आ. गडाखांच्या आंदोलनाची मागणी पूर्ण नेवासा तालुक्यातील बंधारे भरले

Ahmednagar News

Ahmednagar News : माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी आक्रमक पावित्रा घेऊन निर्माण केलेला दबाव, तसेच सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मुळा, भंडारदरा धरणातून मराठवाड्यासाठी सोडण्यात आलेल्या पाण्यातून मुळा, प्रवरा नद्यांवरील नेवासा तालुक्यातील सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरण्यात आल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. समन्यायी कायद्याच्या माध्यमातून मुळा व भंडारदरा धरण समूहातून मराठवाड्याला पाणी सोडण्यास नेवासा … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या तालुक्यात नागरिकांना परवडणारी घरे मिळणार ! आमदार म्हाडाची योजना राबवणार

Ahmednagar News

Ahmednagar News : स्वतःचे घर असावे, असे सर्वसामान्य नागरिकांचे स्वप्न असते; परंतु शहरात जागेचे भरमसाठ दर व घर बांधण्यासाठी येणार मोठा खर्च त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आपल्या घराच्या स्वप्नापासून कोसो दूर राहत आहे. त्यामुळे अशा नागरिकांच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार व्हावे, यासाठी म्हाडाची योजना राबविणार असून त्याबाबत नुकतीच म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी कोपरगाव नगरपरिषदेच्या बेट भागातील सर्व्हे क्र. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ महिला सरपंचाविरुद्ध ‘अविश्वास ठराव मंजूर

संगमनेर तालुक्यातील कौठेकमळेश्वर ग्रामपंचायतच्या महिला सरपंच मिरा रामदास भडांगे यांच्या विरुद्धचा दाखल अविश्वास ठराव सात विरुध्द दोन मतांनी मंजूर करीत त्यांना पदावरून हटविण्यात आले. याबाबत पिठासीन अधिकारी तथा तहसीलदार धिरज मांजरे यांच्या अध्यक्षतेखाली काल गुरुवारी (दि. ३०) सकाळी ११ वाजता विशेष सभा घेण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित विशेष सभेत महिला सरपंच मिरा भडांगे यांच्या विरुद्ध … Read more

कुझरची बैलगाडीला धडक ! ऊसतोड कामगार महिला व एक बैल गंभीर जखमी

कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे शिवारात आनंदवाडीच्या जवळ एका भरधाव क्रुझर गाडीने कर्मवीर काळे कारखान्याच्या ऊसतोड कामगाराच्या बैलगाडीला काल गुरूवारी (दि. ३०) सकाळी जोराची धडक दिली. त्यामुळे ऊसतोड कामगार महिला व एक बैल गंभीर जखमी झाला. अपघात घडल्यानंतर क्रुझरचा चालक तेथून पसार झाल्याची माहिती ऊसतोड कामगार सुपडू बाबु जाधव यांनी दिली. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, … Read more

श्रीरामपूर बाजार समितीच्या सभेत उपसभापतींचा ठिय्या

सभापती व प्रभारी सचिवांनी बेलापूर ग्रामपंचायतीची कराची रक्कम दिवाळीपूर्वी अदा न केल्याने उपसभापती अभिषेक खंडागळे यांनी येथील बाजार समितीच्या मासिक सभेत ठिय्या मांडला. यावेळी समितीच्या आवारात माजी सचिव किशोर काळे यांना झालेल्या मारहाणीवरून माजी सभापती व ज्येष्ठ संचालक सचिन गुजर यांनी सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला. त्यामुळे सभापती सुधीर नवलेंसह सत्ताधाऱ्यांची मोठी कोंडी झाली. बाजार समितीमध्ये … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चक्क पोलीस ठाण्याच्या आवारात दोन गटात हाणामारी

सोमठाणे नलवडे येथे अवैध दारु विक्री केल्याप्रकरणी गावचे उपसरपंच आकाश दौंडे यांचा योगेश दौंडे यांच्याशी वाद झाला. त्यानंतर आकाश दौंडे पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले असता पोलिस ठाण्याच्या आवारात दोन गटात मारामारी झाली. पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी मारामारी केल्याप्रकरणी ७ जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दौंडे यांच्या दोन गटात झालेल्या मारामारीत पोलिस उपनिरीक्षक सचिन लिमकर व … Read more

