राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त निर्माते-दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांची जमीन विकणे आहे… पोस्ट व्हायरल !

bhaurao karhade

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त निर्माते-दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांची जमीन विकणे आहे… अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि सिने जगतात एकच खळबळ उडाली. ख्वाडा, बबन आणि टीडीएम असे एका पाठोपाठ एक हीट चित्रपट देणारे भाऊराव मोठ्या आर्थिक अडचणीत आहेत असे या पोस्टवरून समजल्यानंतर चाहत्यांच्या काळजात धस्स झाले. भाऊराव जमीन विकू नका, आपण सर्व मिळून मार्ग काढू, … Read more

अहमदनगर जिल्ह्याची जलदायिनी असलेलया मुळातील पाणीसाठ्याचा लोखंडी दरवाज्याला स्पर्श !

mula dharan

येथील मुळा धरणातील पाणीसाठा १४ हजार ६२६ दशलक्ष घनफूट झाला असून धरणातील पाण्याने लोखंडी दरवाज्याला स्पर्श केला आहे. त्यामुळे मुळा लाभक्षेत्रात समाधानाचे वातावरण आहे. तर धरणात कोतुळ येथून ६२६० क्यूसेसने आवक सुरु असल्याची माहिती शाखा अभियंता राजेंद्र पारखे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. अहिल्यानगर जिल्ह्याची जलदायिनी असलेले २६ हजार दशलक्ष घनफूट क्षमतेच्या मुळा धरणात का ल … Read more

५ जणांच्या टोळक्याकडून चाँदबिबी महाल परिसरात काका पुतण्याला जबर मारहाण !

marhaan

चाँदबीबी महालाच्या डोंगरावर व्यायाम करण्यासाठी गेलेल्या चुलता, पुतण्याला ५ जणांच्या टोळक्याने आम्हाला ओळखले नाही का? आम्ही नगरचे बाप आहोत, असे म्हणत चाकू, लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत त्यांच्या चारचाकी वाहनाचे नुकसान केल्याची घटना बुधवारी (दि.२४) सायंकाळी ७ च्या सुमारास घडली. यातील एका आरोपीला नगर तालुका पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत संग्राम पोपट पोटे (वय ३०, … Read more

अ‍ॅन्टी करप्शनच्या अहमदनगर पथकाची कारवाई, लाच मागितल्याप्रकरणी मंडलाधिकारी देवकाते व तलाठी भापकरविरुद्ध गुन्हा !

anticurpction

लाच मागितल्याप्रकरणी सावेडीच्या मंडलाधिकारी शैलजा राजाभाऊ देवकाते व तलाठी सागर एकनाथ भापकर या दोघांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात २६ जुलै रोजी गुन्हा दाखल झाला आहे. अ‍ॅन्टी करप्शनच्या अहमदनगर पथकाने ही कारवाई केली. दरम्यान या कारवाईमुळे शासकिय वर्तुळात खळबळ उडाली आहे या प्रकरणी अ‍ॅन्टी करप्शनच्या सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, तक्रार व त्यांच्या नातेवाईकांचा सावेडी येथे १८ … Read more

कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात कालवड व वासरू ठार !

bibatya

कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा शिवारात बिबट्याचा वावर असल्याचे आढळून आले आहे. निमगाव गांगर्डा येथील विठ्ठल ढगे यांना त्यांच्या शेतात विहिरीवर बिबट्या दिसल्याने त्यांनी वनविभागाला कळविले. त्यानंतर पायाचे ठसांची वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडुन पाहणी करण्यात आली असता ते ठसे बिबट्याचेच असल्याचे आढळून आले. परिसरात बिबट्याने येथील शेतकरी उल्हास कर्डिले यांच्या गावरान गायीच्या कालवडीवर तसेच दादासाहेब गांगर्डे यांच्या गायीच्या … Read more

अहमदनगर मध्ये रेल्वे गाडीच्या धडकेत एकाजणाचा मृत्यू , परिसरात खळबळ !

dhadak

रेल्वे गाडीची धडक बसून एकाचा मृत्यू झाल्याची घटना निंबळक शिवारात गुरुवारी (दि.२५) सायंकाळी घडली. गौतम रामदास भोसले (वय ४०, रा. खारे कर्जुने, ता.नगर) असे मयताचे नाव आहे. गौतम भोसले हे निंबळक शिवारात असलेल्या रेल्वे गेट जवळ रेल्वे मार्गा शेजारी गुरुवारी सायंकाळी जखमी अवस्थेत आढळून आले. त्यांना त्यांचा नातेवाईक सोन्या सुनिल पाचारणे (रा. वडगाव गुप्ता) याने … Read more

