31 कोटी संपत्ती असणाऱ्या विखेंकडे नाही एकही चारचाकी !

शिर्डी :- विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील यांच्याकडे 31 कोटी एवढी संपत्ती असून ते या मतदारसंघातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार आहेत. भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील जंगम संपत्ती चार कोटी 69 लाख 762 रुपये, स्थावर संपत्ती 51 लाख 13 हजार 200 रुपये एवढी आहे. त्यांच्याकडे रोख रक्कम एक लाख 49 हजार 789 रुपये, बँक … Read more

आ.शिवाजीराव कर्डिले व विखे कुटुंबामध्ये भांडणे लावून देण्याचे काम

राहुरी : आ.शिवाजीराव कर्डिले व विखे कुटुंबामध्ये भांडणे लावून देण्याचे काम गेली काही दिवस करत होते.मात्र विखे कर्डिले समीकरण तोडण्याचे षडयंत्र आम्ही सामूहिकपणे हाणून पाडले.आमच्या दोन्ही कुटुंबांमधील वैचारिकता कायम राहणार आहे, असे प्रतिपादन खा. सुजय विखे यांनी केले.  राहुरी, नगर, पाथर्डी मतदारसंघातून भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार आ.कर्डिले यांचा उमेदवारी अर्ज भरला. यावेळी सभेत बोलतांना खा.विखे … Read more

संघर्ष टाळत विखे आणि थोरातांची एकमेकांना मदत करण्याची भूमिका !

जिल्ह्यातील दिग्गज नेते मानल्या जाणाऱ्या राधाकृष्ण विखे व बाळासाहेब थोरात या दोन्ही नेत्यांनी शिर्डी व संगमनेर या विधानसभा मतदारसंघांतील संभाव्य कौटुंबिक संघर्ष अखेर टाळला. संगमनेरात थोरातांविरोधात विखे कुटुंबातील कोणीही उभे राहिले नाही, तर तिकडे शिर्डीत विखेंविरोधात थोरातांच्या कुटुंबातील कोणीही अर्ज भरला नाही. यावरून विखे व थोरातांनी अनुक्रमे शिर्डी व संगमनेरमध्ये एकमेकांना ‘बाय’ दिल्याची चर्चा आहे.  … Read more

मला पाठबळ देवून राज्यात नवा इतिहास घडवा – राधाकृष्ण विखे पाटील

राहाता :- तीस वर्षाच्या राजकीय प्रवासात मतदारसंघाचा सर्वांगिण विकास साधताना मी कुठेही कमी पडलो नाही. मतदार संघाचा चेहरामोहरा बदलतानाच सर्वसामान्य माणसाचे हित जोपासण्याचे काम केले. भविष्यात रोजगार निर्मिती बरोबरच पश्चिम वाहिन्यांचे पाणी पूर्वेला वळविणे, निळवंडे धरणाचे पाणी जिरायती भागात उपलब्ध करून देणे आणि गोदावरी कालव्यांच्या कामाचा अजेंडाच आपल्या समोर आहे. हे काम करण्यासाठी मला पाठबळ … Read more

#Blog : ना. राम शिंदेचे राजकीय पालकत्व विखेंकडे !

अहमदनगर :- जिल्ह्याची भाजप आता विखे पाटील म्हणतील त्या दिशेला जाताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपाकडे तिकीटाची मागणी करणारे डॉ. सुजय विखे यांनी लोकसभा निवडणूक होऊन सहा महिन्यातच अहमदनगर भाजप स्वताच्या ताब्यात घेतल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात अतिशय वाईट वेळेत त्या वेळी भाजप वाढवली, मोठी केली आणि त्याचे फळ म्हणून २०१४ ला जिल्ह्यात ५ जागा भाजपला … Read more

विखे आणि शिंदेंना मंत्रिपदे मिळतील पण आ.शिवाजी कर्डीलेना नाही!

