संगमनेर : ‘ती’ आकडेवारी लक्षात घेता शहरासह तालुक्­यातील स्थिती गंभीरतेकडे जाणारी

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  अहमदनगर येथे दोन परदेशी व्यक्ती कोरोना रुग्ण असल्याचे निष्पन्न झाल्याने ते जिल्ह्यातील कोणाकोणाच्या संपर्कात आले याची माहिती जिल्हा प्रशासनाने काढली. त्याआधारे संगमनेरच्या प्रशासनाला माहिती दिली. त्यानुसार प्रांताधिकारी डॉ. मंगरुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित, तहसीलदार अमोल निकम, पोलीस निरीक्षक अभय परमार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, डॉ. संदीप कचेरिया यांनी पथकासह … Read more

परदेशी नागरिकांना मशिदीत आश्रय देणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  नेवासा : परदेशातील १० व्यक्तींना मशिदीत आश्रय देऊन जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी अहमदनगर जिल्ह्यातील नेवाशातील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही मशिदीचे ट्रस्टी आहेत. कॉन्स्टेबल प्रतापसिंह दहिफळे यांनी मंगळवारी याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. तीमध्ये म्हटले आहे की, काल मी तसेच, पोलीस निरीक्षक रणजित डेरे, उपनिरीक्षक बी. एस. दाते, … Read more

कोरोना लढ्यासाठी खासदार लोखंडेंनी केली एक कोटीची मदत !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  अहमदनगर : कोरोनाने संपूर्ण जगात कहर माजवला आहे. या लढ्यासाठी सर्वच थरातून मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ सुरू आहे. यामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनीही कोरोनाच्या लढ्यासाठी आपल्या स्थानिक विकास निधीतून एक कोटीची मदत जाहीर केली आहे. यासंबंधीचे पत्र नुकतेच खासदार लोखंडे यांनी केंद्रीय सांख्यिकी विभागाला दिले आहे. देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत … Read more

धक्कादायक : दिल्लीतील ‘त्या’ कार्यक्रमात सहभाग घेवून अहमदनगर जिल्ह्यात परतले ३४ जण !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- नवी दिल्ली येथील निजामुद्दीन येथे झालेल्या कार्यक्रमात सहभाग घेतल्यापैकी अहमदनगर जिल्ह्यातील ३४ जण असल्याचे निष्पन्न झाले असून त्यापैकी २९ जण परदेशी नागरिक आहेत. या परदेशी नागरिकांपैकी १४ जणांची स्त्राव चाचणी अहवाल अद्यापपर्यंत आले असून दोघांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत. आतापर्यंत ४३७ … Read more

कोरोनाला जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी घेतला ‘हा’ निर्णय

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- नगरमध्ये आणखी तिन व्यक्तींना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. याबाबतचा अहवाल पुणे येथील एनआयव्ही राष्ट्रीय विषाणू संस्थेकडून प्रशासनास काल मंगळवारी प्राप्त झाला. त्यामुळे जिल्हयात कोरोना बाधीतांची संख्या एकूण ८ झाली दरम्यान नागरिकांना आवाहन करताना जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जारी करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे प्रत्येकाने पालन करावे. परिस्थीतीचे गांभिर्य ओळखून … Read more

मोबाईल व इंटरनेटच्या सेवा पुढील तीन महिने मोफत देण्याची मागणी !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर लॉक डाऊन असताना अत्यावश्यक सेवा वगळून सर्व दुकाने बंद आहेत. नागरिकांना संपर्क साधण्यासाठी मोबाईल व इंटरनेट सेवा गरजेची झाली असून, या लॉक डाऊनमुळे सर्व सामान्य नागरिकांना मोबाईल रिचार्ज करता येणार नाही. यामुळे मोबाईल व इंटरनेटची सेवा खंडित न करता ती नागरिकांना पुढील तीन महिन्यांसाठी मोफत देण्याची मागणी लहुजी … Read more

कोरोनामुळे कोंबडी 50 रुपयांत !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  कोरोनाने हाहाकार उडवला असून याचा अनेक व्यवसायांना फटका बसला असला तरी कोरोनाचा कुक्कुटपालक शेतकर्‍यांना मोठा फटका बसला असून अवघ्या 50 रुपयांना एक या दराने कोंबड्या विकण्याची वेळ कुक्कुटपालकांवर आली असून मोठा तोटा सहन करण्याची वेळ आली आहे. बेलपिंपळगाव येथील शेतकरी रत्नदीप कांबळे शेतीला जोडधंदा म्हणून सुगुणा कंपनीतर्फे ब्रॉयलर कोंबडी पालनाचा व्यवसाय … Read more

यशवंतराव गडाख यांनी ‘जे’ केलं ‘ते’ जिल्ह्यातील बाकी साखरसम्राटांना जमेल का ?

