ब्रेकिंग : तीन पोलिस निरीक्षकांच्या बदल्या, ‘या’ दोन पोलिस ठाण्याचे इन्चार्ज बदलले…

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :- कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक विकास वाघ यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली आहे. वाघ यांच्या जागी आर्थिक गुन्हे शाखेतील निरीक्षक प्रवीणचंद्र लोखंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच आर्थिक गुन्हे शाखेतील निरीक्षक वसंत भोये यांची शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे . जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह … Read more

धक्कादायक : भाविकांच्या पैशातून साईसंस्थानाने लॉकडाऊनमध्ये मध्ये केले असे काही….वाचून तुम्हालाही बसेल धक्का !

कोट्यवधीची रुपयांची जमीन न्यायालयाची परवानगी न घेता बाजार भावापेक्षा अधिकच्या भावाने कशी खेरदी केली? असा प्रश्न स्थानिकांबरोबर भाविकांना पडला आहे.

संगमनेर मध्ये काँग्रेसकडून सूडबुद्धीचे राजकारण

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :-भाजपच्या वतीने २२ मे रोजी संगमनेरात ‘माझे आंगण, माझे रणांगण’ आंदोलन शांततेच्या मार्गाने व सामाजिक अंतर तसेच शासनाचे नियम पाळून केले. मात्र, स्थानिक काँग्रेस पक्षाकडून सूडबुद्धीचे राजकारण करण्यात येऊन भाजपच्या आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप भाजप युवा मार्चचे अध्यक्ष अ‍ॅड. श्रीराज डेरे यांनी केला. महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने … Read more

मुंबईवरून आलेला तरुण आईने घरा बाहेर ठेवला आणि दुर्दैवाने त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :- मुंबईवरून आलेला तरुण आईने घरा बाहेर ठेवला आणि दुर्दैवाने त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हा नेवासे तालुक्यातील सातवा कोरोना रुग्ण आहे. तालुक्यातील कारेगाव येथील भांडुपला वॉचमन म्हणून काम करत असलेला तरुण भानसहिवरा गावाच्या आठ जणांसोबत शुक्रवारी (२९ मे) पहाटे घरी आला. त्याची खालावलेली प्रकृती पाहून आईने देखील त्याला घराबाहेरच ठेवले. … Read more

समृद्धी महामार्गाच्या दोन अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

टीम अहमदनगर Live24, 30 मे 2020 :- कोपरगाव जेऊर कुंभारी भागात समृद्धी महामार्गाचे काम चालू असताना लगतच्या विजेच्या खांबावरील तारांना चिकटून दोन मुलींचा मृत्यू झाला. ही घटना २४ मे रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणी समृद्धी महामार्गाच्या दोन नियंत्रक अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी ठेकेदारावर कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न विचारण्यात येत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग: दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2020 :- मुळा नदी पात्रात बुडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला संगमनेर तालुक्यातील भोयरे पठार येथे आज सायंकाळी ही घटना घडली. तेजस शरद कातोरे (वय 9), सुरज शरद कातोरे (वय 5) ही मयत भावांची नावे आहेत. मुळा नदी पात्रात वाळूतस्करांनी खड्डे केले आहे. त्यामुळे पाण्याचा अंदाज येत नाही. आज सायंकाळच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना रुग्णांच्या संख्येने कालचा उच्चांक मोडला,वाचा आजचे कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 ,30 मे 2020 :-  आज कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येने कालचा विक्रम मोडीत काढला आहे. आज दिवसभरात तब्बल 14 जण पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा एकूण आकडा 131 झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील आणखी ०६ रुग्ण बरे होऊन घरी परतले .नगर शहरातील ०३ पाथर्डी, संगमनेर येथील प्रत्येकी ०१ आणि संगमनेर येथीलच नाशिक येथे उपचार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : या तालुक्यात पुन्हा वाढले पाच कोरोना रुग्ण !

अहमदनगर Live24 ,30 मे 2020 :-  आज संगमनेर तालुक्यात पुन्हा कोरोनाचे 3 रुग्ण आढळले आहेत, यात सिन्नर तालुक्यातील 56 वर्षीय व्यक्ती तर निमोण येथे 75 वर्षीय वृद्ध, तसेच भारत नगर येथील 54 वर्षीय महिलेचा सामावेश आहे. तर सकाळी मोमिनपुरा येथील 71 वर्षीय वृद्ध तसेच भारतनगर येथील 33 वर्षीय तरुणाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे … Read more

भंडारदरा जलाशयात मासेमारीसाठी गेलेल्या एकाचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,30 मे 2020 :- भंडारदरा जलाशयात मासेमारीसाठी गेलेल्या श्रावणा सोमा मधे यांचा पाण्यात बुडून मृत्यूू झाला. मृतदेह फुगून पाण्यावर आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला. राजूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. बुधवारी सकाळी मधे हे जेवणाचा डबा घेऊन घरातून बाहेर पडले. लाॅकडाऊनमुळे हाताला काहीही काम नसल्याने भंडारदरा जलाशयात मासे पकडून थोडाफार आर्थिक फायदा होईल, … Read more

