‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पतीसह, सासू सासऱ्याला अटक

अहमदनगर Live24 ,13 मे 2020 :- कोपरगाव तालुक्यातील मंजूर वडाचीवाडी येथील विवाहित महिला जयश्री गोरक्षनाथ गावंड (वय २९) या विहिरीत मृत अवस्थेत आढळून आल्या. त्यांना वर काढल्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात पती गोरक्षनाथ बाळासाहेब गावंड, सासरा बाळासाहेब कारभारी गावंड, सासू लहानबाई बाळासाहेब गावंड या तिघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मृत महिलेचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पाण्यात बुडून दहा वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :- पोहण्यास गेलेला दहा वर्षे वयाच्या मुलाचा श्रीरामपूर शहरालगत बेलापूर-पढेगाव रोडवर असणाऱ्या खटकाळी गावठाण येथील खाणीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला. आज सायंकाळी हा मृतदेह सापडला. खटकाळी गावठाण येथील आदित्य विकास जगताप (वय १०) हा मित्रांसमवेत दुपारी अडीच वाजता पोहोण्यास गेला होता. पोहत असताना दम तुटल्यामुळे तो खोल पाण्यात बुडाला. ही … Read more

परराज्यातील मजुरांसाठी ‘या’ चार बसस्थानकात एक खिडकी कक्ष

अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :- अहमदनगर जिल्हयात अडकलेल्या परराज्यातील मजुरांना त्यांच्या मूळगावी जाण्याकामी तारकपूर बसस्थानक अहमदनगर, पारनेर बसस्थानक, श्रीरामपूर बसस्थानक, आणि कोपरगांव बसस्थानक या चार ठिकाणी एक खिडकी कक्ष कार्यन्वित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत. त्यासाठी, महसुल, मोटार वाहन, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असणारी समिती … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती करणाऱ्या सरपंचांनाच बेदम मारहाण !

अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुमशेत गावात जनजागृती व त्या अनुषंगाने सांगितले म्हणून त्याचा राग मनात धरून सहा ते सात लोकांनी कुमशेतचे सरपंच सयाजी तुकाराम अस्वले यांना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अकोल्याचे तहसीलदार मुकेश कांबळे यांना संबंधितांवर कारवाईच्या मागणीसाठी निवेदन देण्यात आले. यावेळी अकोले पंचायत … Read more

कोरोनाला हरवण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या सेवाव्रती परिचारिकांचा सत्कार

अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :- कोरोना बाधितांवर उपचार करुन त्यांना बरे करण्यासाठी अथक आणि अहोरात्र सेवा बजावणार्‍या बूथ हॉस्पिटलमधील परिचारिकांचा आज जागतिक परिचारिका दिनी सत्कार करण्यात आला. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत असताना यामधील महत्वाचा दुवा असणार्‍या परिचारिकां प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. शहरातील इव्हेंजलीन बूथ हॉस्पिटल येथे कोरोना बाधित रुग्णांवर उपचार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कुऱ्हाडीने खून करणाऱ्या आरोपीस अटक !

अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :- संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर येथे पूर्ववैमनस्यातून डोक्यात कुऱ्हाड घालून सतीष छबू यादव (वय ३६) या व्यक्तीचा भरदिवसा खून करण्यात आला. रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर तपासाची चक्रे फिरवीत पोलिसांनी खुनाच्या आरोपावरून गोरख संपत यादव (वय ३९) … Read more

शून्यातून विश्व निर्माण करणारे माजी खासदार व ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांचा जीवनप्रवास

कुठलाही राजकीय वारसा नसतानाही विलक्षण जिद्द, जनसंग्रहाचा व्यासंग यातून माजी खासदार व ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांनी ग्रामीण भागाचा कायापालट करण्याचे स्वप्न पाहिले. परिश्रमपूर्वक मोठे काम करण्याची जिद्द उराशी बाळगले. सोनईतून येऊन नगर जिल्ह्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच साहित्य क्षेत्रात त्यांनी अतुलनीय काम केले. त्यांच्या कष्टाने सोनईसह परिसराचे सोने झाले. ज्येष्ठ नेते गडाख यांचा आज … Read more

अहमदनगर ब्रेकिंग :’त्या’ महिलेला कोरोनाची लागण, कोरोना बाधितांचा आकडा झाला 54 !

अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :- अहमदनगर शहरातील एका ७० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा ५४ झाला आहे. या महिलेला सारी सदृश लक्षणे आढळल्याने तिला दोन दिवसापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच तिच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. आज सकाळी अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही महिला कोरोना … Read more

अहमदनगर जिल्हा लवकरच ग्रीन झोनमध्ये !

अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ४० झाली आहे.रुग्णाच्या संपर्कात असलेल्यांची तातडीने तपासणी, रुग्ण आढळलेला परिसर तातडीने सील करणे, तसेच बाधित व्यक्तीचा इतरांशी संपर्क तोडणे या जिल्हा प्रशासनाने केलेल्या त्रिसूत्री उपाययोजनांमुळे जिल्हा ग्रीनझोनकडे वाटचाल करत आहे. या तीन प्रमुख उपाययोजनांमुळे जिल्ह्यात रुग्ण आढळण्याचे प्रमाण काहीसे कमी झाले. राज्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भीषण अपघातात दोन ठार !

अहमदनगर Live24 ,11 मे 2020 :- श्रीरामपूर- संगमनेर रस्यावर प्रभात दूध डेरी जवळ दुचाकी व ट्रक यांच्यात आज सायंकाळी ५ :३०च्या दरम्यान भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात २ जण ठार झाले झाले असून अपघातग्रस्त ट्रक मध्ये लोखंडी सळया असल्याचे समजले आहे. अपघातात बाळासाहेब यशवंत कोते (शिर्डी ) व अनिल निकम (कोपरगाव ) यांचा उपचारादरम्यान … Read more

‘त्याच्या’ मृत्यूचे गूढ वाढले, श्वसनाचा त्रास हाेत असताना देखील….

अहमदनगर Live24 ,11 मे 2020 :- तालुक्यातील आदिवासी शेतमजुराच्या मृत्युचे गूढ वाढत चालले आहे. एका शेतकऱ्याने  केलेल्या तक्रारीनंतर खोदकाम करून सुभाष निर्मळ याचा मृतदेह शनिवारी  बाहेर काढला होता. या आदिवासी मजुराच्या मृत्यूप्रकरणी अनेक प्रश्न उभे राहत असल्याने या प्रकरणाचे गूढ वाढतच चालले आहेत, तर तपासावरही संशय निर्माण होऊ लागला आहे. मृत सुभाष निर्मळ (वय ५०) … Read more

महत्वाची बातमी : ‘त्यांना’ आता अहमदनगर मध्ये ‘नो एण्ट्री’ !

अहमदनगर Live24 ,11 मे 2020 :- लाॅकडाऊन शिथिल झाल्याने अनेक मजूर, नातेवाईक नगरमध्ये वास्तव्याला येत आहेत. परवानगी असेल, तरच त्यांना प्रवेश दिला जाईल. परवानगी असेल त्यांची आरोग्य तपासणी करून होम क्वारंटाइनचे शिक्के मारले जातील. अंमलबजावणी करण्यासाठी मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी शहरात १७ प्रभाग सुरक्षा समित्यांची स्थापना केली आहे. या समित्यांमध्ये आरोग्य विभागाच्या यंत्रणेसह नगरसेवकांचाही … Read more

