अहमदनगरकरांची चिंता वाढवणारी बातमी : बाधित व्यक्तीच्या संपर्कात व परदेशात प्रवासही न करता ‘त्या’ महिलेस झाली कोरोनाची लागण !

अहमदनगर :-  जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेल्या स्त्राव चाचणीमध्ये कोपरगाव येथील एक ६० वर्षीय महिला कोरोना संसर्ग बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, कोपरगाव येथील ती व्यकी राहत असलेला परिसर सील करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी स्वताची काळजी घ्यावी आणि विनाकारण घराबाहेर पडू नये. संपर्क टाळावा आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाला … Read more

अहमदनगर चा तिसरा रुग्ण ही झाला कोरोनामुक्त …शुभेच्छा देऊन घरी रवाना !

अहमदनगर :-  जिल्ह्यातील तिसर्‍या कोरोना बाधित रुग्णाचे 14 दिवसानंतरचे दोन्हीही चाचणी अहवाल निगेटीव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेने त्याला शुक्रवारी (दि.10) सायंकाळी शुभेच्छा देऊन घरी रवाना केले आहे. यशस्वी उपचार घेवून या अगोदर दोन रुग्ण घरी रवाना करण्यात आले असून आता तिसरा रुग्ण देखील घरी सोडण्यात आला आहे. तिसरा रुग्ण ही घरी परतल्याने आरोग्य यंत्रणेने समाधान व्यक्त … Read more

वाधवान परिवाराला कोणत्‍या तरी ‘बड्या नेत्‍याच्‍या’ सांगण्‍यावरुनच गृह विभागाने पत्र दिले !

अहमदनगर :-  खंडाळा ते महाबळेश्‍वर प्रवास करण्‍यासाठी वाधवान परिवाराला कोणत्‍या तरी ‘बड्या नेत्‍याच्‍या’ सांगण्‍यावरुनच गृह विभागाने पत्र दिले असल्‍याचे स्‍पष्‍ट होत आहे. पत्र देण्‍याचे धाडस एकटा गृह विभागाचा सचिव करु शकत नाही. त्‍यामुळे या पत्रामागील ‘बोलविता धनी कोण’? याची सत्‍यता मुख्‍यमंत्र्यांनीच जनतेसमोर आणावी अशी मागणी माजी मंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली आहे. गावपातळीवर विज … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी

अहमदनगर :- अहमदनगर जिल्ह्यातील 28 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  श्रीरामपूर तालुक्यातील एक गतिमंद असलेल्या २७ वर्षाच्या तरुणाचा ससून रुग्णालयात करोनाच्या संसर्गाने आज सकाळी मृत्यू झाला. त्याला ५ एप्रिलला ससूनमध्ये दाखल केले होते. त्याच्यावर उपचार सूरु असतानाच मृत्यू झाला. त्याला रक्तदाबाचा आजार होता. रुग्णाला प्राथमिक सर्दी, खोकल्याची लक्षणे दिसत असल्याने त्याला … Read more

अहमदनगरकरांसाठी दिलासादायक बातमी ; त्यांचे रिपोर्ट्स आले निगेटिव्ह !

अहमदनगर :- जिल्ह्यातील तिसऱ्या कोरोना बाधित रुग्णाचे १४ दिवसानंतरचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले आहे. त्यामुळे त्या व्यक्तीला आज घरी सोडण्यात येणार आहे. दरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयाने पुणे येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे कालपर्यंत १२२ व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने पाठविले होते. त्यापैकी १०३ अहवाल प्राप्त झाले असून ते सर्व अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यात या तिसऱ्या कोरोना … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ भागांत 14 एप्रिलपर्यंत अत्यावश्यक सेवेसह असणार संपूर्ण लॉकडाऊन !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झालेल्या नगर शहरातील मुकूंदनगर, भिंगारजवळील आलमगीर संगमनेर शहरातील काही भाग,  आणि जामखेड शहर हे कोरोनाच्यादृष्टीने हॉटस्पॉट पॉकेट म्हणून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी गुरूवारी घोषीत केले आहे. या सर्व ठिकाणी 14 एप्रिलला रात्री 12 पर्यंत अत्यावश्यक सेवेसह सर्व व्यवहार,आस्थापना, येणे आणि जाणे बंद ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांच्या … Read more

विनाकारण फिरणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल

अहमदनगर लाईव्ह24 टीम / कोपरगाव : संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करून रस्त्यावर फिरणाऱ्या पाच जणांविरुद्ध कोपरगाव शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केला असून यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,शहरात विनाकारण रस्त्याच्या मध्ये उभी राहून तोंडास मास्क न बांधता फिरताना पाच जण मिळून आले. त्याचे अशा कृ तीमुळे कोणलाही संसर्ग जन्य आजार पसरण्याचा … Read more

भाजप जिल्हाध्यक्ष म्हणाले राजकारण करण्याची ही वेळ नाही….

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधानांनी जनतेसाठी तीन महिन्यांचा धान्याचा साठा राज्य सरकारला उपलब्ध करून देऊनही पंतप्रधानांना बदनाम करण्यासाठी जनतेला या धान्यापासून वंचित ठेवण्याचे राज्य सरकारचे षडयंत्र आहे. केंद्राने पाठवलेल्या धान्याचे वितरण जिल्हाधिकाऱ्यांनी रेशन दुकानांतून त्वरित सुरू करावे, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. सर्वसामान्य जनतेला माणशी ५ किलो … Read more

शिवभोजन थाळी मिळणार घरपोहोच !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- देशात व राज्यात कोरोनाच्या उद्रेकाने हाहाकार पसरला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संपूर्ण राज्यात या संकटकाळात प्रभावी उपाययोजना करत आहेत. राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी ही बिकट परिस्थिती कौशल्याने हाताळली आहे. शिवसैनिकांना गरजुंना मदत करण्यासाठी प्रोत्साहित केले. लाॅकडाउनमुळे कोणीही उपाशी राहू नये, याचा विचार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता तालुका स्तरावरही आता पाच … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दुकानास आग लागल्याने लाखो रूपयांचे नुकसान !

