अहमदनगर ब्रेकिंग : शेतीच्या वादातून डोक्यात कुऱ्हाड घालून खून !

अहमदनगर Live24 ,11 मे 2020 :- कौठेकमळेश्वर येथे शेतीच्या वादातून डोक्यात कुऱ्हाड घालून एकाचा भरदिवसा खून झाला. सतीश छबू यादव (३६ वर्षे) असे मृताचे नाव आहे. रविवारी दुपारी अडीच-तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर येथील सतीष यादव यांना दुपारच्या वेळी घरातून बोलावून घेत शेतीच्या वादातून मारहाण करण्यात आली. डोक्यात कुऱ्हाड घातल्याने ते … Read more

अहमदनगर जिल्हातील दुकाने आणि आठवडे बाजाराबाबत नवा आदेश

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :- अहमदनगर जिल्हा महसुल स्थळ सीमेच्या हद्दीतील कंटेंटमेंट झोन वगळता महानगरपालिका, नगरपालिकाहदीतीन एकल (stand alone), वसाहती लगत असणारी, निवासी संकुलामधील सर्व दुकाने सुरु राहतील. तथापि याची काटेकोर अंमलबजावणी आणि नियोजन करण्याची जबाबदारी संबंधित स्थानिक प्राधिकरण यांची राहील, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत. यापूर्वी जिल्हा प्रशासनाने नागरी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आणखी ०१ जण कोरोनामुक्त, वाचा आजचे कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :- जिल्ह्यातील नेवासा येथील ०१ कोरोनामुक्त होऊन आज घरी परतला. आज या रुग्णाला बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ३६ झाली आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित व्यक्तींची संख्या ५३ असून त्यापैकी आता १४ जणांवर उपचार सुरू असून ०३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, अशी … Read more

शेततळ्यात बुडून युवकाचा मूत्यू,गावावर पसरली शोककळा

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :- संगमनेर तालुक्यातील वडझरी खुर्द शिवारातील शेततळ्यातील पाण्यात बुडून एका युवकास जलसमाधी मिळून मृत्यू झाला. प्रदिप दत्तू गोर्डे (वय २०) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. शनिवारी (दि. ९) दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.या घटनेने वडझरी गावावर शोककळा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पोलिसांनी बाहेर काढला ‘त्या’ शेतात पुरलेला मजुराचा मृतदेह !

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :- नेवासा तालुक्यातील भेंडा बुद्रूक भागात एका शेतक-याच्या शेतात मजुराचा मृतेदह पुरण्यात आला होता. त्या शेतकऱ्याने त्या संदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्या शेतकऱ्याच्या तक्रारीवरून शनिवारी पोलिसांनी शेतात उकरून तो मृतदेह बाहेर काढला. सुभाष रामभाऊ निर्मळ ( वय ५०) रा. निर्मळ पिंप्री, ता. श्रीरामपूर, असे त्या मयताचे नाव आहे. … Read more

भाजप निष्ठावंत माजी मंत्र्यांची श्रेष्ठींवर नाराजी !

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील अनेकांनी विधानपरिषदेबाबत माझ्या नावाची शिफारस केली होती. 81 शिफारशी झाल्या होत्या. त्यामुळे श्रेष्ठींनी निर्णय घ्यायला हवा होता. आजी-माजी आमदारांनीही शिफारशी केल्या होत्या. तरीही श्रेष्ठींना विचार केला नाही, अशा शब्दांत भाजपचे निष्ठावंत मानल्या जाणाऱ्या माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी श्रेष्ठींबाबत नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे जाणाऱ्या शिंदे … Read more

पोलिसांना फोन करून माहिती दिली पण ‘त्याच्या’वर झाला गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :-  संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्दमधील एका युवकाने पोलिसांना फोन करुन गावात गर्दी झाल्याचे सागितले. प्रत्यक्षात हा बनवाबनवीचा प्रकार आल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी या युवकावर गुन्हा दाखल केला. एका युवकाने खोटे नाव सांगत पोलिसांना फोन करुन सांगितले की, आश्वी खुर्दमधील शिवाजी चौकात मोठी गर्दी झाली आहे. कॉन्स्टेबल वाघ तातडीने घटनास्थळी दाखल … Read more

संगमनेर शहरासह ‘ही’ गावे 23 मेपर्यंत हॉटस्पॉट पॉकेट

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजनेचा एक भाग म्‍हणून संगमनेर शहर हे क्षेत्र हॉटस्पॉट पॉकेट म्‍हणुन व सदरच्‍या क्षेत्राच्‍या मध्‍यबिंदु पासुन जवळपास ०२ कि.मी.चा परिसर हा कोअर एरिया म्हणून घोषित करण्यात आला असून यापूर्वी हॉटस्पॉट पॉकेट म्‍हणून घोषित केलेल्‍या कुरण गाव (संगमनेर तालुका) व मौजे धांदरफळ बु. (संगमनेर तालुका) या क्षेत्रातील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आणखी एक व्यक्ती कोरोना बाधित, जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ५३

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :- संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील मृत्यु पावलेल्या वृध्द व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या आणखी एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. ही ३६ वर्षीय व्यक्ती धांदरफळ येथीलच आहे. या व्यक्तीचा अहवाल आज प्राप्त झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ५३ झाली आहे. तर, धांदरफळ येथील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ०८ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह, जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 52 !

