अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आणखी 9 कोरोना पॉझिटिव्ह, कोरोना बाधित रुग्णांची संख्या 172 !

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 : जिल्ह्यात आणखी ०९ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह तर ४९ जणांचे अहवाल निगेटिव्ह.सर्व बाधित रुग्ण यापूर्वी बाधित आढळलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील नगर शहरातील सहा जणांचा समावेश.यात काल बाधित आलेल्या मार्केट यार्ड मधील व्यक्तीच्या कुटुंबातील तिघे बाधित. यात आई, पत्नी आणि मुलीचा समावेश. याशिवाय मार्केट यार्ड येथील 28 वर्षीय युवकही बाधित. माळीवाडा येथील … Read more

महिलेचे फेक इंस्टाग्राम अकाऊंट बनवून त्यांनी केले असे काही कि झाली जेलमध्ये रवानगी !

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :  संगमनेर मध्ये एका महिलेच्या नावाने  इंस्टाग्राम या फोटो शेअरिंग वेबसाईट वर फेक अकाऊंट तयार करून तिची बदनामी करणाऱ्या दोघांना नगर सायबर पोलिसांनी अटक केली आहे. संकेत नानासाहेब गाडेकर (रा. राजापूर ता. संगमनेर), तेजस कैलास ससकर (रा. गोल्डन सिटी, संगमनेर) असे अटक केलेल्या आरोपींचे नावे आहेत. या प्रकरणी जानेवारीमध्ये बदनामी … Read more

पुढील दोन वर्षात एकही मुलगा जन्माला घालणार नाही ‘या’ गावातील जोडप्यांचा निर्धार !

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 : कोरोनाने सर्व देशभर धुमाकूळ घातला आहे. या कोरोनाने अनेक क्षेत्रांवर विपरीत परिणाम केला. परंतु आता नवविवाहित जोडप्यांवर याचा परिणाम होऊ लागला आहे. याचाच एक परिणाम म्हणजे कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव येथील जवळपास शंभर नवविवाहित व तरुण जोडप्यांनी पुढील दोन वर्ष एकही मूल जन्माला न घालण्याचा निर्णय ग्रामसभेत घेतला आहे. गोधेगावची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आणखी 11 नवीन रुग्ण आढळले,जिल्ह्यातील एकूण रुग्ण @163

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे आज आणखी ११ नवीन रुग्ण आढळले आहेत तर ४० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांची माहिती अकोले तालुका ०६ रुग्ण –  *जवळे येथील ४८ आणि २४ वर्षीय महिला आणि २८ वर्षीय पुरुष बाधित. *वाघापूर येथील ३२ आणि ४० वर्षीय महिला आणि … Read more

चारचाकीचा स्पेअरपार्ट घ्यायला आलेल्या व्यक्ती निघाला कोरोना बाधित !

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :- चार-पाच दिवसांपूर्वी वैजापूर येथून श्रीरामपुरात चारचाकीचा स्पेअरपार्ट घ्यायला आलेल्या व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने संबंधित दुकानदाराचे धाबे दणाणले. मात्र, माहिती लपवून न ठेवता हा दुकानदार स्वतःहून नगरपालिकेच्या रुग्णालयात गेला. तपासणीसाठी त्याला नगरला पाठवण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पऱ्हे यांनी सांगितले, स‌ंबंधित दुकानदाराला कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. ज्या … Read more

मासे पकडायला गेला आणि स्वतःच पोलिसांच्या जाळ्यात अडकला !

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :- विविध गुन्ह्यात मागील तीन वर्षांपासून फरार असलेला आरोपी पारनेर पोलिसांनी ताब्यात घेतले. राजू किसन गांगर्डे, (वय 40, रा. धोत्रे खुर्द, ता. पारनेर) असे आरोपीचे नाव असून धोत्रे शिवारातून त्यास ताब्यात घेतले.  पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय हिंगडे, पोलीस नाईक सुनील चव्हाण, संदीप पवार, भागीनाथ पंचमुख, पोलीस कॉन्स्टेबल विनोद मासाळकर व … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्यांचा फडशा

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :- संगमनेर तालुक्यातील शेळकेवाडी येथे रविवारी मध्यरात्री बिबट्याने चढवलेल्या हल्ल्यात तीन शेळ्यांचा फडशा पडला. यामुळे परिसरातील शेतक-यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याबाबत माहिती अशी: रविवारी शेळकेवाडी येथील जयेश काशिनाथ शेळके यांच्या गोठ्यातील गायी व शेळ्यांवर बिबट्याने रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हल्ला केला. शेळ्यांच्या ओरडण्याने शेळके यांना जाग आली. बॅटरी चमकविल्याने बिबट्याने … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सरपंचांने केला महिलेचा विनयभंग

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या गावातील व्यक्तीचा राग मनात धरुन तो घरी नसतांना त्याच्या घरी जात घराची कडी वाजवून चिलेखनवाडीचे सरपंच भाऊसाहेब धोडींराम सावंत व त्याच्या सात साथीदारांनी गावातील महिलेचा विनयभंग केला.  या प्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात सरपंचासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, चिलेखनवाडी येथील … Read more

बिग ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे दीडशतक !