लॉकडाऊनच्या काळात शिर्डी देवस्थानच्या देणगीत दिवसाला ‘एवढी’ घट

अहमदनगर Live24 ,11 मे 2020 :-  लॉकडाऊनच्या काळात शिर्डीच्या साईसंस्थानला मिळणाऱ्या देणगीत दिवसाला तब्बल पावणेदोन कोटी रुपयांची घट झाली आहे. सध्या ऑनलाईनच्या माध्यमातून रोज सरासरी चार लाख रुपयांची देणगी मिळत आहे. साईसंस्थानला कोरोनाने आर्थिक संकटात टाकले आहे. संस्थानचे वर्षाचे उत्पन्न सरासरी ६८० कोटी तर खर्च ६०० कोटी आहे. मे अखेर संस्थानच्या देणगीत सव्वाशे कोटी रुपयांची … Read more

अहमदनगरकरानों काळजी घ्या ! जिल्ह्यामध्ये वादळी पावसाचा इशारा, वाचा महत्त्वाची बातमी

अहमदनगर Live24 ,11 मे 2020 :-  कोरोना व्हायरस तसेच लॉकडाऊन चे संकट सुरु असतानाच आता अवकाळी पाऊसही बळीराजाची चिंता वाढविणार असल्याची चिन्हे आहेत. हवामान विभागाने राज्यभरात पावसाचे संकेत दिले आहेत.रविवारी (ता.१०) अहमदनगर जिल्ह्यातील काही भागांत वादळी पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान आजही पुढील तीन ते चार तासात वादळी वार्‍यासह पावसाचा इशारा, मुंबई हवामान विभागाने दिला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : 4 रुग्ण झाले कोरोनामुक्त; आज डिस्चार्ज,आतापर्यंत ४० जण झाले कोरोनामुक्त !

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :- कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि आरोग्य यंत्रणा करत असलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे चित्र दिसत आहे. आज जामखेड येथील ०४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.आज या रुग्णांना बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ४० झाली … Read more

कोणीही उपाशी राहू नये, यासाठी मदत केली पाहिजे – आमदार राधाकृष्ण विखे

अहमदनगर Live24 ,11 मे 2020 :- सर्वसामान्य, गोर-गरीबांना लॉकडाऊनमुळे हाताला काम नसल्याने करोनाच्या महामारीत उपासमारीची वेळ आली आहे. गावातील पुढाऱ्यांनी गटातटाचे राजकीय जोडे बाजूला ठेवून या महामारीत एकमेकांना माणुसकीच्या धर्माने कोणीही उपाशी राहू नये, यासाठी मदत केली पाहिजे, असे आवाहन माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे यांनी केले. तालुक्यातील तीन ठिकाणी मोफत अन्नछत्राचे आमदार राधाकृष्ण विखे … Read more

होय ! मालकाचे प्राण वाचविण्यासाठी कुत्र्याने केली वाघाची शिकार….

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :-  संगमनेर तालुक्यातील वाघापुर गावात कुत्र्याने चक्क वाघाचा पाठलाग केल्याची अजब व आश्चर्यचकीत प्रकार पहायला मिळाला. संगमनेर शहरालगत असणार्‍या वाघापूर येथे गव्हाळी वस्तीवर अण्णासाहेब लहानू शिंदे यांच्या घराजवळ सकाळच्या सुमारास बिबट्याचे बछडे निदर्शनास आले. त्याक्षणी घरातील कुत्र्याने त्या बछड्याचा पाठलाग केला. आणि बछडे सरासर शेवरीच्या झाडावर चढले. हे कुत्रे त्या … Read more

संगमनेर तालुक्यात वाढणारी करोना रुग्णांची संख्या चिंताजनक – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील मृत्यु पावलेल्या वृध्द व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या आणखी एका व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे. ही ३६ वर्षीय व्यक्ती धांदरफळ येथीलच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या आता ५३ झाली आहे. तर, धांदरफळ येथील करोना बाधित रुग्णांची संख्या आता ०८ झाली आहे. अहमदनगर जिल्हा आणि संगमनेर तालुक्यात वाढणारी करोना रुग्णांची संख्या चिंताजनक … Read more