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- ज्येष्ठ नेते व साहित्यिक यशवंतराव गडाख यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी वैयक्तिक म्हणून पाच लाखांची मदत जाहीर केली आहे.या रकमेचा धनादेश त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या खात्यावर जमा केला आहे. करोना या व्हायरसच्या आजाराशी लढण्यासाठी सरकारला मोठ्या निधीची गरज लागणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रातील जनतेने मुख्यमंत्री निधीसाठी यथाशक्ती मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे … Read more

मुस्लीम धर्माच्या प्रसारासाठी आलेल्यांकडून अहमदनगर जिल्ह्यात झाला कोरोना व्हायरसचा प्रसार !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जामखेडमधील तिघा जणांना  कोरोनाची लागण झाल्याचे एनआयव्हीच्या अहवालाने स्पष्ट झाले. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता आठ झाली आहे. रविवारी (२९ मार्च) नगरमध्ये सध्या वास्तव्यास असलेल्या दोन विदेशी नागरिकांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामधील एक व्यक्ती फ्रान्स, तर दुसरा आयव्हरी कोस्टचा आहे. या दोघांचे नगर शहरासह जामखेड येथे वास्तव … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांना शोधण्याची मोहिम गतीमान

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जामखेडमधील तिघा जणांना आज कोरोनाची लागण झाल्याचे एनआयव्हीच्या अहवालाने स्पष्ट झाले. यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता आठ झाली असून त्यापैकी एका रुग्णाला घरी सोडण्यात आले आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने जिल्हा प्रशासनाने आता या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्यांना शोधण्याची मोहिम गतीमान केली आहे. त्याचबरोबर, जिल्ह्यात २३ मार्च पर्यंत परदेशातून आलेल्या … Read more

शिर्डीच्या श्री साई बाबा मंदिर संस्थानाकडून मुख्यमंत्री सहायता निधीत ५१ कोटी जमा

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. या आवाहनानुसार शिर्डीच्या श्री साई बाबा मंदिर संस्थानाकडून आज मुख्यमंत्री सहायता निधीत ५१ कोटी रुपये जमा करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून श्री साई संस्थानाने ५१ कोटींचा निधी देण्याचे जाहीर केले … Read more

अहमदनगर जिल्ह्यावर कोरोनाचे संकट : पेशंट्सची संख्या झाली आठ !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर जिल्ह्यावर कोरोनाचे संकट ओढावले आहे. कोरोनाबाधित पेशंट्सची संख्या आठ झाली आहे. जामखेड मधील तीन व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. जामखेड येथे थांबलेल्या परदेशी व्यक्तींच्या संपर्कात या व्यक्ती आल्या होत्या. काल प्रलंबित असलेले अहवाल आज प्राप्त झाले. त्यात हे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील आणखी तीन व्यक्तींना कोरोनाची लागण !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जामखेड मधील तीन व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. जामखेड येथे थांबलेल्या परदेशी व्यक्तींच्या संपर्कात या व्यक्ती आल्या होत्या. काल प्रलंबित असलेले अहवाल आज प्राप्त झाले. त्यात हे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली आहे. आता नगर जिल्ह्यात करोना बाधितांची संख्या आठ झाली असून त्यातील एकाला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना संशयित तरुणी रुग्णालयात दाखल

File Photo

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- पनवेल येथून आलेल्या राहाता तालुक्यातील पुणतांबा येथील कोरोनाचे संशयीत असलेली एक तरुणीस काल नगरच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती पुणतांबा येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. पुणतांबा येथील ही तरुणी पनवेल येथे कामास होती. ती काल रात्री एका टँकरने आली असल्याचे तिने सांगितले. मात्र कोणत्या टँकरने आली … Read more

गंभीर परिस्थितीवर आक्रोशाची टाळी, तृतीय पंथीयांना कोणी देईल का भाजी पोळी ?

file photo

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दिनांक १४ एप्रिल पर्यंत संपूर्ण देशात लॉक डाऊन म्हणजेच संचारबंदी सदृश्य परिस्थिती लागू केली आहे. त्यामुळे अनेक शोषित-वंचित-दुर्लक्षित-उपेक्षित घटकांतील समुदायांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यात तृतीयपंथी समुदायाचा देखील समावेश आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एकूण १५० पेक्षा जास्त तृतीयपंथीसमुदाय आहे. समाजाने वाळीत टाकल्याने यांच्याकडे भीक मागून खाण्याशिवाय … Read more

अहमदनगर ब्रेकिंग न्यूज : ‘त्या’ ५१ मशिदी केल्या सील !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- जामखेड बारा दिवसांपासून जामखेडमधील काझीगल्लीतील मशिदीत राहणारे १० परदेशी व ४ इतर राज्यांतील अशा चौदा नागरिकांपैकी दोघांची कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह निघाल्याने तालुक्यात खळबळ उडाली. प्रशासनाने तातडीने पावले उचलत या चौदाजणांच्या संपर्कात आलेल्या ३१ लोकांना ताब्यात घेऊन तपासणीसाठी नगरला पाठवले आहे. यातील २२ जणांचे नमुने पुणे येथे पाठवण्यात आले आहेत. नऊ जणांना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : १५ कोरोना संशयीत अहमदनगरच्या जिल्हा रूग्णालयात दाखल

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- कोरोनाचा संसर्ग झालेल्या दोन रूग्णांच्या संपर्कात संगमनेर शहरातील १४ व तालुक्यातील एक असे एकूण १५ नागरिक आल्याने खळबळ उडाली आहे. ही बाब समोर येताच सोमवारी प्रशासनाने तत्काळ या पंधरा संशयितांना ताब्यात घेत अहमदनगरच्या जिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे. रूग्ण आढळून आलेल्या ठिकाणी नागरिकांना जाण्यास व येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे, … Read more

महत्वाची बातमी : रेशन धान्य खरेदीचा तो फॉर्म खोटा !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  रेशनवरील धान्य खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा फॉर्म हा अन्न,नागरी पुरवठा विभागाकडून वितरित करण्यात आलेला नाही. सद्या सोशल मीडिया व काही माध्यमावरून अशा प्रकारचा बनावट फॉर्म प्रसिद्ध केला जात आहे. त्यात काहीही तथ्य नसून असा कोणताही निर्णय अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून घेण्यात आलेला नसल्याने नागरिकांनी आपली फसवणूक टाळण्यासाठी असा कुठलाही फॉर्म भरून … Read more