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असून आजही पाच नव्या रुग्णांची भर पडली आहे, यामुळे अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने दीडशतक पूर्ण झाले असून जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या १५२  झाली आहे. आज जिल्ह्यात आणखी ०५ नवीन रुग्ण. अहमदनगर शहरातील भवानीनगर मार्केट यार्ड येथील 29 वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाली … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील मंदिरे खुले करा

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :-  लॉकडाऊन मुळे सध्या बंद असलेली  नगर शहरासह जिह्यातील मठ – मंदिर उघडण्यास परवानगी द्यावी. प्रशासनाने कडक नियमांची अंमलबजावणीची ही संबंधित विश्वस्त – पुजारी यांच्याकडून घेऊन मंदिरे खुली करावीत असे आवाहन विश्‍व हिंदू परिषदेने केले आहे. जिह्यात अनेक पुरातन, स्वयंभू व ऐतिहासिक वारसा लाभलेली देवस्थान आहेत.नगर जिल्हा विश्‍व हिंदु परिषदेच्या … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आणखी ०३ रूग्ण आज कोरोना मुक्त !

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 : जिल्ह्यातील आणखी ०३ रूग्ण आज कोरोना मुक्त होऊन घरी परतले. या ०३ रुग्णांना आज बूथ हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता झाली ७३ झाली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील ३२ वर्षीय रुग्ण, राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील २४ वर्षीय युवक आणि अकोले … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील सलूनची दुकाने पुन्हा बंद !

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- अहमदनगरचे जिल्हाधीकारी राहुल द्विेदी यांनी जिल्ह्यातील लॉकडाऊनची नवी नियमावली रविवारी रात्री घोषित केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील दुकानांची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच अशीराहणार आहे. तसेच पूर्वीपेक्षा फिरण्यासाठी चार तास वाढवून देण्यात आले आहेत. त्यामुळे आता सायंकाळी सातऐवजी रात्री नऊपर्यंत आता फिरायला मोकळीक राहणार आहे. २२ मे पासून सुरू … Read more

फायनान्सच्या कंपनीच्या तगाद्याला कंटाळून तरुणाची आत्महत्या

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील गोंधवणी येथील तरुणाने श्रीरामपूर-वाकडी रस्त्यालगत धनगरवाडीफाटा येथील बसथांब्याशेजारी असलेल्या झाडाला गळफास घेतला. खासगी फायनान्स कंपनीच्या तगाद्याला कंटाळून त्याने आत्महत्या केली. श्रीरामपूर तालुका ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय शिंदे व कॉन्स्टेबल कराळे यांनी पंचनामा केला. आत्महत्या केलेल्या तरुणाच्या शर्टच्या खिशात आधारकार्ड व चिठ्ठी सापडली. एका खासगी फायनान्स कंपनीच्या सततच्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आणखी ६ नवीन रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :- जिल्ह्यात आणखी ०६ नवीन रुग्ण तर ५१ जणांचे अहवाल निगेटिव्ह मुंबईहून अकोले तालुक्यातील वाघापुर येथे आलेली ६२ वर्षे वयाची महिला बाधित. घाटकोपर होऊन अकोले तालुक्यातील जांभळे येथे आलेला ५३ वर्षीय व्यक्ती बाधित मुंबईहून निमोन(संगमनेर) येथे आलेले 40 वर्षीय व्यक्ती आणि आठ वर्षीय मुलगा बाधित मुंबईहून शेवगाव तालुक्यातील दहीगाव ने येथे … Read more

महत्वाची बातमी : उद्यापासून अहमदनगर जिल्ह्यात काय सुरु आणि काय बंद ? वाचा सविस्तर…

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :-  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजनेचे एक भाग म्‍हणुन नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमा होण्‍यास प्रतिबंध व्‍हावा म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार अहमदनगर जिल्‍हा महसूल स्‍थळ सीमेच्‍या हद्दीमध्‍ये कोणत्‍याही रस्‍त्‍यावर, सार्वजनिक वाहतुकीचे रस्‍त्‍यावर, गल्‍लोगल्‍ली याठिकाणी संचार, वाहतुक, फिरणे, उभे राहणे, थांबुन राहणे, रेंगाळणे असे कृत्‍य … Read more

साई मंदिर बंदच राहणार;संस्थानचा निर्णय

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :- शिर्डीचे साई मंदिर या जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरु होईल असे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात येत होतं. मात्र ‘साई समाधी मंदिर दर्शनाकरीता उघडण्‍याचा कोणताही निर्णय घेण्‍यात आलेला नाही’, असा खुलासा साई संस्थानतर्फे करण्यात आला आहे. उपमुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या एका व्हिडीओद्वारे ही माहिती देण्यात आली. महाराष्ट्र शासनाकडून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आज पुन्हा कोरोनाचे दहा रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली असून, आज नवीन दहा जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 141 पर्यंत पोहोचली आहे. तीन दिवसांपासून दररोज दहापेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. दरम्यान आज आजीसह मुंबईहून कर्जत तालुक्यातील राशीन येथे आलेली सहा वर्षीय मुलगी कोरोनाचा लढा … Read more

शिर्डी : कुटुंबातील पाच लोकांना कोरोना

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :- शिर्डी शहरापासून दीड किमी अंतरावर असलेल्या ‘निमगाव ‘ या गावात एकाच घरातील पाच जण कोरोनाग्रस्त निघाले असून परिसरात भीती पसरली आहे. प्रशासनाने यावर कार्यवाही करत चौदा दिवस शंभर टक्के लॉकडाऊन घोषित करून संपूर्ण गावाची आरोग्य तपासणी मोहीम सुरू केली आहे. या गावातील ५० वर्षीय महिलेचा भाजी विक्री व्यवसाय आहे. … Read more