अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण, वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात आज १७९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६२ हजार ३९१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १७४ ने वाढ झाली. … Read more

थोरात यांच्या माध्यमातून आंबेडकरांच्या स्मारकासाठी शासनाकडून निधी आणण्यासाठी काँग्रेस पुढाकार घेणार

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला राज्यघटना दिली. या घटनेने सर्वांना समानतेचा हक्क मिळवून दिला. बाबासाहेबांचे विचार हे समाजासाठी अत्यंत प्रेरक असून ते त्यांच्या भव्य स्मारकाच्या माध्यमातून समाजातील तरुणांसह सर्व घटकांपर्यंत पोहोचावे यासाठी महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून शासनाकडून निधी आणण्यासाठी काँग्रेस पुढाकार घेणार असल्याचे प्रतिपादन, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण … Read more

स्व. राजीव राजळेंची जयंती सामाजिक उपक्रमांनी साजरी

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :- पाथर्डी तालुक्याचे माजी आमदार स्व. राजीव राजळे यांच्या ५१ व्या जयंतीनिमित्त शहरासह तालुक्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करून राजीव राजळे यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. भारतीय जनता पार्टीच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना रुग्णांना फळांचे वाटप, तसेच अभय आव्हाड सामाजिक प्रातिष्ठानच्या वतीने कोरोना रुग्णांना औषधांचे वाटप करण्यात आले. पंचायत समिती … Read more

मोदी सरकारच्या पुतळ्याचे दहन पडले महागात, आंदोलकांविरोधात गुन्हा !

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास पाठिंबा देत श्रीरामपूर येथील छत्रपती संभाजी चौकात शनिवारी सायंकाळी आंदोलन झाले. केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध करून मोदी सरकाच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विनाकारण गर्दी जमवून केंद्र सरकारच्या कृषी व कामगार कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी केंद्र सरकारचा निषेध करून मोदी सरकारच्या … Read more

पेट्रोलपंप कर्मचाऱ्यास मारहाण; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-संगमनेर तालुक्यातील समनापूरच्या रुक्मिणी पेट्रोल पंपावर पेट्रोल कमी टाकल्यावरून पेट्रोल पंप कर्मचाऱ्यास मारहाण केली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी पेट्रोलपंपाचे व्यवस्थापक यांच्या फिर्यादीवरून ६ जणांवर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. संदीप गुंजाळ हा दुचाकीत पेट्रोल टाकण्यासाठी पंपावर आला. पेट्रोल कमी पडल्याने त्याने कर्मचारी शकील शेख याच्याबरोबर वाद घातले. … Read more

छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये आजकाल जास्तच वाढ झालेली पाहायला मिळत आहे. अत्याचार, छेडछाड, विनयभंग अशा घटना घडू लागल्याने महिलांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. असाच एक प्रकार जिल्ह्यात घडला आहे. सासरच्या जाचाला कंटाळून मिरगाव येथील महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात सागर बळीराम यादव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा … Read more

कौतुकास्पद! कोरोना रुग्णांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था सरसावल्या

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-अहमदनगर गेल्या अनेक महिन्यांपासून मानवजातीवर आलेलं कोरोनाचे संकट अद्यापही कायम आहे. या कोरोनामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. यातच पुन्हा एकदा कोरोनाचा विळखा वाढतो आहे. शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत आहे. गावपातळीवर कोरोनाचे संक्रमण वाढले असल्याने कोरोनाबाधितांची आकडेवारीत वाढ होत आहे. त्यातच जिल्ह्यातील अकोले तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव … Read more

या तालुक्यात करोनाने ओलांडला तीन हजारांचा आकडा

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत आहे. गावपातळीवर कोरोनाचे संक्रमण वाढले असल्याने कोरोनाबाधितांची आकडेवारीत वाढ होत आहे. त्यातच जिल्ह्यातील अकोले तालुक्यात कोरोना सुसाट सुरु आहे. अकोले तालुक्यात कोरोनाचा कहर काही थांबायचे नाव घेत नाही. तर लोक देखील काही जबाबदारीने वागायला तयार नाहीत. त्यामुळे, येथील कोरोनाची आकडेवारी मोठी वाढती दिसते … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील रुग्णसंख्यावाढीचा वेग कायम, चोवीस तासांत वाढले ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३७१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६२ हजार २१२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २८३ ने वाढ … Read more