पाथर्डी, नगर, नेवासा, शेवगाव तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

पाथर्डी, नगर, नेवासा, शेवगाव तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या वांबोरी चारीचे पाणी काही दिवस बंद झाले होते. परंतु या भागाचे लोकप्रतिनिधी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी स्वतःची यंत्रणा कार्यान्वित करत सर्व लाभधारक पाझर तलावांसह मढीपर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी विशेष लक्ष घातले असून मुळा धरणावरील या योजनेची तिसरी मोटार देखील आता सुरू केल्याने लाभधारक शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा एकदा … Read more

जायकवाडीसाठी ‘मुळा’तून सोडलेला विसर्ग बंद ! आता नदीपात्रातील साठवण बंधारे भरून देणार, पुन्हा ‘इतके’ पाणी मुळामधून सोडावे लागणार

समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार अहमदनगर नाशिक जिल्ह्यातून जायकवाडीसाठी पाणी सोडले होते. आता मुळामधून सोडलेला विसर्ग बंद करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी ८ वाजता सामन्यायीचा कोटा पूर्ण झाला अन विसर्ग बंद केला. तब्बल पाच दिवस हा पाण्याचा विसर्ग सुरु होता. १ हजार ९६० दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीला सडले गेले. साठवण बंधारे भरून द्या :- मुळा नदीपात्रातील … Read more

Jayakwadi Dam : अवकाळी पाऊस ठरला फायद्याचा जायकवाडीला पाणी पोहोचताना …

न्यायालयाच्या आदेशानंतर नाशिक जिल्ह्यातील दारणा व गंगापूर धरणातून, तसेच अहमदनगरमधील धरणांमधून अखेर मराठवाड्यातील जायकवाडी धरणात पाणी सोडण्यात आले. धरणांमधून विसर्ग सुरू असतानाच रविवारी नाशिक शहरासह जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत सरासरी ५० ते ६० मिलीमीटर पावसाची नोंद केली. त्यामुळे जायकवाडीला पाणी पोहोचताना होणारा ३० टक्के अपव्यय अवघा १२ टक्क्यांवर आला आहे. यामुळे १८ टक्के … Read more

राष्ट्रपतींचे ‘असे’ झाले शनिदर्शन ! हॉटेल, दुकानांच्या गैरसोयींपासून तर परदेशी भाविकांना रस्त्याच्या कडेला ताटकळत उभे राहण्यापर्यंत..पहा एक रिपोर्ट

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू काल (दि.३०) अहमदनगरमध्ये शनिशिंगणापूर येथे शनी देवाच्या दर्शनासाठी आल्या होत्या. शनिशिंगणापूरच्या इतिहासात प्रथमच एक राष्ट्रपती शनी शिंगणापूर याठिकाणी आले आहेत. यावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. या दोन तीन तासात अनेकांना त्रासही झाला, दुकाने बंद राहिली. परंतु देशाच्या राष्ट्रपतींच्या संरक्षणार्थ या गोष्टी करणे योग्यच होते असे म्हणावे लागेल. राष्ट्रपतींच्या या … Read more

Ahmednagar Politics : माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले स्पष्टच बोलले ! खासदारकीची निवडणूक लढवणे वाटते तितकी सोपे नाही. ही निवडणूक विखे…

एकट्या पोखर्डी गावासाठी नऊ कोटी रुपयांचे विविध विकास कामे नामदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय दादा विखे पाटील व माझ्या प्रयत्नातून होत आहेत. सध्या खासदारकीच्या निवडणुका लढवण्याची काहींना घाई झाली आहे. पण खासदारकीची निवडणूक लढवणे वाटते तितकी सोपे नाही. ही निवडणूक विखे पाटील घराणेच लढवून जिंकू शकतात. अनेक लोक आम्ही केलेल्या विकास कामाचे श्रेय घेण्याचा … Read more

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले शनैश्वर मूर्तीचे दर्शन ! प्रसादालयात प्रसादाचे सेवनही…

महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज शनिशिंगणापूर येथे श्री शनैश्वर मूर्तीचे दर्शन घेत मनोभावे पुजा केली. यावेळी राष्ट्रपतींनी श्री शनैश्वर मूर्तीस तैलाभिषेकही केला. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) दादा भुसे, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, अतिरिक्त … Read more

‘त्या’ शेतकऱ्यांना तातडीने अग्रिम पिकविमा रक्कम द्या – आ. आशुतोष काळे

आ. आशुतोष काळे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे पिक विमा कंपनीला अग्रिम पिक विमा देण्याच्या सूचना कृषी विभागाकडून दिल्या आहे. कोपरगाव मतदार संघातील अनेक शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाचा अग्रिम पिक विमा रक्कम मिळाली असून अनेक शेतकऱ्यांना हि रक्कम मिळालेली नाही. त्यामुळे उर्वरित पिक विमाधारक शेतकऱ्यांना तातडीने अग्रिम पिक विमा रक्कम मिळावी, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी … Read more

नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पाऊस ! जायकवाडीला वाहून जाणारे पाणी वाचले

नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात नुकताच अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालकांनी दिलेल्या सुधारित आदेशामुळे नगर-नाशिक जिल्ह्याचे जवळपास पाऊन टीएमसी पाणी वाचले आहे. त्यात नाशिक धरणातील ४०३ दलघफु पाणी वाचले असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. सध्या अहमदनगर व नाशिकच्या धरणातून जायकवाडी धरणासाठी ८.०६ टीएमसी पाणी सोडण्यात … Read more

काळे कारखान्याकडून ऊसाला पहिला हफ्ता २८२५ रुपये शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

ऊस दराच्या बाबतीत नेहमीच जिल्ह्यात अग्रेसर राहिलेल्या कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याने २०२३-२४ च्या गळीतास येणाऱ्या उसाला प्रति मेट्रीक टन पहिली उचल सरसकट २ हजार ८२५ रुपये देण्याचे कारखान्याचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांनी जाहीर केले. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची सभा नुकतीच कारखान्याचे मार्गदर्शक … Read more

भंडारदरा धरणाच्या पाणलोटात अवकाळी पावसाने संकट ओढावले !

भंडारदरा धरणाच्या पाणलोटात रविवारी झालेल्या अवकाळी पावसाने आदिवासी बांधवांवर अस्माणी संकट ओढावले असून मोठ्या प्रमाणात झालेल्या गारपिटीने सुमारे ४० हेक्टर जमिनीवरील भातपिक भुईसपाट झाले आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात रविवारी वादळी वाऱ्यांसह जोरदार गारपिट झाली, गारपिटीचा साम्रद, लव्हाळवाडी, शिंगणवाडी व उडदावणे गावांना तडाखा बसला असून वादळी बाऱ्यासह पाणलोटासह संपूर्ण भंडारदरा परिसर अवकाळी पावसाने झोडपून … Read more

ट्रिपल इंजिन सरकारमधील मंत्र्यांनी शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी दिल्लीची वारी करावी !

समाजाच्या भल्यासाठी वृत्तवाहिन्यांनी नेत्यांची वायफळ वक्तव्य दाखविणे बंद केली पाहिजे, तरच राजकीय नेते असे वादग्रस्त बोलणे बंद करतील. आमच्यावर माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे सुसंस्कृत राजकारणाचे संस्कार आहेत. त्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही बेताल वक्तव्याबाबत सुरू आहे ते अत्यंत चुकीचे आहे, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले खासदार सुळे यांनी शिर्डीतील साई समाधीचे … Read more

Milk Rates : दूध दरवाढीसाठी पावडरची निर्यात करणे व शासनाने ५ रुपये लिटर मागे अनुदान देणे हाच पर्याय !

दूध दराचा प्रश्न गुंतागुतीचा आहे. याबाबत हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रालयात बैठक घेऊन निश्चित यात तोडगा काढला जाईल, अशी ग्वाही महसूल व दूग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी लेखी पत्र दिले. त्यानंतर सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांशी चर्चा करून हे उपोषण मागे घेतल्याचे माकपचे नेते डॉ. अजित नवले, जनसंघर्ष संघटनेचे संदीप … Read more