पोलिसाच्या त्रासामुळेच त्याने आत्मदहन केले आणि…

अहमदनगर Live24 ,30 मे 2020 :- श्रीरामपूर दत्तनगर येथील पोलिस चौकीसमोर अंगावर पेट्रोल ओतून जाळून घेतलेल्या नदीम पठाण या तरुणाची प्राणज्योत गुरुवारी मालवली. त्याला त्रास देणाऱ्या पोलिसावर कारवाई करावी, तरच मृतदेह ताब्यात घेऊ, असा पवित्रा नदीमच्या आईने घेतल्याने पेच वाढला. अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्याची तयारी नातेवाईकांनी … Read more

अहमदनगर मध्ये आज कोरोना बाधितांचा उच्चांक, एका दिवसात सापडले 13 पॉझिटिव्ह, 2 मृत्यू

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :-  आज जिल्ह्यात कोरोनाबाधीत रुग्णांच्या आकड्याने उच्चांक गाठला आहे. एकाच दिवसात तब्बल 13 जण पॉझिटिव्ह, तर दोन जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. घाटकोपरहून अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथे आलेले ०१, ठाणे येथून पारनेर हिवरे कोरडा येथे आलेला १, चाकण (पुणे) येथून ढोर जळगाव शेवगाव येथे आलेला १, संगमनेर २, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आणखी एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू !

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :- संगमनेर शहरात मदिनानगर परिसरात 55 वर्षींय रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे हा व्यक्ती फालुदा विकत असल्याची माहिती समजली आहे. त्यामुळे त्यांनी काही परिसर सील केला आहे. आज सकाळी संगमनेरचे दोन रुग्ण कोरोनाबाधीत मिळून आले होते. त्यातील हा पुरुष असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जुळ्या मुलांना जन्म देणाऱ्या कोरोना बाधीत महिलेचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :-  येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात काल जुळ्या मुलांना जन्म देणाऱ्या कोरोना बाधीत महिलेचा मृत्यू झाला आहे. आज शुक्रवारी सकाळी ८-४५ वाजता मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे. या महिलेचे काल सिझरियन करण्यात आले होते. या महिलेने काल एक मुलगा आणि एका मुलीला जन्म दिला होता. दोन्ही बाळांची तब्बेत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : धोका वाढला,कोरोनाचे आणखी 9 रुग्ण आढळले !

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :-  आज जिल्ह्यात ०९ नवीन रुग्ण वाढले आहेत,६० अहवालापैकी ५१ निगेटिव्ह तर ०९ पॉझिटिव्ह आले आहेत.  अहमदनगर जिल्ह्यात आज आणखी नऊ जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे नगरमधील कोरोनाबाधितांची संख्या 112 झाली आहे. व उपचारार्थींची संख्या 45 झाली आहे. ही रुग्ण अकोले, संगमनेर, पारनेर, शेवगाव आणि राहाता आदी … Read more

मोठी बातमी : बाळासाहेब थोरात यांचं प्रदेशाध्यक्ष पद धोक्यात !

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :- महाराष्ट्र काँग्रेसमध्ये राजकीय स्थित्यंतरे होण्याचे संकेत आहेत. नाना पटोले यांना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी तर विधानसभा अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाण यांना विराजमान करण्याचा विचार काँग्रेस गोटामध्ये सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे सध्या मंत्रिमंडळातही आहेत. महसूलमंत्री पद त्यांच्याकडे आहे. शिवाय काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाची जबाबदारीही त्यांच्याकडेच आहे. … Read more

धक्कादायक : पळालेला तो रुग्ण निघाला कोरोना पॉझिटिव्ह !

अहमदनगर Live24 ,29 मे 2020 :- कल्याणहून आलेल्या पॉझिटिव्ह आजीच्या संपर्कातील तिच्या मनोरुग्ण नातवाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, अशी माहिती तहसीलदार रुपेश सुराणा यांनी दिली. तालुक्यातील तो सहावा रुग्ण ठरला. तो जिल्हा रुग्णालयातून पळून गेला होता. घोडेगावात त्याला ताब्यात घेतले. नेवासे बुद्रूक येथील मुलीला भेटण्यासाठी कल्याण येथून २० मे रोजी ही महिला आल्यानंतर तिला स्थानिक … Read more

ब्रेकिंग – अहमदनगर मध्ये कोरोनाचे शतक पार, आणखी 4 जण पाॅझिटिव्ह

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :- आज अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्ण संख्येने  शतक पार केले आहे, आज जिल्ह्यात ०४ नवीन रुग्ण आढळून आले आहेत.त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांची संख्या 103 झाली आहे. आज नव्याने सापडलेल्या रुग्णांत घाटकोपरहून अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथे आलेले वडील आणि मुलगी कोरोना बाधित असून इतर दोन नेवासा आणि श्रीगोंदा येथील रुग्ण आहेत.  … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाचे दोन आणखी रुग्ण आढळले !

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :-  अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथे आता आणखी दोन रुग्ण मिळून आले आहेत. ही दोघे मुंबई हून आलेले असून त्यांना प्रशासनाने जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. आज त्या दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. यामुळे पिंपळगाव खांड येथील एक हजार लोकसंखेच्या गावात खळबळ उडाली आहे . याबाबत सविस्तर माहिती अशी की, … Read more