जामखेड शहराला पाणीपुरवठा करणारा भुतवडा तलाव व भुतवडा जोडतलाव ओव्हर फ्लो !

talaw

जामखेड शहराला पाणीपुरवठा करणारा भुतवडा तलाव व भुतवडा जोडतलाव ओव्हर फ्लो झाला. यामुळे जामखेड शहर व पाच वाड्यावस्त्यांचा वर्षभराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. मागील तीन वर्षापासून तलाव ओव्हर फ्लो होत असतो, त्यासाठी सप्टेंबर महिन्याची वाट पहावी लागत असे, यावर्षी जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला, यामुळे जोड तलावासह दोन्ही तलाव पुर्ण क्षमतेने शंभर टक्के भरले … Read more

शेतातील खुरपणी असो की कपाशी लागवड असो महिलांमध्ये एकच चर्चा लाडक्या बहिणीचा फार्म भरला का ?

khurapani

महायुती सरकारच्या माध्यमातून राज्यातील सर्व महिला भगिनींसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना घोषित करण्यात आली आणि शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्रची जुळवा जुळवा करत फार्म भरून देण्यासाठी सेतू केंद्रात अंगणवाडी सेविकांकडे एकच गर्दी केली. शेतातील खुरपणी असो की कपाशी लागवड असो महिलांमध्ये एकच चर्चा लाडक्या बहिणीचा फार्म भरला का … Read more

विरोधकांकडे कुठलेही भांडवल आता राहील नाही, महाविकास आघाडीचा ढोंगीपणा उघड करण्‍याची हीच संधी !

vikhe patil

लोकसभा निवडणूकीत झालेल्‍या चुका पुन्‍हा होवू देवू नका, स्‍वत:च्या गावापासून काम सुरु करा. येणा-या काळात विरोधकांच्‍या नकारात्‍मक प्रचाराला तुम्‍हाला तेवढ्याच ताकदीने उत्‍तर देण्‍याचे काम करायचे आहे. विरोधकांकडे कुठलेही भांडवल आता राहीलेले नाही. महाविकास आघाडीचा ढोंगीपणा उघड करण्‍याची हीच संधी आहे. केंद्र आणि राज्‍य सरकारच्‍या योजनांचे मोठे काम आपल्‍याकडे आहे. पुढील साठ दिवसात प्रत्‍येक गावापर्यंत योजना … Read more

शाळा सुरू होऊन ३० ते ४० दिवस उलटूनही, श्रीगोंद्याच्या जि.प. शाळेतील विद्यार्थी गणवेशाच्या प्रतीक्षेत !

school

जून महिन्यात विद्यार्थ्यांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून, शाळा सुरू होऊन ३० ते ४० दिवस उलटून गेले असताना देखील श्रीगोंदा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील सुमारे १८ हजार विद्यार्थी गणवेशाच्या प्रतीक्षेत असल्याने विद्यार्थ्यांना जुन्याच गणवेशावर शाळेत जावे लागत आहे. ज्या विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला आहे, त्या गणवेशाचा दर्जादेखील सुमार असल्याचे पालकांमध्ये बोलले जात आहे. तर अद्यापपर्यंत … Read more

भीमानदी पात्रातील पाण्याच्या विसर्गात वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा !

bhima nadi

पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे भीमा व घोड या नद्यांना महापुर आला असून, गुरुवारी (दि.२५) रोजी संध्याकाळी भिमा नदीला ८० हजार ८७८ क्युसेकने विसर्ग सुरू असून, रात्रीतून विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असल्याने महसूल प्रशासनाने भीमा व घोड नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. घोड धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे काष्टी, सांगावी दुमाला तसेच नदीकाठच्या … Read more

शेअर मार्केटमध्ये इसरवाडे यांची पाच लाखांची फसवणूक, शेअर ट्रेडिंग व्यावसायिकावर शेवगाव पोलिसांत गुन्हा दाखल !

fraud

शेवगाव तालुक्यातील गदेवाडी येथील शेअर मार्केट ट्रेडिंगचा व्यवसाय करणाऱ्याने एका एजंटने गदेवाडीसह परिसरातील अनेकांना गंडा घालून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, लाखो रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गदेवाडी (ता. शेवगाव) येथील शेअर मार्केट व्यवसाय करणाऱ्या तिघांविरुद्ध जय शिवसंग्राम पक्षाचे जिल्हाध्यक्ष नवनाथराव इसरवाडे यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. इसरवाडे यांनी शेवगाव पोलिसांत … Read more