कितीही पळाला तरी बाळ बोठेला अटक होणारच…

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे याच्याविरोधात पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केली आहे. रेखा भाऊसाहेब जरे यांची 30 नोव्हेंबरला हत्या झाली होती. राजकीय क्षेत्रातील महिलेची भरदिवसा भररस्त्यात कुटुंबीयांसमोर हत्या झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. यानंतर पोलिसांनी वेगाने तपास … Read more

सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याचा निर्णय स्वागतार्ह : काळे

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :- महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत देखील सात महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून या निर्णयामध्ये डिसेंबर २०१९ पर्यंतच्या राजकीय, सामाजिक आंदोलनातील खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळाने घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयाचे आमदार आशुतोष काळे यांनी स्वागत केले आहे. मागील सरकारच्या काळात घेतल्या गेलेल्या … Read more

धक्कादायक! मारहाण करत तरुणीचा विनयभंग

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-संगमनेर शहरात किरकोळ कारणातून जामावाने दोन जणांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. तसेच यावेळी एका तरुणीला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करण्यात आले. याप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी भेट देत परिस्थिती नियंत्रणात आणली. याबाबत अधिक माहिती … Read more

टेम्पोच्या धडकेत दोन बैलांचा मृत्यू; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी सहकारी साखर कारखाना उस तोडीस आलेल्या चाळीसगाव येथील रहिवासी यांच्या बैलगाडीस मागून भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने धडक दिली. याला अपघातात दोन्ही बैल जागीच ठार झाले. याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी राजाराम राठोड व त्यांचे सहकारी हे ऊस तोडणी करण्यासाठी कोळपेवाडी येथील कर्मवीर … Read more

किराणा दुकानावर चोरट्यांचा डल्ला ; लाखोंचा माल केला लंपास

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-काही केल्या जिल्ह्यात सुरु असलेल्या चोरीच्या घटनांना रोखण्यात पोलिसांना यश येत नाही . मात्र दुसरीकडे वाढत्या चोरीच्या घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांसह आता व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नुकतेच संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा येथे नाशिक पुणे महामार्गालगत असलेले किराणा सुपर शॉपी फोडून चोरट्यांनी १ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला … Read more

काल कोरोना मुळे झाला इतक्या रुग्णांचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-नगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत कोरोनामुळे आणखी चार जणांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या आता ९५७ झाले आहे, तर दिवसभरात नवे २६७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. नगर जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी चार जणांचा मृत्यू झाला आहे. नगर शहर व जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून शुक्रवारी सायंकाळी सहा … Read more

सात लाखांची दूध भुकटी चोरीस; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस उंचावतच आहे. चोरी, लुटमारी अशा घटनांना आळा घालण्यात अद्यापही पोलिसांना यश येत नसल्याचेच या घटनांमधून दिसून येत आहे. नुकतीच अशीच एक चोरीची घटना नेवासा तालुक्यात घडली आहे. नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील शेटे यांचे पेट्रोल पंप आवारात उभ्या केलेल्या मालट्रक मधून 7 लाखांच्या दूध भुकटी … Read more

भीषण अपघातात अहमदनगर जिल्ह्यातील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :- अंबड शहराजवळ असलेल्या सोमाणी जिनिंग व सदगुरु हाँटेलनजीक ट्रक आणि टेम्पोंची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात टेम्पो चालकासह इतर एक जण जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवार  (दि.४) डिसेंबर रोजी सकाळी सव्वासहा वाजेच्या दरम्यान घडली.  याबाबत अधिक माहिती अशी कि अंबडहून जालन्या कडे जाणारा मालवाहू (ट्रक क्रमांक) (टि.एन् २३ … Read more

विखेंचा दबदबा! नगराध्यक्षपदी कमळ फुलले

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला चांगलाच धक्का बसला आहे. ऐकीकडे हे सर्व सुरु असताना मात्र दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटलांनी आपला राजकीय दबदबा शिर्डी नगरपंचायतीच्या निवडणुकीत दाखवला आहे. विधानपरिषदेवरील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात भाजपला धक्क्यावर धक्के बसत असताना शिर्डीतून पक्षासाठी दिलासादायक बातमी आहे. … Read more