अहमदनगर Live24 ,9 मे 2020 :- संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील मृत्यु पावलेल्या वृध्द व्यक्तीचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ५२ झाली आहे. जामखेड येथील ०२ कोरोना बाधित तरुणापैकी एकाचा चौदाव्या दिवसा नंतरचा दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर दुसऱ्या तरुणाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला आज डिस्चार्ज देण्यात येणार … Read more

अहमदनगर जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी दोन दिवसांत झाले ‘एवढे’ अर्ज !

अहमदनगर Live24 ,9 मे 2020 :-  बाहेरच्या जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासनाकडे रोज हजारो अर्ज येत आहेत. दोनच दिवसांत २ हजार १०० जणांचे इतर अहमदनगर जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी अर्ज आले होते. जिल्ह्यातून बाहेरच्या जिल्ह्यात जाणाऱ्यांना परवानगी देण्यासाठी ऑनलाइन अर्ज स्वीकारले जात आहेत. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र कक्ष कार्यरत करण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘ते’ परदेशी नागरिक पोलिस कोठडीत !

अहमदनगर Live24 ,9 मे 2020 :-  कोरोनाबाधित असलेल्या तबलिगी जमातीच्या पाच जणांचा अहवाल निगोटिव्ह आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यातील दोन परदेशी नागरिकांना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तीन भारतीय नागरिकांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने त्यांच्या अटकेची कारवाई केलेली आहे. टुरिस्ट व्हिसा घेऊन भारतात धर्मप्रसार केल्याप्रकरणी जिल्ह्यातील तीन … Read more

मुंबईतून रिक्षाने श्रीरामपुरात आलेल्या ‘त्या’ सर्वांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 ,9 मे 2020 :- मुंबईच्या नालासोपारा परिसरातून दत्तनगर परिसरात पाचजण रिक्षाने श्रीरामपुरात आल्यानंतर परिसरातील लोकांनी सरपंच व इतर जबाबदार पदाधिकाऱ्यांना हे कळवल्यानंतर आरोग्य विभागाने या पाचही तपासणी केली. मात्र, यापैकी तिघांना नगर येथे पाठवण्यात आले आहे. त्यांचे अहवाल येणे बाकी आहे. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी एक पुरुष, दोन महिला … Read more

‘हा’ तालुका झाला कोरोनामुक्त,चारही पॉझिटिव्ह कोरोना रुग्ण निगेटिव्ह …

अहमदनगर Live24 ,9 मे 2020 :- नेवासे तालुक्यात आढळलेले चारही पॉझिटिव्ह कोरोना रुग्ण निगेटिव्ह झाल्यामुळे तालुक्याला मोठा दिलासा मिळाला आहे. नगर जिल्ह्यातील दुसरा व नेवासे तालुक्यातील पहिला कोरोना रुग्ण १४ मार्चला निष्पन्न झाला. हा रुग्ण परदेश वारी करून आला होता. हा रुग्ण निगेटिव्ह होऊन घरी आल्यानंतर त्याचे मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यात आले. त्यानंतर २७ मार्चच्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘तो’भाग २२ मे पर्यंत हॉटस्पॉट क्षेत्र घोषित !

अहमदनगर Live24 ,9 मे 2020 :- संगमनेर शहरातील ईस्‍लामपुरा, कुरण रोड, बीलाल नगर, अपना नगर, पानसरे आखाडा, गुंजाळ आखाडा, पुनर्वसन कॉलनी, पावबाकी रस्‍ता, ज्ञानमाता विद्यालय परिसर, तसेच कुरण (संगमनेर तालुका) व मौजे धांदरफळ बु. (संगमनेर तालुका) हे क्षेत्र हॉटस्पॉट पॉकेट म्हणून व सदरच्‍या क्षेत्राच्‍या मध्‍यबिंदु पासुन जवळपास 2 कि.मी चा परिसर हा कोअर एरिया म्‍हणून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सासऱ्याकडून तलवारीने वार करून जावयाची हत्या !

अहमदनगर Live24 ,9 मे 2020 :- घरघुती वादातून सासऱ्याने मित्रांच्या मदतीने दारुच्या नशेत लोखंडी पाइप व तलवारीने वार करून जावयास ठार केले. ही धक्कादायक घटना तालुक्यातील मुठेवाडगाव शिवारात शुक्रवारी पहाटे घडली. मयूर आकाश काळे (वय २८, मूळ कर्जत, हल्ली मुठेवाडगाव, ता. श्रीरामपूर) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी तालुका पोलिसांनी चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून तिघांना … Read more

बिग ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला एकाच दिवसात सात रुग्ण आढळले !

अहमदनगर Live24 ,8 मे 2020 :-  संगमनेर येथील एक महिला आणि संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील चार जण असे पाच जण कोरोना बाधित आढळून आल्यानंतर अवघ्या काही तासातच उर्वरित ५ पैकी ०२ व्यक्तींचा अहवाल प्राप्त झाला आणि या दोन्ही व्यक्ती बाधित असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे दिवसभरात जिल्ह्यात एकूण ०७ रुग्ण आढळून आले. आता आलेल्या अहवालानुसार बाधित … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘ते’संपूर्ण गावच केले होमक्वारंटाईन

अहमदनगर Live24 ,8 मे 2020 :-संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येेथे एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने चांगलीच दक्षता घेतली आहे. या गावातील 323 कुटुंबातील 1 हजार 629 ग्रामस्तांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे.  एक सरकारी वैद्यकीय अधिक्षक व तीन खाजगी डॉक्टर अशा चौघांचे देखील स्वॅब घेण्यात आले असून एकूण 23 जणांना नगर जिल्हा रूग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले … Read more