नेवासा :- तालुक्यातील सोनई येथे आज पहाटे दुकानाला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले. याबाबत माहिती अशी की सोनई बाजारपेठेतील मनोज जनरल स्टोअर्स या दुमजली दुकानाला आज गुरुवारी पहाटे आग लागली. या आगीत दुकानातील लाखो रुपयांचे सामान, फर्निचर जळून खाक झाले. आगीवर नियंत्रण आणण्यासाठी मुळा कारखाना, ज्ञानेश्वर कारखाना व श्रीरामपूर नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबांनी प्रयत्न केले. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विषारी औषध पोटात गेल्याने तरूणीचा मृत्यू

कोपरगाव : तालुक्यातील कोकमठाण येथील तरुणीचा विषारी औषध पोटात गेल्याने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दि. ३१ मार्च रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली.सीमा प्रेमकुमार पासीय (वय ३०) असे तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सिमा हिला राहाता तालुक्यातील प्रवरा हॉस्पिटलमध्ये अत्यावस्थ अवस्थेत नातेवाईकांनी दाखल केले होते. तिथे उपचार सुरू असताना तिचा दुसऱ्या दिवशी ३१ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ८३ अहवालापैकी ८२ अहवाल आले निगेटीव्ह !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे पाठविण्यात आलेल्या 83 स्त्राव नमुन्यांचे अहवाल मंगळवारी रात्री उशीरा प्राप्त झाले.  त्यापैकी ८२ अहवाल निगेटीव आले असून एक व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले.  ही व्यक्ती बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील आहे. दरम्यान, बधवारी सकाळपर्यंत एकूण ८५ स्त्राव नमुने चाचणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले असून … Read more

‘होमक्वारंटाइन’च्या वादातून दोन कुटुंबात झाल्या मारामाऱ्या !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोना रोखण्यासाठी होम क्वारंटाइन केलेले दत्तू कचरू सदगीर व देवराम कचरू सदगीर (दोघेही मुथाळणे) यांना ‘तुम्ही होम क्वारंटाइन आहात, बाहेर फिरू नका’, असे सांगितल्याचा राग आल्याने या दोघांनी आपल्या घरातील १० जणांना बोलावून घेत बाळू पूंजा सदगीर यास बेदम मारहाण करत जखमी केल्याची घटना बुधवारी सकाळी मुथाळणेफाटा येथे घडली. जखमी बाळू … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना मुळे काम नसल्याने विधवा महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोना रोखण्यासाठी सर्वत्र लाॅकडाऊन सुरू असल्याने घराबाहेर पडता येत नाही. हाताला काम नसल्याने जगायचे कसे या विंवचनेतून दोन लहान मुले असलेल्या मजूर विधवा महिलेने गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने एका कार्यकर्त्यांच्या लक्षात ही घटना आल्याने तो अयशस्वी ठरला व या महिलेचा जीव वाचल्याची घटना सोमवारी अकोल्यात घडली. कोरोनाच्या या संकटात … Read more

श्रीरामपुरहून आलेले दोन कोरोना संशयीत बहाणा करत झाले गायब !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- मंगळवारी संध्याकाळी जिल्हा रुग्णालयात कोरोनाची चाचणी करण्यासाठी श्रीरामपुरहून आलेले दोघे कोरोना संशयीत केस पेपर काढून ऐनवेळी बहाणा करत गायब झाले. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. जिल्हा रुग्णालयात स्वतंत्रपणे कोरोना कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्या ठिकाणी कोरोना बाधीत रुग्णांच्या घशातील स्त्राव काढून तो तपासणीसाठी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोग … Read more

आनंदाची बातमी : जिल्ह्यातील ‘इतक्या’ शेतकर्‍यांना १४६४ कोटींची कर्जमाफी !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- एकीकडे कोरोना विषाणू संसर्ग आणि प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि इतर यंत्रणा व्यग्र असतानाही या यंत्रणांनी शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे मात्र जिव्हाळ्याने लक्ष दिले आहे. त्यामुळेच राज्यात अहमदनगर जिल्ह्यात महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची अंमलबजावणी सर्वांत चांगल्या पद्धतीने झाली आहे. जिल्ह्यातील २ लाख ३९ हजार ४०६ शेतकर्‍यांच्या कर्ज आणि व्याज माफीची १४६४ कोटी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ कोरोनाबाधित रुग्णाची प्रकृती चिंताजनक

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  श्रीरामपूर तालुक्यात आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्याची प्रकृती चिंताजनक आहे. श्रीरामपूर तालुक्यातील एका गावात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे संपूर्ण गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे.  शेजारच्या गावातील डॉक्टरांनी या रुग्णाची तपासणी केल्याने डॉक्टरांसह त्यांचे संपूर्ण कुटुंब तसेच रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 14 लोकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. सोमवारी … Read more

विनाकारण फिरताना शिवीगाळ करनाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अकोले : मुंबईहून आलेल्या व होम क्वरंटाईनचा शिक्का मारलेला असताना देखील कळसचे बस स्टॅण्ड व रोडवर विनाकारण फिरताना येथील दोघांना ग्रामविकास अधिकारी समजावून सांगत असता शिवीगाळ केल्याने दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील कळस येथील ग्रामविकास अधिकारी कचरू पुंजाजी भोर यांनी याबाबत अकोले पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून यात म्हटले आहे … Read more