गोहत्याबंदी कायदा अस्तित्वात आहे. गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करण्यास बंदी असताना संगमनेरात मात्र या कायद्याचा धाक राहिला नसल्याचे चित्र आहे. वाढते कत्तलखाने व गोवंश मांसाची तस्करीमुळे संगमनेर हे महाराष्ट्रातील गोवंश हत्येचे व गोमांस तस्करीचे केंद्र म्हणून कुप्रसिद्ध झाले आहे. दरम्यान संगमनेरात गोवंश तस्करीसाठी नवनवीन फंडे वापरू लागले … Read more

गर्दी ओसरल्याने साईंच्या दरबारातील विक्रेते चिंतेत

अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- शिर्डीत दरवर्षी नाताळाच्या सुट्टयात भाविकांची अलोट गर्दी साईबाबांच्या दर्शनासाठी होत असते.मात्र यंदा करोना संकटामुळे गर्दीवर मोठा परीणाम झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी गर्दी कमी असल्याचे चित्र दिसत आहे. प्रतिदिन बारा हजार भाविकांच्या दर्शनाची व्यवस्था करण्यात येत आहे. दरम्यान करोनाच्या संकटामुळे मंदिर प्रशासनाने नियम व अटी लागू करत साईदर्शनाची … Read more

टाळ्या – थाळ्या वाजूवन संगमनेरकर मोदींना विरोध करणार

अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून देशभर कृषी विधेयक आंदोलनांवरून रान पेटलेले आहे. याचा निषेध म्हणून अनेक ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान दिल्लीच्या किसान आंदोलनाला एक महिना पूर्ण झाला, तरीही केंद्र सरकारने आपला निर्णय बदलला नाही. सरकारच्या धोरणाला विरोध करण्यासाठी रविवारी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात’ … Read more

अवैध धंद्यांवर पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष; नागरिकांमध्ये संतापाची लाट

अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात गुन्हेगारी सुसाट सुटली आहे, कायद्याचे धाक न राहिल्याने अवैध धंदे देखील वाढू लागले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कोपरगाव शहरात अवैध धंदे तेजीत सुरू आहे. पोलिस याकडे जाणूनबुजुन दुर्लक्ष करीत असल्याच्या आरोप नागरिकांनी केला आहे. शहरातील मटक्याच्या पेढ्या जोरात सुरू आहे. याबाबत काही जागरूक नागरिकांनी मटक्याच्या चिठ्ठ्या … Read more

दिलासादायक! साईबाबांच्या शिर्डीतील गुन्हेगारी मुक्तीकडे वाटचाल

अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात लुटमारी, दरोडा, चोऱ्या आदी घटनांमध्ये वाढच होत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळते आहे. दरम्यान वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी पोलीस प्रशासन देखील सक्रिय झाले आहे. नुकतेच शिर्डी मधील गुन्हेगारीचा वाढता आलेख रोखण्यासाठी पोलिसांनी कठोर उपायोजना केल्या आहेत. यामुळे गुन्हेगारी रोखण्यात यश मिळत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक … Read more

निवडणूक रणधुमाळी! चार दिवसात 52 अर्ज दाखल

अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- राज्य निवडणूक आयोगाने 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. 15 जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. त्यासाठी 23 डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. श्रीरामपूर तालुक्याच्या पुर्वभागातील महत्वाच्या असलेल्या टाकळीभान ग्रामपंचायत निवडणुकीसाठी काल चौथ्या दिवशी ऑनलाईन 20 अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे दाखल अर्जांची संख्या आता … Read more

दोन गट परस्पर भिडले; अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- दोन गटात तुंबळ हाणामारी होऊन अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हा प्रकार राहाता तालुक्यातील वाकडी येथे घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शनिवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास शेतात पाणी भरण्यासाठी गेलो असता, तुम्ही आमच्या शेतात यायचे काही कारण नाही, असे म्हणून आरोपी बाबासाहेब हरिभाऊ … Read more

प्रवाशी महिलांचे पंधरा तोळ्यांचे दागिने लांबवले

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथुन शिरुर (बीड) येथे एसटीबसने प्रवास करताना बॅगमधे ठेवलेले पंधरा तोळे सोन्याचे दागीने अज्ञात चोरट्याने चोरुन नेले. विवाह समारंभासाठी उपस्थीत राहुन गावी परतणाऱ्या महिलांच्या दागिन्यांची चोरी कधी झाली हे त्यांनाही कळले नाही. शाहाबाई भीमराव जायभाय यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. शाहाबाई जायभाये … Read more

आज १५८ रूग्णांना डिस्चार्ज तर ११६ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 26 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात आज १५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६६ हजार २९१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ११६ ने वाढ … Read more