कर्जत-जामखेड मतदारसंघातून पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. जलसंपदामंत्री गिरिश महाजन, आ. मोनिका राजळे यांच्या उपस्थितीत शिंदे यांनी रॅली काढून मोठे शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. त्यानंतर जाहीर सभा घेण्यात आली. विखे, शिंदेंना मंत्रिपदे – कर्डिले भाजपचे आमदार कर्डिले यांनी मंत्री पदाचा मुद्दा उपस्थित करताच एकच हशा पिकला. ते म्हणाले, मुख्यमंत्री … Read more

आमदार वैभव पिचड आहेत ‘इतक्या’ कोटींचे मालक

अकोले – अकोलेत भाजपचे उमेदवार वैभवराव पिचड यांच्याकडे स्थावर – जंगम मालमत्ता व सर्व प्रकारचा उत्पन्नाचा “सोर्स’ ध्यानात घेता ते पाच कोटीचे मालक असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. तर जवळपास कोटीच्या आसपास कर्जाचाही बोजा आहे. स्वयंचलित अशी दोन कोटी 89 लाख तर वारसाने आलेली दोन कोटी 95 लाख रुपयांची मालमत्ता त्यांच्याकडे असल्याचे त्यांनी त्यात … Read more

कोपरगावात कोल्हे गटाला पडले खिंडार !

कोपरगाव :- तालुक्याच्या दक्षिण भागातील बहादरपूर व अंजनापूर येथील असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. बहादरपूर गावातील कोल्हे गटाला मोठे भगदाड पाडून असंख्य युवकांनी आणि कार्यकर्त्यांनी आशुतोष काळे यांचे नेतृत्व मान्य करत त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यामध्ये अंजनापूरचे भास्कर महाराज गव्हाणे, … Read more

पंचायत समिती कार्यालयात पदाधिकाऱ्याच्या केबिनमध्ये दारूपार्टी !

अकोले :- पंचायत समिती कार्यालयात एका पदाधिकाऱ्याच्या केबिनमध्ये गुरूवारी दारूपार्टी झाली असून याची चौकशी करण्याची मागणी करत आचारसंहिता भंगाची तक्रार गटविकास करण्यात आली. या तक्रारीवर शिवसेनेचे रामहरी तिकांडे, भाऊसाहेब गोर्डे, प्रमोद मंडलिक, प्रदीप हासे, राम सहाणे, संजय साबळे, सखाराम लांडे, मारुती आभाळे, रजनिकांत भांगरे, महेश हासे, संदेश एखंडे यांची नावे आहेत. रात्री ८ वाजता झालेल्या … Read more

पिचडांच्या भ्रष्ट राजकारणाचा पाडाव करण्यासाठी विरोधक एकत्र

अकोले : ‘पिचडांच्या भ्रष्ट व संधीसाधू राजकारणाचा पाडाव करण्यासाठी विरोधकांनी एकत्र येत पिचडांच्या विरोधात एकच उमेदवार द्यावा, या लोकभावनेचा आदर करीत माकपने आपला स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय स्थगित केला. कॉ. एकनाथ मेंगाळ, कॉ. नामदेव भांगरे व कॉम्रेड तुळशीराम कातोरे यांनी अर्ज दाखल करण्याची तयारी केली होती. मात्र, शुक्रवारी अखेरच्या दिवशी आपली उमेदवारी दाखल … Read more

आता संगमनेरात परिवर्तन अटळ !

संगमनेर : शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार, उद्योजक साहेबराव नवले यांनी शुक्रवारी (४ ऑक्टोबर) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी शिवसैनिकांसह भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी (आठवले गट), रासप मित्र पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपली उमेदवारी सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी व नागरिकांसाठी असून संगमनेरात परिवर्तन अटळ असल्याचे मत उमेदवार नवले यांनी या वेळी … Read more

तरुणाचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू

संगमनेर :- तालुक्यातील पानोडी येथील महेश रामनाथ पवार (वय २७) या तरुणाचा बुधवारी (२ ऑक्टोबर) सकाळी येथील केटी वेअरमध्ये पाय घसरुन पडल्यामुळे बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास पानोडी शिवारातील बाभूळदरा येथे महेश पवार हा तरुण आपल्या आई- वडिलांसमवेत शेतात सोंगणीच्या कामासाठी गेला होता.  यावेळी एक हजार फूट अंतरावर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : घरात घुसून महिलेवर बलात्कार

श्रीरामपूर :- शहरात रमानगर परिसरात राहणारी एक ३२ वर्षांची महिला तिच्या घरी असताना आरोपी विलास मायकल सिनगारे हा अनाधिकाराने घरात घुसला, दरवाजाची आतून कडी लावून महिलेला धरून तिच्याशी लगट करू लागला. महिलेने विरोध करताच चापटीने मारून, शिवीगाळ करून तुझ्या मुलाला व आईला जीवे ठार मारेन अशी धमकी देवून तिच्या इच्छेविरूद्ध वेळोवेळी बलात्कार केला. अत्याचारपिडीत तरूण … Read more

बाळासाहेब थोरांताविरोधात ‘ही’ व्यक्ती निवडणूक लढविणार

संगमनेर – संगमनेर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांना आव्हान देण्यासाठी शिवसेनेकडून श्रमिक उद्योग समुहाचे प्रमुख साहेबराव नवले मैदानात उतरणार आहेत. शिवसेनेने बुधवारी त्यांची उमेदवारी जाहीर केली असून गुरुवारी ते आपला उमेदवारी अर्ज भरणार आहे.  संगमनेरमधून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याचा दावा भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केला होता. मात्र, शिवसेनेने ही … Read more

सीताराम गायकर यांचे धोतर फेडू म्हणणाऱ्यांचा बदला जनता घेईल.

अकोले – अकोले ‘ऊसतोड मुकादमाचे काम करणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलाने आपल्या श्रमातून व कृतीतून आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. लोकहिताची कामे करत सामाजिक कार्यातून सीताराम गायकर मोठे झाले.  त्यांच्याबद्दल धोतर फेडण्याची भाषा वापरणे अशोभनीय आहे. चुकीचे बोलणे हाच त्यांचा धंदा आहे,’ अशी टीका माजी मंत्री मधुकर पिचड यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता … Read more

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर शाईफेक करणाऱ्या तरुणीचा शिवसेनेत प्रवेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या वेळी त्यांच्या ताफ्यावर शाई फेकणाऱ्या स्वाभिमानी विद्यार्थी परिषदेच्या प्रदेश उपाध्यक्ष शर्मिला येवले यांनी बुधवारी (२ ऑक्टोबर) शिवसेनेत प्रवेश केला.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री येथे येवले यांनी हातामध्ये शिवबंधन बांधण्यात आले. आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या समन्वयातून येवले यांचा शिवसेनेत प्रवेश झाला आहे. अकोले येथे १३ सप्टेंबरला … Read more

रास्ता रोको आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल

राहुरी ;- केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याच्या निषेधार्थ शासनाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून नगर-मनमाड मार्ग अडवणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. निर्यातबंदीच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या निवडक कार्यकर्त्यांनी मंगळवारी सकाळी ११ वाजता शासनाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढून रास्ता रोको आंदोलन छेडले होते.  जिल्हाधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा रवि मोरे, प्रकाश देठे यांच्यासह … Read more

जिल्हाभरात सात जणांनी केला उमेदवारी अर्ज दाखल

अहमदनगर :- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी गांधी जयंतीची सार्वजनिक सुटी असल्याने उमेदवारांनी अर्ज भरता आले नाही. मंगळवारी विविध मतदारसंघातून सात उमेदवारांनी त्यांचे नामनिर्देशनपत्र दाखल केले. श्रीरामपूर मतदारसंघात अशोक निवृत्ती बागुल यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले. नेवासा मतदारसंघात सुनिता शंकरराव गडाख यांनी एक अर्ज क्रांतिकारी शेतकरी पार्टी व एक अर्ज … Read more