तालुक्यातील रत्नापूर, धोत्री, मोहरी, नायगाव चार तलाव ओव्हरफ्लो, तालुक्यातील इतर भागात मात्र पावसाची प्रतीक्षा कायम !

jamkhed

आवर्षण प्रवण दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या जामखेड तालुक्यात मोहरी, नायगाव लघु पाटबंधारे तलाव शंभर टक्के भरले असून, परिसरातील इतर तलावांत पावसाअभावी पाण्याची आवक कमी असल्याने दमदार पावसाची प्रतीक्षा बळीराजाला लागली आहे. गतवर्षी दुष्काळजन्य परिस्थिती तालुक्यात निर्माण झाली होती. त्यावेळी तालुक्याला संजीवनी ठरलेल्या मोहरी तलाव शंभर टक्के भरल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे … Read more

मुळा धरणाचा पाणीसाठा ५० टक्क्यांवर, राहुरी, नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण !

mula dharan

अखेर मुळा धरणाचा पाणीसाठा ५० टक्क्यांवर पोहचल्याने राहुरी, नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. सायंकाळी ६ वाजता कोतूळ येथील पाण्याची आवक मंदावली असली तरी मुळा धरणात १२ हजार ९८० दशलक्ष घनफुट झाला असून धरण ५० टक्के झाले आहे. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी रात्री झालेल्या प्रचंड प्रमाणात तुफानी पर्जन्यवृष्टी झाल्याने धरणाचा पाणीसाठा वेगाने वाढला. … Read more

महावितरणवर गलथान कारभाराचा आरोप, बहिरवाडीत विजेचा शॉक बसून शेतकऱ्याचा मृत्यू !

shock

नगर तालुक्यातील बहिरवाडी येथील शेतकरी रवींद्र बाळासाहेब पाटोळे (वय ३२), या तरुण शेतकऱ्याचा विजेचा शॉक बसून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवार (दि. २५) रोजी दुपारी घडली. घटनेनंतर ग्रामस्थांनी आक्रमक होत मृतदेह महावितरण कंपनीच्या जेऊर उपकेंद्र कार्यालयात आणल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. बहिरवाडी येथील शेतकरी रवींद्र पाटोळे हे शेतामध्ये काम करत असताना विजेचा शॉक बसल्याने … Read more

महाराष्ट्रातल्या जनतेने भाजपची घमेंड जिरवली : बाळासाहेब थोरात !

thorat

लोकसभा निवडणुकीत सर्वच म्हणायचे भाजपच विजयी होईल, मात्र मतदारांनी सगळे चित्रच उलटे करून दाखवले. ही कमाल फक्त जनताच करुन दाखवू शकते. भाजपचा अहकांर, घमेंड सगळा मतदारानी जिरवला. देशपातळीवर निवडणुकीत भाजपची घमेंड अहंकार जनतेने जिरवून दाखवला. भारतात एवढे पुढारी नाही एवढे पुढारी श्रीगोंदा मतदारसंघात आहे, असे प्रतिपादन माजी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. अहमदनगर येथे … Read more

डिंभे-माणिकडोह बोगद्याला मंजुरी द्या, खा. नीलेश लंके यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र !

lanke dharan

पावसाच्या अतिरिक्त वाहून जाणाऱ्या पाण्याचा व कुकडी प्रकल्पामधील पाण्याचा पुर्ण क्षमतेने वापर होऊन जल संकट कमी होण्याच्या दृष्टीने डिंभे धरण ते माणिकडोह धरण बोगद्याचे काम त्वरीत सुरू करण्यासाठी आदेश जारी करण्याची विनंती खा. नीलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या पत्रात नमुद करण्यात आले आहे की, कुकडे या संयुक्त … Read more

मुख्यमंत्र्यांनी आता ‘लाडका आंदोलक’ योजना आणावी, लक्ष्मण हाके यांची मनोज जरांगे यांच्यावर टिका !

lakshaman hake

गावगाडा चालवणारे तुम्ही आमचे दहा टक्के लोक पुढे चालले तर तुम्हाला बघवत नाही, राज्याच्या सभागृहामध्ये आमचे प्रतिनिधीत्व कुठे आहे, नालायकांना बाजुला सारून आम्ही आता लायक माणसं विधानसभेत पाठवू, दंगलीची परंपरा कोणाची आहे, मराठावाडा नामांतराच्या वेळी कोणी दंगली घडविल्या, असा प्रश्न लक्ष्मण हाके यांनी विचारला. तसेच, मुख्यमंत्र्यांना सांगा की लाडकी बहीण आणली, लाडका भाऊ आणला, आता … Read more